शौच करण्याची योग्य आणि चांगली पद्धत
शौच करणे (Defecation ) म्हणजे ( आज लोक 'म्हंजे' असे लिहितात, असो) पचन क्रियेतील (digestion) शेवटची कृती होय, हे आपणाला माहितच असेल. आणि आपल्याला हेही माहित असावे की ह्या कृतीद्वारे सारे प्राणी आपल्या संपूर्ण अन्न नलिकेतून (from the digestive tract) पचन क्रिये नंतर राहिलेले पदार्थ गुद - द्वारे (via anus) शरीरा बाहेर फेकले जातात. असंस्कृत भाषेत आपण 'हगणे' बोलतो. ह्या टाकाऊ पदार्थाला (waste material ) आपण शौच (faeces) असे म्हणतो आणि टाकाऊ वेस्ट बरोबर पचन न झालेले अन्न देखील बाहेर फेकले जाते.
साधारणपणे आपण (मानव) शौचाला दिवसातून काही वेळा किंवा आठवड्यातून काही वेळा जात असतो. आपल्या मोठ्या आतड्याच्या स्नायूंचे आकुंचन एखाद्या लहरी प्रमाणे होत असते आणि शौच गुदाशय (rectum ) ते मलद्वार किंवा गुदद्वाराच्या (anus )दिशेने ढकलले / फेकले जाते. इंग्रजीत ह्याला 'egestion' असे म्हणतात. .
शरीरविज्ञान (Physiology)
शौच पदार्थ (faecal waste) हे प्रथम गुदाशया मध्ये (rectum or ampulla rectii) तात्पुरते साठविले जाते. जस जसे शौच गुदाशयात भरत जाते तसे गुदाशयाच्या स्नायूंची भिंत फुगते, आपली मज्जा संस्था तेथील इंद्रियाना ताणतात आणि त्या मुळे शौच करण्याची भावना उत्तेजित होते. ( As the waste fills the rectum and
expands the rectal walls, nervous
system stretch receptors in the
rectal walls stimulate the desire to defecate.) हि शौच करण्याची आच गुदाशायाच्या स्नायूंचे आकुंचन, गुदद्वाराच्या स्नायूंचा विस्तार / प्रसारण, पाठीच्या कण्याच्या स्नायूंचे तसेच गुदशयाच्या बाहेरील स्नायूंचे आकुंचन ह्या सर्वांमुळे घडते. आणि आचेचे समर्थन न केल्यास शौच पुन्हा मोठ्या आतड्यात फेकले जाते (reverse peristalsis), जेथे जास्त पाणी शोषले जाते आणि साठवले जाते. वरील क्रिया परत घडते. जर शौच करण्यास बराच काळ लोटला, विलंब झालास तर शौच कडक (hard ) बनते आणि बद्धकोष्टता किंवा मलाविरोध ह्याची बाधा होते. आणि जर शौच करण्याची क्रिया तीव्र गतीने होऊ लागली तर अतिसार किंवा जुलाब होतो. ह्या सर्व क्रिये साठी दीर्घ श्वास घेऊन हवा गुदद्वारा च्या स्नायू वरून सोडणे (to expel the air
against a closed glottis (Valsalva maneuver)) आवश्यक असते आणि त्यामुळे छातीचे स्नायूंचे आकुंचन होऊन पोटाचे स्नायू, छातीचा पडदा (diaphragm ) आणि ओटीपोटाचा पडदा ( pelvic diaphragm) अन्न नलिकेवर दबाव आणतात. फुफुसे छातीच्या पडद्याला खाली ढकलतात आणि हवा खेळण्याचे (ventilation ceases temporarily) तात्पुरते बंद होते. छातीतल्या पोकळीचा रक्त दाब वाढतो (Thoracic blood pressure rises) आणि प्रतिक्षिप्त क्रियेमुळे र्हुदायाला होणारा रक्ताचा पुरवठा कमी होतो. ह्या स्तिथीमुळे रक्तपेशीतील किंवा र्हुदायातील रक्त गोठण्याची शक्यता असते आणि मृत्यू देखील ओढावू शकतो ( thrombosis) किंवा अश्या परिस्थितीत पटकन उभेराहून शौच्यालाया बाहेर पडण्याची घाई केल्यास भोवळ/चक्कर येऊ शकते . (Can result in a blackout.) शौच क्रिया होत असतांना गुदद्वाराचे स्नायू आणि मूत्रमार्गाचे स्नायू एकत्रित आणि एकाच वेळी काम करीत असतात. हे सारे दोघा शास्त्रज्ञांनी स्वतंत्रपणे प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे. म्हणुन च शौच करीत असतांना लाघवी होणे स्वाभाविक असते.
हे सारे झाले आपल्या शरीर रचनेचे आणि शौच करण्याची संपूर्ण क्रियेचे वर्णन. आता पाहूया शौच करण्याची ढब (posture)
जरी ह्या साऱ्या ढबी संस्कृती नुसार (culture - dependent) असल्या तरी, अगदी प्राचीन काळा पासून मानव आणि इतर प्राणी देखील , उकडू बसून सौच करायचा (squatting posture) आणि ते देखील उघड्यावर. (defecating in the open).

हळू हळू बदल घडू लागले. तरीही आजही हीच पद्धत बऱ्याच देशात प्रचलित आहे. मात्र पाश्चात्य पद्धतीनुसार बसून शौच कारण्याची सवय ( १९व्या शतकांपासून ) आपल्याला जडलेली आहे. तरीही "बॉकस- गॅस्ट्रो अॅटेरेलोजी' ह्या प्रमाण मानलेल्या पुस्तकानुसार उकडू बसून शौच करणे ही सर्वात उत्तम पद्धत होय कारण त्या 'पोस्चर' मुळे आपल्या मांड्या उदरावर वाकवून जोर दिल्या कारणाने शौच बाहेर शरीरा बाहेर ढकलण्यास मदत होते. असो.
आज आप-आपल्या संकृतीनुसार शौच्यालय प्रचलित आहेत, त्यात मुख्यतः ३ प्रकार होत:
१)उकुडू बसण्याची संडास (squatting pan toilet or Indian Style toilet) ,
वरील चित्रात दर्शिवलेल्या संडासात अशा पद्धतीने मंड्या आणि ढोंगण वाकवून उकुडू होतो (squatting, or crouching). साफ करण्यासाठी पाण्याचा वापर बादलीतून टमरेलने (using a mug to draw from a bucket) किंवा नळकांड्याने फवारा मारून (by use of a bidet shower).
२) बसण्या साठी कॉमोड (Sitting commode or Western Style)
वरील चित्र प्रमाणे अशा पद्धतीने बसून शौच करतो.
ज्यांना भारतीय संडासात काही कारणामुळे शक्य नसते, अशा वेळी हि वेस्टर्न स्टाईलचे कॉमोड सोयीचे वाटते.
आणि
३) दोघांच्या मधला प्रकार म्हणजे अॅन्ग्लो इंडियन semi-squatting, or sitting.
शौच करण्याची योग्य आणि चांगली पद्धत कोणती?
एखाद्या खुर्चीत बसल्या प्रमाणे आरामात शौच करतो खरे. असेलही हि एक आधुनिक (modern) पद्धत. पण ह्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. ह्या स्थितीत आपण ९० औ. चा कोन करून बसतो त्यामुळे पोट संपूर्ण रिकामे करता येत नाही आणि अन्न नलिका - गुदाशयाचे अडचणी उद्भवतात (the angle-90-degrees angle associated with sitting on toilets, at which people sit when evacuating their bowels being the true cause of colon-rectal problems.) असे बसताना आपली पाठ सरळ ताठ आणि पाऊले जामिनाला सपाट टेकलेले असतात, ढुंगण आणि गुडघा ह्यांत ९० डिग्री कोन निर्माण होतो, गुदाशय आणि गुदद्वारा मधले अंतर कमी होऊन शौच करण्यास त्रास होतो. तीनपट अधिक जोर लाऊन शौच केल्याने किरकोळ बाधा गुदाशय खाली उतरणे ( prolapse) तर काही वेळा जीवनाला धोका असलेली स्थिती निर्माण होते ( life-threatening conditions) जसे मेंदूत रक्तस्त्राव (cerebral haemorrhage) आणि ह्दयस्नायूमध्ये रक्ताची गुठळी होऊन
हृदय विकाराचा झटका येऊ शकतो (heart attack due to myocardial infarction),मूळव्याध (haemorrhoids or piles ), आतड्यांचा कर्क रोग आणि इतर विकार होऊ शकतात.
ह्यात असा बदल करुशाक्तो. तो म्हणजे एक स्टुलावर ह्या प्रमाणे आपली पाउले ठेवणे.

ह्याउलट आपण उकुडू बसून शौच करतो तेंव्हा आपल्या ढुंगण आणि गुडघा ह्यांत केवळ ३५ डिग्री कोन निर्माण होतो, गुदाशय आणि गुदद्वारा मधले अंतर वाढते शौच करण्यास सोपे होते आणि आपला कोठा संपूर्ण रिकामा होतो. .खालील चित्रात हे सारे स्पष्ट होईल.
आणि आपण जा हा विडीयो जरूर पहा :
No comments:
Post a Comment