Monday, 3 April 2017

Body -Parts Farming- शरीराच्या अवयावांची शेती


Body -Parts Farming- शरीराच्या अवयावांची शेती

डेलिया फॉस्टर (Delia Foster) ह्यांच्या एका अहवाल रुपी बातमीचा आधार घेऊन मी हा लेख लिहीत आहे. 
 मिस्टर जि नामक एक चिनी माणूस (त्याचे वय माहित नाही) रस्ता ओलांडत होता. कदाचित तो आपल्या विचारात गर्क असावा. भरधाव येणाऱ्या त्या गाडी कडे त्याचे लक्ष नसावे. मोटार चालकाने हॉर्नही मारले असावेत. पण जि क्रोस करीतच राहिला. 

आणि कर् कर्... धाड ... धुडूम ! गाडीच्या धक्क्याने त्याला चक्क १० फूट अंतरावर फेकले होते. तो जब्बर जखमी झाला होता. रक्त बंबाळ अवस्तेत त्याला इस्पितळात नेण्यात आले. त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्याच्या उजव्या बाजूस मार बसला होता आणि उजवी  कान-पाळी ( right pinna or external ear) पार तुटून गेली होती. तो बराच काळ हॉस्पिटल मध्ये होता. त्याच्यावर बरेच उपचार झाले आणि बऱ्याच शस्त्रक्रियाही झाल्या. चेहऱ्याची  आणि गालाची त्वचा पूर्ववत केली गेली. रुग्ण्याच्या बरगडीतील कुर्चा वापरून थ्री डी प्रिंटर पद्धतीने खऱ्या सारखा वाटणारा कृत्रिम कान तयार केला  गेला. पण तो उजव्या कानाच्या वणाच्या जागी बसवणे शक्य झाले नाही. तो बारा झाला आणि आपल्या घरीही गेला.  पण डॉक्टर्स त्याची कान पाळी जोडण्यास यशस्वी झाले नाहीत. ही घटना होती २०१५ सालची. 

त्या घटनेला एक वर्ष उलटून गेले होते. मिस्टर जिला आपण संपूर्ण नाही आहोत असे मनात सारखे वाटत होते.  (he felt he was no longer complete) आपल्याला कान पाळी असायलाच हवी असे त्याला वाटू लागले. तो डॉक्टर गुओ शूझयॉन्ग (Dr Guo Shuzhong) ह्यांच्या संपर्कांत कसा आला ह्याचा उल्लेख नाही. पण त्याची गाठ गुओंशी झाली आणि इंग्रजीत म्हंटल्या प्रमाणे 'the rest is history, as they say'. डॉक्टर गुओ शूझयॉन्ग हे चीनचे नावाजलेले आणि प्रख्यात प्लास्टिक सर्जन आहेत. ते फर्स्ट अँफ्लीअटेड हॉस्पिटल ऑफ झीअँन्ग, जिऍटॉन्ग युनिव्हर्सिटी, मध्ये कार्यरत आहेत. २०१६ साली मिस्टर जिची 'केस ' डॉक्टर गुओ ह्यांनी आपल्या हाती घेतली. नेहमीची प्लास्टिक शस्त्रक्रिया (routine plastic surgery) जिच्या बाबतीत उपयोगी नव्हती. डॉक्टरांनी एक नवीन प्रयोग करण्याचे ठरवले. त्याला आपण 'बॉडी पार्ट फार्मिंग' म्हणूया. होय, अवयावांची शेती! ही शस्त्रक्रिया तीन टप्यात करण्यात आली. प्रथम डॉक्टर आणि त्यांच्या टीमने एक त्वचा विस्तारक (skin expander) जिच्या उजवा बाहुत - फोरार्म (forearm ) म्हणजे मनगट आणि कोऱ्या ह्यांच्या बरोबर मध्ये रोवला (implanted).  दुसऱ्या टप्यात त्याच्या बरगडीच्या लौचिक कुर्चाचा एक लहान 'C' आकाराचा भाग कापून त्या पासून 3D प्रिंटर पद्धतीने एक कृत्रिम कान पाळी तयार करण्यात आली. आणि ती कान पाळी विस्तारलेल्या त्वचेला जोडली गेली. अशा प्रकारे रोवलेली ती कान  पाळी हळू हळू वाढू दिली. काही महिन्यांच्या अवधी नंतर त्याचे एक जिवंत इंद्रिय (tissue) मध्ये रूपांतर झाले - रक्त वाहिन्या व शिराने सुसज्ज!(equipped with blood vessels and nerves) आता ही कान पाळी दुसरीकडे (योग्य) ठिकाणी लावण्यासाठी कार्यरत झाली होती (ready for transplanting). अखेर तिसऱ्या टप्यात सात तासाच्या किचकट आणि बिकट अशा शस्त्रक्रियेने तुटलेल्या कानाच्या व्रणावर लावण्यात आली. लौकरच मिस्टर जि संपूर्ण बरे होऊन आपल्या घरी जातील. 
डॉक्टर गुओ म्हणतात की अशा प्रकारच्या ते  ५०० मुलांवर दर वर्षी करीत असतात. चायना डेली प्रमाणे त्यांनी पहिले फेस ट्रान्सप्लांट २००६ साली केले होते. 

कॅसी चॅन (Casey Chan) मेडिकल जर्नल मध्ये असे लिहिले आहे. सन १९९७. रिचर्ड ली. नॉरीस एका दारुण आणि गंभीर अपघातात जब्बर जखमी झाला. बंदुकीतून चुकून गोळी सुटली आणि नॉरीसचे नाक फोडले, दात तोडले आणि ओठ आणि हनुवटीच्या पार चिंद्या उडवल्या. त्याचा चेहरा विद्रुप झाला होता. परिणाम नॉरीस एकांतवासी झाला (recluse). १५ वर्षे निघून गेली. नॉरीस आता ३७चा झाला होता. आणि त्याचे भाग्य बदलले. त्याला नशिबाने साथ दिली. मेरीलँड युनिव्हर्सिटीचे मुख्य सर्जन, डॉक्टर स्टिफेन टी. बार्टलेट  (Dr. Stephen T. Bartlett) नॉरीसवर एक विस्तीर्ण आणि व्यापक शस्त्रक्रिया करून त्याला एक सुंदर आनंद नवा चेहरा दिला आणि एक नवीन आयुष्य देखील. नवा चेहरा, नवा जबडा, नवी जीभ, नवे दात, नवी त्वचा, नवे स्नायू, नवी उत्ती आणि नवी हाडे - खरोखर एक व्यापक आणि विस्तीर्ण फेस ट्रान्सप्लांटचे हे जगातील सर्वात मोठे उदाहरण आहे . हे सोपे नव्हते. बऱ्याच  अडचणी होत्या - दात्याच्या (donor's)  रक्तगट (blood group) , त्वचेचा रंग (skin tone), ऊती (tissue) , हाडांची ठेवणं(bone structure) , वगैरे जुळणे आवश्यक असते. तसे न झाल्यास प्राप्तकर्त्याचे(rejection by recipient's body) शरीर दिलेले रक्त, त्वचा, हाडे, इत्यादी स्वीकार करीत नाही. ही सारी प्रक्रिया दीर्घकालीन आणि  क्रमाक्रमाने केली जाते (the whole process is long and gradual). अशा शस्त्रक्रियेत रुग्णाला इम्म्युनो सँप्रेसंट ( immuno-suppressant) नामक एक औषध (drug) दिले जाते त्याच प्रमाणे आयुष्यभर बरीच औषधे संयोग (combination of many drugs) दिली जातात

सुमारे व्या  शतकात भारतीय महर्षी सुश्रुत, ह्यांनी प्लास्टिक सर्जरी करून शरीराची पुनर्रचना करण्याचे कौशल्य  (Reconstructive surgery techniques) आणि मोतिबिंब (cataract surgery) शस्त्रक्रियेत मोठे योगदान दिले आहे. इ. पु. ८०० (800 BC) पासून शरीराची पुनर्रचना करण्याचे कौशल्य भारतात उपलब्होते. सुश्रुत आणि चरक ह्यांच्या औषधीय कार्याचा आलेख संस्कृत मध्ये  लिहिलेला होता आणि नंतर ७५० (750AD) साली अब्बासिद कलिफत काळात अरबी भाषेत (Arabic Language) त्याचे भाषांतर झाले आणि इटलीच्या ब्रांका घराण्या करवी युरोपला  ह्या कलेचे ज्ञान मिळाले. असो.

अशा आहे की लौकरच ही प्रक्रिया  गोर गरिबांना उपलब्ध होईल!

                                                                                          विनय त्रिलोकेकर
















No comments:

Post a Comment