- माझी पुस्तके .
Since my post on Facebook ( I had tagged you in it.) remains incomplete, I had again posted the whole piece in parts, which
I am now posting in myvblmy / sending on WhatsApp.
Part I
माझी पुस्तके .
माझ्या प्रकाशित झालेल्या दोन प्य्स्तकांबद्धल आपणास माहीत असेलच, ज्यांत एक आहे इंग्रजीत तर दुसरे मराठीत .
फेसबुक आलेला एक पोस्ट माझ्या
'अदभुत गोष्टींचा संग्रह आणि गोष्ट - एक चित्तथरारक पाठलाग' ह्या पुस्तकाचा अभिप्राय
असून , तो अन्हीप्रय इंग्रजीत लिहिला आहे.
अभिप्राय छान आहे. आणि माझे हे पुस्तक वाचण्याची. उत्सुकता आपल्या मनांत झाली असणार , म्हणून ह्या पोस्ट बद्धल मनापासून धन्यवाद!
अनेकांना वाचनाची आवड तर असते , पण पुस्तकांच्या दुकानांत जाण्याची सवड नसते. काही हरकत नाही.
खालील लिंक वरून ऍमेझॉन द्वारे पुस्तक घरबसल्या उपलब्द होईल .
( Adbhut Goshticha Sangrah Aani... https://www.amazon.in/dp/9390543975?ref=ppx_pop_mob_ap_share)
केवळ माझ्या मराठी पुस्तका बद्धलची उत्सुकता वाचकाच्या मनात निर्माण करण्याच्या हेतूने मी पुस्तकात महेशने (कोठारे) लिहिलेली प्रस्तावना आणि मी मानलेले आभार
येथे पोस्ट/ व्हॉट्सअँप करीत आहे
. FOREWORD / प्रस्तावना
विनय त्रिलोकेकर म्हणजे माझा विनय दादा. माझा सख्खा आते भाऊ माझ्या पेक्षा ७ वर्षांनी मोठा असुनही माझा बाल मित्र. शाळेला सुट्टी पडली की हमखास विनय दादा आमच्या घरी रहायला. म्हणजे माझा तसा आग्रहच नव्हे तर हट्ट असायचा. आम्ही खूप खेळायचो. पण त्याहून मोठी धमाल म्हणजे विनय दादा च्या गोष्टी. त्याची गोष्टी सांगायची स्टाईल अगदी विलक्षण.अक्षरशः
डोळ्या समोर तो चित्रच उभं करायचा. आणि त्यातून त्या गोष्टी थरारक! अधिकतर भूतांच्या! मग काय, नुस्ती धमाल. कदाचित गोष्ट सांगण्याची ही शैली त्याने त्याच्या आई कडून म्हणजे माझ्या आत्या कडून घेतली असावी. कारण मला आठवते, ती सुद्धा खूप छान गोष्टी सांगायची.
विनय दादाच्या गोष्टींचं एक वैशिष्टय होतं. संपूर्ण कथेत ठराविक अंतरानी एक विलक्षण पंच असायचा. आणि तो पंच केव्हां येईल हे मात्र प्रेडिक्ट करणं अशक्य होतं. आणि म्हणूनच कदाचित आम्ही त्या ऐकताना इतके मंत्रमुग्ध होत असू. आता हीच शैली कायम ठेऊन, किंबहुना त्यात अनेक वर्षांच्या अनुभवाची भर पडल्या मुळे उत्कंठा कमालीची शीगेला नेण्याची क्षमता असलेला २ भागांचा हा संग्रह त्याने लिहला आहे. माझा विश्वास आहे की वाचकांना हा संग्रह तितकाच प्रभावित करेल जितका मी प्रभावित झालो आणि माझ्या बालपणीचे ते थरारक क्षण वाचक सुद्धा अनुभवतील.O
मन:पूर्वक शुभेच्छा!
महेश कोठार
क्रमशः
Part II
Since the earlier post was incomplete, it is continued here:
आभार
तसे पाहता प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे अनेक लोकांचे हात माझ्या पाठीशी असल्यामुळेच हे पुस्तक लिहिणे मला शक्य झाले. मी माझ्या आई पासून सुरुवात करतो. आईनेच आम्हा सर्व भावंडांना वाचनाची आवड आणि गोडी लावली आणि नंतर ती माझीआवड माझ्या बहिणीनी जोपासली. मला चांगली पुस्तके, विशेष करून मराठी पुस्तके, मिळू लागली आणि माझ्या सारख्या इंग्रजी (माध्यम) शाळेत शिकत असलेल्या मुलाला, आचार्य अत्रे व पु..ल. देशपांडे ह्यांच्या सारखे दिग्गज आणि उत्तम मराठी लेखक आणि मराठी साहित्याचा परिचय झाला.
माझी सर्वात मोठी बहीण एक चांगली पत्रकार आणि नावाजलेली लेखिका असल्यामुळं आमच्या घरी मोठमोठ्यांची वरदळ असायची, आणि त्यांची वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असत. त्या वेळी मी कॉलेजात होतो. कॉमोरेंड तारा रेड्डी ह्यांची साधी राहणी आणि हमीद दलवाई ह्याचे मराठीवर असलेले प्रभुत्व; ह्या सर्व गोष्टींचा माझ्यावर आणि माझ्या भाषेवर
नक्कीच प्रभाव पडला असणार. आपण काही लिहावे असे मला वाटलेही नव्हते. निबंध लिहिणे किंवा कोणाला निबंध लिहिण्यास मदत करणे इतकेच माझे लिखाण मर्यादित होते. पुस्तक लिहिण्याचे खूळ डोक्यात आले नव्हते.
पण ज्यांची मला विशेष मदत लाभली आहे त्यांचे आभार तर मानायलाच हवेत !
मी प्रथम सुरुवात करतो आमच्या महेश पासून. तसे महेश कोठारेंना कोण ओळखत नाही? लहानपणी एक चाईल्ड ऍक्टर (बाल कलाकार) म्हणून मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आलेले महेश आज ते सिने वर्ल्ड मधली मोठी हस्ती आहेत- उत्त्तम कलाकार, दिग्ज दिग्दर्शक आणि जाणकार निर्माते! एवढेच नाही तर आज त्यांच्या 'जय मल्हार' आणि ' विठू माऊलीं सारख्या मालिकांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. ऐकिवात आहे की 'जय मल्हार'चे रूपांतर थायलंडच्या थाय भाषेत झाले आहे आणि 'जय मारतंड' नावाने 'झी बिंगवर' गाजली. आपले इतके व्यस्त वेळापत्रकअसून सुद्धा माझ्या ह्या पुस्तका करिता प्रस्तावना लिहिण्यास तयार झालात हेच मी माझे भाग्य समजतो.
धन्यवाद !
नंतर येतो तो म्हणजे माझा मावस भाऊ, किरण कोठारे त्यानेच मुळात मला मराठी लिखाण करण्यास प्रोत्साहित केले. आम्हा दोघांची व्हाट्सअँपवर चॅट्टींग चालते. तसेच ईमेलची देवाण घेवाण होत असते. माझ्या इंग्रजीत लिहिलेल्या लेखांवर तो आपला अभिप्राय देत असतो. एकदा त्याने मी काही मराठीतून लिहिले होते आणि त्याने मराठी लेख लिहिण्याचे सुचविले. माझे काही मराठीतले लेख आणि ब्लॉग वाचून त्याने ते लेख प्रसिद्ध
करण्याचे सुचविले. अभिप्राय देतांना तो खोटी स्तुती करीत नाही, उगाचच 'वाह वाह ' न करता रोकठोक मत व्यक्त करतो.
माझ्या पत्नीने केलेलं संपूर्ण पुस्तकाचे एडीटींग केले आहे आणि ते सुद्धा घर सांभाळून. ह्या बद्धल तिचे कौतुक करणे आवश्यक आहे. पुस्तककाची मॅनुस्क्रिप्ट कॉपी करून ५" X 8" पुस्तकाच्या टेम्प्लेटवर पेस्ट करण्याचे किचकट काम माझी मुलगी, मैथिलीने एका रात्रीत केले आणि ते सुद्धा आपल्या दीड वर्षाचा मुलाला सांभाळून !
तसे पाहता प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे अनेक लोकांचे हात माझ्या पाठीशी असल्यामुळेच हे पुस्तक लिहिणे मला शक्य झाले. मी माझ्या आई पासून सुरुवात करतो. आईनेच आम्हा सर्व भावंडांना वाचना------
मी शेवटला उल्लेख करतो एका महत्त्वाच्या व्यक्तीचा, ती म्हणजे माझे स्नेही कैलासवासी प्रदीप कोठारे. त्यांनी त्यांच्या प्रभू
तरुण ह्या मासिकात लिहिण्याची मला विनंती केली, गळच घातली. मी त्यांचे हे आमंत्रण स्वीकारून मासिकासाठी लिहू लागलो आणि आज त्यांच्या साठी नियमित लिहितो. माझे काही त्या मासिकातले वाचल्या नंतर कै. श्रीमती वंदना प्रमोद नवलकर ह्यांनी मला त्यांच्या प्रभू प्रभात मासिका करिता लिहिण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी एक लेख लिहिला. पण तो माझा त्यांच्या साठी शेवटचा लेख. वंदना वहिनींचे देहावसान झाले. त्या हयात अस्त्यातर मी आजही प्रभू प्रभात करीता लिहीत असतो.
चुकून माकून माझ्या कडून कोणाचेही आभार मानण्याचे राहून गेले असेल तर चूकभूल माफ करावी
आपला ,
विनय त्रिलोकेकर
क्रमशः
Part III
हे सारे ( पहिल्या दोन भागांत) iiझाले माझ्या मराठीतील पुस्तकाचे.
असो!
आता आपणा सर्वाना कळविण्यास अतिशय आनंद होतो की ८ जानेवारी ' २१ ते १६ जानेवारी ' २१पर्यंत प्रगती मैदान , नवी दिल्ली येथे होणाऱ्या 'द न्यू दिल्ली वर्ल्ड बुक फेअर' ह्या पुस्तकांच्या प्रदर्शना साठी मला माझे इंग्रजीतले पुस्तक -
'My Collection of Supernatural & Paranormal Stories & The story of Crafty George and his wicked ways'.
प्रदर्शित करण्याकरिता आमंत्रित केले आहे आणि मला एक स्लॉट देण्यात आला आहे .
Of course, you can also order this book and get it at your doorstep
Links are given below:
Please find the links below
( For the , English one)
BLUEROSE STORE
https://bluerosepublishers.com/product/my-collection-of-supernatural-paranormal-stories-and-the-story-of-crafty-george-and-his-wicked-ways/
AMAZON
https://www.amazon.in/dp/9390396808?ref=myi_title_dp
Link Optimization usually takes some Time, so if the book is unavailable on Either Flipkart or on Amazon It'll be updated in a couple of days. Thank you for your cooperation
Find on social media
1484836361_square-twitter.png 1484836356_square-facebook.png 1487771825_Instagram-1.png 1484836633_internet_explorer.png
क्रमशः
Concluding Part IV
THE WORLD BOOK FAIR
AND Me
तिसऱ्या भागात मी लिहिल्या प्रमाणे, ८ जानेवारी ' २१ ते १६ जानेवारी ' २१पर्यंत प्रगती मैदान , नवी दिल्ली येथे होणाऱ्या 'द न्यू दिल्ली वर्ल्ड बुक फेअर' ह्या पुस्तकांच्या प्रदर्शना साठी मला माझे इंग्रजीतले पुस्तक -
'My Collection of Supernatural & Paranormal Stories & The story of Crafty George and his wicked ways'.
प्रदर्शित करण्याकरिता आमंत्रित केले आहे आणि मला एक स्लॉट देण्यात आला आहे .
Yes I am sure that you will help me in your own way, like spreading the word around, especially to those of your friends in Delhi, recommending the book to others with your feedback and reviews . But most importantly, I seek your good wishes and blessings of the Almighty.
I thank you all once again.
माझ्या मित्र मंडळीनो आणि नातेवाईक मंडळीनो , मला खात्री आहे की आपण सार आपापुल्या पद्धतीने मला सहकार्य नक्कीच कराल , जसे दिल्ली मध्ये होणाऱ्या ह्या बुक फेअर आणि माझे पुस्तक प्रदर्शित करण्याकरिता मला तेथे मिटलेल्या स्लॉट बद्धल आपल्या सर्व मित्रमंडळींना सांगणे तथा इतरांना माझे पुस्तक सांगणे (recommend the book by giving feedback and writing review) माझ्या पुस्तकाचा फीडबॅक /b अभिप्राय लिहून माझे पुस्तक वाचण्यास प्रोत्साहित करणे , वगैरे.
पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपणा सर्वांच्या शुभेच्छा आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वा!
ही माझी प्रांजळ , नम्र आणि मनःपूर्वक विनंती आहे !
आपला ऋणानुं बंधू ,
विनय त्रिलोकेकर
संपूर्ण
No comments:
Post a Comment