क्रिकेट
अ] भाग १- चालू
आहे क्रिकेट चा
माहोल (ماحول orمهل) !
ماحول or مهل
? कदाचित माहोल ह्या शब्दासाठी हे अरबी (Arabic) किंवा
उर्दू शब्द असतील. चालू आहे म्हणजे काय? आपल्या कडे क्रिकेट २४ X ३६५ दिवस
चालूच
असते. ५ दिवसांचे कसोटी (टेस्ट) क्रिकेट , ५०-५० चे वन डे आणि २०-२० चे
क्रिकेट, पुरषां बरोबर महिलांचे क्रिकेट. मोठ्यां सोबत २१ खालील क्रिकेट
पटूनचे
क्रिकेट. लौकरच सुरु होत आहे 'आय.पी.एल.' (कदाचित सुरूही झाले एक संपले की दुसरे चालू. क्रिकेट
-क्रिकेट आणि क्रिकेट! आपल्या येथे अनेक धर्म आणि भरपूर सण. क्रिकेट हा पण
आपला धर्म आणि मोठा सण. काळानुसार क्रिकेटचे दैवत बदलत असते - पूर्वी होता
गावस्कर, नंतर झाला तेंडुलकर आणि आता होत आहे विराट. प्रत्येकाला क्रिकेट
बद्धल बोलण्याचा जणू जन्मसिद्ध हक्क आहे, मग त्या व्यक्तीने आयुष्यात बॅट
हातात पकडली असो वा नसो! सर्वांना ह्या खेळाचे बाळकडू लहान पणापासून पाजले जाते. मुलांचे कापडी बॉलने खेळण्या पासून, प्लास्टिक , मग टेनिस नंतर सीजन बॉलने ग्रॅज्युएशन होत असते. आतातर मुलीही रिंगणात उतरल्या आहेत.
'आय.पी.एल.' वरून आठवण झाली. गेल्या 'आय.पी.एल.'
पर्वाचे दिवस. रॉयल चायलेंजर बंगलोर आणि मुंबई इंडियन मॅच. सगळीकडे
आनंदोत्सवाचे वातावरण होते. विराटच्या ६२ धावांमुळे आर सी बी च्या जेमतेम
५ बाद १४२ धावा. आम्ही 'एम.आय.' चे 'डाय हार्ड' सपोर्टर्स आनंदात होतो.
आमच्या फॅमेलीत लग्नकार्य होते - माझा मामेभाऊ नृपाल मुलगा सोयलच्या
लग्नाचे कार्यक्रम. त्या दिवशी होती 'मेहेंदी'ची संध्याकाळ. आम्ही सारे नातेवाईक
आणि मित्र मंडळी हॉल मध्ये जमलो होतो. एकी कडे बायका मंडळी आपल्या
हातापायांवर मेहेंदी काढून घेत होत्या. हातांच्या बोटांपासून पंजे, ते
कोपऱ्यां पर्यंत व पायांची बोटे, पाऊले ते ढोपऱ्यांपर्यंत, सर्व सुबक
कलाकृतींनी भरून गेले होते. दुसरी कडे आम्ही पुरुष मंडळी एक घोळका करून ७
cm X १४ cm मोबाईल स्क्रीनवर पाहत होतो मॅच. आम्ही सारे आतुरतेने 'एम.आय.'च्या
प्रतिउत्तराची वाट बघत होतो. विजय नक्की आपलाच होणार! पण टिना अजून आली
कशी नाही? टिना, माझा मावस भाऊ दिलीपची मुलगी, मुंबई इंडियनची डाई हार्ड
(die hard) फॅन व सपोर्टर, म्हणून ती 'एम.आय.'च्या
मुंबईतील प्रत्येक मॅचला जातीने वानखेडेवर हजर असते आणि मुंबई इंडियन
'लक्की' ठरते, असा तिचा समज आहे. आणि आमचीही तशी समजूत झाली आहे. पण अजून ती
आली नव्हती. मुंबईच्या फलंदाजीला सुरवात झाली. ७ ला नो विकेट. ओ बटलर औट!
षटक संपले. दुसरी ओव्हर सुरु - बद्रीची. दुसरी विकेट गुल, मग तिसरी आणि ४थी
- बद्रीने चक्क हॅट - ट्रिक घेतली! पार्थिव, रोहित आणि मिकलेनअहन
(McClenaghan) भोपळा नफोडताच परत!
" अरे, कोठे आहे ती, टिना?"
" निघाली आहे. येईलच इतक्यात."
आता भिस्त होती ती पोलार्ड- राणा ह्या जोडीवर. ३३ धावा रडखडात झाल्या. उऊऊउ! राणा रन औट!
आणि झाले टिनाचे आगमन! पिक्चर पालटूं लागले. हा हा म्हणता मुंबई इंडियनचा विजय! पोलार्ड जोरदार फलंदाजी केली हे खरे असले तरी हा आहे 'टिना इफेक्ट'! आणि तिला इतके क्रिकेट-प्रेमी बनवण्यास आमच्या 'गच्ची क्रिकेटचे' मोठे योगदान आहे. लिमिटेड ओव्हर नसेल कदाचित आमचे गच्ची क्रिकेट हे ट्वेंटी-२० क्रिकेट प्रथम सुरु करण्याचे दावेदार आहोत (pioneer of twenty - २०)! असो.
मला क्रिकेटची आवड लहानपणापासून. सर्वां सारखे मी कापडी बॉल, प्लास्टिक चेंडू, रब्बर बॉल, टेनिस बॉल आणि सीजन बॉल क्रिकेट खेळलो आहे. घरातल्या लहान खोलीत मी सुरवात तर केलीच पण मुलास देखील घेऊन खेळून व्हेंटीलेटरची कांच आणि काचेची बरणी देखील फोडली आहे. बरणी नातवाने फोडली असे सांगून आईचा राग कमी केला आहे. बिल्डिंगच्या पॅसेज मध्ये, आमच्या गल्लीत मित्रांच्या गल्लीत, शाळेच्या प्ले ग्राऊंडवर, मैदानात आणि पिचवर देखील खेळून झालाय तसेच 'हॅरिस शिल्ड' करिता शाळेसाठी आणि इंटर फार्म व टाइम्स शिल्ड करिता ऑफिस साठीही आणि 'वेलकर टूर्नामेंट मध्ये 'ठाकूरद्वार XI' साठी खेळलो आहे. पण कॉलेज करीता खेळणं शक्यच नव्हते. मैदानं गाजवलं असं काही नाही. पण मजा मात्र नक्कीच लुटली.
मला आठवते. क्रॉसवर आमच्या कंपनी (चौगुले) आणि मोराजी खेमिकल 'एफ' डिव्हिजन टाइम्स मॅच सुरू होती. मी सीमेरेषे जवळ, डीप स्क्वेरला फिल्डिंगला होतो. आमच्या मॅचची बाऊंड्री दुसऱ्या चालू असलेल्या मॅच - पिचच्या पलिकडे, पण त्या पिचच्या जवळ होती. त्या मधल्या पिचवर पंजाब नॅशनल बँक विरुद्ध कोणाचातरी सामना चालू होता. मोराजीच्या डावखुऱ्या फलंदाजने मारलेला फटका थेट माझ्या कडे येत होता. मधल्या पिच मुळे मला तो बॉल नीटसा दिसला नाही आणि माझ्या पुढे टप्पा पडून सीमेपार गेला. परत त्याने फटका लगावला. बॉल ऊंच ऊंच जात होता. माझ्याच कडे! कसाबसा मी तो झेल घेत ला. लक्षात आले मधल्या पिचवर जाऊन तो झेल पकडला होता.
" काय विनय! इथं काय करतोस? (काय प्रश्न!) छान पकडलास. मी पी. एन. बी. साठी खेळत आहे. आणि तू ?" माझ्या परिचयातील राजा काळशेकर बॅटिंग करता करता माझ्याशी बोलत होता
"चौगुले," मी उत्तर देऊन माझ्या पोझिशनला परत गेलो.
मोराजीचा नवा बॅट्समन उजवा होता. मी त्याच जागेवर होतो पण मी त्या नव्या साठी दीप कव्हर झालो आणि त्या दुसऱ्या पिचच्या अधिक जवळ झालो.
"आई कशी आहे? विचारलाय सांग. तुझे लग्न झाले का?" राजाचे चालूच होते. मी नाही असे उत्तर देण्या आंतच. "लग्नाला बोलावं हं."
दरम्यान ४ पंच, त्यांचे २ आणि आमचे २, ह्यांच्या मध्ये काही बोलणे झाले आणि आम्हा दोघांना आपल्या जवळ बोलावले. "तुम्ही गप्पा ठोकण्या साठी आला आहेत का? तुम्ही कोण?... काय ..काळशेकर? तुम्हा दोघांना आम्ही वॉर्न करतो. बॉल ठोकणार की गप्पा? आणि तू रे? " त्यांतील एक अंपायर विचारीत होते.
" त्रिलोकेकर," मी म्हणालो.
"कोण त्रिलोकेकर?" दुसऱ्या पंच्याने विचारले.
" विनय बाळाराम त्रिलोकेकर."
"अरे, म्हणजे तू अलकचा मुलगा. बरोबर?"
"हं. मी तुम्हाला ओळखतो सर. आपण मिस्टर सायबा कोठारे."
"ए कोठारे, आता तू पण ह्या दोघांत सामील होतोस काय?" पहिल्या पंचाने असे बोलत बोलत आम्हा दोघांना सौम्य शब्दात पुन्हा बजावले.
असे म्हंटले जाते की, "Cricket is Gentleman's game!" तुम्हाला वाटते का हो तसे? तसे असते तर कर्णधार स्टीव्हन स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बँक्रॉफ्ट ह्या तिघांनी 'जिंकण्यासाठी काहीपण चलते' असे समजून चेंडूत फेरफार केले नसते. वॉर्नर असल्या बेशिस्तीच्या वादात वारंवार सापडत असतो - इंग्लंडच्या जो रूटला मारणं आणि साऊथ आफ्रिकेच्या डी कॉक आणि ए बी डी विलिअर्स ह्यांच्या बरोबर झालेली खडा जंगी - ही सारी ताजी उदाहरणें होत. साऊथ आफ्रिकेच्या रबाडाने स्टीव्ह स्मिथ मारलेली धडक gentlemanचे वर्तन असू शकते का? कदाचित ही सारी माणसे 'Gentlemen' च्या समूहात 'Black Sheep' असावीत. असो.
आमच्या क्रिकेट मध्ये 'फिक्सिंग' नव्हती, 'बॉल कुरतडणे' घडत नव्हते किंवा कोणतीही बॉल टॅम्परिंग (टेनिस बॉल मध्ये फेरफार कसा होणार?) मात्र होत असे ती मात्र धमाल,धमाल आणि धमाल! आमच्या गच्ची क्रिकेटचे श्रेय जायला (Late Dr.Jay Dhurandhar) जाते. त्यानी आम्हा सर्व भावंडांना (cousins) आणि आमच्या फॅमिलीनां क्रिकेटच्या निमित्ताने एकत्रित आणून महिन्यातील एक तरी रविवार मज्जेत घालवण्याची प्रथा पाडली. Yes Jay, you used to all of together with this initiative. We enjoyed every moment of those fun filled Sunday evenings at Ajinkya Mansion. We miss those wonderful evenings and we miss you very much.
चला तर मग आमच्या गच्ची क्रिकेट च्या प्रवासाला!
विनय त्रिलोकेकर
email id : vbt1946@yahoo.co.in

mob.
7506376746 /9987595865
|