Wednesday, 23 December 2015

उचलली बोटें अन् केले फॉरवर्डस आणि पोस्टस!



 उचलली बोटें अन् केले फॉरवर्डस आणि पोस्टस!

आज  आपण  व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा ट्वीटर वरील पोस्ट वाचलेत तर आपल्याला लक्षात येईल की आपण भारतीय जगातील सर्वात विनोदी आहोत. ह्यात तिळमात्र अतिशयोक्ती नाही. 

अगदी काल परवाची गोष्ट आहे. मला असा फॉरवर्ड आला :

Coming February cannot come in your life time again, because it will have 4 Sundays,4 Mondays, 4 Tuesdays, 4 Wednesdays, 4 Thursdays, 4 Fridays and 4 Saturdays. This happens once every 823 years. This phenomenon is referred as 'Money Bag' in Feng Shui. So send this message to 4 people or 4 groups and money will arrive at your doorstep within 4 days. 

 लेको, ह्या गोष्टीचा खरेपणा पडताळून तरी पहा २०१६ साल लिपियार (Leap Year), फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस आणि सोमवार असतील ५. प्रत्येकी ४ दिवस आठवड्यातील ७ दिवसांचे धरले तर होतात २८च दिवस. आणि हा योग म्हणजे २८ दिवसांचा फेब्रुवारी लिपियर खेरीज नियमित येत असतो. मग हे ८२३ वर्षाचे कोडे काय आहे? असा पोस्ट बद्धल प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी झाली असेल. काहींनी ही एक थाप मानून , 'hocus - pocus', 'crap' किंवा 'humbug' बाब मानून ह्या पोस्ट कडे दुर्लक्ष केलेही असेल. पण काहींनी धन लाभाच्या भाबड्या आशेने ४ जणांना हा संदेश, शहानिशा न करताच,व्हॉट्सअॅप केला असेल

फॉरवर्डवरून मला लहानपणातील एका गोष्टीची आठवण झाली. मी एस.एस.सी.ला किंवा कोलेजात असेन. त्यावेळी कॉम्पुटर नव्हते, ईमेल वा व्हॉटअॅप संदेश पाठवण्याची प्रथा सुरु झाली नव्हती. पात्रांची देवाण घेवाण मात्र होत असे - अगदी १५ पैसे असलेले साधें पोस्ट कार्ड असो किंवा १ रुपयाचे देशी लखोटा वा त्याहून महागडे आंतरदेशीय पाकीट असो! आईला आले होते एक निनावी पोस्ट कार्डरुपी एक पत्र. कार्ड हळद - कुंकू अगदी माखलेले होते. पत्रातील मजकूर असा काहीसा होता

…. देवी प्रसन्न //
 आपल्या कुलदेवतेची पूज्या करून ह्या पत्राच्या २५ प्रती काढून २५ व्यक्तींना पाठवाव्यात. तसे आपण केल्यास आपली भरभराट होईल, आपल्याला धन प्राप्ती होईल, आपल्या मुलांना दीर्घ आयुष लाभेल आणि त्यांची उत्तम प्रगती होइल. 
आणि असे २५ दिवसांच्या आंत न केल्यास तुम्हाला उतरती कळा लगेल. ……. आपला मुलगाही हे जग सोडून जाईल
आपला हितचिंतक 

पत्र वाच्यावर आई पार घाबरून गेली. काय करावे ते तिला सुचत नव्हते. " विनय, मला २५ पोस्ट कार्ड आणून दे",असे म्हणत तिने मला पत्र दाखविले. मी ते पत्रच फाडून टाकले -- म्हणतात न!   'न रहेगा बाँस न बजेगी बांसुरी ' आणि २५ व्यक्तींना असल्या विकृत  भय-मनः स्थिती पासून वाचविले असेन (saved them from this fear- psychosis). आईने पत्र न पाठविल्यामुळे आमचे वाईट असे काही झाले नाही आणि आईच्या पश्चात मी अजून जिवंत आहे.पत्रातील मजकूर कदाचित ह्याहून जास्ती असावा. २५ कार्डे लिहून काढणे किती मेहनतीचे मोठ्या कष्टाचे झाले अस्ते. पण हा झाला एक भाग. आणि भीती सत्राची  होणारी सकाळी मुळे (chain reaction ) सुरु होणारे दुष्टचक्र (vicious circle ) हा झाला दुसरा भाग. 

आणि ह्या फॉरवर्डने तर मी चक्रावूनच गेलो:


अजीब सोडा, हा तर अजीब और गरीब प्रकार होय! मुळात भगवत गीतेत १८ अध्याय आहेत आणि त्यात एकूण ७०० श्लोक आहेत. ११५ हा काय प्रकार आहे? बघा, चालू वर्ष आहे २०१५. आता तुमचे जन्म वर्ष त्यातून वजा केल्यावर तुमचे वय (age) दाखवते. उदारणार्थ :

तथाकथित भागवत गीतेतील च्लोक संख्या = ११५  
Less  तुमचे जन्म वर्ष (Year of birth)  =  ४२ (१९४२)
तुमचे आजचे वय                      =  ७३ वर्षे 

पण जर आपण २००० सालात किंवा २१व्या शतकात जन्माला आला असला तर? उदारणार्थ २००२ मध्ये, तर ११५ - २ = १३ वर्ष संभवते. हसा लेको,हसा! 

शाळेत शिकलेले वय काढण्याचे सरळ आणि सोपे गणित आहे. चालू सन वजा जन्म वर्ष = आजचे वय. जसे २०१५ - १९४२ = ७३ वर्ष आणि २०१५ - २००२ = १३ वर्ष. 

२०१६ सालात आपल्याला असाही संदेश येईल : कोणा एका धार्मिक ग्रंथात ११६ उपदेशात्मक लघुकथा (Parables) आहेत. त्या ११६ उपदेशातून आपले जन्म वर्ष उणे केल्यास आपल्या चालू वय समजेल. वा, क्या बात है!

 व्हॉट्सअॅप  आणि फेसबुकवर शेयर आणि फॉरवर्ड प्रमाणे लाईक (Like) हा देखील एक विनोदाचा विषय होऊ शकतो. खालील फोटोत मी नाही. पण हातात हिरवी बॉटल घेऊन असलेल्या व्यक्तीला कोणीतरी मी म्हणून 'टॅग' केले. लठ्ठपणा सोडलात तर आम्हा दोघांत साम्य असे काही नाही. आणि तरीही माझ्या भाच्याला (संजूला) तो मी आहे असे कसे काय वाटले, देव जाणो. माझे नाव वाचले आणि लगेच त्याने 'like' केले! आपले माणूस फेसबुक वर दिसो किंवा आल्या माणसाचा एखादा पोस्ट असो, त्याला लाईक करणे आणि 'वाह वाह' असे कॉमेंट देणे हे आपले कर्तव्य आहे असे तो समजतो.





Sanjoo Talpade likes this.
Comments
Sunil Potdar
Sunil  Where is this (?)

Vinay Trilokekar
Vinay Trilokekar When I was not there, for that matter I wasn't even called, how can you tag me?

Girish Chaudhari
Girish  U was there. ( You were there असे त्याला सांगायचे असावे.)

 सर्वच विनोद (jokes) हे आपल्याला कोणीतरी पाठवलेले 'फॉरवर्डस' असतात. बहुसंख्य जोक्स नवरा-बायको च्या संबंधावर आधारित असतात आणि त्यानंतर राजकारणी लोकांवर व राजकारणावर असतात. म्हणूनच इतरांचा असा समज होतो की Indi­ans are not only sex-obsessed, but they seem to be inher­ently unhappy in their mar­riages and con­stantly at logger-heads with their spouses, while politi­cians in any case are always fod­der for humour, the world-over. 
माझ्या एक स्नेही आहे. त्याने असे काही व्हॉट्स अॅपवर पाठवले, "माझ्या विवाहित मित्र- मैत्रिणी करिता टीप - This is the best and the most civil way to have a fight with your spouse instead of resorting to physical force--- 

बायोकोने आपल्या नवऱ्या साठी, " मी तुझे नाव समुद्रकिनारी वाळूवर लिहिले, पण ते लाटेने वाहून गेले. मी तुझे नाव हवेत लिहिले पण वाऱ्याच्या तडाख्यात ते नष्ट झाले. मग मी तुझे नाव माझ्या हृदयावर कोरले आणि मला हृदयविकाराचा झटका बसला."

नवरा बायकोला म्हणतो, " मला भूक लागली म्हणून देवाने 'pizza' दिला, मला तहान लागली म्हणून त्याने मला 'coke' दिला आणि मग विचारले 'Any problem?' मी म्हणालो नाही. आणि मग तू आलीस माझ्या आयुष्यात."

Another acquaintance of mine,forwarded these two quotes on 'wife':
1] Once A man asked God: Why all the girls are so cute & sweet, and all wifes (He meant wives) are always angry?
God Answered: Girls are made by me... and you make them Wife...!!! Your Problem.. !!!
2]
Dharam Pita... not real father.
Dharam Maa... not real mother.
Dharam Putra... not real son.
Dharam Bhai...... not real brother.
Dharam Behan... not real sister.
But how this zabardast mistake happened? Dharam PATNI... means REAL WIFE.
Pata Karo Shashtro Main Kahan Galti Huyi... !!

 No wonder the poor guy couldn't manage his marital status and save his marriage!

 अश्याच एका 'व्हॉट्स अॅप फॉरवर्डस' मध्ये मला आले, 
'Oxford Dictionary पेज नं० ७८९ नुसार Indian: old-fashioned & criminal peoples
म्हुणुन इंडिया (India)चा अर्थ असभ्य अ अपराधी लोकांचा देश. भारतीयांचा अपमान करण्यासाठीच गोऱ्या इंग्रजांनी हे नामकरण केलाय. आता तुम्हीच ठरवा आपल्या देशाला भारत म्हणायचे की इंडिया. ह्या पोस्टला कृपया इतके शेयर करा की जास्तीत जास्त भारतीयांना हे कळेल.

शेयर सोडा मी त्याला त्याची डिक्शनरी (शब्दकोश) फेकून देण्याचा सल्ला दिला. असो.

Actual Oxford Dictionary:
Indian: a native or national of India (noun)
 of India (adjective)

India: officially the Republic of India (Bhārat Ganarājya),[12][c] is a country in South Asia. It is the seventh-largest country by area, the second-most populous country with over 1.2 billion people, and the most populous democracy in the world. Bounded by the Indian Ocean on the south, the Arabian Sea on the south-west, and the Bay of Bengal on the south-east, it shares land borders with Pakistan to the west]China, Nepal, and Bhutan to the north-east; and Burma and Bangladesh to the east. In the Indian Ocean, India is in the vicinity of Sri Lankaand the Maldives; in addition, India's Andaman and Nicobar Islands share a maritime border with Thailand and Indonesia.
Home to the ancient Indus Valley Civilisation and a region of historic trade routes and vast empires, the Indian subcontinent was identified with its commercial and cultural wealth for much of its long history.[13] Four world religions—Hinduism, Buddhism, Jainism, and Sikhism—originated here, whereas Judaism, Zoroastrianism, Christianity, and Islam arrived in the 1st millennium CE and also helped shape the region's diverse culture. Gradually annexed by and brought under the administration of the British East India Company from the early 18th century and administered directly by the United Kingdom from the mid-19th century, India became an independent nation in 1947 after a struggle for independence that was marked by non-violent resistance led by Mahatma Gandhi.
The name India is derived from Indus, which originates from the Old Persian word Hinduš. The latter term stems from the Sanskrit word Sindhu, which was the historical local appellation for the Indus River.  The ancient Greeks referred to the Indians as Indoi (Ινδοί), which translates as "the people of the Indus"
The geographical term Bharat, which is recognised by the Constitution of India as an official name for the country, is used by many Indian languages in its variations. The eponym of Bharat is Bharata, a theological figure that Hindu scriptures describe as a legendary emperor of ancient India.
Hindustan was originally a Persian word that meant "Land of the Hindus"; prior to 1947, it referred to a region that encompassed northern India and Pakistan. It is occasionally used to solely denote India in its entirety.

मग, आपल्या फेस बुक वर तुम्ही काय शेयर कराल? अर्थात हा सर्वस्वी विशेष हक्क आहे (your prerogative) पण तो बजावत असताना आपले हसू होणार नाही ह्याची खबरदारी घ्या.
 जाहीर रित्या आणि  राजरोसपणे जरी आपण हे टाळत असलो तरी आपल्या खासगी पार्टीत मेजवानीत जुनेच 'सर्दाजी' व 'गुजु' जोक्स चकण्या सारखे चघळत असतो. आणि त्यात अलीकडे 'मल्याळी' आणि 'सिंधी' भर पडली आहे. आज व्यंग चित्रकार बरीच खबरदारी घेतात. कोणाला दुखवून (offend) एखाद्या self - appointed प्रशासकांचा रोष ओढवून घेणे किंवा एखाद्या खटल्यात गुंतवून घेण्यात काय फायदा? म्हणूच आपण सारे 'safe tar­gets' शोधत असतो आणि लट्ठ माणसे, नवरा-बायको, सासू -सून, आपल्या जोक्सचे सॉंफ्ट
टार्गेट बनतात. वैयक्तिक सॉंफ्ट टार्गेटस प्रतिकार करु शकत नाहीत आणि होतात ' आ बैल मुझे मार'
  माझा एक पारसी मित्र मोठ्या अभिमानाने सांगतो, " We Parsis probably are the only people who laugh at ourselves and don't care how much fun is made of us." हे शंबर टक्के खरे आहे. तर काही लोक स्वतःच्या जोक्सवर स्वतःच हसतात.  काही टी.व्ही शो मध्ये ओढून ताणून हसवण्याचा 'laughter track' लावून केविलवाणा प्रयत्न करतात. कॉफी व्हिथ करण (Kof­fee with Karan) ह्या कार्यक्रमात “Who is the Pres­i­dent of India?” असे विचारवर आलीय भट म्हणाल्या “Prithvi­raj Chauhan”. आणि एका रात्रीत 'dumb' (बिनडोक) विनोदांच्या टार्गेट झाल्या. Although  she is turn­ing out to be a fine director’s actress, one screw-up in pub­lic was enough to make her the butt of every “dumb” per­son joke since then.

माझे एक स्नेही, भावीन झान्कारिया, आपल्या कॉल्म मध्ये लिहितात. (ते एका इंग्रजी वर्तमान पत्रात दर आठवड्याला एक सदर लिहित असतात) 'We are an extremely inse­cure bunch of peo­ple. If a for­eigner says bad things about life in India, instead of acknowl­edg­ing that we are a dirty, insu­lar, self­ish lot in gen­eral, we become defen­sive and fall back on our 2000-years old glory days and our so-called “Bhar­tiya San­skriti”, which really only means falling at the feet of our elders, no mat­ter that we then throw the same elders out to pas­ture when they are of no use to us. If another Indian, espe­cially an NRI points out prob­lems with our civic sense, we ask him not to come back to India. And if some­one makes jokes about us or our reli­gion or com­mu­nity, we want to hang him.'

ते पुढे लिहितात, 'So it takes a lot in India to laugh at oneself. And it’s high time we had some laws that pre­vented peo­ple from going to court or the police, each time some­one poked fun at them or other pub­lic fig­ures or exag­ger­ated funny behav­ioral prac­tices of spe­cific com­mu­ni­ties or groups of peo­ple. Only then, will we be able to move to the next level of a 2ndWorld society.

And only when the same com­mu­ni­ties and peo­ple actu­ally start laugh­ing at them­selves and cre­ate jokes about them­selves, will we become a 1st World country.

Really, progress is not just about infra­struc­ture and gleam­ing roads and shiny build­ings. We have to progress as a soci­ety as well. And for that we need to be able to laugh at our­selves and be gra­cious when oth­ers poke fun at us.' 

पोस्टची शहानिशा करा नाहीतर एक नवीन म्हण तयार होईल - उचलली जीभ आणि लावली टाळ्याला सारखेच उचलली बोटे आणि ठेवली फॉरवर्ड आयकॉनवर!


विनय त्रिलोकेकर

1 comment:

  1. Kiran Kothare
    To vinay trilokekar
    Dec 22 at 10:36 PM
    Good comments and observations on current craze or "in thing"

    Thanks & regards

    Kiran Kothare
    mobile 9819816150


    ReplyDelete