पंखांवरून काळाच्या पलीकडे
आमच्या सिंगापूरचे प्रवासवर्णन (travelogue) करताना माझ्या असे लक्षात आले की ‘Wing of times’
ह्या सेंटोसा येथील प्रयोगा बद्धल लिहिण्यास मला एक अखंड अध्याय लिहिण्याची गरज भासली. आमचा सिंगापूर प्रवासातील दुसरा दुसरा दिवस. सकाळचे जेवण आटपून आम्ही दोघे कारने सेंटोसा बेटा कडे निघालो. केबल कारने सेंटोसात पोंचलों. तेथे आमचे 'ल्युज' (luge) आणि 'स्काय राईड' झाले. ( त्याबद्धल मी सविस्तर लिहिलणार आहे) केबल कार- प्रवासात आमची ओळख एक नेपाळी दांपत्य ( श्रीराम आणि ममीता शर्मा) तसेच कानपुरातील एक जोडप्याशी (अनुरूप आणि निकिता भारतीय) झाली. दोन्ही जोडप्यांची आम्हाला संपूर्ण सेंटोसा प्रवासात उत्तम साथ लाभली. हे आहेत त्यांच्या सोबत केबल कारने जात असताना काढलेले
आमचे काही फोटो:
कदाचित 'Wing of Times' हा जगातील एकमेव कायम स्वरूपी रात्रीचा खेळ/प्रयोग असावा (
the only permanent night show in the world) जो एका खुल्या सुमुद्ररुपी पडद्यावर दाखवला जातो. आम्ही ६ जाणं प्रयोगासाठी रांगेत उभे राहिलो. आमच्या पुढे १० एक लोकं असावी. पाठी मागे बरीच मंडळी होती. साऱ्यांना पद्धतशीर आंत सडले गेले, धक्काबुकी किंवा रेटारेटी नाही. कोणताही गोंधळ नाही. ह्याला म्हणतात शिस्त! समुद्र किनाऱ्याच्या काही अंतरावर अर्धवर्तुळात प्रेक्षकांसाठी बाकडे / खुर्च्या
मांडल्या होत्या - एखाद्या स्टेडियम किंवा सर्कस मध्ये असतात त्या प्रमाणे. बरेच प्रेक्षक वर चढून मागील खुर्च्या पटकावू लागले. आम्ही मात्र तसे न करता पहिल्या रांगेतील बाकाडांवर ठाण मांडली. आमच्या पुढे कोण्ही नसल्यामुळे फोटो काढणं व व्हिडीओ शूट करणे मला सोपे झाले. प्रेक्षक अजून आंत येतच होते, पण ते सारे आमच्या पाठीमागून जात होते, समोरून कोण्ही नाही. मला फोटो काढण्यास कोणताही अडथळा येत नसल्याचे जाणून मी फोटो शूट करू लागलो:
अरे हे काय ? का कोणास ठाऊक, समोरील दृश्य पाहून मला मॅक्सिकन आणि इटालियन खाद्य पदार्थांची आठवण झाली. मी शेजारीच बसलेल्या ममीतला विचारले, "Mamita, have you ever eaten 'tacos'?"
"Why, of course! Those traditional Mexican - corn or wheat tortilla folded triangular things with some fillings, I simply love them. Those things right in front of do remind us of them, don't they?" ती म्हणाली.
"मला ते नॅचोस ('nachos' )किंवा मॅड अँगल ( 'Mad Angles') सारखे अधिक वाटतात ," माझ्या बायकोने उत्तर दिले. आम्हाला वास्तविक नेत्र सुख घेयायचे होते मग अश्या वेळी आम्ही खाद्य पदार्थांचा विचार का करीत होतो? (Why were we thinking gastronomically?) कदाचित आम्हा साऱ्यांना भूक लागली असावी, हा हा!
संयोजकांचा वक्तशीरपणा वाखाण्याजोगाच होता. बरोबर आठच्या ठोक्याला कार्यक्रमाला सुरुवात झाली. सारे घडू लागले आमच्या समोरील खुला भव्य -दिव्य सागर समुद्रवर आणि 'larger-than-life' पाणीरुपी वाईड पडद्यावर, ७० एम एम पडद्याचा कितीतरी पट रुंद अशा पडद्यावर घडत होते - घडणारे सारे चित्त थरारक होते. एक साधी-सुधी काल्पनिक कथा - परी कथा म्हणा - पण तिची मांडणी काय सांगू! सारे अंगावर एक रोमांच उभे करणारे होते. ३डी प्रोजेक्शन वापरून मल्टी मीडिया इफ्फेटआणणे, लेसर बीम, रोबोटिक पाण्याचे फवारे व चिळकांड्या (ह्या फवाऱ्याचे व चिळकांड्यांचे पाणी थेट आमच्या तोंड-अंगावर वारंवार उदातही होते आणि म्हणूनच आम्हाला थेट त्या परी कथेत गेल्यागत वाटत होते) आणि परी कथेतील नेहमीचे घटक- माया-जादू, गूढता, शौर्य आणि प्रेम विणून तयार झाली ती 'विंग्स ऑफ टाईम'. आत्याधुनिक तंत्रज्ञान
वापरून ECA2 ह्या
जगप्रसिद्ध फ्रेंच मनोरंजन कंपनीने सेंटोसातील स्थानिक तंत्रज्ञांसोबत ह्या अवॉर्ड विंनिंग
'विंग्स ऑफ टाईम'
ची निर्मिती केली आहे.
मला आजही फेरी टेल्स आवडतात
- माझ्या आतले लेकरू बाहेर येते. त्यामुळेच हे सारे बघता - बघता हा ७० वर्षाचा माणूस ७ वर्षाचा झाला! असो.
आणि मी हे सारे व्हिडियो शूट करू लागलो.
समोर वाळूवर किशोर वयातील मुलं बागडत आहेत. कोण आहेत ती? ही चुणचुणीत मुलगी कोण?
ही आहे रचेल. ती आहे चौकस, जिज्ञासू, सहासी आणि उत्सुक. ती किनाऱ्यावर असलेल्या खडक आणि दगड न्याहळत बारकाईने पाहत पुढे - पुढे बिनधास्त धावत आहे.
हा कोण तिच्या मागे मागे धावत आहे, बरे? थोडा भित्रा वाटतो? होय!
हा आहे फेलिक्स. वाटतो खरा भित्रा आणि भ्याड. पण आंत दडलेल्या त्याच्या शौर्याची त्याला जाणीव होईल. पण कधी ? अहो, जरा धीर धारा.
होय, फेलिक्सचा स्वभाव रचेलच्या अगदी उलट. तो जरी भित्रा आणि पुराणमतवादी असला तरी आहे तो अतिशय प्रेमळ.
“रुचेल , रुचेल , आहेस तरी कोठे तू ?”
“कोण, फेलिक्स का ?
“हां , तर येथे आहेस तू !”
“माझा पाठलाग करतोस कीकाय ?”
“वर्गातील सारे तुला शोधीत आहेत .”
“माझा पाठलाग करतोस कीकाय ?”
“वर्गातील सारे तुला शोधीत आहेत .”
“हे ठिकाण पहा .मी तुला काही दाखविते .किनाऱ्यावरचे हे विचित्र आणि विक्षिप्त खडक बघ . चल जवळून पाहूया ”
“ त्यांत नवखे असे काय? साधे दगड तर आहेत ते.”
" पण मला हे अद्भुत आणि अनोळखी दगड जवळून न्याहाळाचे आहेत . किती मोठे आहेत हे ! चाल , शक्य असेल तर पकड मला."
“ त्यांत नवखे असे काय? साधे दगड तर आहेत ते.”
" पण मला हे अद्भुत आणि अनोळखी दगड जवळून न्याहाळाचे आहेत . किती मोठे आहेत हे ! चाल , शक्य असेल तर पकड मला."
“नको . थांब!”
“घाबरत असशील तर दुसरे आहेत त्यांच्या बरोबर रहा . इतका भित्रा-भागुबाई राहू नकोस . ”
“रुचेल, थांब wait… माझ्या साठी थांब !” असे म्हणत तो तिच्या मागे धावत सुटतो.
“ऊं हां !”
फार उशीर झालेला दिसतो. अखेर ती धडपडून पडते. आणि समोर हा कोण? एक गूढ प्राचीन कालीन पक्षी रुपी भला मोठा प्राणी!
हा आहे शाहबाझ. त्याच्या कडे आहेत काळाच्या पलीकडे नेणारे जादूचे पंख.
फार उशीर झालेला दिसतो. अखेर ती धडपडून पडते. आणि समोर हा कोण? एक गूढ प्राचीन कालीन पक्षी रुपी भला मोठा प्राणी!
हा आहे शाहबाझ. त्याच्या कडे आहेत काळाच्या पलीकडे नेणारे जादूचे पंख.
" बापरे! कोणरे तू?"
" मी आहे शाहबाझ ! मी नुकताच जागा झालो आहे एका दीर्घकालीन झोपेतून. होय, हजारो वर्षांच्या निद्रेतून! आता मला केवळ सुरवातीच्या काळात आणि माझ्या घरी परत जायचे आहे , बस. "
" आणि ते तुम्ही कसे करणार?"
"अर्थात माझ्या ह्या पंखां वरून !"
“ वाह, ह्यात मोठे साहस वाटते ! मी तुमच्या बरोबर येऊ शकते ?”
“रचेल ! काय ग , तुझे डोके ठिकाणावर तर आहे ना ?”
“ ही , ही , ही ! (फिदीफिदी हसत म्हणते) अहो शाहबाझ राजे , तसे मी आहे रचेल आणि हा आहे माझा मित्र फेलिक्स ”

आणि दोघांना आपल्या पाठीवर घेऊन उडू लागला !
" काळाच्या प्रवाहातून तुम्ही वाटचाल कशी काय करणार , आम्हाला सांगणार का ?"
"माझ्या पंखांमुळे,अर्थात!"
(चला उडूया त्यांच्या सोबत)
आणि उडू लागला शाहबाझ आणि त्याच्या पाठीवर रचेल आणि फेलिक्स - आणि झाला सुरु त्यांचा प्रवास -(आणि त्यांच्या बरोबर आपला देखील) काळाचे रहस्य उलघडत, शतका मागे शतके ओलांडत - निघाले एकविसाव्या शतका पासून पलीकडे. ती पहा खाली उंच -उंच स्काय स्कॅपर्स, उडाण पूल, मोनो आणि मेट्रो गाड्या - अरे, ते पहा 'ट्वेन्टीएथ सेंचुरी फॉक्स' ग्लोब चिन्ह. सारे पाठीमागे गेले की.

"हे पहा ! आपण येत आहोत १९व्या शतकातील ग्रेट ब्रिटन मध्ये. आता माझी रनिंग कॉमेंटरी बंद केलेलीच बरी."
सादर केलेजाते आपल्या समोर येते कलात्मक रीतीने सादर केलेले एकोणिसाव्या शतकातील ब्रिटिश औद्योगिक क्रांती - एकमेकात गुंतलेली ही काटेरी चक्र (गिअर ), वरखाली होत असलेले दट्टे आणि तराफे आणि त्या सर्वांचा होणार खणखणाट.
“ किती अविश्र्वसनीय ! फेलिक्स बघ , आपण आता रेशमी रास्ता ह्या युगा पर्यंत आलो आहोत .”

[ ख्रिस्ता पूर्वीच दुसरे शतक ते चौदाव्या शतकाच्या शेवंता पर्यंत, ह्या काळात देवाणघेवाण आणि व्यापाराचा मार्ग पूर्वेतील चँगऍन (आता झीऍन) म्हणजे चीन पासून पश्चिमेतील रोमन साम्राजा पर्यंत जोडला होता. आणि रेशीमाचा व्यापार अधिक असल्यामुळे १८७७ च्या दरम्यान जग प्रसिद्ध जर्मन भूगोलकर, फ़ेर्डिनंड फॉन रिचतोफेन (Ferdinand von Richthofen) ह्यांनी ह्या मार्गाला रेशमी रास्ता (Silk Road)असे नाव दिले आणि ह्या युगाला पण हेच नाव पडले. केवळ व्यापाराचा नव्हे तर चीन, भारत,पर्शिया ग्रीक आणि रोमन संस्कृतींची देवाणघेवाण झाली. मायान पिरॅमीड हे माया लोकंना वास्तुकला ३००० वर्षा पूर्वी पासून अवगत होती पुरातनवास्तुशास्त्रीय दाखल देतात. असो. ]
“ आणि हे बघा आफ्रिकेतले सवान्ना .”
[ सवान्ना किंवा सवानाह ही एक कुरण आणि अरण्यप्रदेश अशी संमिश्र पारियावरण व्यवस्था होय. म्हणून वन्यजीवन आणि झाडी झुडपे फार. ]
रचेल खाली पाण्यात पडते. फेलिक्स तिला वाचवण्या साठी पाण्यात उडी घे तो. पंखांवरून
“ओ ! रचेल, रचेल! ”
आणि ......
मग तिघांचा पुढील प्रवास चालू राहातो. पंखांवरून काळाच्या पलीकडे!
"...आपण प्राचीन काळात म्हणजे माझ्या मायदेशा जवळ आलो आहोत, आणि मला आता विरामाची गरज आहे ...हूश ! "
“कदाचित कोणीतरी मदत करेल. ”
"मीच एक मोठा रक्षणकर्ता आहे !"
गोष्टी शेवट झाला तरी कार्यक्रम संपला नव्हता. जोरदार दारूकाम झाले. (त्याचेही विडिओ शूट आपण फसेबूक वर पाहू शकता).अशा रीतीने आमचा सेंटोसातील तो दिवसाची सांगता झाली. ह्या विंग्स ऑफ टाईम ने आम्हा सर्वाना संमोहित केले आणि डोळ्यांचे पारणे फेडले!
"...आपण प्राचीन काळात म्हणजे माझ्या मायदेशा जवळ आलो आहोत, आणि मला आता विरामाची गरज आहे ...हूश ! "
“कदाचित कोणीतरी मदत करेल. ”
"मीच एक मोठा रक्षणकर्ता आहे !"
आणि सुरु झाले एक अर्थपूर्ण गाणे : [ गाण्यात यमक नव्हते. पण लय आणि लयबद्धता होती. तसेच पाश्र्वसंगीत सुरेखक होते. आणि गाण्याचे बोल आमच्या वर्तमान परिस्थितीला साजेसे होते.] गाणे इंग्रजितच जसेच्या तसे ठेवीत आहे. ]
When you are travelling far from home don’t be scared! ( आमचा पण घरापासून लांब प्रवास होता )
When you are travelling far from home don’t be scared!
You are not alone (अर्थात मी एकटा नव्हतो, सोबत माझी बायको होती.हा,हा!)
You are not alone.
Find Courage, find courage in you ( आम्हा दोघात 'ते' ठासून भरले आहे! हा,हा!)
Courage within you!
Let the dream come true!
Keep on hoping! Dream will come true!
Keep on hoping!
Keep hoping! Keep hoping! Keep hoping.......
आणि घर आले शाहबाझचे ......
"चिंता नसावी. मी व्यवस्था कारेन."
शाहबाझ होतो अदृष्य. पण रचेल आणि फेलिक्स जादूने येतात वाळूवर! एकमेकांचे हात पकडून निघून जातात.
“ओ , फेलिक्स ! काय साहस होते !”
(मी रेकॉर्ड केलेला विडिओ आपण फसेबूक वर बघू शकता )
एक गोड अंत Keep on hoping!
Keep hoping! Keep hoping! Keep hoping.......
आणि घर आले शाहबाझचे ......
"पुरातन काळ ! हं, आलो एकदाचे घरी! आपल्या सहवासा बद्धल आभारी!"
“किती रम्य आहे इथे !”
“होय. पण आपल्या पार्टीचे काय ?”“किती रम्य आहे इथे !”
"चिंता नसावी. मी व्यवस्था कारेन."
शाहबाझ होतो अदृष्य. पण रचेल आणि फेलिक्स जादूने येतात वाळूवर! एकमेकांचे हात पकडून निघून जातात.
“ओ , फेलिक्स ! काय साहस होते !”
(मी रेकॉर्ड केलेला विडिओ आपण फसेबूक वर बघू शकता )
गोष्टी शेवट झाला तरी कार्यक्रम संपला नव्हता. जोरदार दारूकाम झाले. (त्याचेही विडिओ शूट आपण फसेबूक वर पाहू शकता).अशा रीतीने आमचा सेंटोसातील तो दिवसाची सांगता झाली. ह्या विंग्स ऑफ टाईम ने आम्हा सर्वाना संमोहित केले आणि डोळ्यांचे पारणे फेडले!
विनय त्रिलोकेकर
No comments:
Post a Comment