Sunday 1 January 2017

परिणाम - असोशिकतेचा! [The Intolerance Effect]



परिणाम - असोशिकतेचा! [The Intolerance Effect]

'एकाने आपली गाय मारली तर आपण त्याचे वासरू मारू नये' असेच काहीसे  लहानपणी आई आम्हाला समजावत असे. म्हणूनच म्हणा, आमच्यात फारसे भांडण-तंटे होत नसत आणि झालेच तर समेट पण पटकन घडतआमची शाळा म्हणजे निधर्मीपणाचे मूर्तिमंत उदाहरण होय. आम्ही जरी एका ख्रिस्ती  मिशेनरी शाळेत शिकलो तरी आमच्यावर धर्मांतर करण्याचा सोडा ख्रिस्ती धर्माचे साधे धडे  कधीही आमच्यावर लादले गेले नाही, असे मी शपथेने सांगतो. पारसी, ख्रिस्चन, यहुदी, मुस्लिम, सिख आणि हिंदू, आम्ही सारी मुलं एकमेकांच्या मांडीला मांडीलाऊन एकत्र बसून शिकत होतो, आणि एकमेकांची चेष्टा- मस्करी देखील करायचो. धर्मा वरून आमच्यात कधीच वाद नसत.  शाळेची शिस्त आईची शिकवण आणि वळण शिक्षकांची शिकवण आणि  ह्यामुळे मला पुरोगामी होण्यास फारच मदत झाली आणि  संयम आणि सोशिकता आमच्या अंगवळणी पडली  आमच्या पिढीतल्या बऱ्याच लोकांचे असेच असावे. मुळात संयम, सहनशीलता आणि सोशिकपणा हे आमच्यातले सद्गुण आहेत की दोष आहेत हेच मला समजत नाही
पण आज चित्र बदलत आहेसगळीकडे असोशिकता (intolerance) वाढत आहे.  'सहनशीलता' हे त्यांच्या  शब्द जरी काढला तर प्रत्येकाचे रक्त उसळते आणि त्याला कोणी अपवाद नाही असे पोप फ्रान्सिसना वाटते. हे सारे त्यांच्याच शब्दात:
 “If my good friend Dr Gasparri says a curse word against my mother, he can expect a punch in the nose It’s normal. You cannot provoke. You cannot insult the faith of others. You cannot make fun of the faith of others.
There are so many people who speak badly about religions or other religions, who make fun of them, who make a game out of the religions of others.They are provocateurs. And what happens to them is what would happen to Dr Gasparri if he says a curse word against my mother. There is a limit. One cannot make war [or] kill in the name of one’s own religion, that is, in the name of God.But those who ridiculed another religion should expect some sort of reaction.
"
  धर्म गुरु पोप फ्रान्सीसनी हे उद्गार 'चारली हेब्डो' हत्याकांडा नंतर काढले होते. पण ते ह्या भयानक कृत्याची पुष्टी करत नव्हते. मला वाटते की बरेच धर्मा-धर्मांवरून होणारे वाद हे दुसऱ्यांच्या धर्माबद्धल असलेले गैरसमज, त्या धर्माच्या  अपुऱ्या / चुकीच्या  माहितीमुळे होतात. - मुळात स्वतःचाच धर्म काय आहे हेच मुळात बऱ्याच जणांना माहित नसते. मग ते दुसऱ्यांच्या धर्मांचा अभ्यास कसे करतील?

आज वाढत असलेला उग्रवाद ह्याला कोणाच्यातरी भावना दुखावल्यामुळे, कोणाला खिजवल्या / डिवचल्यामुळे कारणीभूत आहेत असा लोकांचा कयास असतो. मग ह्या दुखावले गेलेल्यांवर काही समाजकंटक आपले जाळे टाकतात. त्यांना चिथवले जाते. त्यांचे बुद्धी भेद / मस्तिष्क - प्रक्षालन (brainwashing) केले जाते. त्यांच्यावर प्रक्षोभक (provocative ) लेखनांचा / भाषणांचा भडीमार केला जातो. त्यांची ह्या रीतीने त्यांची दिशाभूल करून वेठीस धरले जाते आणि त्यांच्या कडून विध्वंसक कृत्ये घडवली जातात. मग हे नवशिके दिशाभूल झालेले निरागस मुले सराईत पटाईत गुन्हेगार बनतात.
आमच्यावर लहानपणी चांगले संस्कार झाले. चांगली शाळा मिळाली, चांगले जाणकार शिक्षक लाभले.आणि  चांगले - वाईट समजू लागलेतसे ह्या भटकलेल्या मुलांचे झाले असते तर ------

 तस्लिमा नसरीन ह्या लेखिकेने अतिरेक नष्ट करण्या साठी धर्मांमध्ये आधुनीकरण सुधारणा करण्याची गरज असल्याचे खालील लेखात नमूद केले आहे.
[ प्रस्तावना :
खाली लिहित असलेला लेख हा तस्लिमा नसरीन ह्यांच्या इंग्रजीत लिहिलेल्या माझ्या मराठी वाचकांसाठी मी केलेला एक अनुवाद असून. ह्यांत माझे मत नाही किंवा माझा कोणताही वाटा नाही (no  inputs). मी केवळ त्यांनी लेखातून मांडलेले आपले मत अनुवाद करून आपणा समोर मांडीत आहे:
[DISCLAI
MER : Views expressed above are the author's own.]

आता हे बंदूक धारी माझीही हत्या करतील का?
अतिरेक नष्ट करण्या करिता इस्लाम मध्ये अधुनीकरण आणि सुधारणा करण्याची गरज आहे- तस्लिमा नसरीन
काही वर्षांपूर्वी मला 'चारली हेब्डो'च्या कार्यालयातून आमंत्रण आले होते. त्या गुणी, बुद्धिमान तेजस्वी व्यंग चित्रकारांचे काम आणि श्रम पाहून मी अक्षरशः भाराऊन गेले. आपला जीव धोक्यात घालूनही  आपल्या आचार-विचारांचे स्वातंत्र्य जपण्याची त्यांची ही धडपड मी स्वतः देत असलेल्या लढया प्रमाणेच होती. बरेच 'फ़त्वे ' काढले जात होते आणि जीवे मारण्याच्या वारंवार धमक्याही येत होत्या. पण ते बिथरले नव्हते. मुहमद पैगंबरचे उपहासाने रेखाटलेल्या व्यंग चित्र मुळे त्यांच्यावर बरेच दडपण दबाव येत होता पण ते थांबले नाहीत.
 
जर 'खटकणारे' व्यंग चित्र काढणे त्यांनी चालूच ठेवले तर त्यांची हत्या केली जाईल असे त्यांना धमकावले जात होते. असे असून सुद्धा ते व्यंग चित्र काढीतच राहिले. त्यांच्या कार्यालयावर आगीचे गोळे (फायर - बॉम) फेकले गेले, त्यांची नावे अल कायदाच्या यादीत टिपली होती आणि तरीही त्यांनी आपले दरवाजे (दुकान) बंद केले नव्हते. आज बहुसंख्य कलाकारांची अशीच दैना आहे - फतवा, जीवे-मारण्याच्या धमक्या, हकालपटीवनवास. ती सारी अद्धभूत माणसे होती- ते सारे व्यंग चित्रकार. ते सारे केवळ आपल्या सुखात्मिकेत  विनोदात  रुळण्यात प्रवीण तर होतेच  पण त्यांना स्वतःही हसण्याचे आणि स्वतःवर हसण्याचे प्रेम होते.   त्यांचे तत्त्वज्ञान माझ्या तत्वांशी मिळते जुळते होते  - ते सारे धार्मिक रूढीवादहिंसा, दहशतवाद ह्यांचा विरोध करून झिडकारत होतेत्यांच्या परीने ते सारे माझ्याच सुरक्षिततेची काळजी करीत होते.
जगातील एका लोकशाही- सुरक्षित जागेत त्यांचे वास्तव्य असल्या मुळे त्यांना स्वतःची काळजी नव्हती. त्या वेळी मला कल्पनाही नव्हती की अतिरेकी ह्याच कार्यालयात घुसून त्या सर्वांची निर्घृण हत्या करतील आणि माहीत नव्हते की जगात असा  कोणताही देश राहिला नसेल जो सुरक्षित असेल.
चारली हेब्डो प्रकाशित होतच राहील. जर ते बंद झाले किंवा चित्रकार घाबरून गेले तर अतिरेकी जिंकले असा अर्थ होईल. मला हे ऐकून खरोखर आनंद होतो की त्यांचा पुढील 'त्या नरसंहारा निषेध कर्णाथ' अंकाच्या कोटी प्रत काढल्या जाणार आहेत. हे प्रकाशन आचार-विचारांचेअभिव्यक्ती स्वातंत्र्य - बोलण्याचे आणि आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य घोषित करते.
अतिरेकी होण्या साठी, अत्याधुनिक शस्त्रे वापरून निष्पाप- निर्दोषांची हत्या करण्या करिता प्रतिभा किंवा शौर्य लागत नाही. पण प्रतिभेविना कोणही पत्रकार किंवा व्यंग चित्रकार बनू शकत नाही. आपल्या देवाला आणि प्रेषिताला प्रसन्न करून स्वर्ग प्राप्त करण्यासाठी ही काही माथेफिरू, असुसंस्कृत आणि रानटी माणसे एवढ्या कलांचे आणि कलावंतांचे बळी घेतात - अशाच पद्धतीने एक भाविक, धर्मशील (pious ) मुसलमान होण्या साठी सिद्धांतरोपण (indoctrinated) केले जाते.
 त्या सर्वांच्या हत्तेचे ऐकून मला फार मोठा धक्का बसलाय. मला जाणीव होते की माझाही अंत माथेफिरू इस्लामिया धर्मवेड्या कडून होईल. कदाचित मी माझी एखादी कादंबरी किंवा एखादे कवितेचे पुस्तक लिहित असेन आणि अचानक ते हळूच लपून छापून माझ्या अभ्याशिकेत शिरून  'अल्ला हो अकबर' च्या  आरोळ्या देत माझी कत्तल करतील किंवा माझ्यावर गोळ्या घालून  डोक्याच्या चिंधड्या उडवतील. पॅरीस सारख्या शहरात,  सशस्त्र सेक्युरिटी गार्डस असून देखील, ते हे घडवू शकतात मग अशा घटना मी रहाते (बंगला देश) तेथे न घडण्याचे कारण नाही. (काही) मुस्लिम लोक कितीही घातपाताचे घटना घडवून आणोत  पण  काखी  पाश्चात्त्य बुद्धिवंत व्यक्ती ( intellectuals of the Occident) त्यांचाच कड घेत असतात. कदाचित  त्यांच्या  उदारमतवादी धोरणांमुळे म्हणा किंबहुना  कधी काळी आपण (युरोपीय देशांनी ) त्यांच्यार (जुलुमाने)  वसाहत केली ह्या भावनेमुळे असो मुस्लिमांकडे, जे आज युरोप अल्प संख्य म्हणून गणले जातात आणि तसेच अफगाणिस्तान  , इराक किंवा पॅलेस्टैन मधले त्यांचे दैव ह्या मुळे असो, हे सारे ( पाश्च्यात्त्य बुद्धिवंत लोक ) मुस्लिमांवर सहानभूतीचा दृष्टीकोन  ठेवत असावेत. पण चारली होब्डोत काम करणारे बुद्धिमान कोणालाच सोडत नव्हते / सूट देत नव्हते . कोणताही  धर्म पुढारी असो , कोणताही राजकारणी (कितीही मोठा) असो ह्या चित्रकारांच्या नजरेतून सुटले नाहीत. ख्रिस्ती , यहुदी  तसेच इस्लाम ह्या सर्वांवर, प्रत्येक धर्मांची तितक्याच तीव्रतेने गमतीदार व्यंग चित्र काढून, त्यांनी त्या त्या धर्मांतील गमतीच्या बाजू लोकांपुढे मांडल्या. काही वेळा त्यांनी मुहमद पैगंबरचे उपहासाने व्यंग चित्र काढले. त्यांचे हे सारे काम म्हणजे एक मोठी कला आहे. काही लोकांना हे कलावंत उत्तरलक्षी (proactive ) वाटतात. पण उत्तरलक्षी असणे ह्या त्यांचा हक्क आहे आणि त्यांचा खून करण्याचा अधिकार कोणालाच नाही. बहु सांख्य लोक चारली होब्डोच्या पाठीशी उभे रहातील. ते सारे ह्या हत्याकांडाचा निषेध करतील आणि दावे करतील की त्या  (अतिरेकी ) लोकांचा धर्माबद्धलची समजूत चुकीची आहे. खरा इस्लाम नास्तीकांची हत्या करण्यास प्रभावित करीत नाही. परंतु असे अनेक पंतथात असा समज आहे की कुराणातील अनेक सुराःत (जसे अल-बकरा, अल निसा आणि अल- तौबा) असे म्हंटले आहे - जे इस्लाम पळत नाहीत त्यांना मारावे. बैमान्यांची हत्या करण्याची मुस्लिमांना आदेश दिल्याचे दाखले बऱ्याच 'हिडीथ ' मध्ये आहेत.
धर्माचे  चिकित्सक परिनिरीक्षण, करून आपापल्या धर्मात आधुनीकरण  आणि सुधारणा इतर धर्मांनी केल्यात , तसे  धर्माचे  चिकित्सक परिनिरीक्षण करून आधुनीकरण  आणि सुधारणा करण्याचे इस्लाम मध्ये वगळले
 आहे. आतां मुहमदाचे मुलतत्ववादी (fundamentalist)  अनुयायी (followers)  जगभर एक आदर्श, निर्दोष, परिपूर्ण आणि पावन इस्लामी राज्य (quintessential Islamic caliphate) प्रस्थापित करू पहातात
ह्याच  विचारसरणीचा आधार घेऊन अलकायदा, आय़. एस. आय़. एस., बोको हराम, अल - शबाब सारखे इस्लामिय गट जगात 'पुण्य अतिरेक' (‘holy terror’) घडवीत आहेत. ज्यांचा इस्लाम वर विश्वास नाही किंवा इस्लाम वर नावे ठेवतात अश्यांची हत्या करणे हे त्यांचे अधिकार मानतात. भिन्न विचारसरणी किंवा लोकशाही तत्वां वर त्यांचा विश्वास नसतोह्या उलट  हे लोक आपल्याला  तथाकथित साक्षात परमेश्वरानी   दिलेले (theocratic) विचार समजून एकाश्म (monolithic) आणि जुनाट प्राचीन - मध्ययुगीन विचारसरणी
(medieval belief) राबवतात.
इस्लामी मुलतत्ववाद (Islamic fundamentalism) ही काही किरकोळ समस्या नाही. ह्या समसेवर तोडगा काढण्या साठी त्याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. केवळ  अभिव्यक्ती स्वातंत्र्यचे प्रवचन करून चालणार नाही. असा कोणता मंत्र आहे की ज्यामुळे अतिरेकी प्रभावित होऊन हातात शास्त्र घेतात?
घरात, माद्रासात किंवा मस्जिद मध्ये होणाऱ्या लहान अजाण मुलांवरील तर्कहीन (irrational) धार्मिक मतरोपण (religious indoctrination) तत्काळ थांबवणे महत्वाचे आहे.  विवेक बुद्धी, तर्कशुद्ध विचार, चांगले - वाईट काय ह्यांची क्षमता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन देऊन मुलांची जोपासना केली पाहिजे. मला खात्रीपूर्वक वाटते की अतिरेक नष्ट करण्या करिता इस्लाम मध्ये अधुनीकरण आणि सुधारणा करण्याची गरज आहे.
                                                         तस्लिमा नसरीन

 अनुवाब पाल ह्यांनीतर चक्क अतिरेक्यांना उद्धेशून असे पत्र लिहिले आहे:

महोदय / मॅडम,

 संबंधितां करिता संबोधन
हे पत्र  पॅरीस  संबंधित नाही. किंवा / लंडन बद्धल नसून सिडनी किंवा कॅनड्याच्या विधानसभे विषयी देखील नाही.किंवा १४ वर्षापूर्वी घडलेल्या न्युयोर्कच्या ( x ११) गोष्टी बद्धल देखील नाही. [ हे गृहस्त मुंबईच्या २६ x ११ बद्धल  असावेत, असो] हे सारे तुझ्या संबंधित आहे.

मला अजूनही काळत नाही की आम्ही सारे (ह्या संपूर्ण ग्रहावरील + अब्ज ) तुला सौवीस्तार आणि किती वेळा समजावून सांगावे की --- हं की निरपराध लोकांना मारू नकोस. ते एखाद्या कॉफी किंवा चहाचा घोट घेत असतात, किंवा आपल्या बँकेत करीत असतात, किंवा नाईट क्लूब मध्ये नृत्य करीत असतात किंवा ताज सारख्या आलिशान हॉटेल मध्ये एखाद्या लग्न समारंभाची मजा लुटत असतात किंवा मौजेने एखादे  चित्र/ व्यंग चित्र रेखाटत असतात. ते  तुझे शत्रू  नसतात. तुमचे आणि त्यांचे काहीच देणे घेणे नाहीती निःशस्त्र माणसे आपापल्या वाटेने जात असतात. तू सांगतोस की तो त्यांच्यावर प्रहार करतोस कारण ते तुमच्या 'कार्या'च्या' , जे काय ते असेल ते असो, विरोध करतात. तुला स्वतःलाच ज्याची (कार्याची) कल्पना नसताना आणि तू ती जाणून घेण्याचा साधा प्रयत्न देखील कधी केला नाहीस  मग त्यांना तरी त्याची (तुझ्या कार्याचीकल्पना कशी  काय असणार?  

आणि खरोखर, मुळात शासन करणारे बुचकळ्यात आहेत आणि तुझे स्वतःचे नेते देखील जे तुम्हा लोकांना आत्मघाती मिशनवर पाठवतात. ( तू विचार की  तुमच्या त्या नेत्यांना, तुम्हाला असल्या मिशनवर पाठवून ते लोक स्वतः करतात तरी काय ?- बहुदा स्टार्स बरोबर नाचतात? आणि 'तुम्हाला ते तसल्या आत्मघाती मिशनवर वारंवार का पाठवतात? ' ह्याचा विचार देखील त्यांच्या मनात येतो का?)

 
निष्पाप लोकांकडे कोणते ध्येय असेल ते म्हणजे - मजा लुटणे, आपल्या कुटुंबां बरोबर व्यवस्तीत रहाणे, प्रेमात पडणे, पैसे करणे, ज्यात रस असेल आणि जे काही करत असतील त्यात व्यवसाय करून आपले करिअर बनवतात, दुसऱ्यांचा आदर करतात आणि दुसऱ्यांचा आदर प्रेम मिळवतात. अरे हं, आय फोन, जो आजकाल सर्वांना हवा असतो! केवळ तू सोडून कोणालाच त्या डोंगराळ भागात  x SUV मध्ये बसून क्षेपणास्त्रनी पाषाणावर भडिमार करायचे नसते, किंवा गुहेत लपायचे नसते. Neanderthal माणसाला देखील हे सारे रटाळ कंटाळवाणे वाटते. आणि हं, मजा लुटण्याची इच्छा ठेवणे ही कोणत्या देशावर अवलंबून नसते.
 हा काही पश्त्या विचार नव्हे. मी अश्या काही देशांत मेजवान्यात सहभाग घेतलाय ज्या  देशात दारूबंदी असून सुद्धा की त्या मेजवान्या  अधिक मास्तीपूर्ण रंजक असत, जश्या आपल्या सारख्या स्वतंत्र आणि लोकशाही देशात होत नसतील

इजिप्तअफगाणिस्तान, सिरिया, इराकची लोक दुखी असतात, सारखे रडत असतात आणि तेथे क्षणा क्षणाला दिवसभर बॉम्ब फुटतात असतात अशी पश्चिमेत कल्पना असते. पण वस्तुतः दिवसभर ते कबाब खात असतील, 'गोसीप' करत असतील - कोण कोणाबरोबर असतो, वगैरे, वगैरे  आणि 'बॉलिवूडच्यागाण्यांवर नाचतही असतील. वेळोवेळी, बॉम्ब फुटतात. कारण  परत तुम्ही लोक त्याला जबाबदार आहात. अरे, सर्वां प्रमाणे ते ही गांजले आहेत.

हे बघ अतिरेकी माणसा, आमच्या सुसंस्कृत दुनियेत बऱ्याच मूर्खपणाच्या गोष्टी आहेत (फेस बुक वर पहिल्या दहा बघितल्यास?) आणि त्यात तुमच्या मशीन गनचे  विघ्न नको. धन्यवाद.   

आणि बर का, तुमच्या कडे बंदूक आहे किंवा एखादा बॉम्ब. पण त्यांच्या कडे  काहीच नाही. आहे ते धान्याचे  पोत, लॅपटॉप,पेन्सील किंवा शाळेचे दप्तर. आणि तुम्ही म्हणता ही न्यायी लढत आहे. .' काही नामी कुविख्यात गुंड एका वृद्धेला म्हणतात, " तुझा  विरुद्ध आम्ही, तू एक महिला विरुद्ध आम्ही दहा पिळदार पुरुष. चला होऊन जाऊनद्या. खेळ सुरु!"  जेवढी  ही लढत न्यायी म्हणशील  एवढीच न्याही आहेरे तुमची लढत. तुम्हाला शत्रूवर हल्ला बोलायचाच असेल तर मग खऱ्या शत्रूशी लढाकी. सन्य उभेकारा आणि संन्याशी लढा. तुमच्या काश्निकाव (KALSHNIKOV) [ रशियन  बंदूक ] शत्रूच्या काश्निकाव सामना करामग पहा काय होते .उध्वस्त पडीक इमारतीत लपू नका आणि सुरक्षित घरात लपून छापून हल्ले नका करूनका मारू धन्य किंवा कोफी घेत असलेल्यांचे किंवा शाळेतील मुलांचे अपहरण करू नका. किंवा विमान उडवून 'stock  दलालाचे बिल्डींग नष्ट नका करूखरेदी करणे, मॉल मध्ये जाणे, शाळा - कॉलेजात जाणे ही सारी ह्यांची दिनचर्या असते.   त्यांच्या साठी हे सारे युद्ध नव्हे. ते तुम्हाला प्रतिउत्तर देऊ शकत नाहीत. ते आपल्या परीने जीवन जगतात, जागुद्या त्यांना. होय, खरोखर इतिहास  क्रूर आणि निर्दयी आहे आणि बरीच  निष्पाप मारली गेली. पण आता आमच्यात  माणुसकी जागृत झाली आहे.आता आमचे पुढारी म्हणतात युद्ध क्षेत्र पलीकडे आणि निष्पाप मंडळी ह्या इथ किल्यात.

"
तुम्ही जर त्या ३३ कोळ्यांना ठार केलेत तर ही लढाई मी जिंकेन " असे कोणताही लष्करी अधिकारी कधीही म्हणत नाही किंवा म्हणाला नाही. कित्येकदा, तुम्ही ह्या धर्मा विरुद्ध तो धर्म किंवा ह्या चाली -रिती विरुद्ध त्या , असे वाद घालत बसतात. मी सगळ्या धर्मांतील लोकांच्या मुलाखती घेतल्यात आणि खात्री केली आहे की कोणत्याही धर्माचे पवित्र शास्त्र किंवा धार्मिक ग्रंथ असे सांगित नाही की निष्पाप लोकांची किंवा भाबड्या मुलांची हत्या करा. कोणत्याही परिस्थितीत असे कृत्य मूर्खपणाचेच ठरते - भेकडपणाचे ठरते. हातात कलाश्निकोव घेऊन हस्त - छायाचित्रका  (Handycam) पुढे उभे राहून मोठ्या दिमाखाने बडाया मारत सांगणे की आम्ही अमुक अमुक अतिरेकी संघटनेचे सभासद आहोत, म्हणजे शौर्य नव्हे. तू शाळेत रहायला हवे होते आणि भाषेचे चांगले ज्ञान प्राप्त करायला हवे होतेस म्हणजे तुला नीट बोलता तरी आले असते. आणि तसे केले असतेस तर कदाचित नोकरी लागली असती आणि तुझा पूर्ण दिवस बॉम्ब बनवण्याच्या वेबसाईट शोधण्या साठी वाया घालवला नास्तास. काही व्यंग चित्रकार, हॉटेलमधले पाहुणे, शाळकरी मुले आणि काही खरेदी करण्यारांना मारलेस म्हणून तू वीर होत नाहीस. हे असेच चालत रहाणार. तुझे तू चालू ठेवणार आणि असे करता करता तू २० -२५ शी मरणार , किंवा पकडला जाणार किंवा गोळीचा शिकार होणार. तुझा फोटो दिवसभर टी. व्ही, दाखविला जाईल. पण बाकी सर्वजण आपापल्या मार्गाने पुढे जातील

खरे शौर्य आहे ते  परिस्थितीला तोंड देत , गुंतागुंत सोडवत शिस्तबध्द नागरिक बनून आयुष जगण्यात, म्हणून उपदेश, नव्हे एक सल्ला  -  सारे थांबव आणि नोकरीला लाग, ज्या ठिकाणी 'निर्वाण' मिळवण्या साठी   तुला सुपर मार्केट मध्ये जाऊन 'ब्रोकोली'' खरेदी करण्यांवर गोळीबार कर असे तुझे कोणतेही वरिष्ठ कदापि सांगणार नाहीत. . 
गांधीजींची काही पुस्तके वाच, मदत होईल
  अनुवाब पाल
Mumbai Mirror | Jan 14, 2015, 02.48 AM IST

आता हे पत्र वाचून जर काही दहशतवाद्यांचे र्हुदय परिवर्तन होणार असेल तर चांगलेच आहे. आणि तसे होत असेल तर ह्या पत्राची जगातील सर्व भाषांतरित पत्रके दारोदारी वाटायला हवीत.
 
 अनुवाब पाल लिहितात

" Dear terrorist, get a job. 

The real heroism is in life. And in living it, with all its complications, wonders, difficulties - civilly.

So just as a small word of advice - stop - get a job. Yes bosses are hard but none of them will tell you to run into a supermarket and shoot broccoli buyers as your gateway to eternal bliss. "
(Mumbai Mirror | Jan 14, 2015, 02.48 AM IST)


 पण जेंव्हा आपण बघतो की चांगली सुशिक्षित मुलं आपल्या नोकरी- धंद्याला लाथ मारून ह्या आत्मघाती आणि विध्वंसक प्रव्वृती कडे वळतात तेंव्हा काय म्हणालमग असे वाटणे स्वाभाविकच आहे की ह्या मुलांवर धार्मिक मतरोपण (religious indoctrination) करून त्यांचा बुद्धी - भ्रंश (brain - wash) केला जात असावा. आणि असे मतरोपण जर एखाद्या घरात, देवालयात, मस्जिद, मद्रसा , गुरुद्वार्रेत किंवा इतर कोठेही होत असेल तर ते त्वरित थांबविले पाहिजे. आणि तस्लिमा नसरीन म्हणतात त्या प्रमाणे, विवेक बुद्धी, तर्कशुद्ध विचार, चांगले - वाईट काय ह्यांची क्षमता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन  देऊन मुलांची जोपासना केली पाहिजे. पण मुलतत्ववाद (fundamentalism) इस्लाम पुरताच मर्यादित नाही. तसे असते तर पेरुमळ मुरुगण, ह्या प्रख्यात तमिळ लेखक, कवी आणि प्राध्यापकाने  असे लिहिले नसते :
“Perumal Murugan, the writer is dead. As he is no God, he is not going to resurrect himself. He also has no faith in rebirth. An ordinary teacher, he will live as P. Murugan. Leave him alone.” 
जरी  त्यांची 'मथोरुभगन' ही कादंबरी वर्षा पूर्वीच प्रकाशित झाली असली तरी  त्याचे इंग्रजीतले   रुपांतर (translation)  ‘One  Part Woman' प्रकाशित झाले आणि वादळ उठले. काही लोकांनी जातीय वाद आणून आक्षेप घेतला. ते सारे लोक कादंबरीचे भांडवल करून राजकारण करू पहात होते.त्या पुस्काच्या प्रती जाळण्यात आल्या. पेरुमलांवर दबाव आणला गेला, माफी मागण्यास भाग पडले आणि जिवंतपणीच त्यांच्यातील लेखक मेल्याचे घोषित करायला लागले
कादंबरीतल्या कथेचा सारांश असा आहे :
कोणा एका गावी (एक काल्पनिक कथा आहे असे समजून) काली आणि पुण्याई (इंग्लिश कादंबरीत  तीच नाव पुन्ना असे आहे) ह्या दोघांचे लग्न होऊन बारा वर्षे होतात तरीही त्यांना मुल झालेले नसते. मुल होण्या करिता ते भरपूर प्रय
त्न करतात. पण सारे प्रयत्न असफल ठरतात, मुल नसल्यामुळे त्यांना  लोक नावे ठेवतात, कुजके टोमणे मारतात, विशेषतः पुण्याईला ह्याची झळ जास्त लागे. अगदी नातेवाईक देखील तिला वांझोटी म्हणत. दोघांना फार त्रास होत होता
 दर वर्षी त्या गावाच्या अर्धनारी नटेश्वराच्या मंदिरात रथ सोहळा साजरा केला जाई. त्यावेळी मुल होण्या साठी देवाला नवस घेतले जात. हा उत्सव कित्येक दिवस चाले. पण त्यात एक रात्र फार महत्वाची. त्या रात्री विवाहित पती आणि  पत्नीला  एका रात्रीपुरते आपल्या पवित्र लग्न-बंधनातून मुक्त केले जाई. पतीस स्वमर्जीने कोणत्याही परस्त्री बरोबर तसेच त्याच्या पत्नीस स्वमर्जीने कोणत्याही परपुरुषा बरोबर अनैतिक संबंध ठेवण्याची मुभा असायची. ही वर्षानु वर्षे चालत असलेली एक प्रथा होती - एक परंपरा होती. ही रात्र काली पुण्याई ह्या दांपत्याचे सारे दुःख आणि सतत होणारी मानहानीचा अंत करणार होती, पण त्याच बरोबर त्यांच्या लग्नाची कसोटी ठरणार होती
 'One Part Woman' ह्यातील काही   हृदयस्पर्शी  उतारे  :
 A shadow fell on her face. She must have been thinking about how the tree had grown so lush and abundant in twelve years while not even a worm had crawled in her womb. Every wretched thing reminded her of that lack.After the wedding, she had fought with her father and had taken a cow from here. It delivered seven or eight calves, populating Kali’s barn with its offspring. She’d tear up just looking at that cow. She had once cried out loud, ‘I don’t have the boon that even this mute creature has been blessed with.’ Her tears filled him with rage against that cow and its calves. He felt like killing them all. But when he looked at their faces, he would melt: ‘Poor things. What can they do about our suffering?’
But, whenever he embraced her, succumbing to the tease, it occurred to him that it was not the same embrace as before. Earlier, there was an urgency and passion to get to know her anew each time. That had dried up now. Now even when he took his face close to hers, his mind started worrying, ‘Will it happen at least this time?’ That was enough to put out the fire, and only ashes bloomed in the embers of his passion. In an attempt to douse it all with water, he started going about it mechanically. ‘God, please bless us this time. Make it happen somehow,’ he kept repeating. It all went up in smoke.
During moments of intimacy, Ponna would ask, ‘Maama, are you planning to abandon me and marry another woman? Tell me.’
वरील उताऱ्यांचे भाषांतर करण्याचे मी मुद्दाम टाळले आहे. So that the essence of the story remains untouched and the reader can have his or her own emotional experience from it.

माझ्या सारख्या लहान (वयाने नव्हे ) माणसाला अजून समजत की ह्या कथेमुळे धर्म भ्रष्ट कसा होतो आणि स्त्रीची विटंबना कशी होते. जसे बऱ्याच लोकांनी त्यांना विरोध केला तसेच अनेक लोक भक्कमपणे त्यांच्या पाठीशीही उभे राहिले. तमिळ नाडू प्रगत लेखक आणि कलावंत संघटनेचे (The president of Tamil Nadu Progressive Writers’ and Artists’ Association) अध्यक्ष, श्री. . तामिळसेल्वन ह्यांनी एक  PILयाचिका नायालयात सादर केली आहे. मुख्य नायादिश श्री. संजय किशन कौल नायादिश  श्री सुन्द्रेश ह्यांच्या   खंडपीठाने ही याचिका अधिक विस्तारित अधिक व्यापक करण्याचे आदेश दिले, जेणे करून 'अभिव्यक्तिस्वातंत्र्यचा' (Freedom of expression) मुद्दा सामावला जाईल आणि मुलाबूत हक्कांवर होणारे आक्रमण ह्याचा मुद्दाही समाविष्ट होईल. समाजात वारंवार होणाऱ्या मुलभूत हक्कांचा भंगा बद्धल त्यांनी खेद, नाराजी 
  काळजी व्यक्त केली. सरकारी आणि बिनसरकारी गटांना एका समांतर कोर्टा प्रमाणे   (Extra- judicial court) अशा रीतीने उचित काय आणि काय नाही ह्याचा नायानिवाडा करून एखाद्याला  दोषी ठरवणे हे  अवैद बेकायदेशीर आहे असे सांगून नामक्काल मधील अधिकाऱ्यांची कानउघाडणी केलीशांतता सभे बद्धल नापसंती व्यक्त करत सांगितले की पुस्तका संबंधी  किंवा लेखका बद्धल कोणाला काही तक्रारी असतील तर नायालायाचा दरवाजा ठोठावा पण वैर कानुनी मार्गाने तोडगा काढू नये.
आपल्या देशाच्या नाय व्यवस्थेवर माझा संपूर्ण विश्वास आहे आणि जरी 'Arm of moral universe may be very long' खरे असले तरी 'but it bends toward justice' हेही खरे आहे. आणि सर्व भटकलेल्या व्यक्ती आज उद्या मूळ प्रवाहात परत येतील ह्या आशेवर मी येथे थांबत आहे.

                                                        विनय त्रिलोकेकर

    

2 comments:

  1. Comments:
    1. Ronica Vijayakar: Well written vinay kaka. Thought provoking. I just can't understand why people can't live and let live.the world would have been such a peaceful place if people followed this simple principle.but as the saying goes if wishes were horses beggars would ride them.
    January 31 at 6:26pm • Unlike •
    2. Reshma Rane And the fact is all the Religions preach Love ,Humanity and Brotherhood.....
    January 31 at 7:12pm • Unlike • 1

    3. Nikolai Kirtikar I agree and even today the children have same lovable feelings about their classmates irrespective of caste and creed. It is only when a person grows up and is frustrated with his career, life, etc. he starts being extremist and starts blaming everythi...See More
    February 1 at 9:42pm • Unlike • 1
    4. Anil Rao Excellent views expressed.I fully agree to what is said,when we went to Jesuit School, there was no compulsion of conversion,non-catholics were allowed to take moral science as subject instead of catholicsam.All students from different communities play...See More
    February 1 at 10:59pm • Unlike • 3
    5. Nikolai Kirtikar I also studied in a missionary school and in fact even when I wanted to take French as 3rd language instead of Marathi they refused it saying that Marathi was my mother tongue and I cannot take another language...............
    February 1 at 11:05pm • Like
    6. Kiran Kothare निकोलाय, तुझ्या बहुतेक मुद्द्यांशी मी पुर्णपणे सहमत आहे. संयम, सहनशीलता आणि सोशिक पणा ह्याचे बाळकडू आपल्याला मुळात आपल्या जन्मदात्यां कडून, मुख्यत्वे मातेकडूनच मिळते. हिंदुस्थानात जन्मलेल्या आपल्या पिढीला ते स्वाभाविक प्राप्त झाले आहे. परंतु हेही तितके...See More
    February 2 at 10:13am • Like

    7. Sundeep Dhurandhar ' - मुळात स्वतःचाच धर्म काय आहे हेच मुळात बऱ्याच जणांना माहित नसते. मग ते दुसऱ्यांच्या धर्मांचा अभ्यास कसे करतील ? - ' well said Vinay Trilokekar
    February 2 at 2:50pm • Unlike • 1

    8. Vinay Trilokekar Thanks all of you. Now you can read 'परिणाम - असोशिकतेचा!' My blog link: htpp//vinaytrilokekar.blog.spot.in
    ReplyDelete

    ReplyDelete
  2. This is a post from my friend Trasssi D'souza:
    Trassi D'Souza shared International Christian Concern's photo.
    10 hrs •
    'Last Words of A Martyr: ‘Let me Die for My God’ Hindu extremists came to the house of Pastor Samuel Naik in Orissa, India and beat him severely. The radical group then poured kerosene all over Pastor Naik’s body, dragged him and his wife outside, and gave him a frightening ultimatum: “If you leave your God, we’ll leave you alone. Or else, you’ll be killed right now.” The pastor then earnestly replied, “I have invested so much of my time to win many souls for God. Now if I deny God, all my work will be in vain. So let me die for my God.” Pastor Naik’s final request was to ask the Hindu extremists to give him his Bible. After they handed him his Bible, he cried, “God, these people don’t know what they are doing! Please forgive them and take my life.” The Hindu radicals immediately swung the blade of the axe, and the body of the pastor fell to the ground. The martyr’s wife clung to the body of her husband. She pleased with the radicals to leave her husband’s body in order to bury him properly. They began to beat her too but Mrs. Naik escaped. The extremists set the house of fire and found Pastor Naik’s mother hiding nearby and brutally threw her into the flames that engulfed the house, where she burned to death. Pastor Niak is survived by his widow and son. Photo for illustrative purposes. –Excerpt from “Last Words of the Martyrs” by Jeff King and ICC Staff'
    International Christian Concern

    Last Words of A Martyr: ‘Let me Die for My God’

    Hindu extremists came to the house of Pastor Samuel Naik in Orissa, India and beat him severely. The radical group then poured kerosene all over Pastor Naik’s body, dragged him and his wife outside, and gave him a frightening ultimatum: “If you leave your God, we’ll leave you alone. Or else, you’ll be killed right now.” The pastor then earnestly replied, “I have invested so much of my time to win many souls for God. Now if I deny God, all my work will be in vain. So let me die for my God.”

    Pastor Naik’s final request was to ask the Hindu extremists to give him his Bible. After they handed him his Bible, he cried, “God, these people don’t know what they are doing! Please forgive them and take my life.” The Hindu radicals immediately swung the blade of the axe, and the body of the pastor fell to the ground. The martyr’s wife clung to the body of her husband. She pleased with the radicals to leave her husband’s body in order to bury him properly. They began to beat her too but Mrs. Naik escaped. The extremists set the house of fire and found Pastor Naik’s mother hiding nearby and brutally threw her into the flames that engulfed the house, where she burned to death. Pastor Niak is survived by his widow and son. Photo for illustrative purposes. –Excerpt from “Last Words of the Martyrs” by Jeff King and ICC Staff

    ReplyDelete