मिस इंडिया २० ० ९ -पूजा चोप्राच्या आईची गोष्ट 

(नीरा चोप्रा -  एक आत्मकथा   - खास मराठी वाचकांसाठी)
मनोगत 

  • लहान कुटुंब - सुखी कुटुंब :
अशोकला दुसरीही मुलगीच झाली. पण त्याला मुली होण्याचा अजिबात खेद वा दुख नव्हते. त्याला दोनच मुले हवी होती - मग ती मुलगा असो की मुलगी. दोन्ही मुलींचे चांगले संगोपन करायचे होते, त्यांना चांगले शिक्षण देणे आणि त्यांच्या सर्व मुलभूत गरजा पुरविणे हेच ध्येय. दोघीही चांगल्या शिकल्या आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. मोठीचे लग्न होऊन ती सुखात आहे. अशोकला आपल्या मुलींचे यश, हुशारी, आणि सुख पाहून आनंद व समाधान वाटते. अशोकचे लहान कुटुंब आज अतिशय सुखात आहे

सुरेशला एका पाठोपा. एक अशा ४-५ वर्षात चार मुली झाल्या. आपल्याला मुलगा होईल ह्या आशेवर तो होता. सर्वात धाकटी चार वर्षाची झाली तर मोठी ९ वर्ष्याची असावी. पण एकाही मुलीला शाळेत घातले नव्हते. अजून आपल्याला मुलगा होईल असे त्याला वाटत होते, तसे त्याला कोणा ज्योतिषाने सांगितलेही होते. देवीला नवसही केला, हे त्याने चारही वेळेस हे सारे  केले होते पण त्याला विसर पडला असावा. पाचवी झाली मुलगीच. अशोक आणि सुरेश एकाच कंपनीत कामाला, सुरेशचा पगार अशोकहून कितीतरी पट जास्त. पण सुरेश आज कर्ज बाजारी, दारिद्र्यात पार बुडालेला. एकही मुलगी शिकली नाही. घरातच असतात बिचाऱ्या!
  • मुलींना शिक्षण देणे अत्यावश्यक :  
 मी एका  मुलीच्या शिकवणी करिता वाळकेश्वरला जायचो. विद्या   माझ्याकडे इंग्रजी, गणित व विज्ञान शिकायची. ती S. S. C. झाली, कॉलेजात जाऊ लागली. पण माझी  ट्युशन चालूच होती. आता मात्र मी फक्त इंग्रजीच  शिकवत होतो. " सर, खालच्या मजल्यावर राहणारी माझी मैत्रीण, कैलाश, तुम्हाला माहितच आहे."
"बोल तिचे काय झाले?" मी शिकवत असताना ती येऊन बाजूला बसत असे. साधारण तिच्याच वयाची, १-२ वर्ष इकडे तिकडे
"माझ्याच बरोबर इंटर आर्ट्सला  आहे. शाळा केली गुजराती मिडीयम मधून आणि आता थोडे जड जाते कॉलेज मध्ये. तिला तुम्ही शिकवाल का? पण ती येथे येणार नाही, तुम्हाला तिच्या घरी ---"  
" But you have to meet the girl's father taking your wife along with you. They are 'Jain Gujarati' and they are very orthodox and very conservative. So your going alone there may not help. They were very reluctant to have their daughter tutored by a male. It was only after much deliberation and coaxing from his son and son's wife that the girl's, Kailash's father has finally agreed to meet you for her tuitions,"  विद्याच्या वडिलांनी मला सांगितले. 
दुसऱ्या दिवशी ठरल्या प्रमाणे आम्ही दोघे कैलाशच्या घरी गेलो. कैलाशचे वडील, तिचा भाऊ , भाभी, व आई सारे होते. काही आडे वेढे न घेता शिकवणीचे ठरले. मात्र शिकवणी फक्त  ७. ३ ० पर्यंत. वडिलांना ते धंद्या वरून घरी येत तेंव्हा कोणही पर पुरुष आपल्या घरात असलेला आवडत नसे. मी शिकवू लागलो. दोन वर्ष गेली. कैलाश BA  झाली. विद्या पण BA झाली. आता फक्त कैलाशच्या ' इंग्रजी संभाषणा' साठी मला ठेवले. कैलाश  इंग्रजीत चांगली बोलू लागली होती. मी तिला शिकवून तिच्या भावाशी ' hi - hello' करून निघत असे. कैलाश व तिचा भाऊ ह्यांच्या खेरीज मी कोणाशीच बोलत नसे. आणि मग एके दिवशी, घरात कैलाशचा भाऊ आणि भाभी च घरात होते आणि माझी शिकवणी संपल्यावर तिची भाभी माझ्या बरोबर चक्क इंग्लिश मध्ये बोलू लागली, " It was me, who insisted that Kailash should study, go to college and most importantly learn to speak in English. That would make her confident. She should not suffer the same fate as did her elder sister, after her marraige. How she silently suffered, tolerating all the abuse from her in-laws, oh yes, she faced a lot till her death, they said it was an accident but they killed her - burnt her alive. She had studied only up to seventh and that too in Gujarati. So I told my husband that it was his responsibility to educate his younger sister, she should also learn conversational English, complete her graduation and then and then only think of her marraige." 

आज कैलाशचे लग्न होऊन तिच्या नवऱ्या बरोबर अहमदाबाद मध्ये सुखाने नांदते. तिला दोन मुलेही आहेत आणि त्यांच्या अभ्यासाकडे ती जातीने लक्ष घालते.
  • मुलगाच हवा, म्हणे वंश चालवण्यास ; मुलगी का नको?                                                              
माझा मित्र मला तावातावाने ओरडून सांगत होता, " तो आपला विठ्या, मला त्याला मित्र म्हणण्यासही शरम वाटते. मला त्याची कीव येते. सा@#$ चे काय विचार!  बुरसटलेले ---मागासलेले ! खरोखर लाज वाटते!"
"अरे, झाले तरी काय? विठ्ठलने  असे केले काय?" मी विचारले. 
 " मला विचारतो,'तुला एकच नात ना? ९- १ ० वर्षाची असेल? मुलाला सांगकी आता तुला एक नातू दे . कुल - दीपक नको का?- तुझा वंश वाढणार कसा?' अजून तो मागासलेलाच! हीच माणसे आपल्या गरोदर बायका/ सुनांना सोनोग्राफी करण्या साठी धाव घेतात, सेक्स डीटरमीनेशन चाचणी करतात. गर्भात मुलगा असेल तर ठीक, नाहीतर चक्क गर्भपात. सारे हिडीस! मुलगा काय आणि मुलगी काय   ---- पण ह्यांना मुलगी का नको? अशा रीतीने झाले वाटते विठ्याला तीन मुलगे आणि चार नातू? "


मनात आलेले वरील विचार आणि नंतर कोठेतरी वाचली 'The Story Of Pooja Chopra's  Mother' मग ठरले - नाट्यरूपांतर आणि अनुवाद करून लिहूया : 

नीरा चोप्राची आत्मकथा

कशी आणि कोठून सुरवात करू ते मला माहित नाही. मी नीरा, पूजाची आई. आज ती यशाच्या उंबरठ्यावर आहे.  जेंव्हा मी पूजाला टीव्ही वर पाहिले, तेंव्हा माहित होते की तिचा प्रत्येक शब्द तिच्या हृदयातून येत होता. आणि मनात आले, ' हे देवा, हीच  ती माझी गोड एवडढूशी छबी - किती मोठी झाली ही! परमेश्वर मला काहीतरी सांगू पाहतो.'  स्पर्धा जिंकली तेंव्हा तिच्या डोळ्यातील ते तेज दिसून आले, ' माझी ही लेक माझी मान गर्वाने  सदैव ताठ ठेवील, ह्यात काही शंका नाही'. आज मला कोणताच खेद नाही. मला विश्वास आहे,  जॉंन्ह मिल्टनच्या ह्या कविते प्रमाणे:
I see ye visibly, and now believe
That he, the Supreme Good, to whom all things ill
Are but as slavish officers of vengeance,
Would send a glistering guardian, if need were
To keep my life and honour unassailed.
Was I deceived, or did a sable cloud
Turn forth her silver lining on the night?
I did not err; there does a sable cloud
Turn forth her silver lining on the night,
And casts a gleam over this tufted grove

--- खरोखर, काळ्या ढगांना एक रुपेरी छटा असते. होय, 'Every cloud has a silver lining,'  माझे झालेले शोषण, ती गरिबी आणि ह्या एकेकाळी सासरच्यांना नको झालेल्या कोवळ्या मुली साठी  मी घेतलेले काही कठीण आणि आवश्यक निर्णय - मी काहीच विसरू शकत नाही. दूर गेले ते भयानक दिवस - फार म्हणजे फारच वाईट काळ होता तो!  माझा नवरा चांगल्या उच्च पदावर होता आणि घरचेही चांगलेच! पण लग्न लागल्या पासूनच ते  रसातळाला जाऊ लागले होते. घर विस्कळीत होत होते. आणि घर  व आमचा विवाह शाबूत ठेवण्या करिता मी बरीच धडपड केली. 

" सर्व काही ठीक होईल ग, एकदाका तूला मुलगा तर होऊ दे," सासरचे सांगू लागले. पहिले मुल - झाली एक मुलगी. त्या पासून चांगले सोडा, माझे वाईटच होत गेले. छळ वाढू लागले. पण मी सासर सोडून जाऊ शकत नव्हते.  माझे वडील वारले होते, माझा भाऊ बाटा कंपनीत कामाला असला तरी त्याचा पगार बेताचाच आणि त्यांत आमचे ओझे कश्याला? म्हणूनच सासरच्या घरात, कलकत्यातच रहाणे उचित वाटले.

माझी सासू कॅन्सर मुळे पलंगाला खिळली होती. तिची शुश्रूषा करण्यात माझा वेळ जात असे. तिला आंघोळ घालीत असताना तिच्या डोळ्यातून ती मला आशीर्वाद देत असल्याचे जाणले. आता तरी आपले चांगले होईल. पण छे! नवऱ्याचा बाहेरख्याली स्वभाव, त्याच्या कडून माझी होणारी रोजची मारपीट अगदी असहाय झाले होते मी. मला घर तोडायचे नव्हते,  विवाहाच्या बंधनातून बाहेर पडायचे नव्हते. माझी धडपड चालूच ठेवली. मी मुळात शुद्ध शाकाहारी पण नवऱ्या साठी मांसाहारी जेवण करण्यास शिकले. त्याला खुश करण्याचा एक वायफळ खटाटोप!

मी पुन्हा एकदा गरोदर राहिले. माझ्या गर्भात पूजा वाढत होती. आठ महिने झाले होते आणि नवऱ्याने मोठा धक्काच दिला. " मी ह्या मुलीशी लग्न करणार  आहे ," असे सांगित  माझ्या समोर एका गोऱ्या गोमट्या मुलीस उभे कले. आपण आत्महत्या करूया असे वाटले देखील पण जीव देणे इतके सोपे नसते. शिवाय आशा होती, ह्या वेळी मुलगा होईल आणि आमचे लग्न वाचेल. पण झाली पूजा.

पूजाचा जन्म होऊन तीन दिवस झाले तरी कोणही हॉस्पिटलात फिरकले नव्हते. समोरील पलंगावर वायुदलातील एका स्कॉड्रन लीडरची पत्नी बाळंत होती. तिने मला फार मदत केली.  पूजासाठी मला बेबी कपडे, औषधे वगैरे पुरवले. वीस दिवस झाले, मी मनाशी निश्चय केला  आणि दोघी मुलींसह, पूजा व शुब्रा समवेत, घर सोडले. शुब्रा जेमतेम सात वर्षाची होती. त्यानंतर मी माझ्या नवऱ्याला कधीच पाहिले नाही. मी ठरविले एक भाकरी मिळाली तरी चालेल, पण आपण ती वाटून खाऊ.

माझ्या मुंबईतील आयुष्याची सुरवात आईच्या आणि भावाच्या मदतीने झाली. दरम्यान भावाचे लग्न झाले होते. आणि मी माझ्या दोन मुलींबरोबर तेथे जाणे ठीक वाटत नव्हते.  It certainly was not an ideal situation. आदर्श परिस्तिथी नक्कीच  नव्हती, विशेतः जेंव्हा भावाला मुले झाली - लहान जागा, वाढता परिवार, पैश्याची चणचण - सर्वाची टंचाई! मी कुलाब्यातील ताज मध्ये काम करू लागले. छोटे पण स्वतःचे रेंटवर घर घेतले. आणि आम्ही तिघे राहू लागलो. मी हे सारे कसे साधले? कामावर जाताना जमिनीवर एक हात्री पसरायची, दोन प्याले दुध आणि काही खाणे आणि  मुलांना सांगे, " शाळेला जाण्याची  वेळ झालीकी  बाजूच्या काकुना ओरडून दरवाजा उघडण्यास सांगा." नंतर दाराला बाहेरून कुलूप लाऊन चाव्या शेजारांकडे ठेवीत असे.

मुली स्वतःचे होम वर्क (गृह पाठ) स्वतःच करीत. शुब्रा पूजाच्या चुका सुधारित असे. मला कामावरून घरी परतण्यास उशीर झालाच तर जेवणही वाढून घेत. मैत्रिणींच्या जन्मदिवसाचा केक न खाता, पूजा तो केक घरी आणून आपल्या मोठ्या बहिणी बरोबर 'शेअर' करायची तर शुब्रा काम करू लागल्या नंतर कित्तेकदा आपले जेवण (चिकन सॅण्डविच ) न खाता तसेच घरी आणून लहान बहिणीच्या दुसऱ्या दिवसाच्या डब्या करिता ठेवीत असे. अश्या रीतीने, एकमेकीना मदत करीत, त्या दोघी मोठ्या झाल्या.   

मी रोज प्रार्थना करीत असे, " देवा, माझ्या वाईट वागणुकीसाठी मला शिक्षा कर पण माझ्या अजाण आणि निष्पाप मुलींना नको. त्यांच्या मुलभूत गरजा पुरवण्यास मला मदत कर ." त्यांचे पाय- जोडे (shoes), मोजे, शाळेचा गणवेश घेणे मला जड जात होते. आम्ही गोरेगावला बंगुर नगर मध्ये राहायचो. पूजा सेंट थोंमस अकॅडेमी शिकत होती.  ती लहान मुलगी घर ते शाळा  हे चार बस stopचे अंतर चालतच पार करायची. तिला रस्ता क्रॉस करता येत नसे व त्यासाठी आजू-बाजुवाल्यांची मदत घेत असे.  बसचे पैसे वाचवून मी ते त्यांच्या दुधासाठी ठेवी.

आमच्या आयुष्याचे चित्र हळू हळू पालटू लागले. मला गोव्यात ६० ० ०  रुपयांची  गोवा  पेन्टा ह्या कंपनी मध्ये नोकरी लागली. कंपनीचे मालक मिस्टर छाब्रा व त्यांची पत्नी खूप प्रेमळ, फार चांगले आणि अतिशय दयाळू! त्यांनी  मला कर्जाऊ काही रक्कम दिली. माझ्या मुलींना मी आईच्या मदतीने माझ्या बहिणीकडे पुण्यास पाठविले. १ ६ - १ ८ तास दिवस-रात्र काम करीत, आठवड्याच्या रजेत देखील (weekly off ), मी गोव्यात चार वर्ष काढून  पुण्यात ए लहानसे घरासाठी , व्हन - बेड रूमचे  घर घेण्यासाठी, पैसे उभे केले. शिल्लक राहिलेल्या विकली ऑफच्या सुट्या आणि इतर रजा  राखून ठेवल्या मुळे वर्षातून तीन ते चार वेळा मला माझ्या मुलींना पुण्यात जाऊन भेटता येत होते.   

पुण्यात घर घेतल्या नंतर पुण्यात नोकरीही मिळवली. मी हॉटेल ब्ल्यू डायमंड मध्ये काम करू लागले. आयुष्याची गाडी आता सुरळीत चालू लागली होती. त्या हॉटेलात एक वर्ष असेन आणि शेवटी मी मैनल्यान्ड (Mainland) चायना (China) मध्ये लागले आणि माझ्या आयुष्याला चांगली कलाटणी मिळाली. आमच्या टीम आणि मँनेजमेंट मुळे मला स्थैर्य लाभले, माझ्या मुलींचे संगोपालन चांगल्या रीतीने करू शकले. रात्री अपरात्री कामानिमित जाणे व लांब लांब प्रवास करणे आणि कामाचे वाढते तास हे सारे सांभाळून घरा कडे दुर्लक्ष होऊ न देणे, माझ्या टीम मुळेच शक्य झाले.
दरम्यान शुब्राही हॉटेल ब्ल्यू डायमंड मध्ये काम करू लागली  ती सर्वात लहान  एम्प्लॉइई होती, कॉलेजात शिकत असल्या पासू आणि म्हणूनच तिला कॉमर्स मध्ये मास्टर्स व BMM  करता आले. आज ती एका मर्चंट नेव्हीतील सुशिक्षित ख्रिस्ती मुलाशी लग्न करून सुखी आहे आणि दोघांना एक सुंदर, गोड मुलगी आहे

आजही माझी पूर्वी प्रमाणे तीच दिनचर्या चालू आहे - कामावर जाणे, घरी येऊन शिकवण्या करणे आणि घरची कामे स्वतःच करणे जसे मी इतके वर्ष करीत आले त्या प्रमाणे. माझ्या ह्या सागरी प्रवासात शुब्रा होती एक मजबूत नांगर तर पूजा होती एक खडक - दोघीने मिळून माझी होडी स्थिर ठेवली. अनेकदा पूजाने लहान कोवळ्या हाताने माझे अश्रू पुसले आहेत जेंव्हा जेंव्हा मी परिस्थितीने गांजून होरपळून जाई आणि हताश होऊन रडू लागेजेंव्हा जेंव्हा माझ्यात प्रतिकार करण्याचे ध्यर्य उरत नसे तेंव्हा पूजा माझ्या पाठी खंबीरपणे उभी असायची. पूजा शैक्षणिक शेत्रात फार हुशार होतीच पण ती इतर गोष्टीतही भाग घेते. एकदा तिला उंच टाचांचे बूट 'मोडेलिंग' साठी हवे होते. तिने काही आपले 'शो' केले आणि स्वखर्चाने आणले.
 
आज पूजा पँटलूंस फेमिनाची मिस इंडिया घोषित झाली. टीव्ही वर तिची मुलाखत चालू आहे. तुम्हीही  ऐका
"When I was 20 days old, my mother was asked to make a choice. It was either me, a girl child, or her husband. She chose me. As she walked out she turned around and told her husband, ‘One day, this girl will make me proud’. That day has come. Her husband went on to marry a woman who gave him two sons. Today, as I stand here a Miss India, I don’t even know if my father knows that it is me, his daughter, who has set out to conquer the world, a crown on my head.


"Our lives have not been easy, least so for my mother. Financially, emotionally, she struggled to stay afloat, to keep her job and yet allow us to be the best that we could be. I was given only one condition when I started modelling ‘ my grades wouldn’t drop.


"All the girls in the pageant worked hard, but my edge was my mother’s sacrifice, her karma. Today, when people call to congratulate me, it’s not me they pay tribute to, but to her life and her struggle. She’s the true Woman of Substance. She is my light, my mentor, my driving force."

[मिसेस चोप्रांचे डोळे पाणावले होते. पण आज त्यांचे डोळे पुसण्यास पूजा घरात नव्हती. पण डोळे पुसण्याची गरज नव्हती कारण ते आनंदाश्रू होते.]