Friday 29 November 2013

आम्ही सारेच विनोदी!

आम्ही सारेच विनोदी!


ह्या मथळ्यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. सारेच विनोदी, अगदी आई पासून, आम्ही पाच भावंडे, आमची भाचें मंडळी ते नातवंडे, सारे विनोदी! एवढेच कशाला इतर नातेवाईक देखील विनोदी आहेत हो.





विनोदाला बरेच अंग असतात. विनोदाचे अनेक प्रकार असतात. काही विनोद किंवा गंमती हलक्या  फुलक्या  'प्रासंगिक ' स्वरूपांच्या (इंग्रजीत ज्याला 'situational humour' म्हणतात) ज्यात थट्टा मस्करीचा भाग अधिक, पण आक्रमक पवित्रा कधीच नाही, टोमणे मारणे नाही आणि कोणाला दुखविणे वा  खाली पाडणेही  नाही  किंवा कोणाची  टिंगल करणे नाहीकाही माणसेच मुळात विनोदी असतात.  तर काही माणसांत उपहास (SATIRE) ठासून भरलेला असतो. अशी माणसे कळत- नकळत दुसऱ्यांना दुखावतात. आमच्यात मात्र   'TO HIT BELOW THE BELT' हा प्रकार नाही. आम्हाला 'sarcasm' आणि 'farce' चांगला समजतो. म्हणूनच आमच्यात राग - रुसवे नाहीत. आम्हाला 'sarcasm' आणि 'farce' चांगला समजतो.म्हणूनच आमच्यात राग - रुसवे नाहीत.



प्रासंगिक विनोदावरून आठवले. त्याचे असे झालेमी समोरच्या सोनू मावशींकडे होतो (तसे त्या आमच्या आईच्या मावशी, पण आम्ही सारेच त्यांना मावशी म्हणत). दुपारची वेळ होती. बाहेरून  कोणीतरी दार ठोठावले. मी दार उघडले.
 " अहो मावशी, दुध वाला आलाय," मी ओरडून सांगितले खरे, पण मावशी दुधासाठी टोप घेनुच येत होत्या
" बाय, आज कितना दुध डालूं ?"
 "नेहमी इतना, लिटर। उद्याके लिए जादा। पर तू पक्का आयेगा रे?"
" हाँ माँजी!"
" आज आया वैसा लवकर आयेगा? पक्का?"
"हाँ,हाँ, बिल्कुल बजे!"
" बजे आना हँ  जरुर, नही तो क्या होगा मै तेरेपर बैठूंगी और तू आयेगा नहीं।"
भैयाचा चेहरा बघण्या सारखा झाला होता

माझ्या मावस  भावानी तर कहरच केली. असेल तो ९वीत त्या वेळी. हिंदीच्या एका निबंधात असे काही लिहिले, '--- मैने झुरलको देखा और डरसे पलंग परसे खाली उदी मारी --"  बिचाऱ्याला हिंदी मध्ये झुरळाला काय म्हणतात हे माहित नसावे. तसेच  'नीचे' आणि 'कुदना' ह्या शब्दांची जाण नसावी. असो!


  • मी 
अशाच एका प्रासंगिक विनोदा पासून आपण सुरुवात करूयाआणि ती देखील माझ्या बाबतीत घडलेल्या घटने पासूनत्याचे असे झालेमी ऑफिस निघत असतांना मला मुलीचा फोन आला, " हेलो (hello)  डॅडी (daddy), मला ओल्या पातीचा ---म्हणजे हुळ पातीचा ----" (मला नीटसे ऐकला आले नव्हतेवाटले ओल्या पातीचा चहा पाहिजे असावासर्दी झाली असेल.) दादर ते माटुंगा मी पायपीट करीत जाऊन दोन जुड्या ओल्या पातीचा चहा घेऊन घरी गेलोमैथिली झोपली होतीमी तिला ह्या प्रकारे उठवले, "गायीला चारा घ्यागायीला चारा!" 
मैथिलीने ताडकन उठून माझ्या हातातील पिशवी घेतलीपिशवीतील ओल्या पातीचा चहा काढला आणि,
"हे काय ड्याडीपाती आहेत पण कांदे कोठे आहेत?"
"ओल्या पातीच्या चहाला कांदे कोठे असतात?"
" काय, ओल्या पातीचा चहा कोणी सांगितले होते चहा आणायलाफ्राईड राइस बनवण्यासाठी चहा घेऊन काय करूमी सांगितले होते हुळ पातीचा कांदा आणण्यास आणि आला चहा!"
नंतर पुढचे चांगले चार-पाच दिवस आम्ही ओल्या पातीचा चहा पिहित होतोआणि त्या रात्री फ्राईड राइस देखील झालाचकांदे आणण्यासाठी ठाकुरद्वार ते धोबी तलाव पर्यंत माझी झालेली परत पायपीट हा एक वेगळा भाग.


  • आई आणि पुष्पा
आमची सर्वात मोठी बहिण पुष्पा, जगासाठी असेल ती 'मोठी' लेखिका, पत्रकार पण कधी कधी वागायची  एखाद्या लहान  मुला प्रमाणे. मला एक किसा आठवतो.  आमची आई आपल्या मुलांच्या बाबतीत फारच possessive! आम्हा सर्वांची काळजी फार करायची. एकदा पुष्पा आणि माझी दुसरी बहिण, निशा लोणावळ्या गेल्या होत्या. परत येताना त्यांना बराच उशीर झाला. रात्रही फार झाली. आई मला म्हणाली, " त्यांना बघाला जाऊया ?"
" त्या जीपने येत आहेत. त्यांना शोधण्या साठी आपल्याला एक हेलीकॉप्टर हवे. तेंव्हा फोन करून हेलीकॉप्टर मागवू का? पण आपल्या कडे फोन आहे कोठे?"
पण गंमत तर नंतर आली. घरी परतल्यावर आपल्याला उशीर कसा झाला ते सांगितले. जीपचा टायर पंक्चर कसा झाला, वगैरे,वगैरे. कशी धमाल केली ते सांगितले.  सकाळी खाल्लेल्या चिकन-बिर्याणीची चव कशी जिभेवर राहिली आहे  हेही सांगितले. पण आईचा राग काही शांत झाला नव्हता.
पुष्पा चुलीवरील भांडी उघडून पाहू लागली. "हे काय, आई? आज सोमवार आहे, तुला माहित नाही का? मला फराळाचे काही ठेवले नाहीस? --"
"काय ग, सकाळी चिकन बिर्याणी आणि मटण चॉप खाऊन तुझा उपवास कसा काय?", मी विचारले. मग आंम्ही सगळे हसू लागलो. पुष्पाला 'शांत' असल्याचे  सर्टिफिकेट आमचे एक चुलत काका नेहमी देत. सुंदर काका नवसारीला असत. अधून-मधून मुबईला येत. काका पुष्पाला बटाट्याची भाजी बनवण्यास सांगत आणि तिने केलेली लाल भडक भाजी त्यांना फार आवडे. आणि म्हणूनच त्यानीं तिला 'शांत' असल्याचा किताब दिला असावा . म्हणतात ना 'आवडत्याचे---'  आम्ही मात्र तिने केलेले खाण्याचे प्रायोगिक पदार्थ घाबरत घाबरतच खात. एकदा तिने चॉकोलेट केले, केवळ वाटीभर. निशा,शुभा, आई आणि मी(उषाचे लग्न झाले असावे त्या वेळी), साऱ्यांनी मिळून चाखले असेल जेमतेम पाव वाटी. 'आवडले नाही' असे तीस सांगितले. 'To call a spade, a spade' (मला वाटते 'spade', म्हणजे फावड्याला सारेच फावड़ा म्हणतात, नव्हे का?) ही आम्हाला मिळालेली शिकवण. " काय वाईट आहे. का आवडले नाही? ", असे म्हणत पुष्पाने राहिलेली ३/४ वाटी संपविली.
 टी. व्ही.त  पाहिले , 'आम्ही सारे खवय्ये' मध्ये असावे, तिने केलेले कारल्याचे आणि दुधी भोपळ्याचे आईस क्रीम. आमच्या ओलखीच्या एक बाईने मला विचारले, "काय मग विनय, खालेस का, पुष्पाने केलेले कारल्याचे आणि दुधी भोपळ्याचे आईस क्रीम?" " नाही हो!"
मी अजून तरी तिच्या हातचे हे पादार्थ खाल्ले नाहीत. पण माझ्या मामी आणि मामे भाऊ नृपाल सांगतात, " खरोखर  दोनही आईस क्रीम स्वादिष्ट होते आणि तिने केलेले  जेवण देखील." तुम्ही म्हणाल ' घरकी मुर्गी डाल बराबर।" पण  म्हणतात ना , पाण्यात पडल्यावर ---.


  • बेबी ताई  

 

 आमची एक मावस बहिण होती, बेबी ताई. मावस भावंडात सर्वात मोठी म्हणून ताई पण बेबी का? कोण जाणे. ती लोकांना टोपण नावे देण्यात पटाईत! तिने दिलेली टोपण नावे कल्पक आणि नाविन्यपूर्ण (INNOVATIVE ) असत.
मला अजून ती दिवाळीची रात्र आठवते. आम्ही सारे देवा आनंदचा 'हम दोनो' हा चित्रपट पाहायला गेलो होता. लीला चिटणीस ह्यांची एन्ट्री होते होतेच आणि बेबी ताई ओरडली, " ही बघा आली सुमंतची आई! रडायला तयार रहा तुम्ही सारे. थोड्या वेळात ती मरणार!" आम्ही सारे हसलो खरे पण इतर प्रेक्षक आमच्यावर खेकचले. सुमंतच्या आईत आणि लीला चिटणीस ह्यांच्या मध्ये विलक्षण साम्य तर होतेच पण लीला चिटणीस बऱ्याच चित्रपटात आजारी खंगलेल्या जीर्ण-शीर्ण व्यक्तीची भूमिका सादर करीत असे तर बिचारी सुमंतची आई आपल्या आयुष्यातच ही भूमिका करीत होती. पुढे आम्हाला कोणत्याही चित्रपटात लीला चिटणीस दिसल्या की सुमंतच्या आईची आठवण होणे  आणि बेबी ताईचा हा किस्सा आठवून हसू येणे स्वाभाविक होते. एकदा मार खाण्याची वेळ देखील आली पण शिव्या खाण्यावरच निभावले,  "सा #$%, तुम लोगोने पिक्चर देखी होगी। इतना सीरियस सीन चल रहा है और आप लोग हासते हो? चुपचाप बैठो वरना मार खाओगे।"

माझ्या आईचा एक मावस भाऊ होता. ताईने त्याला टोपण नाव दिले 'गामडू मामा'. 'गामडू' म्हणजे नेमके काय? ताईने सांगितले, "गबाळ्या - गामडू ." आणि खरोखर तो गबाळेपणाचा एक प्रतिरूप किंवा सार (EPITOME) होता. माझे चुलत-चुलत काका, केशव काकांना 'केशव राव वाजले किती' असे नाव तिनेच दिले असावे. बिचारे आमचे काका!
एकदा मी तिला विचारले, "काय ताई, तुला ही  टोपण नावे सुचतात कशी?"
"विनय, 'टोपण नावे देणे' ही आपल्या जातीची खासियत आहे. जातीत कित्येकांना नावे पडल्यात, माहित आहे ना? - कानबोका, बाबा-नळी, हगऱ्या बंड्या, चोर बाळ्या, वश्या बोकड, बहिरा राव, चपल्या, कावळ्या, बदक - काय, काय ही नावे! तुझा तो हा आहे ना  -- त्याच्या आईला बदकी म्हणतात. कोण ते कळाले ना? काही घराण्यालाच नावे आहेत - बोकडांकडचे मांजऱ्याकडचे. बाबा नळीला नाव कसे पडले माहित आहे? लहानपणी त्याने एका लग्नात, गणपती पूजनाच्या वेळी वडिलांना 'बाबानळी, मला नळी पाहिजे' असे हटाने सांगितले आणि तेंव्हा पासून तो झाला'बाबा नळी '. " 'बाबा लगीन' झपाटलेला ह्या चित्रपटातील हे वाक्य महेशने बाबा नळी वरूनच घेतले असावे.

कित्येक वेळा आपण सारे त्या व्यक्तींना फक्त त्यांच्या टोपण नावानेच ओळखत असतो आणि त्यांची खरी (मूळ) नावे आपल्याला माहितही नसतात. एकदा हे कानबोके गृहस्त माझ्या अंबरमामाकडे गेले. माझ्या मामे  भाऊ, महेशने त्यांचे असे स्वागत केले, " Oh, Mr. Kanboke do come in. We were expecting you,sir. Daddy! Jenma! Mr. Kanboke has already come."
हे कानबोके तेंव्हा आपल्या कानांपासून नका पर्यंत नक्कीच लाल बुंद झाले असवेत
आणि  माझ्या मामा मामीने त्याला समज दिल्या नंतर तो असे ओरडलाही असेल, "Damn it! I wasn't aware of his real name."

महेशची आणखी एक गंमत आठवते. त्याचे असे झाले. एका लग्नात आम्ही सारी भावंडे एक ग्रुप करून बसलो होतो आणि बाजूलाच दुसाऱ्या ग्रुप मध्ये सारी मोठी माणसे, मावशी-मामा लोक. त्या ग्रुप मधून आवाज आला,
"अरे तुम्हाला समजले का? आतांचा बाळा घेळाआ."
महेश ओरडला, " काय? बाळ्या कधी गेला? आपल्याला कुणीच कसे सांगितले नाही?"
"अरे, ते वेगळ्या बाळ्या विषयी बोलत. आपल्या बाळ्या बद्धल नव्हे," मी त्याला सांगितले
मग तो जे म्हणाला त्याने आमि सारेच अक्षरशा उडालोच
" अरे हं, तो त्यांच्यात एकटाच बिचारा राहिला आहे."
  • निखील  
माझा भाचा, निखिल हा आमच्या भाचे मंडळीत कदाचित सर्वात ठेंगणा असावा. तो त्यावेळी कॉलेजात होता, फर्स्ट इयरला असावा  . मला म्हणाला, " मामा, माझ्या साठी बायको शोधशील तेंव्हा माझ्या सारखी बुटकी नको. माझ्या पेक्षा १ - २ इंच उंचच बघ."
"का रे?" मी हसून विचारले.
"मामा, मी जर बुटक्या मुलीशी लग्न केले तर आमची मुले आम्हाला सापडणार नाहीत."
"काय?"
"ती कपाटा खाली किंवा फ्रीज खाली लपतील ना!"
निखीलची आणखी एक गंमत. आम्हाला नातलग फार. आम्हा भावंडा मध्ये  ह्या सारा गोतावळ्या संबंधी   मनांत गोंधळ कधीच नव्हता. आईला तीन मामा - अनामामा, रामजीमामा, मोरामामा आणि दोन मावश्या - सोनुमावाशी आणि चंपूमावशी - मामांना आणि मावश्याना किती मुले व त्यांच्या मुलांना किती मुले, आईची आठ भावंडे ( आमचे तीन मामा व पांच मावश्या), आईची चुलत भावंडे, चुलत-चुलत भावंडे, आमची चुलत भावंडे, वगैरे वगैरे -कोणाचे कोण - सारे काही मनात एकदम क्लिअर पिक्चर. बघाना, अलीकडे केतकी कोठारे -  जयकर, Face Book friend झाली ( तिला, इंग्रजीत तुम्ही distant cousin असे म्हणाल, पण आमच्यात 'distant' म्हणजे 'लांबचा' हा  प्रकार नाही) व ती  माझी नेमकी कोण हे मला माहित आहे. एका लग्नांत माझ्या मावज भाऊ, उदयने मला विचारले " तो कोण?" " धोंडू मामांचा मधु, मधु कोठारे," "तू बरे सगळ्यांना ओळखतोस!" हे झाले सारे आमच्या पूर्ते. असो. पण  आमची मुले आणि भाचे मंडळी, त्यांचे काही खरे नाही. तर सांगत होतो निखीलची गंमत. माझी मावशी, प्रमिमावशीला भाटिया हॉस्पिटलात ठेवण्यात आले. मी निखीलला तसे फोन वरून सांगितले. गोंधळ नको म्हणून मी त्याला म्हणालो, "  प्रमिमावशी लक्षात ठेव प्रमि! प्रमिल मामी नाही, लातामामी-प्रमिलमामी मधल्या प्रमिलमामी नाहीत तर प्रमि मावशी. कळले?" घालाचा तो गोंधळ त्याने घातलाच. माझ्या बहिणी, उषा (त्याची आई) आणि निशा भटियात जाउन प्रमिला धाराधरला शोधू लागल्या प्रमिला प्रभाकरला शोधाचे सोडून. आमच्या गोतावळ्यात तुम्हीही फार गोंधळात असाल. मात्र माझ्या मुलीचे, मैथिलेचे, पारडे थोडे जड( थोडेच बरे का). माझ्या मावज बहीणीचा मुलगा कुणाल विजयकर एका सेटवर तिला भेटला. हाय - हेलो झाले. त्याचा सोबत असलेल्या सायरस भारुचाने त्याला विचारले, " Who is this ?"  कुणाल म्हणाला, "She is Maithili.Oh, she is my niece. And Maithili, this is my friend, Cyrus."
"What rubbish! I am your cousin."


  • संजीव  
सर्वात विनोदी असेल तर तो माझा भाचा, संजीव. तो लहान होता, सात - आठ वर्षाचा असेल. आमच्या घरी आला होता. एकटक आमच्या सिलिंग फ़ेनकडे (ceiling fan) बघत होता. " आजी, तुमचा पंखा गर- गर फिरतो?"
"तुमचा पंखा गोल - गोल फिरत नाही? मग तो कसा फिरतो?" मी विचारले. 
"आंत तो गर गर करतो. पण त्याच्या मानेने तो 'नाय - नाय' करतो." तो त्यांच्या खोलीतील टेबल फ़ेन बद्धल (table fan) बोलत होता. पण त्याचा हा किस्सा फारच मजेशीर आहे. कदाचित त्याची अतिशयोक्ती असेलही. संजीव लहान होता. असेल ३री -४थी मध्ये. शुभाचे काम आटोपले. संजीवला शाळेत सोडण्यास तसा उशीर झाला होता. "संजू! अरे, चल लवकर. शाळेला उशीर होत आहे. भर ती पुस्तके ब्यागेत  आणि चल,"शुभा स्वतःचा एका हाताने पुस्तके दप्तरात कोंबित व दुसऱ्या हाताने  संजीवचा एक हात खेचीत - ओढीत घरा बाहेर नेण्यास सुरवात केली.
   " पण आई, जरा थांब, " संजीव शुभाला विनवण्या करीत होता, काही सांगू पाहत होता.
पक्कड अधिकच घट्ट करीत ती त्याला शाळेच्या दिशेने ओढू लागली. तिचे त्याच्या कडे लक्ष नव्हते.
अर्धा रस्ता पार केला. शुभाचे चालूच, " बेल होईल. आज फार उशीर झालाय. उचल न रे पाऊल भराभर."
संजूचे , "पण आई--- " पण आई ---" चालूच होते. शाळा जवळ येताच संजीव ओरडून म्हणाला," पण, आई बघ की माझ्या कडे."
आता मात्र शुभाने त्याच्या कडे बघितले. " अरे मेल्या, हे काय? तुझे शर्ट कोठे आहे? का घातलास नाही?" 
  " आई, मी मगा पासून तेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. माझे शर्ट घालण्याचे बाकी होते."

आमच्या घरी पिठोरीची पूजा असते. हा एक परंपरेचा भाग आहे. एक वडलोपार्जित प्रथा. प्रत्येक आई आपल्या मुलींना आणि सुनांना, तिच्या नंतर ही एक पूजा घालण्याची रीत चालूच ठेवण्यास सांगत असते. माझ्या आजी कडे ही पूजा असायची आणि आता माझी मामी पिठोरीची पूजा घालते. माझी आई ती घालीत असे आणि आता माझी बायको पण ही पूजा घालते. माझ्या बहिणीकडे, म्हणजे संजीवची आई, ही पूजा असते. आमची आई ह्या पूजेच्या  वेळी सर्व लहानांना, तिच्या मुलांना, चार जावई, सून, ९ नातवंडे, एक नात जावई आणि पणतू, अशा सर्वाना ती 'वहाण' देत असे. 'वहाण' देण्याची पद्धत अशी असायची आणि असते. पुजेस बसलेली बाई डोक्यावर पदर घेऊन देवा समोर, पिठोरीच्या पूजे समोर, बसून तिच्या डाव्या हाताने डोक्यावरील 'वाहणाचे' तामण पकडून तीन वेळा असे विचारते," अतिथी कोण?" (वहाण घेण्याऱ्याने म्हणायचे 'मी').
 " अतिथी कोण?" (वहाण घेण्याऱ्याने परत म्हणायचे 'मी')
" अतिथी कोण?" (वहाण घेण्याऱ्याने ह्या वेळी मात्र स्वतःचे नाव घ्यायचे)
संजीवची पाळी आली माझी दोन्ही मुले आणि इतर भाचे मंडळी अगोदरच हसू लागत. कारण हे असे काहीसे घडत असे :
आई :  " अतिथी कोण?" संजीव: मी ( नाही!) [तो नाही हा शब्द इतक्या हुळूवारपणे म्हणे की आईला ऐकला येत नसे]. राहुल, आदिती,सिद्धार्थ तुम्ही सारे हसता कशाला?  
 आई :  " अतिथी कोण?" संजीव: मी ( नाही!) [ह्याही वेळेस तेंच]
  आई :  " अतिथी कोण?" संजीव: मी  नाही! तीन वेळा तेंच विचारतेस -   अदिती कोण? अदिती कोण?  अदिती कोण?' - मी नाही,मी नाही , मी नाही -अदिती माझी बहिण.

संजीव बऱ्याच जाहिरातींसाठी 'जिंगल' (jingles) लिहित असतो. नाटकात जशी पत्रे एक सूचक वाक्य (cue) पकडून आपले संवाद पुढे चालू ठेवतात त्याच प्रमाणे मी ही संजीव कडून प्रेरणा घेऊन असे जाहिरात 'जिंगल' तयार केले:
(पुरुषाच्या आवाजात आणि 'टिक टिक वाजते डोक्यात --धड धड वाजते छातीत --' ह्या सोनू  निगम ह्यांनी गायलेल्या गाण्या च्या चालीवर):  
                                  घुर घुर होत आहे माझ्या पोटात. अहो, गडबड झाली माझ्या पोटात.

(लहान मुलांचे कोरस / समूहगान): घुर घुर होत आहे ह्यांच्या पोटात. अहो, गडबड झाली ह्यांच्या पोटात

(बाईच्या आवाजात):                   मग 'Enteroquinol', अहो,  'Enteroquinol',
                                              अहो घालाकी, घालाकी त्यांच्या घशातून  पोटात !

(मूळ पुर्षाच्या आवाजात):  आता  घुर घुर नाही  आणि गडबड पण नाही माझ्या पोटात.
                                 नेक्स्ट टाईम लक्षात ठेऊन घालीन  'Enteroquinol', घशातून  पोटात !

(लहान मुलांचे कोरस / समूहगान):लक्षात ठेऊन घालतील 'Enteroquinol', घशातून  पोटात !
 'अ‍ॅन्टरोक्यूनॉल' जागी राज बिंदू किंवा तुम्हाला हवे असलेले नाव घालू शकता. पण रॉयलटी आणि कॉपी राईटचे तेवढे बघा. माझे हे जाहिरात रुपी गाणे प्रसिद्ध झालेच तर दोन गोष्टींची मी काळजी घेईन : १) सोनू निगम ह्यांना रॉयलटी - त्यांना उपोषण किंवा धरणे धरून बसण्याची गरज भासणार नाही. २) गाण्याचे कॉपी राईट माझे आणि निगम ह्यांचे राहील. 

आमच्या घरच्यांनी हे 'Health Benefits of Singing'चे  पोस्टर माझ्या लहानपणी पाहिले असते तर मी सोनू सारखा चांगला गायक  झालो नसतो का?
मी कुठे गायलो तर घरचे सारे मला ओरडून थांबवत, "नको रे विनय, बेसूर आवाजात गाउन आम्हाला असा पीडू नकोस!" आणि मी 'बाथरूम सिंगर' पर्यंतच राहिलो.  तेंव्हा तुम्ही असे तुमच्या मुला- बाळांना, लहान भावंडांना, आई-वडलांना, कोणालाही गाणे गाण्या पासून रोखू नका. त्यांना गाण्याचे हेल्थ बेनेफिट्स घेऊ द्या.  





  • गौतम 
   गौतम संजीवचा धाकटा भाऊ. एखादा विनोदी / गंमतीचा किस्सा त्याच्या तोंडून ऐकणे म्हणजे हसून हसून वाट! त्याने सांगितल्या प्रमाणेच मी लिहित आहे. 
" उषा मावशीने मला तिच्या विरारच्या नवीन फ्लेट (flat) मध्ये येण्यास सांगितले. 'निखीलचा मित्र मकरंदही येणार आहे', असेही तिने सांगितले होते. मामा, तुला माहित आहे ना उषा मावशी कशी होती ते मला धड पत्ता दिला नाही. 'स्टेशन वरून रिक्षा घेऊन अमुक-अमुक सोसायटीत ये. आंत शिरून, डावीकडे वळ, शेवटचे घर आल्यावर दोन फाटे असतील. उजवा पकड. थेट चौथे बिल्डींग माझे. मकरंद  येणार आहे. मी कामात असलेच तर त्याला मी बाल्कनीत तुझी वाट पहाण्यास सांगेन.' मी सोसायटीत शिरून डावीकडील शेवटचे घर गाठले. येथवर सर्व ठीक. पण  रस्त्याला दोन नव्हे तर तीन फाटे. वाटले उषा मावशीला सर्वात उजवीकडील रस्ता लक्षात आला नसावा. मधला रस्ता पकडून मी चौथे घर गाठले. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बालकनीत एक माणूस मला हाताने खुणेने वर येण्यास सांगत होता. निखिलचा मित्र? पण वयाने थोडा काय बराच मोठा वाटला. मी वर गेलो. त्या माणसानेच दार उघडले. हा मकरंद नक्कीच नसावा. मकरंदचे वडील असतील,असे वाटले.
 " ये, बस. काय घेणार? रामू (उषा मावशीने नोकर ठेवल्याचे मला सांगितले नव्हते) पाणी घेऊन ये. चहा, कॉफी की थंड? अरे, बस की."
मी जवळ असलेल्या सोफ्यावर बसलो. 
"अग तुझा भाचा आलाय. अगदी लाजाळू आहे. "
"दहा मिनिटात आलेच," आतून आवाज आला. उषा मावशीचा? वाटत नव्हता. 
रामू माझ्या पुढ्यात पाणी, कॉफी आणि फराळ ठेवीत म्हणाला, " बाईसाहिबानी म्हणल्या तुम्हासनी कॉफी आणि लाडू चिवडा आवडतो. म्हणून म्या आणलाव. खावा."
(मला कॉफी आणि लाडू- चिवडा आवडतो- हा साक्षात्कार उषा मावशीला कसा झाला हे मला कळत नव्हते. पण मला सपाटून भूक लागली होती. तिच्याकडे खायाला एवढेच असावे. काही सेकंदात चिवड्याचा फडशा पाडला, कॉफीही घशात ओतली आणि लाडू उचलून तोंडात घालणार तोंच --- )
"हा कोण? हा माझा भाचा नाही. कोण रे तू? कोण कडे आलायस?" प्रश्नांचा भडीमार! 
"मी उषा मावशीचा भाचा. तुम्ही मकरंदचे आई- वडील का? मकरंद कोठे आहे? माझी मावशी कोठे आहे?", तोंडातील लाडू मुळे मला नीटसे बोलताही येत नव्हते. 
"कोण मकरंद? आता ही उषा कोण? आम्हाला मुलगा नाही आणि आमची लग्न झालेली मुलगी अमेरीकेत असते. माझा  लांबचा भाचा येणार आहे. आमचे हे त्याला ओळखत नाहीत. म्हणून हा सारा गैरसमज."
तोंडात अर्धा आणि बशीत दीड लाडू तसेच टाकून मी उठून जाण्यास निघालो. 
"अरे, थांब. घाई नको. सर्व खाऊन घे आणि आम्हाला तुझ्या मावशीचे संपूर्ण नाव सांग."
त्यांच्या कडून समजले तिचा खरा पत्ता - सर्वात उजवी कडील रस्त्यावर चौथे घर.
मी झालेला सर्व प्रकार मावशीस सांगितला. पण तिला तो कितपत समजला, कोण जाणे? ती म्हणाली, " हो? "अरे गौतम, मकरंद आलाच नाही. तो आज येणार नाही."
मी त्या मकरंदला आजपर्यंत बघितलेही  नाही. निखीलला विचारला हवे, कोण हा मकरंद?  

  •  सलील 
सलिल माझ्या एका मावशीचा भाचा. तो सातवी असावा त्या वेळी. तो एक गाणे बऱ्याचदा गुणगुणत असे. 'एक सूर' (One Tune) किंवा 'मिले सूर मेरा तुम्हारा' ह्या पंक्तीने जास्त प्रसिद्ध असलेले गाणे आपल्या सर्वांना माहित आहे. १९८८ साली लोक सेवा संचार परिषदने तयार केलेले आणि दूरदर्शनने सादर केले राष्ट्रीय एकात्मतावरचे हे गाणे सलील अशा प्रकारे गात असे, " मिले सुरमई तुम्हे-----" मग आम्ही त्याला सांगत, " होय सलील, मिळे तुला सुरमई, सारंगा, बोंबील आणि अनेक मासे." कालांतराने त्याला गाण्याचे बोल समजले आणि मग त्याला स्वतःचे हसू येऊ लागले




  •   कुणाल
कुणाल माझ्या मावस बहिणीचा मुलगा, एक बहुगुणी अष्टपैलू व्यक्तिमत्व! 'मुलाचे पाय  पाळण्यात दिसतात', असे म्हणतात. आणि कुणालच्या बाबतीत ते अगदी १०० % लागू पडते. आपल्या कडे लोकांचे लक्ष कसे वेधून घेयाचे  ही कला (होय, कालच म्हणाला हवे) त्याला लहानपणा पासून चांगलीच अवगत होती. मला आठवते. आम्ही सारे मावशीकडे गच्चीत बसलो होतो. जवळच कुणालही गोल गार्डन चेअर मध्ये बसला होता, असेल तो त्यावेळी साधारण आठ - दहा वर्षांचा. आम्ही सारे आमच्या आवडीच्या 'गोसीप' मध्ये रमून गेलो होता. कुणाल कडे कोणाचेही लक्ष नव्हते. 
अचानक कुणाल ओरडू लागला, "Please ! Someone, please help me. I am stuck in this chair." 
"What have you done to yourself,"त्याची आई, निमा विचारात होती, " कुणाल, अशा रीतीने तू स्वतःला अडकवले तरी कसे? मला नाही जमत तुला खुर्चीतून बाहेर काढायला. आता बस असाच. मी जाते घरी."
मग अंबर मामाने केला प्रयत्न, " कुणाल, तू खरोखर ग्रेट आहेस. मलाही सारे कठीण दिसते."
आळीपाळीने सर्व त्याला खुर्चीतून बाहेर काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. जय झाला, विजूने पहिले आणि दिलीपनेही आपला मदतीचा हात पुढे केला. पण काही उपयोग झाला नाही. आता मात्र कुणाल रडकुंडीला आला होता. आता तुम्ही विचार किरीट असाल, असे झाले तरी काय होते? गोल गार्डन चेअरला लोखंडी नक्षीकाम केले होते. सीट आणि बेक रेस्ट (back रेस्ट) ह्यांना वेत काम  (cane work ) होते आणि हे बरेच वेटोळे-वेटोळे असलेरले लोखंडी नक्षी काम सीट आणि  बेक रेस्ट ह्यांच्या मधोमध होते. कुणालच्या शोर्टसचे एक लूप (loop of his shorts ) त्या नक्षी कामातील वेटोळ्यात अडकले होते. त्या वेळचा गंभीर प्रकार आता मात्र मला नाटकातील 'फार्स' सारखा वाटतो. पप्पाने सुचविल्या प्रमाणे कुणाल सकट खुर्ची आडवी करण्यात आली आणि बंडू आणि मी मिळून आम्ही लूप आणि खुर्चीतील तो गुंता हळू हळू सोडविला आणि आमचे कुणाल राव झाले मोकळे! अरे पण, कात्रीने किंवा ब्लेडने तो लूप मुळात कापला का नाही? येवढा खटाटोप का? हसा लेको हसा! 


 कदाचित माझा आमच्या गच्ची क्रिकेट वरील ब्लॉग वाचला असेल. त्यात मी लिहिले होते कुणालला कसा क्रिकेट खेळण्यात कसा रस नसायचा. पण क्रिकेट नंतरच्या आमच्या पार्टीत तो कशी धमाल उडवायचा. त्याचा Striptease Act फार, म्हणजे फारच गंमतीशीर! त्याचे ते लचकत - मुरडत 'हेलन' नंबर नाच करत, करत आमच्या घोळक्यात येणे, नंतर हेलन प्रमाणे आपली मान एका बाजू कडून दुसरी कडे फिरवीत, डोळ्यांची उघडझाप करणे आणि मादक नजरेने पाहत आपल्या अंगातील टी-शर्ट हळू -हळू काढीत  तो सभोवतील गर्दीत भिरकावणे, त्यानंतर आपली शोर्टचा पट्टा काढणे ---( ह्या घटकेला त्याला कुणीतरी थांबवत). नाहीतर काय झाले असते? तुम्ही कल्पनाच करा!


                                                                               विनय त्रिलोकेकर