Monday, 6 September 2021

नावात काय आहे

 नावात काय आहे?

कोणा एका मोठ्या लेखकाने असे  लिहिले आहे " नावात काय आहे " (वास्तुविक मला माहीत आहे -शेक्सपिअरच्या रोमिओ ज्युलिएट मधले हे आहे. पण असे लिहिण्याची एक पद्धत असते.)
पण आईचे तसे नसायचे.ती म्हणत असे नावात सर्व काही.
कोणत्याही  व्यक्तीच्या नावात कसला आणि कोणताही बदल करणे तिला अजिबात मान्य नव्हते . त्यावर ती ठाम असायची . कोणाला संबोधित करायचे झाले तर त्या व्यक्तीच्या संपूर्ण  व खऱ्या नावानेच करण्या चे आम्हाला बंधनकारक असायची .टोपण किंवा  संक्षिप्त (abreviated names) नावे बिलकुल नाही!
म्हणूनच माझ्या एका मित्राला रवींद्र असे म्हणायचो . जरी इतर त्याला ( त्याची आई देखील ) रवी म्हणायची . तसेच आजवर मी  ह्या माझ्या सोबत्यांना त्यांच्या खऱ्या नावानेच संबोधित करतो उदारणतः गजेंद्र प्रफुल्ल
ल विलास इत्यादी
माझ्या  कडून किंवा माझ्या  कोणत्याही बहिणी  कडून  कोणाच्याही नवा बाबतीत चूक होत नसे .चुकून झ्याल्यास आई कडून हे सुनावले जाई , ," त्याचे नाव खोडू नकोस, कोणाच्या नावात केलेली अशी चीर फाड मला मुळीच आवडत नाही ..."
आईचे स्वताःचया नवा बाबतीत  तसेच असायचे.तिच्या अलक- किशोरी ह्या नावाचा तिला फार अभिमान होता.
माझे बाबा एकटेच कसे तिला अलक किशोरी ह्या तिच्या संपूर्ण नावाने हाकमारीत
आणि  तिच्या ह्याच नावाची सर्व  अधिकृत कागदोपत्री नोंद आहे.
तसे आईला  फ्रेंच किंवा आफ्रिकन नावांचा परिचय नव्हता  नाहीतर ...
Albert  Camus  हा आल्बेर काम्यू (फ्रेंच albɛʁ kamy) 
का व कसा?S मधला स कोठे गेला ?
अगाथाच्या   Hercule Poirot  पायरॉ  मधला ट कोठे हरवला ? Hansie Cronje
क्रोनजे नसून  क्रोनिए कसे ?
असे अनेक  प्रश्न तिला पडले असते. अस
The other day  (' other day' म्हणजे मराठीत आपणा लिहितो ' त्या दिवशी '
ही पण एक लिहायची पद्धत आहे.. वास्तविक ही ३ - ४  पूर्वीची गोष्ट्ट असावी .) माझा एक मामे भाऊ , नृपाल कोठारे आपल्या मुलाच्या निमंत्रण पत्रिका घेऊन घरो आला होता.
":विनय, तुझ्या बहिणींच्या चिठ्ठ्या पण तुला  देतो. Please... "
. (आम्ही सारे PP लोक, आमंत्रण  पत्रिकेला
  चिठ्ठी म्हणतो . होय चक्क चिठ्ठी म्हणतो !पण  अम्हा PP लोकांतील एक funny aspect'  - मजेदार पैलू  किंवा एक विनोदी  प्रकार म्हणूया.)
माझ्या तीन बहिणी आणि त्यांच्या  परिवाराचे आमंत्रण मी स्वीकारले . पण एक निमंत्रण पत्राने माझे लक्ष् वेधले - त्यावर लिहिले होते , 'शिबानी विजय तळपदे'. माझ्या चेहर्या वरील आश्चर्य पाहून ( आम्ही तिला शुभ म्हणतो ), नृपाल म्हणाला , " Mummy told me that her name is Shibaani and not Shubha, as all of us call her... In fact, your mom had told her so. Mummy had specifically told me that , " अरे नृपाल अलकवंस  सांगत असत माझ्या शुभाचे खरे नाव शिबानी आहे पण बिचारीला शुभनि किंवा शुभा   , असे काही म्हणतात. तेंव्हा तू  तिचे नाव बरोबर लिही."
( वंस'म्हणजे नणंद   आणि हा आमच्यातील  एक खास ठेवणीतील शब्द  आहे . आता थोडा दुर्मिळ झाला आहे.)  असो..
आईचे नवा बाबतीत असे होते.

आई आणि  बेबी ताई   नावांच्या  बाबतीत दोन परस्पर विरुद्ध टोक ! एकीला (आई ) नावात कोणताही  बदल / फेरफार  केलेला चालतनसे तर दुसरीला (बेबी ताई) एखाद्याच्या नावात बदल करण्यात मजा येत असावी -  ती तो आपला हक्क मनात असावी

‌कदाचित प्रफुल्लचे. पप्या होण्या मागे, गजेंद्रचे  गजा होणे तसेच इतरांच्या नावात ऍकारान्ती शेवट होणे ,  जसे  विलासचे विल्या  मध्ये रूपांतर. ह्यात बेबी ताईचा हात ( किंवा डोके असावे अशी मला दाट शक्यता  वाटते.    वरच्या मजल्यावरील सुभोधा झाली   शुभी आणि तिची बहीण कुमुदिनी झाली कुमू (Not ‘Kammo’ from ‘The 3 Idiots’).
‌.  घर मालक आणि त्यांच्या मुलाबाळांचे सोडा नोकर ( गाडी ) मंडळी ह्या बदलीकरणातून सुटले नाहीत. गौर्या नाथ्या , गण्या..  पण निलेशचे निळटॅ कसे हे कोडे आहे. मात्र ह्यातून सुटला आजीचा सखाराम. मालकीणबाई त्याला सखा म्हणार कशी काय?
‌बिल्डिंग मध असलेल्या टॉमी  कुत्रा बनला टाम्या !

ताई जशी टोपण नावे ठेवण्यात माहीर होती तशीच ती गोष्ट्टी सांगण्यातही .
  मराठी माधयमातून शिक्षण  घेऊन सुद्धा ती  इंग्रजि  सिनेमाची गोष्ट कशी सांगू शकते ह्याचे मला नेहमीच नवल वाटायचे.
‌  इंग्लिश नट नात्यांचे ज्ञान अघात होते. लहानपणी तिच्या कडून ऐकलेल्या इंग्लिश चित्रपटांच्या गोष्ट्टी  मुळेच ते सारे चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणि कुतूहल  वाढत असे . तिने केलेली शिफारस आणि वर्णन ह्या मुळेच मी  What A Way To  Go, An Affair To Remember, Gone With The Wind, and many other movies.       

हे सारे चित्रपट संधीची मिळताक्षणीच मी पाहिले
मला अजून ती दिवाळीची रात्र आठवते. आम्ही सारे देवा आनंदचा 'हम दोनो' हा चित्रपट पाहायला गेलो होता. लीला चिटणीस ह्यांची एन्ट्री होते न होतेच आणि बेबी ताई ओरडली, " ही बघा आली सुमंतची आई! रडायला तयार रहा तुम्ही सारे. थोड्या वेळात ती मरणार!" आम्ही सारे हसलो खरे पण इतर प्रेक्षक आमच्यावर खेकचले. सुमंतच्या आईत आणि लीला चिटणीस ह्यांच्या मध्ये विलक्षण साम्य तर होतेच पण लीला चिटणीस बऱ्याच चित्रपटात आजारी व खंगलेल्या जीर्ण-  भूमिका सादर करीत असे .  बिचारी सुमंतची आई आपल्या आयुष्यातच ही भूमिका करीत होती!पुढे आम्हाला कोणत्याही चित्रपटात लीला चिटणीस दिसल्या की सुमंतच्या आईची आठवण होणे  आणि बेबी ताईचा हा किस्सा आठवून हसू येणे स्वाभाविक होते. एकदा मार खाण्याची 
वेळ देखील आली पण शिव्या खाण्यावरच 
निभावले,  "सा #$, तुम लोगोने पिक्चर देखी होगी। इतना सीरियस सीन चल रहा है और आप लोग हासते हो? चुपचाप बैठो वरना मार खाओगे।"

माझ्या आईचा एक मावस भाऊ होता. ताईने त्याला टोपण नाव दिले 'गामडू मामा'. 'गामडू' म्हणजे नेमके काय? ताईने सांगितले, "गबाळ्या - गामडू ." आणि खरोखर तो गबाळेपणाचा एक प्रतिरूप किंवा सार (EPITOME) होता. 

माझे चुलत-चुलत काका, केशव काकांना '
 'केशव राव वाजले किती',  असे नाव तिनेच  दिले असावे. 
बिचारे आमचे काका!

एकदा मी तिला विचारले, "काय ग ताई, तुला ही  टोपण नावे सुचतात 
कशी?"

"विनय, नावे देणे' ही आपल्या जातीची 
खासियत  . जातीत कित्येकांना नावे पडल्यात,   आहे ना? - कानबोका, बाबा-नळी, हगऱ्या बंड्या, चोर बाळ्या, वश्या बोकड, बहिरा राव, चपल्या, कावळ्या, बदक - काय, काय ही नावे! तुझाxcxxzvvvx हा आहे ना, त्याच्या आईला बदकी म्हणतात. कोण ते 
 समझले? काही घराण्यालाच नावे आहेत - बोकडांकडचे व मांजऱ्याकडचे. बाबा नळीला नाव कसे पडले माहित आहे? लहानपणी त्याने एका लग्नात, गणपती पूजनाच्या वेळी  वडिलांना 'बाबानळी, मला नळी पाहिजे' असे हटाने सांगितले आणि तेंव्हा पासून तो झाला' "बाबानळी'!
बाबा लगीन' झपाटलेला ह्या चित्रपटातील हे वाक्य महेशने बाबा नळी वरूनच घेतले असावे.

कित्येक वेळा आपण सारे त्या व्यक्तींना फक्त   त्यांच्या ओळखत असतो आणि त्यांची खरी (मूळ) नावे आपल्याला माहितही नसतात. एकदा हे कानबोके गृहस्त माझ्या अंबरमामाकडे गेले. माझ्या मामे  भाऊ, महेशने त्यांचे असे स्वागत केले, " Oh, Mr. Kanboke do come in. We were expecting you,sir. Daddy! Jenma! Mr. Kanboke has already come."

हे कानबोके तेंव्हा आपल्या कानांपासून नका पर्यंत नक्कीच लाल बुंद झाले असवेत. 
आणि  माझ्या मामा मामीने त्याला समज दिल्या नंतर तो असे ओरडलाही असेल, "Damn it! I wasn't aware of his real name.


विनय  त्रिलोकेकर