Monday, 23 December 2013

चावीच्या छिद्रा पलीकडे



चावीच्या छिद्रा पलीकडे 
असते एक दार. असते त्याला एक चावीचे छिद्र. 'बाहेरून छिद्राला डोळे लाऊन आपल्या कडे कोणी पाहत तर नसेल? ', मनात एक भीती. 'आपण आहोत खरे चार भिंतींच्या आंत, पण बाहेरून कोणी आपले ऐकत तर नसेल ? म्हणतात ना  - भिंतीना असतात कान आणि  छिद्राला असतात डोळे!' मनांतील ही छिद्रा बद्धल असलेली साशंकता स्वाभाविक! आणि स्त्रियांच्या बाबतीत ती भीती अधिक असणे साहाजिक! आणि असे काही ऐकले वा वाचले म्हणजे -----

अलीकडे मी असे  वाचले  - ओर्थोपेडीक्स मध्ये पोस्ट - ग्रॅजुयेशन करीत असलेला  सत्तावीस वर्षांचा कोणी एक डॉक्टर, आपल्याच दोन स्त्री सहकारी डॉक्टरांचे, त्या बाथरूम मध्ये आंघोळ करीत असताना, त्यांच्या नकळत त्यांचे स्वतःच्या  कॅमेऱ्यात विडीयो शूट केले. त्याच्या ह्या अनैतिक वर्तना बद्धल अटक झाली आहे,  आणि कालांतराने शिक्षा देखील होईल. पोस्ट - ग्रॅजुयेशन परीक्षेसाठी सध्या तो जामिन्यावर बाहेर आहे. पण काय हो, तुम्हाला असल्या अनैतिक डॉक्टर कडून स्वतःचा किंवा आपल्या आई- बहिणींचा इलाज करून घेण्यास आवडेल का? असल्या शिक्षणाचा काय उपयोग? 'एथिक्स', शिष्टाचार, मॉरल्स (नैतिकता),कॉन्शन्स(सदसद्विवेकबुद्धी) - हे सारे त्याच्या शब्द कोशात नसावेत. ह्या साऱ्यावरून त्या माणसाच्या चारित्र्याची सहज कल्पना करता येते. हा माणूस चावीच्या छिद्रा पलीकडे राहून खोलीच्या आंत चोरून पहाणाऱ्या पैकी असावा. आणि भिंतीला कान लाऊन ऐकणाऱ्यातला (an eaves dropper) देखील! 

आम्हाला शाळेत 'नैतिक शास्त्र' (Moral Science) शिकवले जाई. शाळेचे उपमुख्याध्यापक, रेवेरेंड फादर अलमेडा शिकवीत. गार्डिनर ह्यांच्या 'On keyhole morals' चा आधार घेत ते आम्हाला सांगत होते, "मुलांनो, तुमची- आमची खरी ओळख काय? आपले स्वतःचे मोजमापन कसे कराल? समाजात तुम्ही कसे वागतात त्यावरून? नाही! लोकांना दाखवण्यासाठी आपण सारे काही करतो - रीतभात सांभाळतो, आपल्यावर कसे चांगले संस्कार आहेत असे भासवतो - लोकांकरिता एक मुखवटा -एक आवरण! तुमची 'पबलिक इमेज' म्हणजे फक्त तुमची एक इच्छा - जगाने आपल्याला असे ओळखले पाहिजे. पण खरोखर तुम्ही तसे आहात? आपल्याला लोकांचे सर्टीकेट,त्यांचे चांगले मत हवे असते. त्यासाठी आपण शिष्टाचार, लोकांमध्ये उठायचे - बसायचे कसे, प्रसंगाला शोभणारे कपडे कसे घालायचे - केवळ लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे आणि समजावे म्हणून! आपल्याकडे जगाचे लक्ष आहे, त्या बारीक चावीच्या छिद्रातून ते सारे आपल्याला पाहत आहेत, ह्याची आपल्याला सतत जाणीव असते म्हणून आपण काळजी घेऊन स्वतःला त्यांच्या पुढे सादर  करतो.  तुम्हाला स्वतःची ओळख करायची असेल तर असे समजा - आपल्याकडे कोणही त्या छिद्रातून पाहत नाही आणि मग तुम्ही कसे वागाल  ते ठरवील तुम्ही कोण आहात ते!" 
त्या डॉक्टरने देखील शाळेत नैतिक शास्त्रातील धडे घेतले असतील, पण बोध काही घेतलेला नाही. तुम्ही आणि मी देखील हे धडे गिरविले, बरोबर? चवीच्या छिद्रातून कोण आपल्याला चोरून बघणार नाही ह्याची खबरदारी घेतो आणि ते अगदी रास्त आहे. 'चावीचे छिद्र' हे केवळ सांकेतिक आहे. चावीच्या छिद्रा पलीकडे कोणही नाही आपल्याला पाहत, आपल्याला त्याची पूर्ण खात्री मग आपण कशे वागतो हे महत्वाचे! केवळ लोकांसमवेत किंवा आप्तेष्ट मध्ये नव्हे तर स्वतःशीच कसे वागतो हे महत्वाचे. चावीच्या छिद्रातून आपल्या लहान मुलांकडे बारीक नजर असणे बरोबर असते -ते काय करतात, कोठे जातात, काय  वाचतात - हे सारे आपण करतो त्यांच्याच भल्यासाठी. त्यातून दिसते ती म्हणजे आपल्या मुलांसाठी तुम्हाला वाटणारी आस्था व तिडीक.  पण जेंव्हा मुलं मार्गाला लागलेली असतात तेंव्हामात्र  ते करणे जरुरीचे नसते. अगदी परवाचीच गोष्ट. माझ्या एका मित्राने चुकून आपल्या विवाहित मुलाचा कोट घातला. कोटाच्या किश्यात त्याला बरेच कागद पत्रे सापडली. बंद लिफाफे मुलाच्या नावे होती. इतर पत्र बंद लिफाफ्यात नव्हती.  घरी परत गेल्यावर त्याने ती सारी आपल्या मुलाकडे सुपूर्त केली, त्यांतील कोणताही मजकूर न वाचता. एक कुतूहल म्हणून  तो वाचू शकला असता- अगदी एकांतात - कोणालाही समजले नसते. चावीच्या छिद्रा पलीकडे कोणाही नव्हते. पण त्याने तसे केले नाही. तसे केले असते तर तो स्वतःच्याच नजरेतून उतरला असता. आणि ह्याला म्हणतात 'decency'. असो. 
काहीशा ह्याच दिशेने वाटचाल करीत माझे एक स्नेही, भावीन झांखारिया, आपल्या 'The Gifting Dilemma' ह्या लेखात लिहितात : त्यांना एका ऑर्थोपेडिक डॉक्टर मित्राने असा एक इमेल पाठविला, ' आम्हाला आमच्या सहकाऱ्याने दोन स्वीटसची बॉक्सेस, एक - फेर्रेरो रोषर आणि दुसरे  चायनाची शिंगदाणा चिक्की. दोन्ही होत्या शिळ्या. आम्ही त्या गुपचूप फेकून द्याव्या का त्या मित्रास ते सांगावे? कदाचित त्यांना हे माहित नसावे आणि ते त्या सप्लायरला सांगून रिफंड मिळवतील.  किंवा ते पुन्हा बांधाबांध करून कोणालातरी, ज्या प्रमाणे बरेच लोक करतात, भेट म्हणून पाठवू? त्याला अनेक प्रतिउत्तरे मिळाली. 
  •   एकाने लिहिले की त्यांने स्वतःस एक सामान्य मॉर्टल समजून ते गिफ्ट रिसायकल करावे.
  •  दुसऱ्याने सांगितले गप्प बस आणि सारे विसरून जा. 
  • तिसऱ्याने लिहिले असाच इमेल त्याला देखील पाठव म्हणजे तो समजून जाईल.
  • आणि चौथा (जो एकमेव डॉक्टर नव्हता), त्याने सांगितले सदैव सत्य बोलावे, तो जर खरा मित्र असेल तर तो दुखावेल  जरूर पण काही काळच पण तो तुझी कदर करील.
  •  माझ्या त्या स्नेही मित्राने त्यासअसा उपदेश केला की सध्या काही न करता ती मिठाई फेकून दे. मग सवडीने त्या मिठाईची विषय काढ आणि मग त्यास विचार की त्याने ती कोठून खरेदी केली. मग राग रंग बघून पुढचे पाऊल उचल. 
     
मित्रानो, तुम्ही काय केले असते? ह्यात ठरेल तुमची  चावीच्या छिद्रा पलीकडील पात्रता!
                                                                              विनय त्रिलोकेकर

2 comments:

  1. Jay Dhurandhar Good thoughts
    9 hours ago · Like
    Vinay Trilokekar Thanks,Jay.

    ReplyDelete
  2. Kiran Kothare
    To Me
    Dec 26 at 3:24 PM
    Dear Vinay,

    You seem to be equally at ease while expressing in Marathi. It is a great achievement for non vernacular school student.
    If what you have mentioned in your earlier article is true ( your earlier attempt of writing in Marathi was taken as Shibani's writing and she got scolding for writing horrible Marathi with lots of grammatical errors), then this piece is the fitting reply which brings out your mastery that must have been painstakingly acquired .

    The topic though current is also little abstract and to write philosophically on such topic needs high level of maturity. Hence only senior people( in their fifties or above) will be able to appreciate your thoughts.
    Younger ones may comment " kitana pakata hai". Hence seek feedback only from elderly people.

    The end question really makes one introspect about one's own most natural likely response.

    Keep it up.


    Thanks & regards

    Kiran Kothare
    mobile 9819816150

    ReplyDelete