एरंडेल तेल
'एरंडेल तेल' सध्या नावानेच मला अजूनही धडकी बसते. आमच्या घरी 'एरंडेल तेल' पाजण् याचा एक भयानक कार्यक्रम महिन्यातून एकदा तरी होत असे. त्यातून कोणच सुटले नाही - पुष्पा पासून आमच्या सर्व भाची-भाचे मंडळी पर्यंत. मी मात्र माझ्या दोन्ही मुलांना त्याची झळ लागू दिली नाही. पुष्पा आवडीने पिहित असे. मला पिताना अंगावर काटा येत असे, आईचे ते मला सांगणे, " मोजून दीड चमचा देते" आणि कपात चमचा तिरका धरीत बाटलीतून 'एरंडेल तेल' घालण्यास सुरवात होत असे पण अर्धा कप भरला तरी तेलाची धार चालूच - मग डोळे मिटून, नाक दाबीत कसे बसे तेल गिळणे! तुम्ही हे भयानक 'पेय' प्याहाला नसाल तर तुम्हाला आम्ही ह्या दिव्यातून कसे गेलो त्याची साधी कल्पना देखील करता येणार नाही. त्या तेलाचा स्वाद - तुमच्या रुचिज्ञानकलिकाना (taste buds) गोड ,आंबट , तिकट , कडू हे स्वाद माहित असतील. पण आणखी असतो एक स्वाद आणि तो म्हणजे एरंडेल तेलाचा - एक चमत्कारिक असा स्वाद आणि तो लपविण्यासाठी आई एरंडेल तेल वेग- वेगळ्या माध्यमातून देऊ लागली - सुरवातीला चहातून, मग झाले रॉस्बेरी - पिऊन झाल्यावर दिवस भर येणारव ते भीषण ढेकर!
एरंडेल तेलाचा नेमका स्वाद काय? Google
प्रमाणे ह्या भयानक तेलाचा स्वाद पेट्रोलियम जेली सारखा असतो माझ्या एका बहीण निशा म्हणण्या प्रमाणे " गिळगिळीत " हा शब्द उच्चीत होय.
जेंव्हा जेंव्हा घरी एरंडेल तेलाचा कार्यक्रम असे तेंव्हा मी आजी कडे पळायचो. पण प्रत्त्येक वेळा असफल होत असे तेथेही मा झी ह्या एरंडेल तेला पासून सुटका होत नसे. मी कसा एक ' रोल मॉडेल आहे: असे महेशला जैनीमामी सांगत मला एरंडेल घेयायला भाग पाडीत असे आणि माझा अक्षरशः बकरा होत असे. दरम्यान मी एक युक्ती शिकलो. आजीने दिलेला एरंडेलाचा एका हातात तर हाताच्या मुठीत मसाला सुपारी आणि दोन्ही एकाच वेळी घशात! परिणाम - तयार होत असे तोंडात एक एक केक जो मी एका दमात जिभेने घशात ढकलू लागलो . मी गिळगिळीत स्वादावरर अशा रीतीने केली मात!
आमची सर्वांत मोठी बहीण , पुष्पा आवडीने पिहित असे.एरंडेल तेल हे सांगोतले आहे .पण जेंव्हा एखादी संपूर्ण फॅमिली ह्या एरंडेल तेलावर अक्षरशः तुटून पडत असेल तर ? तुम्हाला खर वाटत नाही ?पण हे मजेदार सत्य आहे.
होते एक कुटंब . असे म्हणतात की ह्या कुटंबातील सारे सदस्य एरंडेल तेला साठी भांडत . का तर आई कडून मिळालेल्या एरंडेल तेलाचे १ - २ चमचे पिऊन झाल्या वर चमचा चाटणार कोण ह्या वरून भांडत.
.
विनय त्रिलोकेकर
No comments:
Post a Comment