Friday, 24 March 2017

आपली मुंबई आणि काही गोड आठवणी

आपली मुंबई आणि काही गोड आठवणी

का कोणास ठाऊक मला  सी आय डी चित्रपटातील कुंकुम आणि जॉनी वॉकरच्या तोंडी असलेल्या ह्या गाण्याची आठवण झाली:


ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ 

जरा हट के जरा बचके 
 आज इंग्रजितल्या बॉम्बेचे मुंबई झाले आणि मुंबई पार बदलून गेली. पण त्या 'जरा हट के जरा बचके' प्रमाण अधिककच वाढले आहे! आणि भेंडी बाजार, क्रॉवफोर्ड मार्केट, भुलेश्वर भागात खरेदी करता - करता स्वतःचा जीव मुठीत घेऊन कसा आपला मार्ग काढायचा? 


हेच चित्र भुलेश्वर, क्रॉफोर्डमार्केट आणि इतर ठिकाणी. हे आहे भुलेश्वर. येथे आहेत भरपूर देवालय आणि हा आहे मध्य भागी भाला मोठा कबुतर खाना. दिवस रात्र असते किच्चाट -तुफान मरणाची गर्दी आणि ह्या गर्दीतून वाटकाढीत, हातगाड्या आणि सकूटर कसे बसे चुकवीत भाविक व खरीतदार माणसे आपला मार्ग काढीत असतात. कबुतरांना खाणे घालणे उचित नसते असे विज्ञान शास्त्र म्हणते. पण काही चुकीच्या रूढी, चाली रीती किंवा अंध श्रद्धा म्हणा, लोकं कबुतरांना चणे (चेव -गाठे देखील) घालीत असतात. ह्या येथील रहिवाशी मात्र टी बी (क्षय), दमा, न्यूमोनिया व इतर साथीच्या रोगांने पिढीत होतात. मग सांगा ह्यांना पुण्य आणि स्वर्ग कसा लाभेल. आणि येथे खिसे कापूंचा उपद्रव असतो तो वेगळाच!
 
 आणि असे होते क्रॉफोर्डमार्केट, साधारण १८०० मध्ये:
 आणि आता:

 ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ
 पण तरीही ....
ये है बम्बई मेरी जान 
 कहीं ट्रामे,कहीं मिल -  आता 'ट्रामे' ' झाल्या भूतकाळात जमा. 
  ह्या पहा सिंगल आणि डबल डेकर ट्राम्स आणि असे होते ट्रामचे रूळ



  ह्या ट्रॅम्स होत्या आमच्या जाणवीतल्या

फ्लोरा फौंटनचे रूपांतर झाले हुतात्मा चौक. डावी कडील चित्रात दिसतात  'विकटोरीय' पूर्वीच्या घोडा गाड्या आणि बैल गाड्या आणि गोडे खेचीत असलेल्या ट्राम. ह्या घोडे खेचीत असलेल्या ट्रॅम्स पाहिल्याचे मला आठवत नाही.  
ट्रॅम सारख्या ट्रॉली बस होऊन गेल्या. अनेक बदल झाले आहेत. पण तेंव्हा बेस्ट परिवहन सेवा नफा करीत असे!  होय, अनेक बदल झाले आहेत हो! आता परिवहन सेवेचे नुकसानाच भार विद्युत ग्राहकाला उचलाला लागतो. मुंबईकराला आणखी एक 'मुश्किल'!
हे झाले ट्रामे, ट्राम आणि ट्रॅमचे .....
मात्र ह्या ओळी ......
कही बिल्डिंग, कहीं मोटर  उंच स्काय स्क्रॅपर्स झाले पण चाळी तश्याच आणि झोपडपट्टीही कायम!
आपल्याला असे वाटत असेलही
मिलता है यहाँ सबकुछ
इक मिलता नहीं दिल
 इंसाफका नहीं कहीं नामो निशां 
ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ  
जरा हट के जरा बचके 
पण तरीही .......
 ये है बम्बई मेरी जान!
...................... जरी
कहीं सट्टा कहीं पत्ता 
कहीं चोरी कहीं रेस 
कहीं डाका कहीं फांका
कहीं ठोकर कहीं ठेस 
तरीही 
बेकारों के है कई काम यहाँ 
...................................
कहें इस को बिनेस्स

 इथं तुम्ही उपाशी मरणार नाहीं, ' इक चीज़ के हैं कई नाम यहाँ आव जाव ये है घर तुम्हारा!'
 बुरा दुनिया है जो है कहता 
ऐसा भोला तू ना बन 
जो है करता वो है भरता 
ये जहाँ का है चलन 
दादागिरी नहीं चलने की यहाँ

 ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ 
जरा हट के जरा बचके 
ये है बम्बई मेरी जान 
सुनो मिस्टर सुनो बँधो 
ये दिल है आसान जीना यहाँ
 सुनो मिस्टर सुनो बँधो
ये है बम्बई मेरी जान
आणि दूसरे जॉनी वॉकरच्या तोंडी असलेले हे गाणे :


मैं बम्बई का बाबु नाम मेरा अंजना 

इंग्लिश धुन में गाऊं मैं हिंदुस्तानी गाना

मैं बम्बई का बाबु

ये दुनिया है उसकी जो दुनियासे से खेले आणि 'दुनिया जुकती है, जुकाने वाला चाहिए।'

सकती हो या नरमी हँसते- हँसते झेले आम्ही काही पचवू शकतो!

सुन लो अजी सुन लो ये जादूका तराना हाच तो जादूचा मंत्र!

......

 कुछ है दौलत वाले कुछ है ताकत वाले 
असली है हिम्मत वाले 
होय, असे होते हे हिम्मत वाले !
 आणि असे- 
आणि घडला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र!

 आणि त्या वेळात माझ्या लहान पणातील मला आठवत असलेली ही घटना

मी  घरातील शेंडेफळ. माझ्यावर चार बहिणी, पुष्पा,उषा,निशा आणि शिबानी (शुभा ). आमची सर्वात मोठी बहिण पुष्पा. माझ्यात आणि तिच्यात दहा -बारा वर्ष्यांचे अंतर. ती लहान वयातच आचार्य अत्रेंच्या 'मराठा' मध्ये  नोकरी करू लागली. तारा रेड्डी, हमीद दलवाई, शैलाताई पेंडसे, इत्यादी लोकांचे येणे जाणे आमच्या घरी सुरु झाले. 'संयुक्त महाराष्ट्र' ची चळवळ चालू होती. चळवळ मोडण्यासाठी धर- पकडीचे सत्र चालू होते. पुष्पाला पकडण्यात आले. आमची आई रडू लागली. अंबर मामाने तीस समजावले, " अग, चांगली गोष्ट आहे ग, अभिमानाची गोष्ट आहे." तुरुंगातून सुटल्या नंतर तिचा चाळीत सत्कार करण्यात आला. ह्या सर्वांचा अर्थ आणि महत्व त्यावेळी नीटसा समजला नसेलही. असो.
कसे होते आणि झाले असे. ह्या फोटों द्वारे चला नॉस्टॅल्जिक प्रवासाला - काही गोड आठवणींकडे.




नव्या जुन्याच्या आणखी काही आठवणी. ह्याच ओव्हल मैदानातून सी. के. नायडूंनी चेंडू आपली  बॅट फाटकावून राजाबाई टॉवरच्या घड्याळाची कांच फोडली होती. 






 बदल घडत गेले पण जडजवाहीरांचे आकर्षण तेवढेच! कोणा एका गल्लीत लागत असे मोत्यांचा बाजार तर आज होतो खाऊ गल्लीत हिऱ्यांचा व्यापार!




मोहमद रफी गायलेले ' ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ   बॉम्बचे / बम्बई का / मुंबईचे वर्णन, जरी 'मुश्किल' वाटणारे जीवन आणि तरीही सर्वांना 'ये है बम्बई मेरी जान!' वाटणारी मुंबई - हे होते आमच्या जमान्यातील गाणे: आपण ह्या गाण्याचा विडिओ खालील URL वर पाहू शकता:
 https://www.facebook.com/vinay.trilokekar/videos/1495297627167647/
 आणि काही तरुण- तरुणींनी केली 'रॅप' गाण्यानी 'आमची मुंबई'ही एक डॉकेमेंटरी. तसे ह्यात डेप्थ नसेलही पण एक प्रामाणिक प्रयत्न जरूर आहे. नायर, वाडकर, कुमार,श्रीराम 'भोरे आणि तुमचे इतर सहकाऱ्यांचे अभिनंदन! रॅप द्वारे मुंबईचे धगधगीचे आणि धडपडीचे जीवन, ट्रेनचा त्रासदाय प्रवास, टपरीवरील चहाची गोडी, वडापाव खाऊन पोट भरणारी आणि मुंबईला आपलंस करणारे आपण सारे मुंबईकर! आणि पहा URL वर :
https://www.facebook.com/vinay.trilokekar/videos/1495328947164515/
  दोन्ही गाणी एकच गोष्टची जाणीव करून देतात आणि ती म्हणजे सर्वांना वाटणारी मुंबईची ओढ आणि आकर्षण! होय, मुंबई ही खरोखर स्वप्नांची नगरी आहे. मूळ रहिवाश्यां पासून बाहेरून येणाऱ्यांपर्यंत सर्व आपल्या उराशी एक स्वप्न बाळगून असतात. ही स्वप्न नगरी तयार झाली आहे सात बेटांपासून. अरबी समुद्रातील सात बेटे होती कुलाबा, फोर्ट, बायखळा, माटुंगा, वरळी, परळ आणि माहीम.  ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आली आणि येथे अक्षरशः वास्तव्य करून बसले. आणि कालांतराने इंग्रजांनी आपल्यावर सत्ता प्रस्थापित केली. आणि मुंबईचे केले बॉम्बे


ह्याच ब्रिटिश राजवटीत काही स्थापत्यशास्त्रातील सुबक वस्तू निर्माण झाल्या. गेट व्हे ऑफ इंडिया, व्हिक्टोरिया टर्मिनस, राजाबाई टॉवर, ऑपेरा हाऊस थिएटर, इत्यादी हे सारे उत्कृष्ट नमुने  होत. ह्या सर्व वास्तूंवर दगड करून सुशोबित नक्षीकाम डोळे दिपवून टाकतात. ऑपेरा हाऊस थिएटरवरून आठवण झाली, आज बरीच जुनी चित्रपट गृहे बंद होऊन त्यांच्या जागी मल्टीप्लेक्सीस किंवा मॉल्स आली आहेत. ओपन एअर थिएटर्स तर पार संपल्यात जमा झाली. केळे वाडीतले  (भालेकर मार्ग) खुल्या साहित्य संघ मंदिरचे झाले  बंद ऑडिटोरियम तर धोबीतलावातले खुले रंग भवन पार नष्ट! पण असे झाले आहे  रॉयल ऑपेरा हाऊस सुंदर नूतनीकरण:
थिएटर जरी १९१२ साली बांधण्यात आले तरी रॉयल ऑपेरा हाऊसचे उद्घाटण मात्र  १९१६ साली किंग जॉर्ज ५वे ह्यांच्या हस्ते झाले होते. म्हणजे चक्क १०० वर्षे झाली आहेत ह्या वास्तूला. येथे पूर्वी नाटके व संगीत - गाण्यांच्या मैफिली होत असत.  अंतर देशीय कलाकारच्या बरोबर भारतीय कलाकार (दीनानाथ मंगेशकर, बालगंधर्व तसेच पृथवीराज कपूर) आपल्या कलेचे कार्यक्रम सादर करीत. कोणी एक महा भागाने असे लिहिले आहे आणि मी शब्द न् शब्द तसाच ठेऊन उतारा खाली  देत आहे ( quoting in verbatim) :
'The place also has a love story to its credit. Shashi Kapoor during the screening of ‘Deewar’ happened to see Jennifer Kendal in the audience and fell in love with her.'
अरे महा भागा, 'दीवार' हा चित्रपट १९७५चा आणि शशी कपूर आणि जेन्निफर कँडल ह्यांचे लग्न झाले होते १९५८ साली. दोघांनी परत लग्न केले होते कारे? लग्नापूर्वी ते दोघेही 'शॅक्सपिअर वाला' ह्या मिस्टर कँडल ह्यांच्या नाटक कंपनीत  तर्फे देशोदेशी जाऊन नाटकं सादर करीत. आणि तेंव्हा त्या दोघांचे प्रेम जमले. असो.

असे म्हणतात की १९३५साली आयडियल पिक्चर्स रॉयल ऑपेरा हाऊसचा ताबा घेतला  आणि ह्या इमारतीचे रूपांतर सिनेमा हॉल मध्ये झाले. कालांतराने इतर चित्रपट प्रमाणे प्रेक्षकवर्ग कमी होऊ लागला, बिझनेस फार कमी, नुकसान होऊ लागले आणि १९८० साली थिएटर बंद झाले. बिल्डिंग कडे दुर्लक्ष झाले. म्हणतात गोंडलच्या राजा राणीने ते विकत घेतले. त्यांनी इमारतीचे नूतनीकरण करण्याचा विचार केला. महाराष्ट्र शासनानेही  रॉयल ऑपेरा हाऊसला पूर्वीचे वैभव द्यायचे योजले आणि आर्किटेक्ट आभा लंभ ह्यांची नेमणूक केली. इमारतीची बाहेरून दुरुस्ती करण्यात आली. पुढे ग्लोबल कॉन्झरवेशन कमिटीने ह्या इमारतीची गणना 'endangered architectural sites' ह्या यादीत केली. मुंबई हेरिटेज कॉन्झरवेशन कमिटीने ह्या इमारतीचे संपूर्ण (आंतून -बाहेरून ) नूतनीकरणास मान्यता दिली.  

आणि आता जुने पडीक थिएटर उभे राहिले नव्या अवतारांत पण थाट तोंच अगदी जुन्याच वैभवात! अशा रीतीने चांगले बदल घडोत!


                                                                                                          विनय त्रिलोकेकर