Sunday, 26 June 2016

मला सुद्धा थोडा वेळ द्या बाळांनो !





मला सुद्धा थोडा वेळ द्या बाळांनो !



ह्या आहेत मिसेस गोम्स.


बिचाऱ्या खूप दुःखी दिसतात. बरोबर? काय करणार बिचाऱ्या! एकट्याच राहतात आपल्या आलिशान ३ बी.एच.के. फ्लॅट मध्ये.  त्यांचा परिवार फार मोठा आहे .  ५ मुलं-  २ विवाहित मुली व ३ मुलगे आणि अनेक नातवंड. तरीही मिसेस गोम्स एकट्याच. मुलं आपापल्या फॅमिली (परिवारा) बरोबर परदेशांत असतात. हां , अधून मधून येत असतात - तीन -चार वर्षातून कधी तरी एकदा! पीटर होते तोवर एकटेपणा वाटत नव्हता. पीटरनेच मुलांना शिक्षणासाठी पाठवले होते. नंतर कालांतराने सारे पीटरचाच परदेशातील बिझनेस सांभाळू लागले आणि अजूनही सांभाळतात. पीटर सोबत मिसेस गोम्स मुलांकडे अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया कित्येक वेळा जाऊन आल्या होत्या. पण दहा वर्षा पूर्वी पीटर हे जग सोडून गेले आणि ही सर्व मजा संपली. तसे तिला पैसा अडक्यांची कधीच कमतरता भासली नव्हती. आयुष्यात उणीव होती ती आपल्या माणसांची ! आतां ती नातवंडांच्या, मुलांच्या. सुना-जावयांच्या दुर्मिळ गाठी भेटीतच समाधान मानीत होती. पण नातवंडात तिचा वेळ मजेत जात असे. आणि ती त्या क्षणांची आतुरतेने वाट बघत असे.

एक दिवस मिसेस गोम्स आपल्या दिवाणखाण्यात बसल्या होत्या . त्या आपल्या विचारात मग्न होत्या. कदाचित आपला नाती-नातवांचा विचार करीत असावी. अचानक फोन वाजू लागला आणि काहीशा गडबडीतच तिने धावत जाऊन फोन उचलला.





तिच्या नातीचा अमेरिकेतून फोन होता. तिचा आनंद उफाळून आला होता. सर्वच नातवंडे आणि तिची मुलं ह्या वेळी एकत्रित तिला भेटण्यास येत होती. फक्त १० दिवस बाकी होते.  ती अक्षरशः आनंदाने नाचू लागली. नातवंडांसाठी बरेच काही तय्यार करून त्यांना सर्वांना स्वतःच्या हाताने खाऊ घालायचे होते. भरपूर  मजा -- छे , काय म्हणतात ही हल्लीची मुलं.. हं - धमाल, होय धमाल येणार होती , बऱ्याच गप्पा होणार होत्या, अगदी दुनिया भरातील.  जेन , रिया, सुसान,जेनी, टॉम ,रीग--- (वया मुळे सर्वांची नावे लक्षात ठेवणे आता सोपे जात नव्हते) पण एकाच धमाल येणार  नक्कीच ! आणि त्या दिवसाची वाट पाहू लागली.






दिवस फटाफट निघूनही गेले आणि अखेर तो दिवस उजाडला. चला पाहूया काय घडले ते.


आजी मनात म्हणत असावी, "अरे बाळांनो, तुमच्या त्या मोबाईल मधून बाहेर येऊन मला सुद्धा वेळ द्या !" 

                                                 विनय त्रिलोकेकर