Saturday, 24 February 2018

हमिद दलवाई - एक पहाडी पुरुष!



हामिद दलवाई - एक पहाडी पुरुष!


मला आठवते.  माझी सर्वात मोठी बहीण, पुष्पा, लेखिका आणि पत्रकार असल्यामुळे आमच्या घरी मोठमोठया प्रतिष्ठित व्यक्तींची वर्दळ असे. साधारण तो साठ साल असावा. मी लहान होतो. पण त्यावेळी घरी येण्याऱ्या पैकी माझ्यावर  एका व्यक्तीची छाप पाडली - त्यांचे व्यक्तिमत्वच तसे होते - उंच, धिप्पाड म्हणता येणार नाही पण सदृढ  अंगयष्टीचा (robust physique), रुंद खांदे, मजबूत मनगट, तुकतुकीत त्वचा, घारे - करडे डोळे, चेहऱ्यावर विलक्षण तेज आणि तांबूस कांती, हनुवटीवर दाढी नाही -   संपूर्ण काढलेली (clean shaven), एक देखणा पुरुष पांढरा शुभ्र सदरा व लेंगा आणि पायात कोल्हापुरी चप्पल असा साधा पेहराव (simple attire) - प्रत्येक वेळी तोच पोषाख, त्यांत कोणताही बदल नाही. ह्या पहाडी व्यक्तिमत्वाचे नाव होते हमिद दलवाई.  

घरात अनेक विषयांवर चर्चा सत्र चालत असत, वाद विवाद होत. हमिद दलवाई इस्लाम धर्मा बद्धल विशेतः धर्मातील त्रुटी बद्धल तावातावाने बोलत असत. त्यावेळी त्यातील मला विशेष समजत नसायचे. पण हळू हळू कळू लागले. त्यांच्या बद्धल लिहिताना ते 'एक अतिप्रज्वलित नास्तिक' असे चुकीचे त्यांचे वर्णन केले जाते. त्यांच्या बोलण्यातून  इस्लाम बद्धल त्यांना किती आस्था आणि प्रेम होते त्याची जाणीव मला वारंवार होत असे. होय, त्या आस्थे पोटीच  त्यांच्या समाजातील मध्ययुगी (medieval) रीती - रूढी त्यांना पसंत - मान्य  नव्हत्या. ते एक पुरोगामी मुस्लिम बंडखोर होते. आणि त्या रूढींना प्रतिकार करण्यासाठी त्यांनी आपले पाऊल पुढे टाकले. एप्रिल १८, १९६६साली त्यांनी ८ - ९ मुस्लिम महिलेंच्या मोर्चाचे नेतृत्व करीत " ज़ुबानी तलाक़ बंद करो!"घोषणा देत थेट मंत्रालयावर धडक मारली - तीन वेळा तलाक़ (triple talaq), बहुपत्नीकत्व (polygamy), व  हलाला निक़ाह ह्यांवर बंदी घालण्यासाठी त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्य मंत्री, वसंतराव नाईक ह्यांना निवेदन सादर करण्यात आले. आणि दलवाईंनी इस्लाम मध्ये सुधारणा करण्याचे (reform) बीज पेरले. 


इस्लाम आणि इतर धर्मांत असलेल्या सनातनी प्रवृत्तीचा (orthodoxy)  दलवाईंना  विरोध होता. अनेकदा आपल्या लेखणीतून तसेच जातीने लढाई देत मुस्लिम समाजात सुधारणा करण्याचा पाया (groundwork for reforms in Muslim society) घातला. त्यांच्याच धर्मातील काही लोकांनी त्यांना 'काफ़िर' (non - believer) ठरवले, त्यांच्या विरुद्ध अनेक फतवे काढण्यात आले,  त्यांच्यावर बहिष्कार (social boycott),  त्यांच्या कुटुंबियांना वाळीत टाकणे,  व त्यांच्यावर माराहण करणे ह्या सारखे प्रकार  घडले. एक  मुसलमान आणि इतके चांगले मराठी कसे बोलूशकतो ह्याचे मला आश्चर्य वाटे. मुसलमान म्हणजे हिंदी - उर्दू भाषिक आणि ख्रिस्ती म्हणजे गोव्याचा अशी माझी कल्पना. कोकणी मुसलमान - मंगलोरी ख्रिस्चन हे माझ्या विचारांच्या पलीकडे होते. भाषा ही प्रांताशी निगडित असते आणि धर्माशी नव्हे, हे समीकरण मला काही काळाने समजले.

 दलवाईंच्या जन्म २९, सप्टेंबर १९३२ साली कोकणातील रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळी गावात झाला. १९५१ साली ते मॅट्रिक झाले. पुढे इस्माईल युसूफ आणि रुपारेल कॉलेज. - इंटर पर्यंत नंतर विद्यालयीन शिक्षणाला राम राम ठोकला. पण आयुष्यातले शिक्षण चालूच. असे म्हणतात की त्यांचा साने गुरुजींच्या राष्ट्र सेवा दळाशी संपर्क आला आणि अनुभवी सोशियालिस्ट कार्यकर्ते भाई वैद्यांशी गाठ पडली. भाई वैद्य  दलवाईं बद्धल असे म्हंटले आहे  की दलवाईंच्या लढा आजसारखा राजकारणी हेतू साधून केलेला नव्हता आणि दलवाईंच्या निर्धर्मियता आणि राज्यघटने वर संपूर्ण विश्वास होता. दिलीप चित्रेंच्या बरोबर एक मुलाखतीत त्यांनी असे म्हंटले आहे, “If secular democratic ideals are to survive, all liberal forces in this country have to rally and work together on a non-party, non-political basis!One cannot helplessly watch the game. The rules have to change.”

 पु. ल. देशपांडे आणि विजय तेंडुलकर सारख्यांच्या देखील मोठा वाटा होता. दलवाईंबद्धल बोलतांना पु. ल. देशपांडे म्हणाले, “When I say that I was a friend of Hamid, I feel it might amount to self-praise. He was so great. It is no exaggeration to say that meeting him was like embracing a great man because of the way he was fighting with injustice.” 
इतिहासकार  रामचंद्र गुहांच्या ' Makers of Modern India' २२ जणांच्या यादीत हमीद दलवाईंच्या नाव आहे. आणि काय आमचे नशीब - एवढ्या वेळा ते घरी आले असतील पण  एकदाहि त्यांचे चरण स्पर्श केले नाही.


राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, महात्मा गांधी आदींचा प्रभाव तर होताच पण ते जेंव्हा आचार्य अत्रेंच्या छत्राखाली आले आणि त्यांच्या लिखाणाला एक  खरी  दिशा मिळाली. त्यांच्या ह्या छोट्याशा कारकीदीत (brief tenure) त्यांनी बरेच लिखाण केले आहे -  इंधन, लाट, राष्ट्रीय एकात्मका आणि भारतीय मुसलमान, इस्लामचे भारतीय चित्र, जमीला जावद आणि इतर कथा. एकाचवेळी त्यांनी लहान लहान गोष्टी मौज, सत्यकथा,आणि वसुधा ह्या मासिकांसाठी लिहिल्या.
 त्यांची 'इंधन' ही १९९६ ची कादंबरी वाचायची माझी खूप इच्छा आहे पण त्याचे दिलीप चित्रेंनी केलेले इंग्रजीतले रूपांतर 'Fuel' च उपलब्ध आहे. 


 ह्या गोष्टींचा संग्रह 'लाट' साधना प्रकाशनने प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या 'Muslim Politics in India' ची प्रस्तावना लिहिताना वि. के. सिन्हा लिहितात, “Dalwai’s sharp barbs directed against the Muslim orthodoxy may comfort the Hindu fundamentalists. However, they would be mistaken. Dalwai’s arguments are equally applicable to the Hindu community, when Dalwai often says, 'I attack all aspects of medieval religious obscurantism, whether it is Muslim or Hindu." दरम्यांत इस्लाम धर्मात सुधारणा करण्याचा त्यांचा लढा चालूच होता. सत्य शोधक संस्था काढली (Muslim Truth Seeking Society), . मला मात्र त्यावेळी हे सर्व माहित नव्हतं. 

 मला माहित होते ते फक्त आणि फक्त 'मराठा'  दैनिकात  बहिणी सोबत काम करीत असणारे  आणि अधून मधून घरी येऊन वेग वेगळ्या विषयांवर गप्पा मारणारे हमीद दलवाई. शाळेतून मी कॉलेजात गेलो. हे कोणी मोठे गृहस्थ आहेत ह्याची जाणीव होऊ लागली.  १९६५च्या भारत-पाक युद्धाच्यावेळी दलवाईंना 'मराठा' वर्तमान पत्रा तर्फे सिमेवर धाडण्यात आले. त्यांनी केलेले  एकूण तेथील परिस्थितीचे विसलेशण आणि वर्णन बेमालूम तर होतेच पण लिहिलेली हवालदार अब्दुल हमीदच्या शौऱ्याची गाथा - एकट्यानी केली पाकिस्तानी पॅटन  ८ टँकची धूळदाण करूनच मग शाहिद होणे - सारे रोमांचक आणि आंगारवर शहरे आणणारे - मनाला हूर हूर लावणारे होते. हे सारे वाचल्या मुळेच  असेल मी अन.सी.सी. 'जोश' (Special Company 'Josh' of NCC) च्या स्पेशल पथकात दाखल झालो. असो.    
अचानक त्यांचे आमच्या घरी येणे बंद झाले. बहिणीकडून समजले की ते मूत्रपिडांच्या विकारांने आजारी होते. माझे शिक्षण पूर्ण झाले होते. नोकरी सुरु झाली. त्याच सुमारास वर्तमान पात्रांत दोन खून खटले झळकत होते. एक - नानावटी खून खटला! आणि दुसरा -  धोबी तलाव येथिल पारशी रहिवाश्यांच्या जहांगीर मॅन्शन मधील ४ जणांचे हत्याकांड - नुसरवानजी, त्यांची पत्नी जमाई, त्यांच्या सोबत राहत असलेला दोराबशा आणि त्यांचा नोकर बावला. २ फेब्रुवारी १९७१चा दुपारी फिरोझ दारूवाला चोरी करण्यासाठी घरात शिरून गामाईच्या गळ्यावर गुप्ती ठेऊन तिच्या कडे पैसे मागितले, आणि जेंव्हा तिने ६० रुपये देऊ केले तेंव्हा त्याने प्रथम तिला १४७ वेळा भोसकल. नंतर त्याने इतर तिघांची तीच दशा केली. आपल्या विरुद्ध जातील असे सर्व पुरावे त्याने शिताफीने नष्ट केले. आपला संशय येऊ नये म्हणून 'नॉर्थ बॉम्बे - अल्पसंख्य विभागा' मधून लोकसभेच्या जागे साठी अर्ज देखील केला. खेदाची गोष्ट म्हणजे त्याला ८९६ मते मिळाली! एखाद्या गुन्हेगारला मत देणे आणि गुन्हेगाराला संसदेची उभे राहण्याचा अधिकार असणे हेच मला चुकीचे वाटते.  पोलिसांच्या योग्य चौकशीमुळे त्याला पकडण्यात आले. त्याला फाशीची शिक्षा फर्मावण्यात आली. कदाचित सहानभूती मिळविण्या करिता असेलही, किंवा उदात्त भावनेने म्हणा जाता जाता एक चांगले कार्य फिरोझने केले  - आपले मूत्रपिंड हामिद दलवाईंना दान केले!

 मे ३, १९७७ वयाच्या ४४ वर्षाच्या उमीदीत ह्या पहाडी व्यक्तिमत्वाचा अंत झाला. त्यांना श्रद्धांजली देताना त्यावेळचे पराष्ट्र मंत्री अटल बिहारी म्हणाले होते की हिंदूना ही एका दलवाईंची गरज आहे! 

मी हा लेखाचा शेवट त्यांच्याच शब्दाने करीत आहे, "A Muslim is judged not by how he behaves in the mosque, but rather when he is outside!"
                                                                                                                विनय त्रिलोकेकर




No comments:

Post a Comment