पिठोरी
आज आहे पिठोरी!
"अतिथि कोण ? "
" मी !"
"अतिथि कोण ? "
" मी !"
"अतिथि कोण ? "
"विनय!" (स्वतःचे नाव घेत )
अशा प्रकारे आम्ही ५ That's देवाला नमस्कार करून आई कडून वाण आणि आशीर्वाद (आजही मला फोनवरून
माझी बहीण, निशाने आशीर्वाद
दिला) घेत असू . आई पाटावर पिठोरीचे (धारपाया ) चित्र काढीत असे . पुढे माझी सर्वांत मोठी बहीण , पुष्पा हे चित्र कागदावर काढू लागली आणि त्यानंतर मी काढू लागलो . The mantle was sort of passed onto me.
दरवर्षी हे चढणे सोपे नव्हते आणि हे पिठोरीचे चित्र फार मोठे असायचे . मग माझ्या मुलीने ते लहान काढून त्याची फ्रेम केली . आता आम्ही तीचपुजतो.कदाचित माझ्या बहिणी धार्मिक असतीलही , पण मी थोडा वेगळा आहे. तरीही आम्ही सारे कर्तव्य निष्ठ आहोत . असो .
आम्ही मोठे झालो . मुले झाली . मुलं पण मोठी झाली. मला तरी आठवत नाही की आई वाण देत असतांना आम्ही कधी मजा मस्ती केली असेल. आम्ही हे सारे गंभीर्याने साजरा करत होता, may be with all the sanctity (पवित्रता) !
आई तिच्या सर्व मुलांपासून , जावई सून ते सर्व नातवंडांना वाण देयायची . ( जर कोणी प्रत्येक्षात नसेल तर त्याची /तिची प्रॉक्सी ).
संजीव हा तर वात्रटपणात नक्कीच सर्व प्रथम!
एकदा संजीव वाण घेत होता.
आई , " अतिथी कोण ?"
संजीव , " मी (नाही )"
आई , " अतिथी कोण ?"
संजीव , " मी (नाही)" l
तो 'दोनही वेळा ' नाही ' हा शब्द इतक्या हुळू बोलला की आईने ते ऐकले नाही . मात्र तिसऱया वेळी आई , " अतिथी कोण ?"
संजीव , " मी नाही , माझी बहीण ! आजी तू काय तेच विचारात आहेस ? आदिती कोण ? आदिती माझी बहीण आहे न ?"
विनय त्रिलोकेकर