Tuesday, 29 October 2013

माणसाची गरज!





माणसाची गरज!
माझ्या एका फेस बुकच्या फ्रेंड, दीपश्रीने  असे पोस्ट शेअर केले:





त्यावरून मला लिओ तोळस्तोय ( Leo Tolstoy) ह्यांची मी शाळेत असताना वाचलेली गोष्ट (रशियन भाषेतून इंग्रजीतले रुपांतर) आठवली. 'माणसाला अशी कितीशा जागेची गरज असते?' वाचलेली गोष्टीतील शब्द नि शब्द मला आठवतो. आणि खास आपल्या साठी ती गोष्ट मी मराठीत लिहित आहे.
'माणसाला अशी कितीशा जागेची गरज असते?'



                                                 भाग १ - सैतानाला आव्हान !

   एक मोठी बहिण आपल्या खेडेगावातील धाकट्या बहिणीकडे येते. मोठीचे लग्न झाले असते ते एका श्रीमंत शहरातील व्यापाऱ्याशी तर धाकटीचे  एका गावातील शेतकऱ्या बरोबर. दोघी चहा घेत असताना मोठी आपल्या धाकट्या बहिणीस गर्वाने सांगू लागते की शहरी जीवन कसे आरामशीर आणि सुखसोयीचे, कसे ते आणि त्यांची मुले- बाळे  भिन्न - भिन्न व सुंदर कपडे घालतात, कशी आपली मुलं ह्या वातावरणात रुळली आहेत, कशी ती रोज पक्क्वान्ने खात असतात आणि ती स्वतः देखील कशी वेगवेगळ्या विहारस्थानाना आणि नाट्य गृहांना जात असते, मनोसुक्त मौजमजा कशी लुटते, स्वतःचे मनोरंजन कसे करते, वगैरे, वगैरे. .   
. धाकटी बहिण काहीशी चिडली होती. तिला शहरी जीवनाचे आकर्षण सोडा तर चक्क एक प्रकारची घृणा होती. आणि झाले असे की तिने आपल्या शेतकरी जीवनाचे गुणगान चालू केले.

 " माझे आयुष तुझ्या सारखे बनवण्याची माझी मुळीच इच्छा नाही!" ती तावातावाने बोलत होती, " आम्ही रांगडे जीवन जरूर जगात असू पण मनमोकळे आणि कोणतीही काळजी नसलेले आनंदमय आयुष जगात आहोत.तुम्ही आमच्या पेक्षा चांगल्या प्रकारे आणि उच्च पद्धतीने जगात असाल. जरी तुम्ही गरजे पेक्षा जास्त कमावतात तरी तुम्ही आपले सारेच गमावू शकता. ताई, तुला ती म्हण माहित आहे ना, ' नफा आणि तोटा हे जुळे भाऊ आहेत' असे नेहमी होत असते की आज जे श्रीमंत आहेत ते उद्या आपल्या भाकरी साठी भिक मागतील. आमचे तसे नाही. आमचे कसे सारे सुरक्षित आणि विश्वसनीय असते. शेतकऱ्याचे आयुष जाड-जुड व रंगतदार  नसते तर खडतर पण दीर्घायुष्य असते. आम्ही धनवान कधीच होणार नाही पण आम्हाला खाण्याची कमतरता कधीच नसणार!"

 मोठी बहिण कुत्सिक्पणाने व उपहासाने म्हणाली, " बस कर! तुला जर डुकरांच्या आणि येथील वासरांच्या  व केर-कचऱ्यात तुझे पुढचेही आयुष काढायचे असेल तर ठीक आहे. सुडौलता, सौष्ठ व सुरेखपणा ह्यां गोष्टी तुला काय ग समजणार! आमचे शहरी रीतीरिवाज आणि शिष्टाचार तुला कसे काय आवडणार? तुझा नवरा कितीही राबो, एखाद्या गुलामा प्रमाणे, पण तू आणि ते अशेच मरणार - शेणाच्या ढिगाऱ्यावर आणि तुमची मुलेही तशीच मरणार. "

  दरम्यान, दोघी बहिणींचा चहा घेऊन झाला होता आणि त्यांचे बोलणेही संपले होते. आता सारे झोपण्या साठी निघाले देखील. पण खोलीत त्यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणीतरी होते - साक्षात सैतान! सैतानाला मनोमन आनंद होतहोता. बरे झाले पाहोमच्या बायकोने त्याला बढाया मारण्यास प्रवृत्त केले!

 "म्हणूनच त्याने मला, म्हणजे साक्षात सैतानाला, आव्हान दिले होते.काय तर म्हणे, अधिक अधिक जमीन असती तर मलाही, खुद्द सैतानाला घाबरणार नाही काय? मग बघूचया. होऊ दे आपल्यात एक चढाओढ - एक जंगी झटापट! मी मिळवून देईन तुला हवी तेव्हडी जमीन आणि येशील तू माझ्या तावडीत."



आणि सुरु झाले त्यांचे हे युद्ध!  


                                          भाग २ - सुरु झाले सैतानाचेकारस्थान!

 शेजारच्या गावात राहणाऱ्या एका म्हातारीकडे थोडी जमीन होती, तीनशे एकर. ती साऱ्या आजूबाजूच्या शेतकरी आणि माजदुरांशी गोडीगुलाबीने रहात होती. सारे काही ठीक चालले होते. पण तिने ठेवला एक सैनिकाला आपला मदतनीस गुलाम. तो ह्यां ना त्यां कारणावरून लोकां कडून दंड वसूल करू लागला. पाहोमला पण त्याची झळ पोहोंचू लागली. पाहोमने कितीही काळजी घेतली तरी  कित्येक वेळा पाहोमचा घोडा तिच्या शेतात घुसत असे किंवा त्याच्या गाई आणि वासरे मातारीच्या गाय्रानांत जात आणि दर वेळा त्याला दंड भरावा लागत असे. कुर-कुर करीत तो दंड भरायचा पण आपला राग-क्रोध तो आपला हकच्या पत्नीवर काढीत असे. साऱ्या उन्हाळ्यात पाहोमची ही व्यथा चालूच होती.

हिवाळा सुरु झाला. रशियातील ते थंडीचे दिवस. सगळीकडे हिम वर्षाव, सर्व जमीन बर्फाने आच्छादलेली. पाहोमला बरे वाटू लागले. घोडा होता तबेल्यात आणि गुर- ढोर होती गोठ्यात. आता बाईच्या शेतात त्याची गुरे आणि घोडा चारू शकत नसल्या मुळे आपल्या कडील चारा- वैरण संपते ह्या विचाराने पाहोमची कुरकुर होतच राहिली. पण समाधान एवढेच आता दंड भरण्याची काळजी नव्हती.

मग त्याच्या कानावर आले की ती म्हातारी आपली जमीन विकू पाहते आणि बाजूच्या खानावळीचा मालक त्या संबंधी तिच्या बरोबर बोलणी करण्यास जाणार आहे. इतर शेतकर्यांना हे जेंव्हा समजले तेंव्हा ते भयचकित व काळजीने व्याकूळ झाले.

"बापरे," ते विचार करीत होते," जर तिची जमिनीवर खानावळी मालकाने कब्जा केला तर तो मोणूस आपल्या कडून अधिकच दंड वसूल करून आपल्याला जास्तच त्रास देईल. आपण सारे तिच्या मालमत्तेवरच औलंबून आहोत. ती जागीर आपल्या साठी फार महत्वाची आहे. "

मग साऱ्या शेतकरी समुदयने ती जमीन सामुहुकरीतींनी, तिला चांगली किंमत देऊन, विकत घेण्याचे आणि समाईक रीतीने शेती करण्याचे ठरवले. त्या साठी सारे गावकरी दोन तीन वेळा भेटले देखील. पण मतभेद होतच राहिले.  तानाने  पेरले होते त्यांच्यात विसंवादाचे बीज! मग असे ठरले की प्रत्येकाने स्वतंत्रपणे  आपल्या  हिमतीने  आणि गरजेनुसार  आपल्याला पाहिजे  इतकी  जमीन खरीदी  करायची . म्हातारीने  ते ही मान्य  केले.  आपला शेजारी  पन्नास  एकर जमीन घेत  आहे हे पाहोमला समजले आणि असेही  समजले की जमिनीची अर्धी  किंमत आता आणि राहिलेली  अर्धी  किंमत एका  वर्षा  नंतर  घेण्यास  ती बाया तयार  झाली. पाहोमला त्याचा हेवा वाटू लागला.
 
"बघ, सारी जमीन जात आहे. दुसरे ती घेत आहेत आणि आपल्याला काही उरणार नाही" तो आपल्या बायकोस समजावत होता, " जीवन अगदी कठीण होऊन बसले आहे. म्हत्यारीचा तो गुलाम आपली फार पिळवणूक करतोय. आपल्याला काहीतरी केले पाहिजे." 

मग ते दोघे विचार करू लागले, आपण जमीन कशी घ्यायची. त्यांच्या जवळ शंभर रुबल्स शिल्लक होते. त्यांनी काळजावर दगड ठेऊन तट्टू विकला आणि अर्ध्या मधमाश्या देखील. मुलला भाडे कामगार म्हणून एका लामिनदाराकडे कामास जुमपाविले आणि मोबदल्यात जामीनदाराकडून आगाऊ पगारही घेतला आणि राहिलेली रक्कम आपल्या मेहुण्याकडून कर्जाऊ घेतली. अशा रीतीने जमिनीची अर्धी किंमत उभी केली. कागद पत्र करून चाळीस एकर जमीन आपल्या नवे केली आणि बाकी राहिलेली रक्कम वर्षभरात फेडण्याचा करार करून त्या जमिनी वर तो कसू लागला.

आता पहोमच्या नावे स्वतःची अशी जमीन झाली होती. त्याने काही बीज-बियाणे शेजाऱ्यानकडून मागून आणली आणि ती आपल्या जमिनीत पेरली. पिक भरघोस आले आणि वर्षभरात त्याने आपले सारे कर्ज चुकते केले, म्हातारीचे आणि आपल्या मेहुण्याचे देखील. तो आता एक संपूर्ण शेतकरी झाला होता. स्वतः जामीन नांगरणे, पेरणी करणे, कापणी करणे, स्वतःच्या जमिनीवर चारा उगवून आपली गुरे आपल्याच शेतावर चाराला लावणे. आणि शेतीच्या उत्पन्नातून बऱ्यापैकी पैसा येऊ लागला. पाहोमला असे वाटू लागले की आपल्या जमिनीत पिकणारे गावात तसेच उगवणारी फळे - फुले आणि धन्य पाहोमला  इतरां  पेक्षा नक्कीच वेगळी  आहेत. आणि आपण  काढलेले पिक इतरांच्या पिका पेक्षा किती तरी पटाने सरस आहे ह्याची त्याला खात्री पटली. पण त्याला त्याचे नवल ही वाटत होते कारण पूर्वी तो जेंव्हा ह्या भागातून जात असे तेंव्हा ह्या जमिनीत काही वेशेष आहे असे त्याला काद्धीच वाटले नव्हते, आजू-बाजूच्या जमिनीं सारखीच वाटायची. मग आता ती वेगळी कशी झाली?
तुम्हाला तो सैतान लक्षात आहे ना?होय, होते ते सैतानाचेच कारस्थान!
                                       
                                       बघाग ३ - ह्याला भूक म्हणावी की हाव?

पहोम आता सुखात होता. आणि तो समाधानी पण राहिला असता जर काही गरीब शेतकरी त्याच्या इलाख्यात अतिक्रमण करीत राहिले नसते तर. तो त्यांना सभ्य पणे विनवण्या करी, पण त्यांचे त्यांच्या
गुरांना घेऊन पाहोमच्या शेतात येणे थांबले नाही. सामुदायिक गुराख्यांचा मुख्याने तर कहरच केला. गावातल्या साऱ्या गाई -( तेथे म्हशी नसतात, हो), शेळी- मेंढरे, घोडे- बकऱ्या पाहोमच्या कुरणात चरण्यास पाठवू लागला. घोडे मका व इतर धान्याची कणसे खात. पाहोम बिचारा वारंवार त्या सर्वांना हक्लावीत असे. पण मग हे सारे त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले.मग त्याने जिल्ह्यातील न्यायालयात तक्रार नोंदवली. जरी त्याला माहित होते की शेतकऱ्यांची 'जमीन' ही मुलभूत गरज आहे तरी पण तो असा विचार करीत होता, " मला त्यांच्या अशा वागण्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. असे होत राहिले तर माझे सर्वस्व नष्ट होईल. त्यांना धडा शिकवलाच पाहिजे," 

झाली मग पाहोमची त्यांना धडा देण्याची सुरवात! एक धडा, दुसरा धडा - तीन- चार शेकार्यांना ठोठावले दंड. आणि झाली मग शेजार्यांची पाहोमवर अढी गेण्यास सुरवात! ते पाठवू लागले आपली गुरे मुधाम पाहोमच्या शेतात! एकाने तर रात्रीच्या वेळी शेतात शिरून लाकडांसाठी झाडे ही तोडली आणि विनाकारण पांच कवळी लिंबाची झाडी कापून टाकली. दुसऱ्या दिवशी जेंव्हा पाहोमने हे पाहिले तेंव्हा त्याच्या रागाचा पारा फार चढला.
 पाहोम विचार करू लागला. कोणी केले असावे हे? बरेच डोके खाजवून त्याने असा निष्कर्ष काढला की हे काम निश्चितच सैमनचेच असणार आणि त्याने त्याची कोर्टात तक्रारही केली. पणन पुरव्याच्या अभावी सैमन सुटला. "तुमचे हात ओले केले म्हणून त्याला तुम्ही सोडले", असा आरोप तो न्यायधीशावर  करू लागला. मग पाहोम ह्यांना त्या कारणांवरून  सर्वांशी भांडू लागला. आणि त्याला धमक्या येऊ लागल्या- त्याचे घर जाळण्या पासून ते त्याला मारण्या पर्यंत.

त्याच सुमारास एक अफवा पसरली की कित्येक लोकं गाव सोडून जात आहेत. आणि पाहोमला वाटले, " मला हे गाव सोडण्याची काहीच गरज नाही. लोकांनी गाव सोडल्याने बऱ्याच जमिनी मोकळ्या होतील. मी त्या जमिनी घेऊन माझी जागीर वाढवीन. मला अधिक आरामशीर राहीन. अजून तशी माझी अडचणच होते, ठीकशी मोकळीक आणि आराम मिळत नाही."
एके दिवशी पाहोमने एका वाटसरू कडून ऐकले. तो वोलगा ह्या गावातून नुकताच आला होता. शेती करण्यास आणि धन मिळवण्यास तेथील परिस्थिती फार अनुकूल होती. जमीन इतकी सुपीक होती की म्हणे राई लावली की ती घोड्या इतकी उंच वाढे. एक शेतकरी मोकळ्या हाताने आला आणि आज त्याच्याकडे स्वतःचे सहा घोडे आणि दोन गाई आहेत.  
पाहोमच्या हृदयात आकांक्षेची ठींगरी पेटली.
" मी दुसरी कडे ऐशारामात राहू शकतो मग ह्या बिळात का राहू? ह्या गर्दीच्या ठिकाणी त्रास आणि भानगडी फार. मी जमीन व घर विकून येथला कारोबार आटपीन,पण मला खुद्द जाऊन पाहणी केलेली बरी!" पाहोमने ठरवून टाकले. 

उन्हाळा आला आणि आणि स्वारी निघाली बोटीने वोल्घाला.पाहिजे असलेली संपूर्ण माहिती मिळवून पाहोम शरद ऋतूत घरी परतला आणि आपली मालमत्ता विकण्यास सुरवात केली. आपली जमीन त्याने फायद्यात विकली, आपले घर्वादी व वास्तू आणि गुरे   विकली, आणि आपल्या समूहाचा राजीनामा दिला. तो वसंत ऋतू सुरु होताच आपल्या कुटुंबासकट नव्या ठिकाणी जाण्यास निघाला.

 नव्या जागी पोहोंचताच पाहोमने तेथील (एका मोठ्या गावाच्या) समाज संस्थेत प्रवेश घेतला. त्याला १२५ एकेर जमीन देण्यात आली आणि त्या शिवाय तो संस्थेची जागा वापरू शकत होता. त्याने आपल्या इच्छेनुसार बांधकाम केले आणि हवी असलेली गुरे-ढोरे विकत घेतली. ही जमीन आधीच्या जमिनी पेक्षा चारपट जास्त होतीच पण अधिक सुपीक आणि मक्यासाठी फार उपयुक्त होती.  बांधकामाची गडबड नव्या ठिकाणचे नाविन्य, ह्या मुळे पाहोम सुरवातीला खुश होता. पण जस जशी सवय होत गेली तस तशी पाहोमची हाव वाढू लागली. समाज संस्थेने दिलेल्या जमिनी वर पहिल्या वर्षात त्याने गहू पेरला आणि पीकही खूप आले. पण--------
वर्षभरातच त्याला वाटू लागले,"अधिक गहू लागवड करण्यासाठी आपल्याला जमीन पुरेशी नाही."
सैतान समजून चुकला , "पाहोम माझ्या जाळ्यात अडकत चा

                                                        भाग ४ - येरे माझ्या मागल्या!
अधिक संपत्ती, अधिक जमीन, अधिक ऐश्वर्य आणि अधिक ऐषाराम, हे सारे मिळवण्याची पाहोमची धडपड चालूच! दोन वर्षात त्याने गव्हाचे भरघोस पिक्काढले होते. त्याला गव्हाचे लागवड चालू ठेवायची होती. पण गव्हाला लागते कोरी (VIRGIN), पण दोन वर्ष गव्हाचे पिक काढून जमीन झाली होती नापीक- बंजर. आणि तो उगवू शकत होता ते म्हणजे घास - चारा. सारेच गव्हा करिता कोऱ्या जमिनीच्या शोधात. पाहोमने भाड्याने एका वर्ष करिता जमीन मिळवली. आणि गव्हाचे पिक चांगले देखील आले. पण जमीन गावापासून फार दूर होती आणि गहू बैलगाडीतून गावात आणण्यासाठी चांगला दहा मैलांचा प्रवास करायला लागत होता. त्याची होती अनेक शेते, पण सारी विखुरलेली. 
पाहोमचे विचार चक्र सुरु झाले:
"मी एक भली मोठी जागा घेतली तर? एकाच ठिकाणी असलेली जमीन, माझी घरवाडी, वास्तू, शेतीवाडी, सारे काही एकत्रित असेल. सारे कसे आटोपशीर. माझे जर असे स्वतंत्र घरकुल असेल तर
 कोणतीच असुखदता किंवा कटुता माझ्या वाट्यास येणार नाही."
हा विचार त्याच्या मनांत घर करून बसला होता. आणि सुरु झाला पाहोमचा पुन्हा जमीन-शोध! 
येरे माझ्या मागल्या!
                                                          
                                                               भाग ५- हाव काही संपत नाही
 

 पाहोम व त्याचा परिवार नव्या जागी पोहोचताच, त्याने त्या मोठ्या गावातील जनसमुदाय संस्थेच्या सभसत्व करिता अर्ज केला. त्या सामुदायिक संस्थेकडून १२५ एकर जमीन मिळवली. जागा एके जागी नव्हती तर वेग-वेगळ्या ठिकाणी विखुरलेली होती. ह्या खेरीज संस्थेचे गायरानही वापरण्याची त्याला मुभा होती. आपल्या इच्छेनुसार पाहोमने तेथे घर बांधले आणि गुरेढोरांची खरेदी केली. संस्थेकडून मिळालेली जमीनच त्याच्या अगोदरच्या संपूर्ण जमिनी पैक्षा तीनपट जास्त होती. जमिनीचा बराचसा भाग पिकाऊ आणि लागवडी साठी उपयुक्त होती. सुरवाती-सुरवातीला, बांधकामाच्या गडबड  व वासाहित मध्ये जम बसवण्यात घेतलेले परीश्रम, ह्यामुळे पाहोम फार खुश होता.

 मग त्याचे विचार चक्र पुंन्हा सुरु झाले. आपली जमीन पुरेशी नाही असे त्याला वाटू लागले. पहिल्या वर्षात त्याने संस्थेने दिलेल्या जमिनीत गव्हाची लागवड केली. पिक पण भरघोस आले. त्याला गहूच पेरावे असे वाटले. पण संस्थेनी दिलेली जमीन त्यासाठी अपुरी होती. आणि वापरून झालेली जमीन आता गव्हासाठी निरुपयोगी झाली होती कारण गव्हाची लागवड फक्त कोऱ्या (vergin) जमिनीत होते. सतत फक्त दोन वर्षच कोऱ्या जमिनीवर गव्हाची लागवड करता येते आणि नंतर ती जमीन पडीक बनते आणि त्यावर घास- चारा वाढतो. अशा कोऱ्या जमीन मिळवण्यासाठी साऱ्यांची चढाओढ चालली होती. गरीब तशी जमीन विकत घेत आणि व्यापाऱ्यांना देत जेणेकरून त्यांना आपले कर भरता 
येत. तर पाहोमला तसली जमीन गव्हाच्या लागवडी करिता हवी होती.

 त्याने तशी जमीन अखेर मिळवलीही. त्यांनी गव्हाची लागवड पण केली आणि पिक देखील भरघोस आले. पण ते शेत गाव पासून फार लांब होते आणि पिक आणि इतर सामान ने-आण करण्यासाठी बैल गाडीने दहा मैलांचा प्रवास घडत असे. मग पाहोमला समजले की काही सावकार स्वतंत्रपणे आपल्या शेतावर राहूनच आपल्या श्रीमंतीचा लाभ घेतात.
 त्याने असा विचार केला, "मी जरका अशी जागा घेऊन माझे घरकुल थाटले तर काय मजा येईल. किती ते आटापशीर आणि छान असेल ते!"

तीन वर्ष त्याने अशीच काढली. जागा भाड्यानी घेऊन आणि त्यावर गव्हाची लागवड करणे. त्याला भरघोस पिक मिळत असे. पण आता तो हे सारे करून पार ठाकला आणि कंटाळला देखील. भाड्यानी जमीन मिळवण्या साठी वेळोवेळी होणारी धडपड, नोकोशी वाटू लागली. जेथे जेथे भाड्यानी जमीन उपलब्द असे तेथे शेतकऱ्यांची होत असे झुंबड. त्यासाठी तुम्हाला अतिशय चलाख आणि चतुर असणे जरुरी होते.
आणि तिसऱ्या वर्षी असे घडले की त्यांनी आणि एका व्यापाऱ्याने मिळून एक जमीन भाड्यानी घेतली. ती नांगरली देखील. पण काही शेतकरी आणि त्यांच्यात तंटा झाला. शेतकरी न्यायालयात गेले आणि  पाहोमचे झाले नुकसान.
मग त्याने असा विचार केला, " माझी जर स्वतंत्र जमीन असेल तर झगडे-तंटे आणि कटुता माझ्या वाट्याला येणारच नाही."
तो असल्या जमिनेच्या शोधातच होता आणि त्याची गाठ पडली एका शेतकऱ्याशी, ज्याने तेरा एकर जमिनेची खरेदी केली होती. पण काही अडचणी मुळे तो ती जमीन कमी किंमतीत विकण्यास तयार झाला. घासाघीस करून पाहोमने ती जमीन १५०० रुबल्स, ते पण काही रक्कम सुरवातीला आणि बाकी
नंतर ह्या तत्वावर.

सारे काही दोघांचे निश्चित झाले. कागद पत्रेही तयार झाली. पैश्यांची देवाण- घेवाण तेवढी बाकी होती. तेही झालेच असते, पण --- एके दिवस एक व्यापारी आपले घोडे चारण्यासाठी पाहोमच्या शेतावर आला. पाहोमने त्याला चहाचा आग्रह केला आणि चहा घेत-घेत गप्पा मारू लागले. व्यापारी नुकताच बश्कीरांच्या देशांतून परतला होता. त्याने त्यांच्या कडून हजार रुबल्सच्या मोबदल्यात तेरहाजार एकर जमीन खरेदी केली होती.
" तुला ती जमीन फार स्वस्तात मिळालीकी रे! जवळ- जवळ फुकटात म्हणा!"
"होय, बश्कीरांच्या प्रमुखांशी मैत्री केली म्हणजे आपले काम झालेच म्हणून समजा! मी त्यांना शंभर रुबल्स किंमतीचे रेशमी पायघोळ जागे दिले व चादरी आणि त्या व्यतिरिक्त एक चहाचा खोका व पिहित असेलेल्यांना वाईन; आणि मिळाली मला एक पेन्नीला एक एकर दरांत ही सारी जमीन," असे सांगून त्याने पाहोमला जमिनीची कागत पत्रे दाखवली. पाहोमने आपल्या प्रश्नांचा भडीमार चालूच ठेवला.
आणि व्यापारी पुढे सांगू लागला, " सारी जमीन नदी काठी असल्या मुळे ती सुपीक आहे. तुम्ही जरी वर्षभर चालत बश्कीरांच्या देशाशाचा फेरफटका केलांत तरी थांची सारी जमीन पालथी घालू शकणार नाहीत. बाश्किर लोकं फार मेंढ्यांप्रमाणे गरीब,नम्र व नेमळत आहेत. तुम्ही त्यांच्या कडून काही मिळवू शकता.'

"मग आता एका हजारात पंधरा हजार जामीन मी का घेऊ? जर मी बश्कीरांच्या देशातात गेलो तर मला दहापट जामीन मिळू शकते आणि ती देखील फेकाऊ दरांत," पाहोम विचार करू लागला.
                                                                   


                                                                      भाग ६ -बश्कीरांच्या देशात .






                                                                

  व्यापाऱ्याने पाहोमचा निरोप घेतला. पण पाहोमने तो जाण्या पूर्वी त्याच्या कडून हवी असलेली संपूर्ण माहिती घेतली होती, जसे बश्कीरांच्या देशात जयाचे कसे, तेथे जाण्यास वेळ किती लागेल, वगैरे, वगैरे. आपल्या पत्नीस आपल्या घराची काळजी घेण्यास पाठी ठेऊन पाहोम एका मदतनीसास बरोबर घेऊन बश्कीरांकडे जाण्यास रवाना झाला. वाटेत ते एका गावात थांबले आणि एक चहाचा खोका, थोडी वाइन व व्यापाऱ्याने सुचवल्या प्रमाणे इतर काही वस्तूंची खरेदी करून आपल्या पुढील प्रवासास प्रयाण केले. साधारण तीनशे मैलांचे अंतर त्यांनी पार केले होते आणि सात दिवसांनी ते एका ठिकाणी पोहोंचले. तेथे त्यांना बश्कीरांचे तंबू ठोकलेले दिसू लागले. सारे काही त्या व्यापाऱ्याने सांगितले होते त्याच प्रमाणे पाहोमला आढळले -  तंबूवर बुरणूसांचे आवरण होते आणि सारे तंबू नदी किनाऱ्यावर होते, बाश्किर कोणत्याही प्रकारची शेती करीत नव्हते आणि भाकरीही खात नव्हते, तंबू मागे बांधलेले घोडे आणि तट्टू किनार्यावर कळपात चरत आणि दिवसातून दोन वेळा घोडी घोड्यांजवळ आणल्या जात. गोडींचे दुध काढले जाई आणि त्या दुधा पासून कुमीस तयार केले जाई आणि चीज तयार करीत. हे काम स्त्रियांचे असे. पुरुषांचे काम काय तर कुमीस व चहा पिहीणे, मतान खाणे आणि आपल्या अलगुजानी संगीताचे सूर वाजवणे. ते लट्ठ, आनंदी पण अजाण व अज्ञानी होते. जरी त्यांना रशियन भाषेचे ज्ञान नव्हते तरी ते सारे प्रेमळ व सुस्वभावी होते.  


पाहोमला पाहून बाश्किर लोक आपापल्या तंबूतून बाहेर आले आणि भेटीस आलेल्या पाहुण्या भवति जमा झाले. कोणी तरी एका दुभाष्याला शोधून आणले. दुभाष्या मार्फत पाहोमने त्यांना आपण कशा करिता आलो आहोत ते सांगिले. पाहोमला त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून त्यांना आनंद झाल्याचे जाणले. पाहोमला एका आलिशान तुंबूत नेउन तेथील मुलायम गाडीवर बसण्यास खुणेने सुचविले आणि तेही त्याच्या सभोवती बसले. थोड्या वेळात पाहोमला चहा व कुमीस पिहीण्यास दिले आणि नंतर मेंढीचे मटण. असे स्वादिष्ट पेय आणि मटण पाहोमने आयुष्यात चाखले देखील नव्हते. सोबत आणलेल्या भेटवस्तू खटाऱ्या काढून पाहोम त्या वाटू लागला. बाश्किर लोक आपापसात काहीतरी बोलत होते. 
" हे सारे तुम्हाला सांगू इच्छितात," दुभाषी पाहोमला सांगत होता, "सर्वांना तुमचा स्वभाव फार आवडला आहे. ते तुमच्यावर खुश आहेत. तुम्ही त्यांना भेटवस्तू दिल्यात. आता तुम्हाला त्यांच्या कोणत्या गोष्टी पसंत आहेत? त्या ते तुम्हाला देऊ इच्छितात!"
" मला येथील जी गोष्ट सर्वात जास्त पसंत आहे ती म्हणजे तुमची जमीन. आमची जमीन कस काढून काढून पार ओसाड आणि नापीक बनलाय. तुमची जमीन फार सुंदर आहे आणि अशी जमीन नाही."
दुभाष्या कडून पाहोमचे म्हणणे समजल्यावर बाश्किर काहीशे आश्चर्यचकीत झाल्या सारखे वाटले. एकमेकांशी पुन्हा कुजबुज करू लागले आणि नंतर आनंदाने नाचू बागडू लागले. त्यांचे हे वागणे पाहोमला बुचकळ्यात टाकत होते.
" तुमचा चांगुलपणा आणि तुम्ही दिलेल्या भेटवस्तू. ह्यांच्या मोबदल्यात ते सारे तुम्हाला स्वःखुशीने आणि मोठ्या आनंदाने तुम्हाला हवी तेव्हढी  जमीन देण्यास तयार आहेत. तुम्हाला हवी असलेली जमीन त्यांना दाखवा, त्यांच्या नजरेस आणा आणि ती जमीन होईल तुमची," दुभाषी पाहोमला समजाऊ लागला, " पण तुम्हाला त्यासाठी थोडे थांबणे गरजेचे आहे. आमचे प्रमुख येतीलच इतक्यात आणि मग ते ठरवतील सारे काही."


भाग ७ - बश्कीरांच्या प्रमुखांशी भेट



पाहोम आणि इतर प्रमुखांची वाट पाहू लागले. इतक्यात डोक्यावर कोल्हयाच्या मृदुलोमाची टोपी (fox -fur cap) घालून एक माणूस तंबूत शिरला. सारे एकदम शांत झाले आणि दुभाषी तत्परतेने पुढे होत पाहोमला म्हणाला, " हेच आहेत आमचे साक्षात प्रमुख!"
पाहोमने प्रमुखांना आपल्या कडील सर्वात सुंदर असलेला मुलायम  रेशमी झगा आणि ५ पौंड चहाचा खोका नजराणा दिला. प्रमुखांने त्या सर्वांचा स्वीकार करीत त्यांच्या साठी आरक्षित असलेल्या आसनावर जाउन बसले. इतर बाश्किर त्यांना काही सांगू लागले आणि ते साऱ्यांचे बोलणे लक्ष देऊन  ऐकत होते.
मग प्रमुख रशियन भाषेत पाहोमला म्हणाले, " होय, होऊ दे तसेच. तुम्हाला हवी असलेली जमीन तुम्ही निवडा. आमच्या कडे मुबलक आणि पुरेशी जमीन आहे."
" मला तुम्ही पाहिजे ती आणि पाहिजे तितकी जमीन द्याल," पाहोम आपली काळजी व्यक्त करीत होता,        " आयुष आणि मरण देवाच्या हाती असते. आज तुम्ही द्याल पण उद्या तुमच्या मुलांनी माझ्या कडून ती काढून घेतली म्हणजे? तेंव्हा जमिनेचे कागद पत्र असलेले बरे . मला एक व्यापारी भेटला होता आणि त्याने तुमच्या कडून जमीन घेतली. मलाही त्याच प्रमाणे कागदी करार हवा आहे"
 प्रमुखांना समजले आणि त्यांनी पाहोमला कागदपत्रे तयार करून जमीन देण्याचे आश्वासन दिले.
" आणि किंमत काय ?" पाहोमने विचारले.
"आमचा भाव एकाच. एक दिवसाला हजार रुबल्स"
पाहोमला समजले नाही.
"एक दिवस? हे कोणते माप? किती एकर होतील?"
"आम्हाला तशी गणना करता येत नाही," त्यांनी सागितले. " आम्ही " आम्ही दिवसाच्या मापाने विकतो. एक दिवसात जेवढी जमीन तुम्ही आपल्या पायाने चालत पालथी घालाल तेवढी जमीन हजार रुबल्स मध्ये तुमची."
पाहोमला आश्चर्य वाटले.
"पण एका दिवसात बरीच जमीन मिळू शकते. एक भला मोठा जमिनीचा तुकडा!"
प्रमुख काहीसे हसून म्हणाले, "होय, होईल ते सारे तुमचे. पण एक अट आहे. जेथून सुरवात कराल तेथे सूर्यास्ता पर्यंत परत येणे जरुरीचे. अन्यथा तुमची रक्कम बुडाली."
"मी सुरवात करीन. त्या जागेची मी खुण कशी ठेवायची? आणि मी किती प्रदेश पालथा घातला हे कसे मोजायचे? "
" तुम्हाला आवडेल त्या ठिकाणी आपण जाऊ. आम्ही तेथे थांबू. तुम्ही तेथून सुरवात करा. बरोबर एक कुडळ घ्या. आणि वेळोवेळी पालथ्या घातलेल्या जमिनीवर खुण करा. प्रत्येक वळणावर एक खड्डा खणा. नंतर आम्ही एका खड्डया पासून दुसऱ्या, तिसऱ्या असे करीत शेवटच्या खड्डया पर्यंत  नांगरून तुमची जमीन निश्चित करू. अशा रीतीने तुम्ही एक भले मोठे वर्तुळ करू शकता. पण लक्षात असू द्या सूर्यास्ताच्या आंत तुम्हाला परत येयला हवे."
पाहोम उल्हासित झाला होता, आनंदित झाला होता. त्याने दुसऱ्या दिवशी सुर्योदयालाच सुरवात करायचे पक्के केले. त्यांनी गपागोष्टी केल्या. पुन्हा कुमीस आणि मटणाचे बेत झाले. रात्र झाली. पक्षांच्या पिसांच्या मुलायम गाडीवर पाहोमला झोपण्याची व्यावस्ता केली होती. नंतर सारे लोक आपापल्या तुंबूत निघून गेले. 


   भाग ८ - सैतानाचा खेळ म्हणा की एक पूर्व सूचक स्वप्न?

पाहोम मुलायम गादीवर झोपला खरा पण त्याला झोप काही येई ना. त्याच्या मनांत एकाच विचार.
"काय भला मोठा जमिनीचा तुकडा मी त्या भोळ्या माणसां  कडून वसूल करीन! दिवस भारत मी चांगले पस्तीस मैल सहज मिळवीन. सद्या दिवस मोठे आहेत मग चाळीस मैल पण शक्य! खरोखर, ३५ ते ४० --- फारच मोठी जमीन! त्यातील काही भाग इतका सुपीक नसेल, मी तो वीकेन किंवा गरीब शेतकारांना भाड्याने देईन. पण चांगला सुपीक भाग माझ्याकडेच राखून ठेवीन आणि त्यावर शेती करीन. मी दोन बैल जोड्या विकत घेईन आणि काही कामगारही कामाला ठेवीन. शंबर-दीडशे एकर जमीन नांगरून त्यावर शेती करीन आणि बाकीचे गाई-गुरांना चारण्या साठी ठेवीन."
अशा रीतीने पाहोम रात्रभर जागाच राहिला. साधारण पहाटेस त्याला डुलकी लागली. त्याचे डोळे मिटले असतील- नसतील तोंच त्याला एक स्वप्न पडले. त्याला वाटले की आपण तुंबूत निजलो आहोत आणि बाहेर कोणीतरी खुदुखुदु हसत होते. स्वप्नात पाहिले बाहेर बश्कीरांचा प्रमुख तंबू समोर बसून आपले पोट धरून जोर-जोरात हसत आहे आणि गडबडा लोळत आहे.
 " कहो असे हसता का?" असे विचारण्यासाठी पाहोम त्यांच्या जवळ गेला.
पण हे काय? हा तर प्रमुख नसून तो तर नुकताच आपल्याला घरी भेटलेला व्यापारी, छे हा तो नाही. हा तर फार पूर्वी आपल्याला भेटलेला वोल्गा वरून आलेला पहिला शेतकरी.
बापरे! हा तर साक्षात सैतान! होय तोच तो, डोक्याला दोन शिंग आणि पायाला खुर असले ला सैतान! सैतान आपल्या पुढे उताणा पडलेल्या माणसाकडे पाहून खुदुखुदु हसत होता. त्या उताण्या पडलेल्या व्यक्तीच्या पायात पादत्राणे नव्हते आणि अंगात फक्त विजार व शर्ट. तो एक मृत देह होता. हे काय? तो मेलेला माणूस आपणच आहोत. पाहोम खडबडून जागा झाला.
"काय हे भयानक स्वप्न!" पाहोम स्वतःशीच म्हणाला.
तंबूचे दार उघडे होते. पहाट होत होती.
"आता उठलेले बरे," पाहोम विचार करीत होता. " लौकर सुरवात करायला हवी."
तो उठून बाहेर आला आणि खटाऱ्यात झोपलेल्या आपल्या नोकरास जागे आणि त्याला बश्कीरांना बोलावण्यास पाठविले. कुमीस व चहाचा कार्यक्रम झाला. पण पाहोमने ते घेण्यास नकार दिला. एकतर त्याला कधी एकदा आपण सुरवात करतो असे झाले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते स्वप्न.
हा त्या सैतानाचा खेळ तर नसेल? ते एक सूचक स्वप्न तर नसेल? 



भाग ९ -विनाश काले विपरीत बुद्धी
बाश्किरही तयार झाले होते आणि सारे निघाले: काही गोड्यांवर स्वार झाले तर काही बैल गाडीतून निघाले. पाहोम आपल्या छोट्या खटाऱ्यात निघाला,सोबत त्याचा नोकर होता. सारे ठरलेल्या घासाच्या मैदानात आले आणि तेथील 'शिखान' नावाच्या एका लहान टेकडीवर चढू लागले. आता कुठे पहाट होत होती, पूर्वेकडील क्षितिजावर सुर्य आपली सुंदर लाल-शेंदरी किरणे टाकू पाहत होता. सारे टेकडीवर एका बाजूस जमा झाले. बश्कीरांचा प्रमुख पाहोम जवळ येउन आपले हात फैलावून समोर पसरलेले माळरान पाहोमला दाखवीत होते.
ते भव्य विस्तारलेला क्षेत्र दाखवीत ते म्हणाले, " तुमच्या जेवढे लांब दिसते, तुम्ही दृष्टी जेथवर पोहोंचू शकते, ते सारे आमचे आहे. तुम्हाला जो भाग आवडेल तो तुम्ही घ्या."
पाहोमच्या डोळ्यांत एक प्रकारची चामख होती. सारी जमीन सुपीक दिसत होती,  राई सारखी काळी भोर आणि हाताच्या तळव्या प्रमाणे सपाट. खोऱ्यात वेगवेगळी घास-गवत वाढली होती. काहीतर छाती -- छे, डोक्या पर्यंत उंच होती.  सर्व काही आपल्या मना प्रमाणे होत होते.
 प्रमुहांने  आपल्या डोक्यावरील कोल्हयाच्या मृदुलोमाची टोपी काढली आणि जमिनीवर ठेवीत पाहोमला म्हणाले, " ही झाली तुम्हाच्यासाठी  खुण. येथून करा सुरवात आणि परत या. जेवढ्या जमिनी वरून तुम्ही वाटचाल कराल ती होईल तुमची."
पाहोमने आपले पैसे काढून डोक्यावरील आपल्या टोपीत ठेवले. नंतर आपल्या अंगातील बाहेरचा गरम कोट काढला, मात्र आंतला बाह्या नसलेला कोट अंगातच ठेवला. त्याने आपला कमरेचा करगोटा सईल करून पोटा खाली तो घट्ट केला, पाण्याचा चंबू करगोट्य़ाला बांधला, भाकरीची पिशवी कोटाच्या खिशात कोंबला, आपल्या दोन्ही उंच बुटांचे झडपे वर केले आणि आपल्या नोकर कडून कुडाळ घेऊन ती आपल्या हातात घेऊन तो आपल्या मोहिमे साठी सज्ज झाला.
"आपण कोणत्या दिशेने सुरवात करूया? सारीच जमीन कशी भुरळ पाडणारी, मोहात डुबवणारी. काही असो, उगवत्या सूर्याच्या दिशेने गेलेले बरें," असा विचार करून पाहोम पूर्व दिशेस वळला आणि प्रवासास प्रारंभ केला.
"मला वेळ वाया घालवून चालणार नाही. आता काहीसे थंड असल्यामुळे चालण्यास सोपे जाईल."
काही अंतर चालल्या नंतर, अंदाजे हजार यार्ड असावे, तो थांबला, एक खड्डा खणला आणि त्याच्या बाजूला मातीचा आणि हिरवळीचा ढीग रचला जेणेकरून ही जागा लांबून कोणालाही स्पष्ट  दिसेल.
चालून चालून त्याचे पाय मोकळे झाले होते, अंगातील ताठरपणा व कडकपणा पार निघून गेला होता म्हणून तो आता अधिक वेगाने चालत होता. काही अंतरावर आणखी एक खड्डा खणला. त्यांनी पाठी वळून पाहिले. सुर्य प्रकाशात शिखान टेकडी स्पष्ट दिसत होती, त्यावरील माणसेही आणि चकाकणारी खटाऱ्यांची चाके देखील.
पाहोम अचूक अंदाज बंधू शकत नव्हता पण तरीही आपण जवळजवळ तीन मैल अंतर कापले असावे. आता उष्मा वाढला होता. त्याने आपला आंतील कोटही काढून खांद्यावर घेतला. तरीही तो चालतच राहिला. त्याने वर सूर्याकडे पाहिले. नसत्याची वेळ झाली होती.
"दिसातली पहिली पाळी, पहिली फेरी संपली. अशा दिवसात चार असतात, म्हणजे अजून तीन बाकी. तेंव्हा डावी वळून उत्तरेच्या दिशेने वाटचाल करण्यास अजून काही अवधी बाकी आहे. पण माझे बूट काढलेले बरे!" असे स्वतःशी बोलत त्याने बूट काढून ते करगोट्या बांधले.
 आता चालणे अतिशय सोपे झाले होते.
" अजून मी तीन मैल सरळ जाऊन मग डावीकडे वळेन," तो विचार करीत होता. हे ठिकाण फारच छान आहे आणि ही जागा सोडणे म्हणजे खेदाची नव्हे तर मूर्खपणाची बाब ठरेल. काय गंमत आहे, जसजसे  आपण पुढे जात आहोत तसतसे अधिक चांगली आणि अधिक सुपीक जमीन आढळते!"
तो आणखी काळ सरळच चालत राहिला आणि नंतर त्याने टेकडीच्या दिशेने आपली नजर टाकली.  टेकडी जेमतेम दिसत होती आणि माणसे  मुंग्यांप्रमाणे वाटत होती. उन्हातात टेकडीवर काहीतरी चमखत असेलीले पाहोमला दिसले.
"हुष -- हूफ! काय ही गर्मी! केवढा हा घाम. मला. ह्या दिशेने मी पुरेसे आणि आवश्यक तेवढे आलो आहे. आता डावी कडे वाळू या."
त्याने एक खड्डा करून आणि त्याच्या बाजूला माती व हिरवळीचा ढीग रचला. चंबूतून पाण्याचे काही घोट घेऊन डावीकडी तीव्र मोड घेतला. अशा रीतीने तो आता उत्तरेच्या दिशेने चालू लागला. येथे गावात फार उंच होते आणि तापलेले होते. पाहोम अतिशय दमला होता आणि त्याला भूकही लागली होती. सुर्य डोक्यावर आला होता म्हणजे भर दुपार झाली होती. पाहोम थांबला काही भाकऱ्या खालल्या, पाण्याचे काही घोट घेऊन विश्रांती करिता बसला. मात्र आडवे होण्याचे त्याने टाळले कारण  त्याला आपण  झोपी जाऊ अशी भीती वाटत होती. काही वेळ बसल्या नंतर तो पुढे निघाला. खाण्यामुळे त्याला तरतरी आली होती. पण ऊन्हही फार वाढले होते. त्याला झोप येत होती तरीपण तो चालत राहिला. त्याने विचार केला," तासा भाराचा भोगायचा आहे आणि जन्मभरचा आनंद लुटायचा आहे."
तो ह्याही दिशेने खूप पुढे आला होता आणि तो पुन्हा डावीकडे वळणारच होता तोंच एका ओलसर खोऱ्यानी त्याचे लक्ष वेधले.
" ही जागा सोडणे म्हणजे माझा  मूर्खपणाच ठरेल", हे त्याचे पालुपद चालूच. "आळशीचे पिक चांगले लागेल!".
म्हणून त्याने ट्या जागेच्या पलीकडे जाउन आणखी एक खड्डा केला आणि कोपऱ्यावर डावी कडे वळण घेतले. त्यांनी टेकडीच्या दिशेने कटाक्ष फेकला. उष्णतेमुळे धुसर पसरले होते. टेकडी थरथर कापत आहे असा आभास होत होता आणि माणसे तर अंधुक झाली होती.
"बापरे! ती उत्तर दिशेची बाजू मी फार खेचली. आता ही दक्षिणे कडे चालले माझी वाटचाल कमी करायला हवी. होय, माझ्या होणाऱ्या जमिनेच्या नाकाश्याची तिसरी बाजू कमी केली पाहिजे."
आणि तो भराभर पावले उचलून त्या दक्षिण दिशेने सरळ जाऊ लागला. त्याने सूर्याकडे पाहिले. सुर्य अर्ध्या क्षितिजावर आला होता आणि त्यांनी अजून तिसऱ्या बाजूचे दोन मैल देखील पूर्ण केले नव्हते. चौरसाची ही तिसरी बाजू पूर्ण करण्यास अजून दहा मैलांची गरज होती.
"नाही, माझा हा चौरस असंतुलित आणि ओबडथोबाड झाला तरी हरकत नाही. आता मला सरळ रेषेत पश्चिमेच्या दिशेनी टेकडीकडे मोर्च्या नेलेला बरे. तसे आतापर्यंत मी खूप जमीन आपलीशी केली असेन."
 मग पाहोमने शेवटचा खड्डा खणून थेट टेकडीच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरवात केली.

 भाग १० -  माणसाला अशी कितीशा जागेची गरज असते, हो?'

पाहोम थेट टेकडीच्या दिशेने चालत होता. त्याची पावले जड झाली होती. तो उष्णतेने बेजार झाला होता. अनवाणी चालून त्याचे तळवे कापले होते आणि त्यांना फोडही आले होते. त्याला धड चालता येत नव्हते. त्याला आराम करावयास वाटत होते. पण ते शक्य नव्हते. त्याला सूर्यास्तापूर्वी टेकडी गाठायची होती. सुर्य कोणाकरिता थांबत नसतो! तो खाली खाली जात होता.
"अरे देवा! एवढी जमीन मिळवण्या साठी मी केलेली इतकी धडपड हा माझा मूर्खपणा तर नाही. मला फार उशीर तर झाला नाही ना? "
त्याने टेकडीकडे आणि नंतर सूर्याकडे पाहिले. तो आपल्या लक्षापासून फार दूर होता आणि सुर्य पार खाली आला होता. अगदी क्षितिजाच्या सीमेला भिडायला आला होता. 
पाहोम वेगाने धाऊ लागला. त्याने आपला कोट फेकला, बूट फेकले, टोपी भिरकावली आणि पाण्याचा चंबू देखील फेकला. मात्र कुडाळीचा उपयोग एखाद्या  काठी सारखा करीत आधार घेत घेत पुढे सरकू लागला.
"मी काय करू? मी अडशाप्रमाणे जास्त घेत बसलो. आता सारे नष्ट झाले! मी सुर्य मावळण्या पूर्वी कसा पोहोंचणार?"
भीतीने तो अधिकच कासावीस झाला. तो घामाने पार ओलाचिंब झाला होता. त्याची विजार त्याच्या अंगाला चिकटल्यामुळे तो नीट धाऊ शकत नव्हता. त्याची छाती लोहाराच्या भात्याप्रमाणे वर खाली होत होती. घसा सुकला होता.छातीत हातोड्याचे घाव पडत होते. पाय गळून गेले होते तरीही तो धडपडत धडपडत पुढे जात होता. पाय असून त्याला ते नसल्यासारखे वाटत होते. आपण मारणार तर नाही? पण तो थांबू शकत नव्हता.
" इतके सर्व केले आणि आता मधेच सोडले तर मला सारे मूर्ख समजतील."
तो कसाबसा टेकडी जवळ आला होता. बाश्किर त्याला प्रोत्साहन देत होते. लवकर येण्यास ओरडून सांगत होते. बश्कीरांचे ओरडणे चालूच होते. त्याला खुणेने लवकर येण्यास सुचवीत होते. पामोम उत्तेजित झाला होता. त्यांचे ह्या ओरडण्याने पाहोमच्या हृदयातील आग अजून ज्वलंत ठेवली होती. त्याने आपली सारी शक्ती आणि अंगातील सारा बळ एकवटवून जोरात टेकडीकडे कूच केली.
सुर्य अगदीच खाली आला होता आणि तो फार मोठा आणि रक्ताप्रमाणे लालभडक दिसत होता. तो थोड्याच अवधीत मावळणार असे दिसत होते. पाहोमही आपल्या लक्षा पासून दूर नव्हता. टेकडीवरून लोक पाहोमला हातवारे करून जलद धावण्यासाठी प्रवृत्त आणि प्रोत्साहित करीत होते. प्रमुखांची कोल्हयाच्या मृदुलोमाची टोपी जमीन होती आणि त्यात पैसेही दिसत होते. प्रमुख मात्र खाली बसून आपले पोट दाबून हसत होता. पाहोमला त्या स्वप्नाची आठवण झाली.
" मी भरपूर जमीन मिळवली असेन पण ती उपभोगण्या करिता परमेश्वर मला जगू देईल का? मी माझे आयुष समात्त केलाय. मी त्या जागे पर्यंत जाऊ शकत नाही."
पाहोमने सूर्याकडे पाहिले. त्याचा खालील अर्ध्याहून अधिक भाग जमिनीत नाहीसा झाला होता. त्याने आपले उरलेसुरलेले बळ एक करून स्वतःला पुढे झोकावून टेकडी कडे झेप घेतली. टेकडीच्या पायथ्याशी आला देखील, पण एकदम काळोख झाला. त्याने सूर्याकडे पाहिले. सुर्य मावळल्या सारखे वाटत होते.
"माझी सारी मेहनत वाया गेली!" तो रडून ओरडला. तो हा आपला खटाटोप येथेच सोडणारच होता, पण वरून टेकडीवरून बाश्किर लोक त्याला वर येण्यास सुचवीत होते. मग त्याच्या लक्षात आले की वर टेकडीवरून सुर्य अजून दसत असावा. तो धडपडत कसाबसा टेकडीवर गेला. त्याला टोपी दिसत होती आणि बाजूला बसलेले बश्कीरांचे प्रमुख देखील. ते पोट दाबून हसत होते अगदी पाहोमला दिसलेल्या स्वप्नाप्रमाणे. पाहोमने किंकाळी फोडली आणि तो धडकन पुढे झोकून पडला, जणू त्याच्या पाया खालची जमीनच सरकली. तरीही त्याने मोठ्या कष्टाने टोपीला हात लावला.
 "वाह, ह्याला म्हणतात चतुर माणूस!" प्रमुख उद्गारले."केवढी जमीन मिळवली आहे ह्या महाशयाने!"
 पाहोमचा नोकर धावत पुढे येउन पाहोमला उचलण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने पाहिले की आपल्या मालकांच्या तोंडातून रक्त येत आहे. पाहों मेल होता! सार्यांना ते समजले. सारे बशिर्कीर हळहळले आणि आपल्या जीभ दांताना लावीत खेदाने, "च्क ,च्क" करू लागले.
नोकराने कुदळ उचलली आणि एक कबर खणली - इतकीच लांब व रुंद की त्यात पाहोमचे मृत देह राहील. शेवटी ६ फ़िलांब  X ३ फि रुंद जागेत त्याला पुरण्यात, गाडण्यात आले.\
 एवढीच असते माणसाची गरज! 

                                                                                                      विनय त्रिलोकेकर


1 comment: