Tuesday, 23 November 2021

सवयी

 

सवयी

सवयीचे अनेक प्रकार ,    वाईट सवय (बुरी   आदत or bad habit), खराब सवय ( गंधी आदत or dirty habit),  चांगली सवय (अच्छी आदत or good habit),  इत्यादी प्रकार. पण काही सवयी तर चक्क चमत्कारिक आणि  मजेदार असतात. Yes, you may call them downright funny
or even  crazy!

बघा ना , माझ्या एका मामे भाभावाने स्वतःला एका सवयी पासून दूर ठेवण्या साठी  मनगटी घड्याळ (wrist watch) घालणे चक्क सोडले !
कोठेही गेलो असता , चार चौघात दर मिनिटाला आपण आपल्या घड्याळात  पाहून आपल्या सामोरील  व्यक्तीला  अडचणीत     पाडायचे का ?
ह्या विचित्र सवयी (queer  habit)
वरून मला माझ्या चुलत भाऊ , नारायण दादाची आठवण झाली.त्यालाही हीच सवय जडली होती. कोणा कडेही  किंवा कोणताही कार्यक्रम असो   मिनिटा मिनिटाला आपल्या मनगटावरील घडल्यात पाहणे दादाचे चालू असायचे , आणि त्याचे बरोबर त्याचे,
‌ "साला , इतके वाजले ! निघायला हवे !" ( But he never left in a hurry. In fact, he stayed put till the very  end.)
आणि मनगटावरील घड्याळ तपासताना आपल्या हाथात काय आहे त्याचे ध्यान नसे
मग त्यांच्या समोर उभे किंवा बसलेल्या व्यक्ती कडून असे ओरडणे ऐकू येई ,
" नाऱ्या , तुझा पूर्ण ग्लास माझ्या बुटावर  आणि पँट्सवर उपडा केलास!
  साला इडियट !!!"

माझे चुलत-चुलत काका , केशव राव मनगटात असून देखील गल्लीतून येत जाता लोकांना किती वाजले हे विचारीत . केशव काकांना '
 'केशव राव वाजले किती',  असे टोपण नाव पडले.

विचित्र सवयी नसून हा कदाचित ह्या गृहस्थांचा एक जेनुइन मेडिकल प्रॉब्लेम म्हणजे खरी
वैद्यकीय समस्या असू शकेल.पण कॉलेज मध्ये असताना त्यांच्या सवयीची  आम्हा मुलांना गंमत वाटे , मात्र काहींना (especially, the girls) राग येत असे . आमच्या प्रोफेसर भागवयांचा (उजवा किंवा डावा ) डोळा लवत असे आणि आम्ही त्याला डोळा मारतात असे असे समजलो ! ते शिकवत असलेल्या फिसिक्स ह्या विषया कडे लक्ष होते कुठे ? ते संपूर्ण पिरियड भर किती वेळा डोळा मारतात हे माजून टिपू लागलो आणि वर्गभर  शेअर करू लागलो आमच्या मैत्रिणीही त्यांत सहभागी होऊ लागल्या !
ते डोळा मारीत नसावेत पण त्यांनी  आपल्या ह्या समस्से वर  इलाज / वैद्यकीय उपचार घेतला मात्र नव्हता .  कित्येक वर्षांनी  (कॉलेज नंतर २०-२५ वर्षांनी ) , ते माझ्या मावस भावाबरोबर बॅडमिंटन खेळात होते आणि ... शटल  कॉक ओरडले " हे काय करतोस ? चक्क मला डोळा मारतोस !"

विनय त्रिलोकेकर

No comments:

Post a Comment