Monday, 20 July 2015

Bikini's 69th Birthday - बिकीनीचा ६९वा जन्म दिवस


Bikini's 69th Birthday - बिकीनीचा ६९वा जन्म दिवस

आज- काल  'स्पेशल ' म्हणजे विशेष दिवस पाळण्याची प्रथाच होऊन बसली आहे. आज काय तर 'मदर्स ' डे , उद्या 'फादर्स डे', नंतर 'फ्रेन्डशिप डे (अर्थात मला ह्यात वावगं किंवा खेद आणि आक्षेप पण नाही, जसा काही जण १४ फेब्रुवारी च्या व्हॅलन्टाईन-( valentine) दिवसाचा तोड- फोड करून विरोध  करतात)  ) आणि असे अनेक 'विशेष' दिवस. त्यात आणखी भर - ५ जुलैला असतो 'बिकीनीचा जन्म दिवस. - आणि ह्या ५ तारेखेला होता ६९वा. पण खरोखरच बिकीनीचा जन्म केवळ ६९ वर्षांपूर्वीच  झाला होता का?

 बिकिनी हा प्रकार हजारो वर्षां पासून प्रचलीत / अस्तित्वात असावा आणि रोम येथील खालील दगडी नक्षीकाम (mosaic ) तसे दर्शवते:




बिकिनीची व्याख्या म्हणा किंवा अर्थ म्हणा, आणि वर्णन विकीपेडिया प्रमाणे असे आहे :



[From Wikipdeia, the free encyclopedia
bikini is usually a women's abbreviated two-piece swimsuit with a bra top for the chest and panties cut below the navel. The basic design is simple: two triangles of fabric on top cover the woman's breasts and two triangles of fabric on the bottom cover the groin in front and the buttocks in back. The size of a bikini bottom can range from full pelvic coverage to a revealing thong or g-string design.]

बिकिनी हा एक आखूड / तंग  पोहण्यासाठी घालण्याचा पेहराव असतो व त्याचे दोन भाग असतात (two piece suit) - दोन त्रिकोणी कापडांनी बनतो छातीचा भाग झाकण्या करिता वरचा ' टॉ' आणि दोन त्रिकोणांचा बनतो शरीराच्या ढुंगणाचा भागासाठी 'बॉटम'. बिकीनीचा आराखडा बनवण्याचे श्रेय पर्शियाच्या लुइस रिअरर्ड ह्यांच्या कडे जाते. त्यांनी बिकिनी हे नाव 'बिकिनी अॅटॉ' (जेथे अणु बॉम्बची चाचणी सुरु होती ) वरून घेतले.  ही पण एक वादाची बाब आहे. कारण त्याच सुमारास फॅशन डीसाइनर जॅक्स हिम्स त्या सारखाच आराखाडा सादर केला होता.

[The name for the bikini design was coined in 1946 by Parisian  engineer(actually it should be French engineer from Paris) Louis Réard, the inventor of the bikini. He named the swimsuit after Bikini Atoll, where testing on the atomic bomb was taking place. Fashion designer Jacques Heim, also from Paris, invented a similar design in the same year. Due to its controversial and revealing design, the bikini was slow to be adopted. In many countries it was banned from beaches and public places. The Holy See declared the design sinful.While still considered risqué the bikini gradually became a part of popular culture when film stars like Brigitte BardotRaquel WelchUrsula Andress and others began wearing them on public beaches and in film.

The bikini design became common in most western countries by the mid-1960s                       as beachwearswimwear and underwear. By the late 20th century it had become common as sportswear in sports such as beach volleyball and bodybuilding. Variations of the term are used to describe stylistic variations for promotional purposes and industry classifications, like monokinimicrokinitankinitrikini, pubikini, bandeaukini and skirtini. A man's brief swimsuit may also be referred to as a bikini. A variety of men's and women's underwear are described as bikini underwear. The bikini has fueled spin-off industries, like bikini waxing and sun tanning.]

आणि पुढे असेही लिहिले आहे :


[The 1967 film An Evening in Paris is mostly remembered because it featured Bollywood actress Sharmila Tagore as the first Indian actress to wear a bikini on film.  She also posed in a bikini for the glossy Filmfare magazine. The costume shocked a conservative Indian audience, but it also set in motion a trend carried forward by Zeenat Aman in Heera Panna (1973) and Qurbani (1980), Dimple Kapadia in Bobby (1973) and Parveen Babi in Yeh Nazdeekiyan (1982). ]
कदाचित ह्याचाच आधार घेत मृणालीनी सुंदर ह्यांनी आपला लेख 'Bombay Times' मध्ये लिहिला असावा. (Mrinalini.Sunder@timesgroup.com). त्या असे लिहितात ," Way back in 1946 on July 5, Perisian engineer -------and Parveen Babi in Yeh Nazdeekiyan" (सारे विकिपीडिया मधून शब्दशः 'लिफ्ट' करून) आणि नंतर स्वतःची  एक पुस्ती जोडून, असे लिहिले आहे , "over the years,the bikini has traversed the distance between the silver screen and the real world, and today, it's part of every bride's trousseau.---"
लेखा सोबत Brigitte Barot, Ursula Andress, Halle Berry, Angelina Jolie आणि Zeenat Aman ह्या ५ नायाकिंची छाया चित्रे जोडली आहेत .  

मात्र  ' Wikipdeia' ची खालील माहिती, काही कारणास्तव लेखिकेला, लिहिता आली  नाही :
[Women were actually wearing two-piece, bikini-like outfits thousands of years ago. There are Roman mosaics of athletes running and throwing discuses in them.The first modern bikini was designed in 1946 by French engineer Louis Réard. He said it’s not a real bikini unless it’s skimpy enough to be pulled through a wedding ring.( here again Wikipedia contradicts itself, On one hand it says that women were wearing bikini like two piece outfits thousands of years ago while on the other hand it says the first bikini was designed in 1946 by Louis Re'ard)
·       As it turned out, that was smaller than the world was ready for – it was 
so shocking, Réard couldn’t find a woman to model it for him. It was banned in Spain and Portugal, and the Vatican dubbed it ‘sinful’.
·         Réard eventually found a nude casino dancer, Micheline Bernardini, to model it for him. She got a lot of fan mail.
·         Ursula Andress wore possibly the most famous bikini ever in the 1962 Bond film Dr No. In 2001, she sold it through Christie’s for £35,000.]


मुळात  बिकिनी हा प्रकार हजारो वर्षां पासून प्रचलीत / अस्तित्वात असताना (वर सांगितल्या प्रमाणे) 'बिकिनी' चे पारिभाषिक नामकरण (nomenclature) जरी फ्रांसच्या लुईस रिअर्ड केले असले तरी ह्या पेहेरव्याचा  तो शोधक कसा? रिती / चाली बदलत असतात. कपड्यांचा बाबतीतही तेच असते. कदाचित ही एक सायकल असते. एखादी जुनी फॅशन नंतर तीच नवीन म्हणून परत येते. पोहण्याच्या ड्रेसचे असेच आहे. आजही संपूर्ण कपडे घालून काही जण नदीत पोहतात. सुरवातीला हाच पोहण्याचा पोशाख असावा. नंतर त्यात उत्क्रांति घडत गेल्या. १९०९ साली अॅनेट केल्लरमन (Annette Kellerman) सर्व प्रथम (नोंद केलेल्या रेकॉर्ड प्रमाणे ) अंगाला घट्ट बसणारा पोहण्याचा पोषक घालून एक कल (TREND) सुरु केला. सैल-सैल स्विम सूट आता तंग होऊलागले.



आणि बरेका, खालील छाया चित्र हे कोणाचे आहे माहित आहे आपल्याला?


                                                                       

ह्या आहेत मीनाक्षी शिरोडकर, चक्क स्विमिंग कॉस्टूम घालून आणि ते देखील १९३८च्या 'ब्रह्मचारी' चित्रपटात.


आचार्य अत्रे- मास्टर विनायक लिखित ह्या धाडसी चित्रपटात जलविहार करीत, ' यमुनातीरी खेळू खेळ कान्ह्याचा 'गाणे म्हणत आपले मराठी पाऊल पुढे टाकले. आणि त्यानंतरच झाल्या :
१] मर्लिन मोनरो (Marilyn Monroe)[ जन्म १९२६ चा आणि खालील फोटो १९६२ सालचा ]

२] रॅक्वेल वेल्च (Raquel Welch) [जन्म १९४०चा, आणि 'ब्राह्म्हचारी' तिच्या जन्म्पुर्वीचा ]

३] शर्मिला टागोर - १९६२च्या 'An Evening In Paris' चित्रपटात आणि नंतर इतर बॉलीवुडच्या नायिका.  
खालील फोटोत शर्मिला टागोर  घातलेला बिकिनी असेल तर मीनाक्षी शिरोडकरांनी घातलेला बिकिनी का नसू शोक्तो ?



मग भारतात  नवीन तंग कपडे धाडसी  पायंडा घातला (Indian pioneer of swim suit / bikini ) कोणी? हा वादाचा विषय ठरू नये. ज्या प्रमाणे मराठी रंगभूमीवर आद्य संगीत नाटककार कोण हा एक वादाचा मुद्धा ठरलाय, जरी असे लिहिले गेले आहे तरीही :
In 1879, playwright and producer Trilokekar (Sokar Bapuji Trilokekar.a dramatist, a poet and a  prose-writer). independently presented his musical play Nal-Damayanti (नल-दमयंती) to Marathi public. It was the first musical play on Marathi stage. असो !

वादांवरून आणखी एका गोष्टीची आठवण झाली', आज-काल  हौसिंग सोसायटीत होत असलेला एक नवीन वाद - नॉन वेज मराठी विरुद्ध वेज गुजराती. हा वाद उग्र होऊ नये एवढीच इच्छा.

अजून एक वाद - मरीन ड्राइव्ह्च्या फुटपाथवर बांधलेल्या अनधिकृत ओपन जिमवरून सुरु आहे अजून एक वाद आणि रिंगणात उतरले आहे काही दिग्गज लोक.  मांसाहाराचे आणि व्यायामाचे विनाकारण राजकारण झाले आहे.

 माझ्या फेस बुकवरच्या  एका ग्रुप मध्ये मी असे पोस्ट केले होतेकी लौकरच मी  'बिकिनी' वर लिहित आहे  आणि  त्या लेखातील काही उतारा /वेचा देखील मी फेस बुकवर टाकला . माझा हा लेख प्रसिद्ध होण्यापूर्वीच खालील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत :




वाद -विवाद, जर - तर  ह्याच खाली आणखी एक लेख ' DILIP OF ARABIA'  टाइम्स ऑफ इंडियात हा आठवडा सरता सरता प्रसिद्ध झाला. म्हणे डेविड लीन ह्यांनी  लॉरेन्स ऑफ अरेबिया मधल्या शरीफ अल्लीच्या भूमेके साठी दिलीप कुमारला ऑफर दिली होती, त्यांनी ती नाकारली व ऑमर शरीफ उदयास आले आणि the rest is history, as they say. लेखात लिहिले आहे की जर दिलीप कुमारनी ती भूमिका स्वीकारली असती तर ते हॉलीवूडचे एक मोठे स्टार झाले असते --वगैरे,वगैरे. पण ह्या झाल्या जर-तर च्या गोष्टी.

तेंव्हा हा सरत असलेला आठवडा 'कॉन्ट्रोवरसी'चा आणि वाद-विवादाचा ठरला.
माझा हा लेख, 'माझ्या विकली कॉलमचा (MY WEEKLY COLUMN)' - ५व्या आठवड्यातील घडामोडी' असा समजूया.  लौकरच पुढच्या आठवड्यात भेटू, तेंव्हा au revoir, good bye,આવ જો, --चला  भेटूया !  तोवर ---

सदैव आपलाच,

विनय त्रिलोकेकर






No comments:

Post a Comment