Saturday 26 July 2014

माझा शालेय प्रवास - शिक्षकांना एक श्रद्धांजलि आणि सहप्रवाशां बरोबर एक स्वंवाद

 

माझा शालेय प्रवास

 शिक्षकांना एक श्रद्धांजलि आणि सहप्रवाशां बरोबर एक स्वंवाद

माझे शिक्षक : 

दोन वर्षा पूर्वी, जानेवारीत, आमच्या शाळेचे 'माजी - विद्यार्थी मिलाफ' संमेलन होते. मला चार शब्द बोलण्याची विनंती करण्यात आली आणि मी असे काहीसे म्हणालो, मी शब्दशः अवतरण लिहित आहे (quoting in verbatim):




[" LIFE, LIKE MONEY, IS MEANT FOR SPENDING. YOU SIMPLY CAN NOT HOARD IT. BUT THE AMOUNT OF TIME YOU SPEND IN EDUCATION IS LIKE MONEY YOU PUT IN A BANK. AND WHEN YOU HAVE INVESTED IN INSTITUTION LIKE OURS - ST.SEBASTIAN GOAN HIGH SCHOOL - THE DIVIDEND IS VERY VERY HIGH! WHEN THE MOST OF  YOU, WHO HAVE GATHERED HERE FOR THE EX - STUDENTS REUNION, MUST HAVE BEEN IN THIS INSTITUTION FOR TEN OR ELEVEN YEARS. AM I RIGHT? BUT WITH ME IT IS DIFFERENT - I HAD THE PRIVILEGE OF SPENDING 21 YEARS, 11 YEARS ( It  was XI Std. SSC then) AS THE STUDENT AND ANOTHER 10 YEARS AS THE PARENT - MY SON ALSO PASSED OUT FROM THIS VERY SCHOOL----" ]  

माझ्या शिक्षिका श्रीमती कुसुम श्रीधर देसाई, ह्यांना पाहून मला एक सुखद धक्का बसला. होय,  देसाई टीचर, तुम्हाला पाहून आश्चर्य आणि फार फार आनंद झाला. तुम्ही आलात आणि आम्हा साऱ्यांना अक्षरशः काबीज केले! तुम्ही ९० वर्ष्याच्या झाला असाल पण तुमच्यात फार असा बदल झाला नाही. तुम्ही अजून तसेच आहात - उल्हास्चे  एक मूर्तिमंत उदाहरण आहात! ( epitome of enthusiasm) तुम्हाला बघितले आणि मी आणि माझे मन ५० वर्ष मागे धावत गेले. तुम्ही चाळीशीत असाल. मी ५वी अ च्या वर्गात सर्वात शेवटच्या बेंचवर बसलो होतो  (एखाद्या सामान्य सभासदा प्रमाणे back bencher राहून आपल्या पुढ्यात घडत असलेले पहाण्यात एक और मजा असते!). सारी मुले अगदी तल्लीन होऊन, मग्न होऊन आणि लक्ष देऊन आपले ऐकत होते - तुम्ही एक कविता समजावत होत्या - हे सारे नेहमीचेच - मग पद्दlतली कविता असो किंवा द्दlतला धडा असो आणि आताही तसेच -  तोच तो खणखणीत आवाज, तोच उल्हास आणि आपल्या बोलण्याने साऱ्यांना बांधून ठेवण्याची कला अजूनही कायम! कोणताही बदल नाही.  'Hats off’ to you, my dear teacher! तुम्ही मला त्या कार्यक्रमाच्या दिवशी दिलेले ' सुखशांती' हे भेट रुपी पुस्तक. मी वाचले. आपल्या नातीने लिहिलेली प्रस्तावना फार सुंदर आहे. तुमचा हा कवितेचा संग्रह माझ्या साठी एक मौल्यवान ठेव आहे. धन्यवाद! मला माहित आहे की आपले स्वर्गवासी पती मिस्टर श्रीधर देसाई आणि त्यांचे भाऊ नारायणराव  हे मराठीतले उत्तम कवी होते, पण आपणही कविता करीत असाल ह्याची कल्पना नव्हती. आपल्या मोठेपणाचा उल्लेख आणि गवगवा तुम्ही कधीच केला नाहीत. तुमची ही विनयशीलता मला अजून आपल्या शाळेतील काही शिक्षकांची आठवणी करून देतात. आपल्या शाळेत रुजू होण्या पूर्वी त्या सर्वांनी बरेच काही मिळविले होते - प्रसिद्धी, नाव, बरेच काही. पण कुठेही कोणता गवगवा सोडा, तर कोणाकाडे उल्लेख देखील केला नाही. आम्हा विद्यार्थ्यांना त्या सर्वांच्या मोठेपणाची कल्पनाच नव्हती.

मिस्टर गोडबोलेसर, तुम्ही होता आमचे चित्रकलेचे मास्तर, शिकवायचे ८वी ते १०वी पर्यंत, तसेच तुम्ही आम्हाला आपण शासनाच्या 'Elementary' आणि  'Intermediate' परीक्षेंसाठी  तयार करीत.त्या परीक्षेंसाठी शाळा अगदी अल्प शुल्क आकारीत असे. फ्रान्सिस फर्नांडेझ हा वर्गातील एक अनाथ मुलगा. त्याला त्याची आजी वाढवीत असे. तो उत्तम चित्र काढीत असे.  त्याची रंगसंगती फारच छान तर त्याने काढलेली स्मृती चित्रे अगदी जिवंत वाटत. सर, तुम्ही त्याचे फार कौतुक करीत आणि तो 'Elementary' च्या क्लासला का येत नाही हे समजताच तुम्ही त्याची फी तर भरलीच पण  त्याला पेंट, ब्रश, पेन्सिल, इत्यादी पुरवलेत. सर, तुम्ह्च्या मुळेच तो 'Elementary' आणि  'Intermediate' ह्या दोन्ही परीक्षेत A ग्रेड घेऊ शकला. मी कॉलेजात असताना टाईमस ऑफ इंडियात असे वाचले:
Mr. Godbole, the famous artist passes away---He was the pioneer in Indian Water colours. His research work in water  colour at the J J School of Arts, enabled the use of Indian made water colours for the first time.-------- During his last days he was working as a drawing teacher in St,Sebastian Goan High School.
 पाव पानी ह्या मजकुरा सोबत तुमचा फोटो होता पण त्या शेवटच्या वाक्याने माझे लक्ष वेधले. सर, तुम्ही आम्हाला आपल्या 'WATER - COLOUR'  मधील रिसर्च बद्धल सांगितले नाहीत. 

मिस्टर तिवारीसर, आज 'Open Book’ ह्या संकल्पनेचा फार गवगवा होत आहे- कशीही मॉर्डन पद्धत आहे, आधुनिक कल्पना, ती आत्मसात करणे किती गरजेचे, वगैरे,वगैरे. पण सर, तुम्ही ही संकल्पना आमच्या 
‘Objective Weekly Test' आठवड्याच्या चाचणी परीक्षेत राबवीत असत, म्हणजे ६३ -६४ साला पासून. कदाचित आमच्या अगोदरच्या 'BATCHES' च्या बाबतीत देखील असेच घडले असावे. अशा परीक्षेंचे महत्व तुमच्याच शब्दात, “The whole idea of this exercise is to make the students read, understand the topic, remember every thing that they have read and use the same when needed, and not just for the examination but during the whole life. Those of you have read the books thoroughly at home, will find the papers easy, while the others will not. But in our Terminal and Preliminary Examinations such pattern will not be followed. It is needless to say that the S.S.C. Board papers have never have this pattern."
 सर, कदाचित तुम्ही 'Teacher, ahead of your time' असाल! पण आम्हाला मात्र फार फायदा झाला. असो!

रेवेरेंड फादर  हूबर्ट ऑलिम्पस मस्केरेन्हस, आपल्या बद्धल  वाचकास असे जरूर वाचवायला मिळेल :
Hubert Olympus Mascarenhas, who was born in Porvorim, Goa, in 1905, died at Mumbai, on 9 February 1973, and who was a Catholic priest belonging to the Archdiocese of Bombay, ideologist of repute, and nationalist. He did his early ecclesiastical studies at the Pontifical Seminary in Kandy, Sri Lanka. In Rome, at the University of the Propaganda Fide, he took a licentiate in Canon Law as well as PhD. He was ordained in Rome in 1934, at the age of 29. Returning to Mumbai, he obtained an M.A. in English, an M.A. in Sanskrit, and a PhD in History at the University of Bombay. He was a scholar.He was appointed post-graduate teacher of Ancient Indian History and Culture at the University of Bombay, and Professor of Indian Philosophy for M.A. students at the St Xavier's College, Mumbai. His The Quintessence of Hinduism: The Key to Indian Culture and Philosophy was widely acclaimed. He is one of Richard De Smet predecessors in a 'realist' interpretation of Sankara. 
For almost 12 years (late 1940s and early 1950s) [Actually, it was up to April,1958 because Rev. Father F.X. Fernandez became our Principal from June, 1958.] he also served as Principal of St Sebastian Goan High School, Dabul. He proposed a theory of pre-Portuguese Christianity in Goa Jose Cosme Costa reports that Mascarenhas even proposed that there were Christian temples dedicated to the persons of the Trinity: Abanath / Bhutnath (Father Lord), Ravalnath (from Rabboni - Rabulna - Rabulnath) / Bhai rav (Brother Lord), and Atman / Bhavka Devta, Santeri, Ajadevi (Spirit).  A recent archaeological discovery of a "Thomas Cross" hidden in a smallish monument, surmounted by a Latin Cross, near the old Goa harbour lends support to this thesis. The Cross bears an inscription in Pahlavi, which, Costa reports, was the liturgical language of the church associated with the Metropolitan of Fars.He also participated in the Konkani movement in Mumbai, and did work for the Konkani Bhasha Mandal.  He was nationalist to the core. As an indologist and a linguist ( He was expert, both spoken as well as written, in many foreign languages- Portuguese, German , French , Spanish, English and many Indian languages- Marathi, Konkani, Hindi, Bengali, Sanskrit.)  he attracted the attention of nationalist leaders such as Jawaharlal Nehru, Kaka Kalelkar and S.S. Mulgaonkar. His patriotism and espousal of Indian nationalism brought him into conflict with the ecclesiastical authorities
फादर, तुम्ही माझे पहिले मुख्याधापक ( the first Principal). आपल्या मुळेच मला शाळेत प्रवेश मिळाला आणि माझे कल्याण झाले. मी मराठी माध्यम असलेल्या शाळेत शिकत होतो. मुळात देवनागरी लिपीच मला जमत नव्हती. मी लिहीलीले माझे मलाच कळत नसे. त्या शाळेतील शिक्षिका, ताईबाई ओरडून  मला बोलत, " हे काय आहे? ही तुझी ' अ, आ, इ,  ई ' ? ह्या तर कोंबडीच्या तंगड्या दिसतात!" बाईना बघून मला धडकी बसे. त्यात माझ्या बाजूला बसायचा तो चंदू भिडे, माझ्या डब्यातील दोना पैकी एकतरी लाडू (मला बसेन किंवा रव्याचे लाडू आवडत) चोरून खाई. आणि बाई मलाच "खोटा आरोप करतोस" असे म्हणून गप्प करित. माझी आई मला सांगत असे, "तुझे बाबा सांगायचे विनयला अंग्रेजी शाळेत टाकूया. आणि मी तूला इंग्लिश शाळेतच टाकणार आहे." ताई बाईची भीती, चंदू भिडेचे लाडू चोरणे आणि आईने केलेले ' इंग्रजी शाळेत टाकण्याचे' प्रॉमिस ह्या सर्वांचा परिणाम तो असा की माझी मराठीतील प्रगतीचा झाला बट्ट्याबोळ. मनातील गोंधळ अधिक वाढण्या पूर्वी मला आपल्या शाळेत प्रवेश मिळाला हे माझे सुदैव! उशिरा का होईना, वयाच्या ७व्या वर्षी मी १बी (I B ) मध्ये चक्क इंग्रजी शाळेत - St.Sebastian Goan High School दाखल!  आपल्या शाळेत आलो खरे पण इंग्रजी शिकणे तितके सोपे नव्हते. तुम्हाला त्याची पूर्ण जाणीव असावी म्हणूनच मला आणि माझ्या सारख्या इतर काही मुलांना आपल्या पंखांखली आपण घेतले आणि २री ब च्या क्लास टीचर मिस नरोहनांना आम्हाला शाळेपुर्वी १ ते २ तास शिकवण्यास नेमले. आपणही जातीने लक्ष देतेच होता आणि आमच्या प्रगतीचा आढावा घेत होता. आपण भाषा तज्ञ आहात त्याची मला त्यावेळी कल्पना नव्हती. पण माझ्या आई बरोबर उत्तम अस्खलित मराठीत तर अशोक पालच्या माँ बरोबर सफाईदार बंगालीत आपण बोलत तसेच इतर   गोअन मुलांच्या घरच्यां बरोबर कोकणीत बोलत. नंतर समजले आपल्याला अनेक भारतीय भाषा (हिंदी,मराठी,बंगला, संस्कृत,कोकणी,गुजराती, तमिळ) तसेच बऱ्याच परदेशी भाषा ( इंग्लिश, पोर्तुगीज, जर्मन स्पानिष {Spanish}) अवगत आहेत. आणखी एक गोष्ट स्मरते ती ही. आमच्या समोर रहात असलेल्या जोकिम सैगल ह्याला सेंट थेरेसा मधून शिस्तीभंग केल्या मुळे काढून टाकले होते. ९वी च्या ह्या विद्यार्थ्याचे  आयुष्याचे नुकसान होणार होते. पण आपण तसे होऊ दिले नाही. त्याला समज दिलात आणि आपल्या शाळेत घेतले. हि गोष्ट जॉकिमनेच सांगितली होती आणि त्याने असे सांगितले की तुमच्याच मुळे त्याला व त्याच्या इतर मित्रांना सुधारण्याची संधी मिळाली. ह्यावरून आपण खरेखुरे समाज सुधारक (Reformist ) आहात हे ध्यानात आले.       R.I. P. 

मिस नरोह्ना,  तुम्ही फादर मस्केरेन्हस सारख्याच प्रेमळ व दयाळू! मला तुम्ही आपल्या घरी बोलवून शिकवत. माझ्या बरोबर इतरही मुलं ह्या फ्री ट्युशनला येत असत. जरी तुम्ही माझ्या २री च्या वर्ग-शिक्षिका तरी तुम्ही माझे कोचिंग ४थी संपेस तोवर चालूच ठेवले. दर वर्षी मला तुम्ही नाताळात क्रिसमसला  (CHRISTMAS) आणि नव वर्ष सेलेब्रेट करण्या करिता घरी बोलावत. मी ७वी  - ८वी पर्यंत तुमच्या घरी येत असे, आपल्या आशीर्वाद (blessings) आणि मार्गदर्शनासाठी. नंतर आपण लग्न करून लंडनला स्ताहिक झालात. टीचर, मी तुमचा सदैव ऋणी राहीन!


 रेवेरंड फादर एफ. एक्स. फर्नांडेझ, आपण झालात आमचे प्रिन्सिपल मी ५वीत असताना आणि १०वी पर्यंत होतात. आपण अतिशय कडक, शास्त प्रिय आणि चांगले शिक्षणतज्ञ! आपल्या कारकिर्दीत शाळेने अनेक शेत्रात भरघोस यश प्राप्त केले. मुलांनी खेळाची मैदाने तर गाजवलीच (कसरत / अथ्लेटीक्स मधले टाटा शिल्ड बरीच वर्ष राखले, अनेक हॉकी व फुटबॉलची  अनेक पदके आणि ट्रोफी पटकावल्या) पण त्याच बरोबर शैक्षणिक शेत्रात मोठे यश मिळवले, आणि मार्च १९६५ च्या SSC च्या परीक्षेत मेरीट लिस्ट मध्ये येऊन अजित गायकवाडने तुमच्या परिश्रमांचे चीज केले. अजून एक वर्ष तुम्ही शाळेत असता तर हे  तुमच्या करिता पार्टीन्ग गिफ्ट ठरले असते. 

 

जोशी मास्तर, तुम्ही आम्हाला ८वित शिवायला सुरवात केलित, मराठी आणि संस्कृत साठी. तुमचे आम्हा सर्वांवर बारीक लक्ष असायचे.  संस्कृतचे श्लोक, व्याकरण आणि भाषांतर आमच्या कडून चांगले करून घेत. अभ्यास नियमित करण्यासाठी तुमचा आग्रह असायचा. घुरून पाठांतर करणे महत्वाचे असे तुमी आम्हाला वारंवार सांगत. . दिलेले गृहपाठ न केल्यास  कडक शिक्षा करीत. त्यात तुम्ही कोणालाच सोडत नसत, कोणाची गय करीत नसत. संसृत करिता साऱ्या तुकड्या - A ,B & C  एकत्र येत असू. आम्ही केवळ १०- १५ मुले होतो, त्यामुळे तुम्ही साऱ्यांकडे जातीने लक्ष पुरीत होता. प्रत्येकाच्या प्लस-मैनस बाजू तुम्हाला माहित असायच्या. म्हणूनच दिलीपला (बुरडे मास्तरांच्या मुलास ) तुम्ही म्हणत, " दिलीप, तू घरून अभ्यास करून आला नाहीस. तू सारे थोड्या वेळा पूर्वी वाचले आहेस. तुझी स्मरण शक्ती दांडगी आहे. पण घरी वाचत जा." तसे अजित गैकवाड ला सांगत, " काय रे, तू फक्त अभ्यास एके अब्यास करतोस. इतर मुलां प्रमाणे थोडी मस्ती कर, खेळ आणि थोडी मौज मजा कर. " किरणचे नेहमीचे पालुपद असायचे, " मी घरून अभ्यास करून आलो आहे. पण तुम्हाला बघून सारे विसरलो." " असे असेल तर आई कडून चिठ्ठी घेऊन ये की माझ्या मुलाने घरी अभ्यास केला ", तुम्ही त्याला सांगायचे आणि मग त्याचे ते रडणे --- मग तुम्ही मला म्हणायचे, " तू पण घेऊन ये आईची चिठ्ठी." " मला आई देणार नाही कारण मी घरी अभ्यास केला नाही." " निर्लज्य कोडगा आहेस."तासाच्या सुरवातीला तुम्हाला पाणी लागत असे आणि प्रदीप मदन तुम्हाला मोठ्या तत्परतेने पाण्याचा ग्लास आणून देत असे. आम्ही त्याला 'पाणक्या' असे टोपण नाव ठेवले होते. एकदा वर्गात शिरताच मी ओरडलो, " पाणक्या सरांसाठी पाणी घेऊन ये." तुम्ही ते ऐकलेत आणि म्हणालात, " आज विनय तू घेऊन ये" अशा रीतीने तुम्ही माझी खोड मोडलीत. तुम्ही आम्हा सर्वांची घरची परिस्थिती पण जाणून घेत. आम्हाला आमच्या कर्तव्याची जाणीव करून देत. मला अजून तो दिवस आठवतो. तुम्हाला आम्हाला जडणाऱ्या वाईट सवाई बद्धल सांगत होता - व्यसन लागले की ते  सुटणे कसे किती कठीण असते - असेही म्हणालात की तुम्हालाही सिगारेटचे व्यसना पासून मुक्त होता येत नव्हते, डॉक्टरनी मनाई केली असताना सुद्धा. मग माला तुम्ही विचारले होते, "काय रे तू ओढतोस का? नाही न, बरे आहे. मला वाचन दे तू कद्धिच ओढणार नाहीस. " मी तुम्हाला दिलेले शेवट चे प्रॉमिस. दुसऱ्या दिवशी तुम्ही गेल्याचे आम्हाला समजले. आम्ही सारे तुमच्या अंत दर्शन घेण्यास आलो होतो, सर्व शिक्षक वर्ग आणि ८वि ते ११वीतली सारी मुले . "Sir, I have kept the promise made to you. I have never smoked!"तुम्ही आम्हाला लावलेली शिस्त आणि वळण ह्या मुळे आयुष्यात बराच फायदा झाला. आपल्या सारखे शिक्षक आम्हाला लाभले ह्यात खरोखरच आमचे भाग्य आहे.

 

 

माझ्या ह्या अकरा वर्षांच्या शाळेतील वाटचालीत अनेक शिक्षक लाभले आणि त्यांच्या कडून मी बरेच काही शिकलो. अनेक अनुभव आले, काही चांगले तर काही वाईट. पण वजा बाकी करून चांगल्याचे पारडे जडच! शाळा सोडून मला ४९ वर्ष होतील. पण शाळेतील आठवणी अजून ताज्या आहेत, जणू कालच घडल्यात.

आमच्या इंग्रजीच्या मास्तर मिस्टर, एस. व्हि. बुरडेंचा आवाज अजून माझ्या कानांत घुमतो,

'Dull would he be of soul who could pass by
A sight so touching in its majesty:
This City now doth like a garment wear

The beauty of the morning: silent, bare,
Ships, towers, domes, theatres, and temples lie
Open unto the fields, and to the sky,
All bright Earth has not anything to show more fair:
and glittering in the smokeless air.

Never did sun more beautifully steep
In his first splendour valley, rock, or hill;
Ne'er saw I, never felt, a calm so deep!

The river glideth at his own sweet will:
Dear God! the very houses seem asleep;
And all that mighty heart is lying still!'

"Westminster Bridge, my dear children, is a road and foot traffic bridge over the River Thames in London, linking Westminster on the north side and Lambeth on the south side. One fine morning as William Wordsworth was passing over the bridge  the poet moved by the splendour that lay before his eyes –  moved by the splendour that lay before his eyes – everything that morning was different – there was no smoke in the air, no hustle- bustle, he was explaining to us, and so moved was the poet that he penned this poem - .‘Upon Westminister Bridge'." 
ते गद्द आणि पद्द तितक्याच सफाईने शिकवत, कविता आणि कवी तसेच लेखकां बद्धल त्यांना संपूर्ण माहिती असे. ते अतिशय विद्वान होते पण तसेच ते एक 'उपासात्म्कते' मूर्तिमंत उदहरण (epitome of sarcasm) होते. ते म्हणत, “I do not carry any green book (सिल्याबासचे पुस्तक) with me as others do ( आम्ही सारे हसत कारण ते कोणाला उद्देशून बोलत हे माहित होते - अर्थात केणी मास्तर ) and I am not preparing you for your SSC Examination. I want all of you to excel in life and so I am teaching the subject, all the essence and nuances of the language.” 
ते धडे इतके रंगवून सांगत आणि प्रत्येक व्यक्तीचे वर्णन इतके सुंदर करीत की तुम्ही थेट धड्यातील गोष्टीत जात. साऱ्यांना ते जिवंत करीत, आर.एल. स्टीवन्सन ह्यांचा ट्रेजर आयलंड मधले जिम,कप्तान बिली बोन्स, लॉंन्ग जॉन सिल्वर किंवा ब्लेक डॉग (Black Dog), तसेच चार्लस डिकन्सच्या डेविड कॉपरफिल्ड मधले डेविड, त्याची आई, मिस्टर मुर्डस्टोन किंवा मिस पगेटी असो - सारी पात्रे डोळ्या समोर उभी करत.  मात्र  जेन ऑस्टिन ह्यांच्या 'प्राईड आणि प्रेजुडीस' साठी त्यांचे 'बेस्ट' राखून ठेवले असायचे. तसे त्यातील सुरवातीचा एक अध्याय / प्रकरण आमच्या अभ्यासक्रमात होते. पण सरांनी आम्हाला साऱ्या गोष्टीचा सारांश सांगितला आणि माझी ती कादंबरी वाचण्याची उत्कंठा वाढली.  

 गणित आणि पदार्थविज्ञान व रसायनशास्त्र शिकवण्यात केणी मास्तरांचा कोणही हात धरू शकणार नाही. स्वभावाने ते सरळ आणि सुस्वभावी - आपण बरे आणि आपले काम - उपहासाने कोणाला बोलणे नाही. मुलांना एस.एस.सी. करिता चांगले तयार करणे हे त्यांचे ध्येय. त्यासाठीच तर ते बोर्डाचे हिरव्या रंगाचे पाठ्य पुस्तक त्यांच्या सोबत असे.

शाळेतील बहुसंख्य शिक्षक चांगले होते. मात्र सर्वच नाही. अपवाद होतेच. आमचे आठवी वर्ग मास्तर, (ते Social Studies शिकवीत), काही अशा प्रकारे विचारणा करीत: एखादा प्रश्न साऱ्या वर्गाला ओळी- ओळीने, प्रत्येकाला  विचारला जाई आणि शेवटला माझ्यावर असा फेकला जाई, " Vinay, you won’t know the answer, would  you ?" मी पार गोंधळून जात असे. भूगोलाच्या तासाला (one period) एक बोर्ड वर जगाचा नकाशा ते लावीत. ते अशा प्रकारे प्रश्न विचारीत, " दाखव पाहू 'मलबार ' किंवा  'रंगून' कोठे आहेत ते. " मग धड्यात बर्मा, कर्नाटक किंवा केरळ असो वा नसो.  एकदा त्यांनी बर्मीज लोकांचे वर्णन करायला सांगितले. मी पट्कन उत्तर दिले, " ती माणसे काळी असतात, त्यांचे नाक चपटे असते आणि डोळे बटबटीत असतात ---" त्यावर ते काहीसे किंचाळून म्हणाले, “Are you looking at me and describing me? That's not the characteristics of the Burmese, you mischievous boy! ” तसेच इतिहासातील  'Mavali ' ह्या शब्दाला (म्हणजे मावळी) ते मवाली असे म्हणत आणि  त्याचा अर्थही ते  'a rogue, hooligan, hoodlum, ruffian' असा सांगत. ह्या विषया वरून माझ्या बहिणीत आणि माझ्यात बरेच वाद होऊ लागले. त्या बरोबर की माझे सर? पुन्हा मनांत गोंधळ. माझे इतिहास   भूगोल राहिले कच्चे
असे होते आमचे शिक्षक आणि शिक्षिका:


CLASS
CLASS TEACHER
OTHER TEACHERS

I B
Miss  Pariera


IIB
Miss Narhona


111A
Miss Effie Fernandez
{Mrs. Ranade (drawing)  }
 तीसरी आणि चौथी मधल्या टीचर्स नक्की आठवत नाही। 
1V A
Miss D’Costa
{ & Miss. Cutino (singing)}

V A
Miss Rose Mendez
Mrs. Kumsum  Desai (Marathi),Miss  Dolly D’souza (Hindi), Mr.Khot (Craft) & Mr. Narvekar (drawing)
Mr. Jeromme Fernandez was our Scout Master from V to XI
VIA
Miss Mable Pariera
Mrs. Kumsum  Desai (Marathi & Hindi), Mr.Khot (Craft) & Mr. Narvekar (drawing)

VII B
Mr. Kshirsagar
Mr.Khot (Craft) & Mr. Narvekar (drawing), Miss Amma (Soc.Studies.)

VIII B
Mr.Ramchandani
Mr. Arthur (English & Soc.Studies), Mr. S.V. Burde (Mathematics), Mr.Joshi ( Sanskrit & Marathi), Mr. Joe Crasto ( Sports/ Morals) Mr. Patel & Mr. Patvardhan (Drill #)
# From VIII to X
IX B
Mr. Arthur
Mr. S.V. Burde (English & Mathematics), Mr.Joshi ( Sanskrit & Marathi) Mr,Joe Crasto ( Sports/ Morals)

X B
Mr. Joshi / Mr. Mungekar / Mr. Jerry D’souza
Mr. S.V. Burde (English , Sanskrit & Mathematics), Mr.Joshi / Mr.Mungekar ( Sanskrit & Marathi), Mr. Ghaisas (Marathi) Mr. Sharma (Hindi), Mr. Mishra (Gen.Science), Rev.Father Almieda (Morals) Mr. Naik (Social Studies) Mr. Jerry D'souza (English Text)
Mr. Joshi died in August. Mr. Mungekar left in the middle of the year and Mr. J.D’souza was in the last term. Father Almeida , who taught us Morals would often cover 'SEX EDUCATION', (when even today, it's taboo to even talk openly about  the 3 letter word) although it was not included in our.  curriculum. His Morals sessions never sounded like sermons, it used to heart to heart talk.
XI B- S.S.C. Class  1964-1965 
Mr. S.V.Burde
Mr.Keni - Class Teacher of XIA (Maths,Phy.Chemistry),Mr. Tiwari (Gen. Science / Phy. Hyg./ Special Arith.), Rev.Father Ceril Narhona,nthe Principal ( Civics & Adm.), Mr. Mishra (Hindi), Mr. Ghaisas ( Marathi -L.L.) 

[Our S.S.C. Result was 100 % and Ajit Gaikwad of XI A came in the merit list]
1) English -(Mr. Burde)
2) Sanskrit-----do----- or 2) Marathi Lower Level ( Mr. Ghaisas)      3) Hindi ( Mishra )       4) Gen Science (Mr. Tiwari)                           5) Mathematic Both for Higher & Lower Level ( Mr. Keny)        6) Phy. Chem.( Mr.Keny)         or        6) Phy. Hyg. ( Mr. Tiwari)
7) Civics & Adm. ( Father Narhona)           8) Special Arithmetic Mr. Tiwari- for those who opted for 8 subjects instead of 7. There were very few of them and my friend Suhas Shanbhag was one of them. He got 100% Arithmetic) 


 मी ह्या सर्व शिक्षकांचा सदैव कृतज्ञ राहीन!

माझे सहप्रवाशी:

तसा माझा 'स्कूल मेटस'चा परिवार फार मोठा आहे. कशी आणि कोठून सुरु करू हे मला समजत नाही. शाळेतील प्रवास आपण साऱ्यांनी एकत्रित केला. एकत्रित रित्या अभ्यास केला, एकमेकांच्या खोड्या काढला, टीचरसना टोपण नावें ठेवली आणि एकमेकांना मदतही केली. आपल्यातील काही प्रवाशांचे काय झाले, ते काय करतात त्याची आपल्याला माहित नाही. त्या साठी तर  होती ही आपल्या Alma Materची  री -युनिअन. आपल्यातील काही जीवनातील प्रवास देखील सोडून गेले. 

रवींद्र तोटे, तू तर माझा लंगोटी यार. आपण सारे तुमच्या घरी एकत्र जमून अभ्यास करायचो, अगदी ५वी पासून ते BSc पर्यंत. आपण सकाळ दुपार चहा-चपातीचा नाशता चवीने खायचो. आम्हाला ते पंचपक्वान वाटायचे. तुझे आई-वडील कामावर जात आणि घरात धुड्कुस घालायला आपल्याला मोकळीक असायची. काय ती धमाल, किती मजा! रवि, तुझे गणित चांगले होते पण इंग्रजी बेताचे आणि त्यावरून काही तुझी टिंगल करायचे ते मला मुळीच आवडत नसे. पण तू ते सारे शांतपणे सहन करीत असे. गणितातच तू BSc केलेस. गेल्या वर्षी तू अचानक  निघून गेलास. 

सुरेंद्र मुर्देशवर, ओळखलेस का मला? कसा विसरशील आम्हा दोघांना, श्रीकांत तेलंग आणि मला? बराच त्रास दिला रे आम्ही तुला. श्रीकांत आणि मी, आम्ही दोघेही सडपातळ आणि तू होतास पिळदार शरीरयष्टीचा. मग तू आम्हा दोघांना घाबरत कशा साठी असे? आम्हाला तू आळीपाळीने तुझ्या पाठीवर घेऊन शाळेच्या मैदाना भवति फिरवीत असे. आपण लहान होतो. पण हे सर्व आठवल्यावर माझीच मला लाज वाटते. ७वी मध्ये तू शाळा सोडली होतीस. समक्ष भेटलास  तर तुझे पाय धरून माफी मागेन. करशील का माफ? श्रीकांत तुझी माफी मागण्यास राहिला नाही. त्यालाही माफ कर. तसे आम्ही दोघांनी फार वेडे चाळे  व मस्ती केली. मग ८वी ला जोशी मास्तर आले आणि आम्हाला डोस पाजले. माझी गाडी रुळावर आली. त्याचे तसे झाले नाही. तो ९वीत पाठी राहिला. पण जोशी मास्तरांचे बोल त्याच्या वर्मी लागले असावेत कारण त्याने नंतर BSc, LLB, LLM  केले. लॉची पुस्तके लिहिली, आणि Govt. लॉ कॉलेजात प्रोफेसर झाला. संगीतकार झाला आणि सुरेश वाडकरना त्याने ब्रेक दिला असे त्याच्या तोंडूनच मला समजले होते. काही महिन्या पूर्वी त्याच्या एका मित्रने मला सांगितले, "श्रीकांत इज नो मोर."

जॉकिम कर्डोझो, तू अजून तेवढाच विनोदी आहेस काय रे? मला आठवते. आपण सहावीत होता. आपल्या 'इंग्लिश' टीचर, मिस मेबल परेरानि लेटर राईटिंग शिकवत होत्या, नमुना दाखवला - कसे पत्र लिहिणाऱ्याने आपले नाव व पत्ता वर उजव्या कोपऱ्यात, त्या खाली तारिक, वगैरे वगैरे आणि नंतर त्यांनी आपल्याला पत्र लिहिण्यास सांगितले. तू तर कहरच केलास. तुझ्या नावा खाली चक्क मेबल टीचरांचा अड्रेस लिहिलास. त्यांनी चिडून जाब विचारला तेंव्हा तू , चेहऱ्यावर कोणतेच हावभाव आणून न देत (keeping a straight face), उत्तर दिलेस, " You had told us that we should not write our own name and address and so I have written some fictitious name and address - the address is all my imagination." आणि तुला आठवते? एकदा तू तुझ्या दोन्ही भुवया शेव करून वर्गात आलास. तुझे कारण तितकेसे मला ध्यानात नाही पण ते गमतीशीरच असावे. सर्व वर्ग हसला होता. मला आठवते मॉरल सायन्सच्या तासात फादर सेक्स एजुकेशन बद्धल चर्चा करीत होते.(आपल्या पाठ्यपुस्तकात आणि अभ्यासक्रमात हा विषय नव्हता) आणि जेंव्हा तू फादर अल्मेडाना म्हणालास, " Father, being a priest, you have never married, then how can you tell so confidently about sex and marriage?", तेंव्हा आम्ही सारे, संपूर्ण वर्ग, हसला असेल. पण तुझा चेहरा - स्ट्रेट फेस. अर्थात फादरनी आपल्या उदहरणे देऊन समजावले की प्रत्येक गोष्ट अनुभवाची किंवा उपभोग घेण्याची गरज नसते. आपल्या सगळ्यांचे समाधान त्यांनी अगदी खुबीने केले होते. पण तुझ्यातला तो खट्याळपणा मला त्यावेळेही जाणवला. जॉकिम, तू काय करतोस मला माहित नाही, पण तू एक कॉमेडी कलाकार, फार्सचा बादशा, जरूर झाला असतास! 

विन्सेंट डिसौझा आणि अशोक फेरॉव, तुम्ही दोघे माझे चांगले मित्र. शाळा संपल्या नंतरही आपली ती दोस्ती  कायम. आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचो - हिंदू व क्रिस्ती धर्मा विषयी, खेळां विषयी, वेगवेगळे इंग्रजी सिनेमा आणि नट- नटी, हॉकी - क्रिकेट - फुटबॉल - सारे कवर करीत आपण तासंतास गप्पा मारायचो. अशोक, तू माझ्या बरोबर क्रिकेट खेळत असे आणि तू, विन्सेंट, मला फूट बॉल खेळण्यास प्रोसाहित केलेस. तुम्ही दोघांनी  शाळेच्या टेबल टेनिस स्पर्धेत मला पाठींबा दिलात आणि तुमच्या सपोर्टमुळे मी अंतिम फेरी पर्यंत जाऊ शकलो. तुमच्या कडून मी बरेच काही शिकलो. पण तुम्ही दोघेही अचानकपणे निघून गेलात. विन्सेंट, तू डेथ बेडवर असताना, मी तू भेटलो देखील पण अशोक, तू तर न भेटताच निघून गेलास. आणि तुमच्या दोघां प्रमाणे आपल्या वर्गातला मधुसूदन झवेरी, होय तोच जो गुजराती असून शुद्ध मराठी बोलत असे, तोही निघून गेला.

इतर सवंगड्या बद्धल लिहिणार मी  आहे. पण सावढीने आणि तोवर आपला प्रवास चालू ठेवूया.


                                                                                      विनय त्रिलोकेकर