आमचे शेक्सस्पिअर!
माझ्या
एका बहिणीचा (cousin's) फेस बुक पोस्ट वाचला आणि मलाही रिचर्ड जेफ्री
ब्रॅग (Richard Geoffrey
Bragg)[ नंतर त्यांनी आपले आडनाव ब्रॅग बदलून कँडल असे केले] ह्यांच्या नाटक कंपनी
शेक्सपिरआनाची (Shakespeareana) आठवण झाली. साधारण १९६१ - ६२ साली त्या थिएटर
कंपनीने शेक्सस्पिअर ह्यांच्या काही नाटकांचे प्रयोग आमच्या शाळेत सादर केले होते.
सर्व नाटकांत रिचर्ड स्वतः , त्यांची पत्नी लॉरा, दोन कन्या जेनिफर व फेलिसिटी आणि
शशी कपूर कोणती न कोणती भूमिका वाटावीत होते. कॉमेडी ऑफ एरर, मर्चन्ट ऑफ व्हेनिस, ऑथेल्लो.
किंग लिअर, मॅकबेथ, इत्यादी नाटकांचे भाग झाले. आम्ही १५ - १६ वर्ष्यांचे असू. प्रत्येक
वेळी नाटकातील आपली भूमिका संपताच शशी कपूर आमच्यात येऊन बसत होते आणि आम्हा विद्यार्थ्यात
बसून गप्पा मारीत आणि आम्हा मुलांना आपले ऑटोग्राफ देत होते.
त्याच लेखेत माझी कसीन, केतकी (Ketaki Kothare Jayakar) असे लिहिते आणि त्यातील काही भाग तिच्याच पोस्ट शब्तशः मी लिहीत आहे, 'Aleque
(Padamsee) said that Shakespeare is best in the English language because at times
there are no proper words to express the sentiment in another language. In fact
Shakespeare developed the English language.'
हे झाले अँलेक पदमसी ह्यांचे मत. काही प्रमाणात त्यात तत्थ्य असेलही. एवढे मोठे शेक्सपिअर आणि इंग्लिश पुरते मर्यादित कसे ठेऊ शकतो? मला इलस्ट्रेडेड विकलीतला बाची कांगा ह्यांच्या लेख आठवतो.
त्यातील काही भागाचा शब्दशः हा उतारा आहे: ‘Ear plug, ear plug here cometh a Parsee --- (ही पारशी मंडळी -- बोमन, आडी, डिनशॉ -- पार्टीला येतात आणि पार्टीचे दृश्यच पार बदलून टाकतात. त्यांच्या लाऊड पण मजेशीर बोलण्याने आणि हास्य विनोदाने घटनास्थळ दणाणून टाकतात. ) ---We Parsis are very possessive. Everything good is “Apro” or "our own" for us and so do we treat any celebrity as “Apro”. Hence we have આપ્રો હોમી ( Homi Bhabha) , આપ્રો દાદાભાઈ (Dadabhai Naoroji,), આપ્રો ઝુબીન ( Zubin ,the famous Indian conductor of Western classical music), આપ્રો મિસ ઇન્ડિયા પર્સીસ (1965 Miss India- Parsis Khambata),આપ્રો માણેક ( Field Martial Manek Shaw) and there are many more such ‘Apros’. Why, we even have Apro King George and Apro Queen Elezabeth! Can you imagine we even call John F Kenedy as આપ્રો જઓન. ----'
'આપ્રો શેક્સપીઅર' लिहायचे चुकून त्यांच्या कडून राहून गेले असावे. आम्ही पाठारे प्रभू देखील इंग्रजीच्या बाबतीत तेव्हडेच पॉझेसिव्ह आहोत. पु ल देशपांडेंचे बटाट्यांची चाळीतील सोकरजीनाना त्रिलोकेकर लक्षात आहेत ना? "साला इडियट, तू डाएट कर, पोटॅटो सोडून दे. कोणी विचारले तू कोठे राहातोस तर बटाटे काढून सांग चाळीत राहतो." ... " आपण साला ट्रॅव्हल केले पाहिजे." ... "साला, छत्री म्हणजे समाधी मग रेनकोट म्हणजे ताज महाल काय?"... " साला, तू पर्वतीला एकदम राइट ऑफ्फ कर." "साला, लास्ट टाइम येथे माझ्या ब्रदर इन लॉ ला सोडला आलो होतो."
आमच्या अगोदरच्या पिढीची आणि आमच्या पिढीची ती एक खासियत होती--- संभाषण कोणत्याही भाषेत असो पण प्रत्येक वाक्यात किमान ५ -६ इंग्रजी शब्द असायलाच हवेत. आजची पिढीतील बहुसंख्य मुलं संपूर्ण संभाषण इंग्रजीत करितात. आणि बरेच मराठी नटांना मराठी नाटक-सिनेमाची स्क्रिप्ट इंग्रजीतच लागते. देवनागरी वाचता येत नसावी. आमच्या परिचयातील एक व्यक्ती आहेत. आमच्या समाजातील नाहीत पण बोलण्याची पद्धत तीच.
"आमची मोठी फॅमिली आहे. ५ ब्रदर्स आणि ३ सिस्टर्स. मी सर्वात बिग (एल्डेस्ट असे म्हणायचे असेल)म्हणून फॅमिलीचा गणपती माझ्या कडे येत असे. पण आम्ही ब्रॉथेर्सनी मिटिंग घेतली. आम्ही एक डिसिशन घेतले. दर इयरला वेग वेगळ्या ब्रदर कडे गणपती बसवायचा. यंदा आमचा सर्वात स्मॉल (यंगेस्ट) ब्रदर, अविनाशच्या पाळी"
भीषण! हा झाला गमतीचा भाग!असो.
मला आठवते. १९५७-५८ साली साहित्य संघात कोणता तरी महोत्सव होता. त्या ओपन एअर नाट्य गृहात शॅक्सस्पिअर ह्यांची बरीच नाटके रात्री सादर केलीगेली. त्या पैकी बऱ्याच नाटकांना मला आईने नेले होते. मी ११- १२ वर्षांचा असेन. अशा रीतीने इंग्रजीत नव्हे तर चक्क मराठीत 'शॅक्सस्पिअर' ह्यांची साहित्य संघाच्या खुल्या रंगमंचा वर गाठ (tryst with Shakespeare) पडली. अर्थात १०-१२ वर्ष्याच्या मुलाला 'शॅक्सस्पिअर' किती उमजले हा एक वेगळा भाग. असो.
मोठा झालो तेंव्हा समजले की ह्या सर्व नाटकांचा इंग्रजीतून मराठीत रूपांतर नाटककार (आणि कवी, कविता आपल्या टोपण नाव कुसुमाग्रज नावाने लिहीत.) वि. वा. शिरवाडकर ह्यांनी केले होते. आपल्याला माहित असेलच 'Comedy of Errors' चे अनुकूलन (adaptation) कित्येक भाषेत झाले आणि त्यावर चित्रपटही झाले. हिंदीतले दोन - पहिले होते किशोर कुमार आणि असित सेनेचे 'दो दुनि चार' आणि नंतर संजीव कुमार -देवें वर्मा ह्यांचे चे 'अंगूर'.
पण त्यावेळी साहित्यात कॉमेडी ऑफ एरर्स वर आधारित शिरवाडकरांचे 'आमचे नाव बाबुराव' हे मराठी नाटक झाले. विशेष म्हणजे माझी मामी, जैनी मामी (उर्फ सरोज कोठारे, महेश कोठारेंची आई) त्यांत भूमिका केली होती.
माझा ब्लॉग 'Copy Cats of the Cinema World' मध्ये
कॉमेडी ऑफ एरर पासून बनवलेल्या चित्रपटांबद्धल असे लिहिले होते:
वास्तविक, 'शॅक्सस्पिअर' चे अनुवाद (translation) आणि अनुकूलन (adaptation) अनेक भारतीय भाषेंत झाले आहे. त्यांच्या लिखाणावर आधारित कथा, गोष्टी व नाटके लिहिली गेली आणि चित्रपटही झाले आहेत . कदाचित ब्रिटिश - वास्तव्यामुळे हे झाले असावे. इंडियन नॅशनल लायब्ररी, कलकत्ता, नुसार असे अनुवाद / अनुकूलन ह्या प्रमाणे आहेत : बंगाली (१२८), मराठी (९७), तामिळ (८३), हिंदी (७०), कन्नड (६६), तेलगू आणि (६२). काही गुजरातीतही झाली. त्यांत मराठीतील नाटकांत शिरवाडकरांचा मोठा वाट आहे. त्यांचे 'शेक्सपिअरचा शोध' हे मला वाचायचे आहे. तत्पूर्वी साधारण १८७० साली गणपतराव जोशींची नाटक कंपनीने बोजड आणि पुस्तकी भाषांतर केलेल्या 'ऑथेल्लो', 'मॅकबेथ', 'हॅम्लेट','ज्युलियस सिझर', 'मर्चंट ऑफ व्हेनिस', 'रोमिओ -ज्युलिएट', इत्यादी नाटकांचे प्रयोग सादर केले होते.
ऑथेल्लो ही एक श्रेष्ठ शकांतिका! ती झाली 'एकाच प्याला'. राम गणेश गडकरी 'आयगो' (Iago) हे पात्र झाले 'तळीराम', जो ऑथेल्लोला दारू पिऊ घालीत राहतो. माझी बहीण सांगते बाल गंधर्व ऑथेल्लोची पत्नीची भूमिका केली होती, बाबुराव पेंढारकर होते प्रमुख भूमिकेत आणि पूल देशपांडेंची हार्मोनियम पेटीवर साथ. बाल गंधर्वांवरुन माझ्या आणि माझ्या शाळेतील बक्षीस आठवतो. माझ्या मुलाला फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचे बक्षीस मिळाले होते. कार्यक्रमात मुलाने नाटक आणि नाचत 'स्त्री' पात्र म्हणून (त्यावेळी आमची शाळा फक्त मुलांची होती , जरी आता कोएड झाली असली तरी) ह्यांत भाग घेतला होता. बक्षीस स्वीकारत असताना शाळेचे प्रिन्सिपॉल, रेव्हरंट फादर लुर्डिनो फर्नांडिस म्हणाले, " Here is Bal Gandharva of St. Sebastian... Siddhartha we are all proud of you!"
हे आहेत माझ्या मुलाचे काही फोटो :
शाळेतून घरी आल्यावर माझ्या आईचे उद्गार, " सिद्धार्थने त्याच्या खापर पंजोबांचे नाव राखले!"
त्याचे खापर- पणजोबा म्हणजे माझे पणजोबा,सोकर बापूजी त्रिलोकेकर. प्रथम संगीत नाटककार कोण? किर्लोस्कर की त्रिलोकेकर? असा एकेकाळी वाद चालायचा, असे आई सांगत असे. पण भारत नाट्य संशोधन मंदिरच्या Legends of Marathi theater मध्ये असे लिहिले आढळते :
The tradition began when in 1843 the king of Sangli asked Vishnudas Bhave to transform a Kannada play ‘Seeta Swayamvar’ into Marathi and present it on stage. Vishnudas Bhave kept up the same profession of performing plays in Sangli, Mumbai and Pune till 1861. The plays in Bhave’s times and style followed a particular pattern. They would begin with holy prayer-like music and songs, followed by the entry of Lord Ganapati and Goddess Saraswati, which was followed by the play, which presented a story or a plot. This Bhave style of plays continued for long. They can be called musical plays as music played a major role in the whole presentation. The main comperer or ‘Sutradhar’ (सूत्रधार ) had to sing throughout the performance. Later, Sokar Bapuji Trilokekar cut down the Comperer’s singing and let other characters also sing. This brought welcome and entertaining variations for the audience. In 1879, S.B.Trilokekar produced ‘Nal Damayanti’-a prose-cum-musical play named ‘Harishchandra’.
वसंत कानिटकरांनी शेक्सपिअरचे ४ ते ५ नाटकांची एक 'खिचडी' करून एक नव नाटक निर्माण केले होते.
मला त्या वेळी कल्पना नव्हती की साहित्य संघात शिरवाडकरांचे मॅकबेथचे अडॅप्टेशन 'राजमुगुट' आपण पाहत आहोत त्यात नानासाहेब पाठक आणि दुर्गाबाई खोटे प्रमुख भूमिका करीत होते. हेही माहीत नव्हते की ह्या नाटकाचे दिक्दर्शक होते हर्बर्ट मार्शल, एक इंग्रज. आठवतात केवळ त्या नाटकातील ३ चेटकिणी.
मी तेंव्हा 'झुंझारराव' ही पाहिले. असे म्हणतात की ऑथेल्लो चे हे अडॅप्टशन मुळात जी.बी. देवळ १८९० साली केले होते. मात्र मी पाहात होतो ते त्याचे आधिनुकरण होते. भिरवाडकरांचे 'नटसम्राट' हे आहे किंग लिअर चे रूपांतर. नटसम्राट हे 'किंग लिअर'वर आधारित आहे असे म्हणणे अधिक रास्त होईल. राजाचा केला एक नट - जो झाला 'नटसम्राट'. माझे भाग्य की त्या भूमिकेत प्रथम पाहिले डॉक्टर श्रीराम लघू ह्यांना. त्यांनी ही भूमिका अमर केली आहे. ह्या भूमिकेत दत्ता भट पण पाहिले आहेत. आणि अली कडे चित्रपटातील भूमिकेत नाना पाटेकरांना.
आता तुम्ही सांगा आपली मराठी भाषा किंवा इतर भारतीय भाषा 'शेक्सपिअर' समजावण्या साठी कोठे कमी पडतात का. भावना, अभिप्राय, विचार किंवा 'सेनिमेंट्स' कमी पडतात ? शेक्सपिअर ह्यांची सर्व पात्र सदैव चिरतरुण (ageless) आणि शाश्वत (timeless) आहेत. त्यांना काळाचे आणि वेळेचे बंधन नाही आणि भाषेचे तर मुळीच नाही. वाचकांसमोर आणि प्रेक्षकांसमोर शेक्सपिअरवर आधारित साहित्य जरूर ठेवा, पण वाड्ःमयचौर्य (plagiarism) नसावे!
होय म्हणूनच आमचे शेक्सपिअर!
विनय त्रिलोकेकर

Angoor , is a 1982 Bollywood Hindi comedy film starring Sanjeev Kumar (as Ashok Tilak) and Deven Verma (Bahadur) in dual roles, and directed by Gulzar. It is a remake of the 1963 Bengali comedy film Bhranti Bilas (starring Uttam Kumar) that is based on Ishwar Chandra Vidyasagar's Bengali novel by the same name which itself is based on Shakespeare's play The Comedy of Errors, which is one of WilliamShakespeare’s early plays. It is his shortest and one of his most farcical comedies, with a major part of the humour coming from slapstick and mistaken identity, in addition to puns and word play. All characters are innocent and destiny plays the main role in bringing all characters to one place. Most of the other films are generally based on false characters and deliberately make false statements to fool others. The star cast was Moushmi Chatterjee (as Ashok’s wife, Sudha), Deepti Naval (as Sudha’s sister, Tanu), Deven verma (as Bahadur, Ashok’s servant), Aruna Irani (as Bahadur’s wife, Prema),and others.
The film is about two pairs of identical twins separated at birth and how their lives go haywire when they meet in adulthood. Earlier ‘Do Dooni Char’,1968 Bollywood musical was made and which is also a loose remake of the 1963 Bengali film, Bhranti Bilas. The star cast of ‘Do Dooni Char’ was Kishore Kumar (as Sandeep), Asit Sen (as Sevak, his servant), Tanuja (as Anju, Sandeep’s wife) and others. I had seen both these movies.
The Comedy of Errors tells the story of two sets of identical twins that were accidentally separated at birth (Shakespeare was father to one pair of twins). Antipholus of Syracuse and his servant, Dromio of Syracuse, arrive in Ephesus, which turns out to be the home of their twin brothers, Antipholus of Ephesus and his servant, Dromio of Ephesus. When the Syracusans encounter the friends and families of their twins, a series of wild mishaps based on mistaken identities lead to wrongful beatings, a near-seduction, the arrest of Antipholus of Ephesus, and false accusations of infidelity, theft, madness, and demonic possession.
In 1940 the film ‘The Boys from Syracuse’ was released, starring Alan Jones and Joe Penner as Antipholus and Dromio. It was a musical, loosely based on ‘Comedy of Errors’ and the film ‘Big Business’ is the modern take, with female twins instead of male. Bette Midler and Lily Tomlin star in the film as two sets of twins separated at birth, much like the characters in Shakespeare's play. But the farce that unfolds is quite different’
In 1978 the USSR launched a film ‘Comedy of Errors’.
Indian cinema has made six films based on the play, 1963 Bengali film - Bhranti Bilas(starring Uttam Kumar) , Do Dooni Char, Angoor, Kannada - Ulta Palta (starring Ramesh Aravind), Telugu - Aamait Asal Eemait (starring Naveen D Padil), and 2014 Punjabi - Double Di Trouble (directed by Smeep Kang, and starring Dharmendra, Gippy Grewal).

·