मुंगी - एक नवलाव
असे मानले जाते की मुक्ताबाईंच्या अभंगातील रत्न- शिरोमणी (jewel) म्हणजे तिला झालेल्या आत्मसाक्षात्काराचे वर्णन करणारा हा अभंग होय:
मुंगी उडाली आकाशीं l
तिणें गिळिलें सूर्याशीं ll१ll
थोर नवलाव जांला l
वांझे पुत्र प्रसवला ll२ll
विंचू पाताळाशी जाय l
शेष माथां वंदी पाय ll३ll
माशी व्याली घार झाली l
देखोनी मुक्ताई हांसली ll४ll
आपल्या मुंगी रुपी जीवात्मा आणि त्यात होणार प्रचंड शक्तिशाली बदल - सूर्यशक्ती स्वतःत असल्याचा आत्मसाक्षात्कार! ह्या अभंगाच्या पहिल्या कडव्यांच्या पहिल्याच ओळीत मुंगीचे आकाशात उडून चक्क सूर्यास गिळणे म्हणजे मुक्ताईला स्वतःस होणाऱ्या आश्चर्यकारक पण सुखद अनुभवाचे सुंदर वर्णन आहे.
भले मुंगी आकाशात उडत नसेल पण मुंगी हा लहान जीव बऱ्याच भराऱ्या मारतो - मुंगी, एक छोटासा कीटक, ह्या सृष्टीतील खरोखर एक नवलाव (marvel) - एक मोठे आश्चर्य आहे.
जगात मुंग्यांच्या जवळ जवळ १२००० जाती (species) आहेत आणि त्या जातींचे अनेक मूलस्थान (habitat) आहेत. त्या सर्वांचे वजन (biomass) जगातील सर्व पृष्ठवंशी (vertebrates) प्राण्यांच्या एकत्रित वजन पेक्षा अधिक आहे, असे मानले जाते. बऱ्याच सजीव सृष्टी - पारियावरण रचनाबद्ध प्रणालींच्या (ants are central players in many ecosystems), विशेषतः शेतकी क्षेत्रात, मुंग्या अग्रभागी आहेत.
मुंग्या ह्या पृथ्वीवरील प्राथमिक आणि मूळ शेतकरी समजल्या जातात. असे असून
देखील, शालेय / महाविद्यालयीन पुस्तकात पारियावरणशास्त्राच्या अध्यायात
मुंग्यांचा ओझरताच उल्लेख जाणवतो. मुंग्यांकडे विज्ञान शास्त्रात असे
दुर्लक्ष एक मोठी उणीव आहे आणि ती उणीव भरून काढण्याची गरज आहे.
आपण
मानव अत्यंत बेपर्वाईने वागून ह्या पारियावरण शास्त्रातील महत्वाच्या आणि
अत्यावश्यक घटक असलेल्या मुंग्यांना अनेकदा पायाखाली चिरडतो. आपण मानव
प्राणी ह्या जगात येण्यापूर्वी मुंग्या अस्तित्वात होत्या, १४५ लक्षावधी
वर्षा पूर्वी आणि डाइनसॉर (dinosaur) ह्या प्रचंड प्राण्यांच्या नायनाट
(annihilation) झाला त्या घटनेचे मुंग्या साक्षी आहेत.मुळात उत्पत्तीपासूनच मुंग्यांची उत्कांति (evolution ) होत गेली प्राणी- पारियावरण प्रणालीत आपले प्राबल्य / वर्चस्व वाढवले. मुंग्यांच्या संयोगक्षमते (adaptability) त्यांनी जगातील कानाकोपऱ्यात आपले मूलस्थान (habitat) केले आहे - जंगलात आपली वसाहती (colonized forest canopies) करणे, जमीन पोखरून भूमी खाली आपली वसाहत निर्माण करणे, जमीन पोखरून त्यावर वारुळे बनवणे, सुकलेल्या झाड-बुंद्यात आपले घर करणे आणि पहाडी उंचीची बर्फीली थिंडी असो किंवा वाळवंटातील उष्मा असो - सारे सहन करीत आपली पुढील वाटचाल चालूच ठेवत असतात. आणि म्हणूच ह्या कीटकाला 'सुपर ऑर्गॅनिसम' असे इ. ओ. विल्सन आणि बार्ट हॉलडॉब्लर (Pulitzer Prize Winners) ह्यांनी आपल्या त्याच नावाच्या पुस्तकात म्हंटले आहे. त्या पुस्तकात त्यांनी मुंग्यांच्या एकमेकात कामांची करत असलेली वाटप आणि एकमेकात होणारे संपर्क ह्या सर्वांचे चित्रे, उदाहरण वगैरे देऊन सविस्तर आणि अप्रतिम वर्णन केले आहे.
आपण सुरवात करूया मुंग्यांच्या राणी (queen) पासून. मादी - राणीचे मुख्य कार्य म्हणजे नराच्या (male drone) साह्याने 'उत्पत्ती' घडवणे. नराचे कार्य तेवढ्यापुरते मर्यादित असते. आणि वीणेचे कार्य (mating) पूर्ण होताच नराचा मृत्यू होतो. नंतर मादी आपली अंडी घालण्यासाठी योग्य जागेचा शोध घेते आणि तशी जागा सापडताच आपली अंडी घालते. मुंग्यांची वसाहत घडवण्यात मादीचा मोठा वाटा असतो. अंडी उबवल्यावर आतून लहान-लहान काळ्या (larvae) बाहेर येतात. बाहेर पाडण्याऱ्या पहिल्या अळ्यांच्या तुकडीचा , म्हणजे बॅचचा सांभाळ ती राणी स्वतःच करते. ह्या कळ्यांचे नंतर कोशात (pupa). त्यानंतर कोष फोडून बाहेर येतात कामगार (workers), ज्यांचे कामा प्रमाणे वर्गीकरण होते. आणि ते संपूर्ण वसंहिताचे दायित्त्व घेत सारे 'division of labour' ह्या तत्वावर कामे करू लागतात - अन्न व इतर साहित्य गोळा करणारे फॉरेंजर्स (foragers), अन्नाचा पुरवठा करणारे फीडर्स (feeders),इत्यादी. ही सारी कामे व्यवस्तीत पार पाडण्यासाठी आपापसात संपर्क असणे गरजेचे असते आणि ते रासायनिकरित्या देवाण-घेवाण करितात. मुंगी आपले संवेदनाग्र (antennae ) दुसरीच्या संवेदनाग्रावर घासते अथवा स्पर्श करते. ह्या संवेदनाग्रातून निघणाऱ्या रासायनिक द्रवांची (त्यांना pheromones असे म्हणतात) देवाण-घेवाण होते. ह्या द्रवाचे उगमस्थान त्या -त्या वसाहताची राणी असते आणि त्यामुळेच त्या संपूर्ण वसाहतीत एक विशिष्ट गंध दरवळत असतो आणि त्यामुळेच आपल्या सवंगड्यांची ओळख पटत असते. ह्या फेरोमोनच्या साह्याने आपल्यातील मृत्यू पावलेल्या सवंगड्यांचे मृत देह शोधून नंतर ते दूर करून वसाहतीचे आरोग्यशास्त्र ठेवले जाते. हे सारे फार गुंतागुंतीचे आहे आणि त्यावर अजून संशोधन होत आहे.
मुंग्यांची वर्तणूक कित्येक वेळा सुरस, मजेदार, मनोरंजक तर कधी-कधी चित्तवेधक असते. काही मुंग्या, विशेषतः हारपेग्नंथॉस (Harpegnathos) जातीच्या मुंग्या चक्क उड्या पटाईत असतात, काही मुंग्या जायबंदी/ पकडल्या गेल्यावर मेल्याचे नाटक करतात आणि धक्का देणारी बाब आहे ती हिमालयातील फॉर्मायका (Formica) मुंग्या इतर वसाहतीत जाऊन तेथील कामगार मुंग्यांना काबीज करून त्यांना ताब्यात आणून, वळण आणि काम करण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना गुलाम बनवतात.
मुंग्यांचे सामान्यपणे असे वर्गीकरण केले जाते:
आणि ह्या डोमासिआ डोलाऱ्यांचा मुंग्या आपले घरटे म्हणून उपयोग करतात. झाडांना फळं आल्यावर, मुंग्या फळांतील गर खाऊन बिया वेचतात आणि बिया पेरणे- झाडे वाढवणे फळांचा आहार करणे - हे संपूर्ण चक्र चालू राहाते.
हे फिलिड्रिस नागासाऊ मुंग्या आणि स्काऊमेल्लारिया झाडें ह्यांच्यातील सहजीवनचे एक उदाहरण होय. हेच नव्हे का परिश्रमांचे फळ?
पडल्याचं तर किंवा जाणून बुजून स्वतःला खाली झोकून दिल्यास म्हणा, आपली पडण्याची दिशाचे नियंत्रण करून अलगद खाली जमिनीवर वा खालील फांदीवर येऊ शकतात. अशा रीतीने वरच्या फांदीवरून खालील फांदीवर जाण्यास त्यांना त्याचा चांगला फायदा होतो. आपल्या काळ्या पासून निघणाऱ्या रेशमी धाग्यांने मुंग्या पानांचे विणून असामान्य घरटी बनवतात. सहजीवन साधण्याचे ह्या मुंग्या म्हणजे एक उत्तम उदाहरण होय! अखंडता, ऐक्य, चिकाटी आणि लढाऊ वृत्ती ह्यांचा फायदा मुंग्यांचं नाही तर यजमान झाडांना व शेतकऱ्यांना होतो. एखादे श्वापद किंवा आपले भक्ष जवळ येताच मुंगी त्यास चावते आणि त्यावर फॉर्मिक आम्लचा (formic acid) फवारा मारून त्याला जायबंदी करते.
म्हणून यजमान झाडांना फायदा होतो आणि ज्यामुळे ही झाडांची वाढ चांगली होऊन सशक्त आणि निरोगी फळ प्राप्ती होते. ह्या मुंग्या (झाडांत घरटे आणि आपले खाद्य) आणि ही झाडें (हानिकारक जीवजंतू पासून संरक्षणात) ह्यांच्यातील सहजीवनचे (symbiotic existence) एक उदाहरण होय.
ह्या जातीच्या मुंग्याच्या प्रामुख्याने ऑकोफाईल (Oecophylla) विणकर मुंग्या होत. ह्या लाल मुंग्या आंबा, पेरू आणि संत्री- मोसंबींच्या झाडावर आढळतात. ऑकोफाईल मुंग्यांतले वर्कर्स लहान (minor workers) ४ ते ५ मी.मी. लांबीचे तर मोठे कामगार मुंग्या (major workers) दुप्पट लांबीचे, म्हणजे ८ ते १० मी.मी. लांबीचे असतात. मोठांचे काम असते धाडी टाकणे, बचाव करणे, नवीन घाटी बनवणे, वसाहतीची देखरेख तसेच वसाहत वाढवणे. एखादे खाद्य - मग तो मेलेला मोठा कोळी किंवा लहान कीटक असो, अतिशय परिश्रम घेऊन वाटेतील अनेक अडथळे पार करून ही कामगार मंडळी वर झाडाच्या टोकावर असलेल्या घरट्यात नेत असतात. तर लहान वर्कर मुंग्या वसाहतीत राहून अळ्यांना खाद्य देणे आणि त्यांच्या इतर गरज भागवणे.
ह्या मुंग्या आपली घरटी मातीने किंवा मातीत न बनवता पाने विणून तयार करतात. त्यांची पानांची घरटी विणण्याची कला मजेदार व मनोरंजक असते. मुंग्या हाताच्या पंज्या पेक्षा रुंद असलेली चार पाने आपल्या हजारो सवंगड्यांच्या मदतीने वाकून पाने एकमेकांना चिकटवून ठेवतात त्याच बरोबर मुंग्यांची दुसरी टोळी अळ्यांमधून निघणाऱ्या चिक्कट रेशमी द्रवाने पाने जोडून घरटी तयार करतात.
त्यांची ही घरटी म्हणजे वास्तुशास्त्रातील उत्तम नमुने होत. जोडण्यारी पानांत फार अंतर असलेच तर मुंग्या एकमेकांच्या कंबरेवर (thorax) किंवा डोक्यावर (head) 'गोविंदा ' प्रमाणे चढून ती पानें ओढून एकमेका जवळ आणून चिकटवतात. आवश्यक असलेल्या कळ्या (larvae) आपल्या जबड्यात (mandible) हुळूवर पकडून नियोजित स्थळी आणण्याची व्यवस्था खुबीने करतात. अशा रीतीने कळ्यांची हळुवार नेआण मजेदार वाटते.
३] पान -कापणाऱ्या मुंग्या (Leaf - Cutters Ants): ह्या मुंग्यांना प्रारंभिक किंवा 'अंतिम सुपर ऑर्गॅनिसम' (the ultimate super organism) असे इ. ओ. विल्सन आणि बार्ट हॉलडॉब्लर म्हंटले आहे. शेतीप्रधान /कृषिप्रधान मानवाचा जन्म १०,००० वषापूर्व झाला. हे मानवाचे फार मोठे परिवर्तन होते. वेचण्याचे दिवस आणि शिकारी / पारधी जीवन सोडून शेती करू लागला. पण ह्या मुंग्यांना शेतीचे ज्ञान त्या पूर्वीच म्हणजे ५० ते ६० लक्ष वर्षा पासून अवगत होते. ह्या मुंग्या पाने अक्षरशः कापून आपल्या घरट्यात आणतात. आणि पानांचे तुकडे तेथे गाडतात, त्यावर आपली विष्ठा (faeces) आणि बुरशी (fungus) पिकवतात. बुरशीची झपाट्याने वाढ होऊ लागते ( rapid proliferation of the fungii).बुरशी हे ह्या मुंग्यांचे खाद्य आणि त्या पासून त्यांना जीवन आवश्यक असलेले प्रथिन (proteins), स्टार्च व कार्बोहाड्रेट्स (starch & carbohydrates) मिळतात. बुरशीच्या असलेले जंतूं पासून (pathogens) मुंग्यांना कोणतीच बाधा होत नाही. असे म्हंटले जाते की वर्षा काठी प्रत्येक वसाहती मागे ८५ ते ४७० की.ग्रा. बुरशीची लागवड होत असते.
अजून भरपूर जातीच्या (species) मुंग्या आहेत. पण खालील दोन जाती उल्लेखनीय वाटतात. पहिली अग्नी मुंगी (Fire Ant) आणि दुसरी सुतार मुंगी (Carpenter Ant).
अग्नी मुंग्या (Fire Ants) आपली घरटी जमिनीत करतात जिथे ओलावा असतो जसे नदीकिनारी, तलावाकाठी, ओलसर हिरवळ (lawn), झाडांचे बुंदे, ओलसर विटा आणि खडक व धोंडे-दगड. मात्र घरट्यांसाठी असे आच्छादन नसल्यास, मुंग्या घुमटाच्या आकाराचे वारूळ तयार करतात. जी आपल्याला मोकळ्या जागी आढळतात जसे उद्याने व गार्डन. ह्या मुंग्या अति आक्रमक असतात. आणि दुसऱ्या जातीच्या मुंग्यांना दूर पिटाळून लावतात. लहान जनावरांवर हाला करून त्यांना ठार मारतात. त्या केवळ भक्ष्यावर पक्कड मिळवण्यासाठी आपल्या जबड्याने चावा घेतात. आणि दौंष करून त्याच्या शरीरात सोलेनॉप्सिन (Solenopsin) विषारी अल्कोलाईड (alkoloid) त्या जीवजंतू , किंवा श्वापदाच्या शरीरात टोचून भरतात आणि त्याला मारून टाकतात.
अग्नी मुंग्या अत्यंत जहाल व बिकट परिस्थितीत राहू आणि जगू शकतात. त्या निष्क्रियता स्थितीत मध्ये किंवा हाईबार्नेशन (hibernation) मध्ये जात नाहीत आणि तरीही कडाक्याच्या थंडीत जगू शकतात. पण अशा थंडीत ८० ते ९०% त्यांची जमात नष्ट होत असते. अति थंडी किंवा अति उष्मा, ऊन -पाऊस, पूर वा दुष्काळ असो, सर्व परिस्थितीत ह्या मुंग्यांचा लवचीकपणा आणि स्थितिस्थापकत्व दिसून येतो.
पण स्वतःचा बचाव करण्याचे ह्या मुंग्यांचे चातुर्य वाखाणण्याजोगी आहे. उष्णदेशीय वादळमुळे सखल भागांत पाणी साठते. आपल्या संवेदनशील प्रकृतीमुळे त्यांना वातावरणांत होणाऱ्या बदलांची सतत जाणीव होत असते. पाणी साचल्याची जाणीव होते. अशा वेळी अग्नी मुंग्या गवतांच्या पानांवर चडून राहतात आणि पाण्याची पातळी अधिक वाढते तेंव्हा एकमेकांना जोडतात. अग्नी मुंग्या एकमेकांचे पाय व जबडे (mandibles) घट्ट पकडून जाळे तयार करतात, त्यांत एखादी हवेची पोकळी तयार होते आणि जणू एक जिवंत तराफा ( a living raft) पाण्यांत तरुंगु लागतो. घरट्यात फसलेल्या इतर लहान लहान बछड्याना आणि कळ्यांना ह्या तरंगत्या तराफ्यावर आणले जाते. अशा अवस्थेत राहून मुंग्या बराच काळ(कित्येक महिने) राहू शकतात. ह्या तराफ्याच्या मध्य भागी असते राणी मुंगी. हा तराफा तयार करण्यास मुंग्या फार वेळ घेत नाहीत तर काही मिनिटात तयार करतात, - दोन मिनिटांच्या आत असे प्रोफेसर विलियम मक्काय (Willium MacKay, Professor in the department of Biological Science, University of Texas) म्हणतात.
अशा रितेने साऱ्या मुंग्या एकाच प्राण्याचे (single animal) अवयव (organs) असल्या सारखी बनून वेगवेगळी कामे पार पडतात. माणूस पोहत असताना आपले डोके वर करून पाण्याच्या पृष्ठभागा बाहेर कसे ठेवायची धडपड करतो आणि अशा वेळी एखाद्याने पकडले तर ते त्याला खचित चालेल. पण अग्नी मुंग्यांचे वागणे असते अगदी उलट आणि एकमेकांना जोडून आपला बचाव करतात. मुंग्यांच्या अशा तराफा करून 'समूहात राहण्याची वर्तणूक' (pack - behavior) आणि लहान मास्यांची समन्वित हालचाली (coordinated action) करून एकाच दिशेने जात (schooling) एक भाला मोठा मासा असल्याचा आभास निर्माण करून आपल्यावर हल्ला करणाऱ्यांना पळवून लावणे ह्यांत साम्य वाटते.
सुतार मुंग्या (Carpenter ants): ह्या मुंग्या आपली घरटी ओले अथवा मेलेले लाकूड आपल्या जबड्याच्या (mandibles ) मदतीने लाकूड कुरतडून (लाकूड खात / भक्षण करीत नाहीत) त्यात सज्जा निर्माण करतात आणि त्याततच असतात त्यांची घरटी. तसेच ह्या मुंग्या झाडांत पोकळी करून किंवा जुनी लाकडी इमारती पोखरून ती व्यापतात. अशा रीतीने इमारती मध्ये ,
इमारती बाहेर, आणि जंगलात आपली घरटी करतात आणि त्यांचा उपद्रव मोठ्या
प्रमाणात जाणवतो. मूळ किंवा पालक घरापासून अनेक भोगदे (tunnels) करून बरीच
घरटी तयार करतात, बोगद्यांचे जाळेच असते. साधारणपणे मुंग्यांची लांबी 0.७५ से.मी. ते २.५४ से.मी. इतकी असते.
लाकूड हे त्यांचे खाणे नाही. त्या लाकूड केवळ घरटी, फाटे, भोंगाडे, सज्जा,
वगैरे बनवण्या करीत कुरतडतातआणि म्हणूनच घरट्यांबाहेर लाकडी भुसा आढळतो.
ह्याच उलट पांढऱ्या मुंग्या (ज्या मुंग्याच नाहीत) किंवा वाळवी (termites),
ज्या अक्षरशः लाकडाचे सेवन करतात कारण टर्माइट काष्ठतंतूचे (cellulose)
पचन करू शकतात. सुतार मुंग्यां आपले भक्ष्य वेचतात (forage) आणि बहुदा
रात्री. त्या मेलेल्या कीटकांचे भाग किंवा कीटकांपासून मिळणारे मध
(honey), मकरंद (nectar), इत्यादी. त्यांचे भक्ष्य वेचणे व्यक्तिगतरीत्या
किंवा सामुदायिकपणे असते.
पांढऱ्या मुंग्या? हे पंख असलेले कीटक मुंग्याच नसतात. [वरील चित्रात] वाळवी (termites) ओले लाकूड खातात आणि ते देखील दिवसाच्या २४ तास,आठवड्याचे ७ दिवस आणि वर्षाचे ३६५ दिवस! म्हणूनच त्यांना मूक-विनाशकारी (silent destroyer) असे म्हणतात. असे संशोधक म्हणतात की जगातील सर्व वाळवींचे एकूण वजन हे जगातील सर्व माणसांचे एकूण वजनापेक्षा कित्येक पटीने अधिक असते. अनुरूप आणि योग्य घरट्या साठी जागा मिळताच त्यांची पंख गळून पडतात. त्यांच्या २००० जाती आहेत. दर वर्षाकाठी जगात मालमतेचे $५ अब्जाहुन (5 $ billion) अधिक नुकसान होत असते.वाळवी सारखेच दुसरे कीटक असतात अनेक जातीचे बोरर कीटक [खालील चित्रात] आणि सारे मिळून लाकडांचे अर्थात आपल्या मौल्यवान फर्निचरचे नुकसान करतात.
मुंग्यांबद्धल अजून बरेच लिहता येईल. पण आज येथेच थांबत आहे.विनय त्रिलोकेकर
No comments:
Post a Comment