Friday, 29 June 2018

भाग १- आमचा प्रवास - सिंगापूर आणि मलेशिया - आमच्या मुलांकडून मिळालेली एक अस्मर्णीय भेट !



भाग - आमचा प्रवास - सिंगापूर आणि मलेशिया
                                आमच्या मुलांकडून मिळालेली एक अस्मर्णीय भेट !
आमची मुलंमुलगी , मुलगा आणि सून, अर्थात आमची नातं देखील (Oh, Sarah dear , how could I not include your name?) ह्या सर्वांना एक सुंदर कल्पना सुचली - माझ्या ७०व्या जन्म दिवसानिमित्त एक अमूल्य आणि अस्मर्णीय भेट म्हणून आम्हा दोघांना सिंगापूर - मलेशिया चे पॅकेज देऊन आनंद लुटण्यास १५ - २० दिवसां करीत परदेशी पाठवायचे!
आम्हला काहीच करायचे नव्हते, अगदी सामान सुमनांची बांधा-बांधी देखील नाही. बॅग भरणे म्हणजे मला धडकीच भरते - packing my luggage bags - I always dreaded the very idea. एक दिव्य पार पाडण्या सारखे असते. आपण बॅग भरण्यास घेतो, किती शर्ट आणि कोणते घेयायचे इथून सुरवात आणि समोरून बायकोच्या प्रश्नांचा भडीमार - इतकेच का? टी शर्ट? बापरे इतक्या पँट्स, आपण किती महिन्यांसाठी जात आहोत? काय भरून झाले आणि बाकी काय हे मला लक्षात येत नाही - दाढीचे सामान? टूथ ब्रश घेतला का? (वास्तविक, हे सारे हॉटेलात मिळते) पत्त्यांचा जोड? हे घातले आंत , पण ते घालाचेच राहिले वाटते. मग साऱ्या नीट बॅगेत लावलेल्या वस्तू बाहेर. अरे हे काय ही तर आंतच होती. डबल म्हेनत! दरम्यान बॅग पुनः भरताना लक्षात येते आपण टूथ पेस्टच्या ट्यूबवर पाय देऊन अर्ध्याहून अधिक पेस्ट बाहेर काढून ती काही वस्तुंना लावली आहेहे शर्टाला काय लागले ? शेविंग क्रीम ! ट्यूब वर बसलो वाटते! Oh, shit!अरे, विष्टा नाही रे, गोदरेज मेंथॉल शेविंग क्रीम - थंड थंड गार गार
आमच्या मुलीनेच केले आमचे सर्व सामान पॅक . ती त्यांत अतिशय प्रवीण आहे - आम्हां दोघांच्या दोन बॅग्स - प्रत्येकाची स्वतंत्र एक - माझे सर्व कपडे इस्त्री करून, व्यवस्तिथ घडी घालून. मोजे, रुमाल निटनिटके बागेत! हॅन्ड बागेत लागणारी महत्वाची कागदपत्रं - तिकीट, प्रवास कार्यक्रम (travel itineraries), पास पोर्ट, इत्यादी अगदी सुबक रित्या- सहज सापडतील अशा!! 
चंद्रा बरोबर वेळेत आला. सामान आमच्या गाडीत ठेवण्यास त्याने तत्परतेने मदत केली. तो अधून मधून आमची गाडी आमच्यासाठी चालवीत असतो. चंद्रा एक सेफ ड्राईव्हर तर आहेच पण एक चांगला माणूस देखील. आम्हाला सोडण्यास मुलगी एअर पोर्टला आमच्या सोबत आली होती

फ्लाईट सकाळच्या  २ची होती. आमच्या कडे भरपूर वेळ होता.
 टाईमपास करण्यास आपल्याला काय पाहिजे ?

आमचे एम एच १८७ मुंबई- कौलालंपूर, मलेशिया उड्डाण अगदीच घटना पूर्वक नव्हते असे नाही. मलेशियन एअरलाईन आपले वेळापत्रक पाळू   शकली नाही  सकाळी ची फ्लाईट अखेर वाजता निघाली आणि तासांचा हवाई प्रवास तासांचा झाला. विमानांत आमची एका मलेशियन स्टुडंट्शी गाठ पडली. तिसरी सीट तिची होती. आमच्या गप्पा सुरु झाल्या. सियारनी राज (Syarnii Raj) असे तिचे नाव. मूळची ती मलेशिया मधल्या इपोहतील(Ipoh). ती त्या वेळी चेन्नई येथे डेन्टिस्ट्रीतील पोस्ट ग्रॅड्युएशन करीत होती आणि आता सुटीत आपल्या घरी जात होती. विमान प्रवासात आम्हाला तिची फार मदत झाली. जुनीच ओळख असल्या प्रमाणे आम्ही बोलत होतो
"Aunty, when I come to India, will you brush up my Hindi? My boy friend is Punjabi and quite often pulls my leg because of my funny pronunciation of Hindi words. I am a quick learner. आप मेरा हिंदी को ब्रश करेगी ना?" 
बायकोचा चेहरा पाहण्यासारखा झाला. आपण आपले दात घासतो, एखादी वस्तू घासतो किंवा जमीन , फरशी वगैरे घासून पुसून साफ करतो... पण 'हिंदी' कसे ब्रश करणार? मग मी तिला सारे समजावले आणि आम्ही सारे पोट भरून हसलो.   
ती कौलालंपूर पर्यंतच आम्हाला साथ देणार होती त्या नंतरचा प्रवास आम्ही दोघे करणार होतो आणि त्या साठी तिच्या मनांत आमच्या बद्धलची एक प्रकारची काळजी वाटत होती आणि तिच्या डोळ्यात दिसत होती ... 
“I’m bit worried for you two. I won’t accompany you to Singapore, I wish I could. Take care. Do give me a WhatsApp call and free to call me in case of problem or anything you need. When you come to Malaysia do come to our place.”
एकामेकांचे मोबाईल नंबरांचे देवाण घेवाण झाले, तिचा पत्ता घेतला आणि तिने आमचा मुंबईतला. तिच्या घरी जाण्याचे आमच्या कडून तिने प्रॉमिस घेतले आणि तिनेही इंडियात आल्यावर मुबंईत घरी येण्याचे कबुल केले. आणि आम्ही तिचा निरोप घेतला.!
अशा रीतीने प्लेनचे उशिरा लँड  होणे एका अर्थाने फायद्याचे ठरले - a boon in disguise.- आमचे  (check in) सामान थेट सिंगापूरला जाणार होते. त्यामुळे एम एच ६०३ - कौलालंपूर -चेंगी  फ्लाईट साठी टर्मिनल 'एम' कडे जाणे सोपे झाले. एक फ्लाईट लेट होणे म्हणजे दुसरीला देखील उशीर. पण अखेर एक तास उशिराका होईना दरम्यान विमान दुपारच्या ला लँड झाले - एकला होणार होते ते झाले तास भर उशिरा! चांगी विमानतळावर उतरलो होतो. कस्टम आणि इमिग्रेशनला वेळ लागला नाही. आमच्या दोन्ही बॅग्स बेल्ट वरून खाली उतरवून ठेवण्यात आल्या होत्या. (त्यातील एक डॅमेज झाली होती, पण ही  गोष्ट आम्हाला हॉटेलवर गेल्यावरच समाजली.) 
बाहेर विमान तळाच्या लॉबीत एक मिश्किल चेहऱ्याचा आणि एकंदररीत आनंदी दिसणणारा माणूस एक मोठी माझ्या नावे  असणारी पाटी घेऊन उभा होता. आम्हाला त्यानी एका १० seater एअर कंडिशन कोच मध्ये नेऊन बसवले. तो मलेशियन होता. त्या कोच मध्ये आम्ही दोघेच होतो. आमच्या व्यतिरिक्त कोणी प्रवासी नव्हते. अनेक वेळा त्याने  आपले नाव सांगितले असेल पण समजणे किंवा उच्चारणे मला कठीण वाटले. अखेर - वेळेच्या प्रयत्न नंतर तो म्हणाला, “Call me Kumar, that’s everyone does, especially those coming from India as you do. First have lunch and then I’ll take you to the hotel. We are already late.” त्याचे इंग्रजी चांगले होते आणि ड्रायविंगवर चांगलाच कंट्रोल होता. गाडी चालवीत चालवीत सराईत मार्गदर्शका प्रमाणे (like a true guide) भडा भडा बोलत होता, “To your left you can see…, now on the right there is…”  त्यानी आम्हाला अनेक ठिकाणांची माहिती पुरवली  " This is Geylang, here we come to  Joo Chiat, now at  Kampong Glam, " सोबत   त्या ठिकाणचे महत्व आणि त्याचा मलेशियाच्या संस्कृतीशी संबंध ही सर्व माहिती उत्कृष्ट रित्या सांगत होता , "There are many Quays ....this is... "  त्याने अशा रीतीने अनेक ठिकाणे दाखवली आणि त्यांची नावं देखील सांगितली, पण त्यांनी ही कोणत्या क्रमाने दाखवली ते मला आठवत नाही.( the chronological order of these names he mentioned, I am not sure of) त्याच्या बोलण्याचा आवाजानेच मी जागा होतो कदाचित किंवा भुकेने असेल. ( His voice had kept me away from dozing off. I was tired and hungry too.) Now here you see ICA - Immigration & Checkpoints Authority of Singapore, Aliwal Arts Centre, Malay Heritage Centre, all these are 300m from your hotel. You have already seen Masjid Sultan Mosque, which is  400m. This the Golden Mile Complex and your hotel is 600m from here....That's far on the right you see Singapore Expo, a convention space with many exhibition halls, now we are driving on the coastal road,...…Tiong Bahru – it’s charming fusion of old and new,Marina Bay, Orchard Road – a shopping destination like no other, that's National Library, it's ver modern one, you know and it has indoor garden.. -and this is Little India,..It is place of worship with lots of your Hindu temples, there is a Gurudwara,Buddist Buddha Gaya temple and mosques as well … mini India, I suppose. At night you will find this place –an explosion of colour and spice. Ah we are almost there! There on your right, the huge complex you see, is Mustafa Centre, you can get anything and everything over here.  Our hotel is just round the corner. But you will eat first. What do you prefer non veg or veg? You have 6 choices – you can take these coupons to any of these. Now what’s the time….. 4 pm.. (Most of the restaurants closed their lunch counters.) Have your lunch over here. For dinner I take you to Jewel of India Restaurant.”
ते रेस्टरॉं गुजराती दामपत्य चालवीत होते. " ખાના નથી। બંધ કરવામાં ટાઈમ થયો"असे बोलून आमच्या तोंडावर हॉटेलचे दार लावू लागले. आम्ही गया वया केल्यानंतर त्यांचे आपापसात काही बोलणे झाले आणि त्यांनी आम्हाला आंत घेतले. टेबलवर दोन गुजराती थाळ्या मांडण्यात आल्या. पुरी - भाजी, राईस पुलाव, डाळीची आमटी --- सर्व चविष्ट आणि पोट भर .. त्यांचे जेवण झाले नसावे आणि त्या जोडप्याच्या आपुलकीनेच  आमची भूक भागवली होती. धन्य ते दोघे! अथिति देवो भावो - हीच भारतीय भावना ते परदेशातही जपत होते. God bless them! 
कुमारने आम्हाला परत पिकअप केले. आणि गाडीत त्याची रननिंग कॉमेंटरी चालूच होती, "This is Bugis Shopping Center, 800m from the hotel ...This is  Mustafa Center..." ( आम्ही मुस्तफा सेंटर पार करेसपर्यंत संपूर्ण सिन्टेरचा इतिहास जन्मा पासून त्याच्या आजच्या अवतारा पर्यंत पुढ्यात मांडला गेला.) " I think, Mustafa Ceter was built in 1971. I wasn't here then. But ever since its inception has grown impressively.  it started , they say, as outlet for ready- made garments. And today has become A big shopping Paradise - selling everything and anything  on earth and that too 24 hours X 7 days a week. "

कुमारने आम्हाला हॉटेल बॉस वर सोडले. तत्पूर्वी कुमारने हॉटेल बद्धल अशी माहिती पुरवली होतीच:
हॉटेल बॉस सिंगापूरच्या शहरातील दोन मोठ्या संस्कृतींच्या मध्य  भागी बिलगून आहे. ती धगधगणारी केंद्र   (eclectic cultural enclaves) म्हणजे कॅम्पोन्ग ग्लॅम (Kampong Glam) आणि लिटिल इंडिया ( Little India), ज्यामुळे आपल्याला सिंगापूरच्या ह्या ऐतिह्यासिक पारंपारीतआणि सांस्कृतिक वारसा असलेल्या ठिकाणांचचे अन्वेषण म्हणा किंवा शोध घेणे सहज शक्य होते. मूळचे मलाय रहिवाशी (Native-Malay) आणि मुस्लिम समुदाय ह्यांचा कॅम्पोन्ग ग्लॅमशी अजूनही घनिष्ट संबंध असल्यामुळे आणि ऐतिहासिक कारणांमुळे ह्या ठिकाणाला मुस्लिम कॉर्टर असे संबोधीत केले जाते. आणि येथे मुस्लिम समुदायांचे वास्तव्य लक्षणीय असणे स्वाभाविक आहे विशेतः बससोरः स्ट्रीट (Bussorah Street) मध्ये. ह्या येथे अरब स्ट्रीटच्या बाजूला (पाच मिनिटांच्या हाकेवर) असलेले सुलतान मॉस्क हे एक महत्वाचे चिन्ह (major landmark) म्हणून ओळखले जाते. हॉटेल बॉसच्या शेजारी जुम्म्हा मस्जिद  (Jama’ah Mosque) आहे. येथे आपले मलबारी लोग मोठ्या प्रमाणावर प्रार्थने साठी येत असतात. मलाय हेरिटेज सेंटर भेट देणे प्रत्येक पर्याटक साठी आवश्यक आहे. सिंगापूरच्या उच्च संस्कृतीचे प्रतिबिंब होय. पण रात्र होताच चित्र बदलून जाते. दिव्यांच्या झगमगाट, आणि दुमदुमणाऱ्या रोषणाईत हा भाग न्हाहून जातो आणि सुरु होते करमणुकीचे आणि विविध मनोरंजनाची रात्र! हे सारे हॉटेल पासून केवळ काही पाऊलांच्या अंतरावर

हॉटेल बॉसला जाणे अगदी सोयीस्कर आहे. सिंगापूरच्या व्हिकटोरीय स्ट्रीटला लागून आहे आणि लव्हेंडर एम आर टी स्टेशन पासून केवळ ३०० मीटर आणि चांगी एअरपोर्ट पासून १५ कि.मी. लॉबी पासून सुरवात सुरवात करूया. हॉटेलची ओसरी (lobby) भव्य, प्रशस्त ऐसपैस आहे. आंत शिरताच ओसरी किती सुसज्ज आणि सुशोभित आहे त्याची जाणीव होते. फ्रंट डेस्क म्हणजे रिसेप्शन कॉउंटर २४ तास खुले आणि तुमचे स्वागत उत्तम पद्धतींनी केले जाते. चलनांची अदलाबदल करणे, प्रवासाबद्धल  - हॉटेल पासून जवळ कोणती स्थळे पाहण्या जोगी आहेत आणि हॉटेलबद्धलची माहिती - काय सुविधा उपलब्ध आहेत वगैरे ,वैगैरे - ह्या सर्वांचा पाढाच तुमच्या समोर वाचला जातो


" Mr. Vinay, you and your wife, take rest. You are tired. I shall pick you up for the 'Night Safari'. I wll come around 6 or so. Be ready and wait in the lobby."
 "Welcome to Hotel Boss. I'm sure you'll enjoy your stay over here.  Please accept this complimentary gift."आम्हाला एक मोठे पार्सल देण्यात आले. "Oh you are unable to get net on your mobile. Give it. I'll help you. Sir, not only over here in this lobby, we have WiFi connectivity in the entire hotel premises - all 24 hours. Give us some time and we will fix it for you." खोरोखऱ काही सेकंदच माझ्या मोबाईल WiFi  -net आले आणि आम्ही हॉटेलवर सुखरूप पोहोंचलो हे आमी आमच्या मुलांना सांगितले



आमची बुकिंग सुपीरिअर डबल रूम मध्ये केली होती. १४व्या मजल्यावरील रूम नंबर १४२३ मध्ये, असे मला वाटते. तसे सर्वच रूम्स एअर कंडिशन्ड, प्रयेक खोलीत TV -फ्लॅट स्क्रीन असलेला, इलेकट्रीकची किटली, इस्त्री (लॉंड्री सर्व्हिस असताना , इस्त्रीचे काय गरज?) आणि बाथरूम ज्यात लागणाऱ्या सर्व वस्तू - शाम्पू, साबण, शेवर, रेझर, हेअर ड्रायर. दोन्ही वेळचे जेवण आम्ही बाहेर घेणार होतो आणि केवळ ब्रेक फास्ट हॉटेलच्या तळमजल्यावरील डायनिंग एरियात.





अरे देवा! वाजायला शिंग उरली नाहीत! लॉबीत जायला हवे. ठरल्या प्रमाणे कुमार वेळेत आला आणि आम्ही गाडीत बसून नाईट सफारी टूर साठी निघालो
 
गर्दी बरीच होती. आंत जाण्यासाठी आम्ही रांगेत उभे राहिलो. पुढे सरकत असतांना आमच्या समोर अनेक करमणुकीचे कार्यक्रम सादर होत होते. नाच- गाणी, जादूचे प्रयोग, कसरतीचे प्रयोग आणि एक ग्रुप तर हे सारे एकीकरण (combination of the other performances) करून एकच धमाल उडवून देत होता - तोंडातून आग फेकणे, पाण्यात जिवंत मासे आणि पाणी गिळूनटाकणे आणि जिवंत मास्यांसकट पाणी पोटातून बाहेर काढणे, नाचत नाचत कसरती करणेसांस्कृतिक आणि करमणुकीचे सुंदर खेळ  आणि लोक नृत्य वगैरेअसे डोळे दिपवणारी  (Cultural performances like tribal dances, blowpipe demonstrations, fire-eating displays) अनेक प्रयोग!! 



अखेर आम्ही टॉय ट्रॅम पाशी पोहोंचलो. आमची रात्रीची सहल - यात्रा (Night Safari) सुरु होणार होती



 ट्रॅमने निघालो पाहण्यासाठी 'रात्रीचे प्राणी' (‘Creatures of the Night’). गाडीत मार्गदर्शक महिला सांगूलागली हे सारे... "‘Creatures of the Night’ is the regular feature of the Night Safari'. This is..."
  आपण अनेक प्राणी संग्रह (zoo), जंगली जनावरांचे आश्रयस्थान (sanctuary) किंवा सर्कस पहिल्या असाल. पण ही सारी निशाचरांची  पारंपारिक घरं (traditional nocturnal houses) साऱ्या प्राण्यांची दवस- रात्र चक्रच बदलून टाकतात जेणे करून ही निशाचरे दिवसभर सक्रिय आणि कार्यक्षम राहू शकतात. पण ह्या इथे तसे नसते. सिंगापूरचे हे प्राणी घर (घरच म्हणाला हवे, खऱ्या अर्थाने  हे त्यांचे गृहस्थान आहे) एक संपूर्ण  खुले आस्मानी प्राणिसंग्रहालय (entire open-air zoo) आहे. - एक मोठे दमट उष्णकटिबंध असे जंगल (humid tropical forest) , जे सात भौगोलिक क्षेत्रात विभागले आहे (It is divided into 7 geographical zones). हे सारे आपण ट्रॅम द्वारे किंवा चालत जाऊन पाहू शकता. चालण्या साठी चार पाऊल वाटा आहेत
जंगलात अनेक  प्राणी - गेंडे, पेनगॉलिन्स, हत्ती, मत्स्य मांजरी, सर्वल आणि इतर बरेच. येथे असलेली कृत्रिम प्रकाश योजना अतिशय मंद आहे - चंद्र प्रकाश असल्याचे भासवते. चंद्रप्रकाशाहून किंचित अधिक प्रखर, पण इतकाच उजेड म्हणजे अंधुक प्रकाश, जेणेकरून कोणत्याही निशाचाराचे जीवन विस्कळीत होत नाही (not disturb nocturnal life) किंवा संधिप्रकाशातले त्यांची वागणुकीला बाधा येत नाही. त्यांचे निवास्थान अत्यंत कल्पकतेने बनविले  आहे
अचानक आमची ट्रॅम थांबली. समोर प्लॅटफॉर्मवर एक स्टॉल होता. आम्ही उतरलो. आम्हाला तहान लागली होती. काही थंड पेय घेतली. दोन - तीन घेतले असतील आणि आमची ट्रॅम आम्हाला तेथेच सोडून निघून गेली


"There no need to panic, sir," तो दुकानदार म्हणाला. "The same tram will come back again after an hour with the second batch of tourists."
एक तास थांबणे ! बापरे!
"We are taking the walking trail, " एक जोडपे आम्हाला म्हणाले. ते दोघेही तरुण होते. खरे तर मला भीती वाटू लागली होती. पण बायकोला कशाला दाखवा? (I was really scared but put a brave front and said to my wife),  म्हणून मी म्हणालो," Let's also take the walking trail."  

आम्ही त्यांतील एक पाऊल  वाट निवडली. कसली ट्रेल हो! चालतो, चालतो, चालून, चालून आमची दमछाक होत होती. पण बरेच समजले. वाटेत होते बरेच खंदक ( moats - खड्डे आणि त्यांत पाणी) आणि इथे आम्हाला जाणीव झाली ती म्हणजे इथल्या कल्पकतेची (creativity). खंदक चक्क ओढा आणि झरा (streams) असल्याचे आभास. ओढ्यांचा आणि झऱ्यांच्या पलीकडे होते डहाळ्या काड्यांचे (branches and twigs) कुंपण आणि त्या पलीकडे निशाचरांचे साम्राज्य. डहाळी आणि काड्या दिसणाऱ्या वास्तविक होत्या गरम वायर (hot wires), ज्यामुळे  प्राण्यांना आपआपल्या कक्षातच ठेवण्यात मदत होत असे  - एक प्रकारचा वेसण किंवा बंधन घालण्याचा उपाय. सारे कृत्रिम (artificial) असून सुद्धा अगदी नैसर्गिक (natural) वाटत होते. अखेर एक -दीड तासांच्या प्रयत्ना नंतर, अंधुक प्रकाशातल्या वाटेवरून मार्ग काढीत आम्ही 'स्टार्टींग पॉईंट' वर पोहोचलो. 'क्रीचर्स ऑफ नाईट' आवारातून बाहेर आलो. बाहेर 'नाईट सफारी'च्या आवारात बरेच स्टेल्स होते. प्रत्येक स्टॉल मधली आणि बाहेर आवारातील सजावट  ' निशाचर आणि त्यांचे जीवन ' ह्या मूलभूत विषयावर आधारित होती. चिनी नवं वर्ष असल्यामुळे त्यांचे बोध चिन्ह (mascot)  'कोंबडा-कोंबडी' हेही सजावटीत दिसत होतं. स्टॉल बघून आम्ही फोटो शूट केले आणि गेट बाहेर पडलो







कुमार बाहेर होताच. त्याने थेट गाडी जुअल ऑफ इंडिया रेस्टोरं (Jewel of India Restaurant) कडे आणली.
 तेथे प्रवेश करताच आम्ही आतिशय प्रभावित झालो. आंतील सजावट अप्रतिम होती. आमचे केलेले स्वागत, अगत्याने दिलेली सर्विस ह्या सर्वामुळे  पहिल्याच दिवशी आमच्यात जिव्हाळा निर्माण झाला. बराच उशीर झाल्यामुळे विशेष गर्दी नव्हती.   एक  pint beer ( सिंगापूर $) मी घेतली. बिअर रिफ्रेशिंग वाटली. सोबत हॉटेलात चालू असलेले सॉफ्ट संगीत (इतर वेळी येथे लाऊड मुसिक असते,असे म्हणतात) अतिशय मधुर होते. मॅनेजर कडे सवड असावी. मी एक दोन सिप घेतले असतील. मॅनेजर माझ्या जवळ येऊन बसला. गप्पा  सुरु झाल्या. सिंगापूर बद्धल बरीच माहिती मिताली. आमच्याकडे लंच - डिनर साठी चोयसिस (निवड पर्याय) होते. पण बहुसंख्य वेळा आम्ही रात्रीचा जेवण्यासाठी येथेच आलो.   Jewel of India was the best -ह्यात  मुळीच शंका नाही
 आम्ही आता हॉटेलवर आलो आहोत. आजचा दिवस संपत आला आहे. आम्ही आपली रजा घेतो. गुड नाईट. उद्या भेटूया!

                                                                                                        
विनय  त्रिलोकेकर


https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiPcRD7d_oCXK_kjyccnKeUDcOZefUgBvF0XguZx_U-fzmnbLq5lkvT8eEchJ3KpGmRWr0O_tVHr2XZotfqmxkry-s3zS51FH-aPu1xaf3dTknTT8cflh2wCrEYpTB0ww8stlXXTPco170/s640/LUSG91E560G119095_20170117008850026-pre.jpg