Monday 30 July 2018

मलेशियातील प्रवास १) मलेशियात सुंदर स्वागत



मलेशियातील प्रवास 
) मलेशियात सुंदर स्वागत
 
 सिंगापूरने इतके प्रभावित झालो होतो की तेथून पाय काढणे आमच्यासाठी जरा मुश्किलच होते. पण कितीही कठीण वाटत असले तरी आम्हला मलेशिया साठी निघायचे होते. कौलालंपूरच्या  . ५५ ची फ्लाईट पकडण्या करीत आम्ही वाजता सकाळचा नाशाता करून हॉटेल बॉस सोडले. अगोदर सांगितल्या प्रमाणे आमची एक बॅगचे नुकसान झाले होते, बॅग बंद करता येत नव्हती, कशी बशी तिला आम्ही दोरीने बांधली,  त्यासाठी बबल पॅकिंग करणे गरजेचे होते. राईसने आम्हाला गेट नंबर ६ वर सोडली होते. बबल पॅकिंगचे काउंटर बंद होते.  ८. ३० ला उघडणार होते. आमचे टेन्शन थोडे वाढले. 

एअर पोर्ट पी. आर. ओ. (Public Relations Officer) सांगितले,"Don't worry. You go to gate number 17, where the bubble counter is open 24 hours. It is far from here. you take that train. It will take you there in minutes. Get your bag bubble packed and come back." 

माझ्या मनातील विचार - तिकीट काढणे, दोघांनी धडपड करून तेथे जाणे आणि वेळेत परत येऊन चेक इन करणे आणि टर्मिनल २ ला जाणे - हे सारे त्या पी. आर. ओ. ने ओळखले असावेत, " Sir, it will not take time. You don't any tickets to travel. Simply board the train, as the train stops at each station it's gate number will be flashed on the screen inside the train and even an announcement will be made. You can go alone with that bag of yours. She can wait over here till you return. You shoulb be bach within no time."

हे सारे चालू असतांना एक गृहस्थ आमच्या पाशी येऊन म्हणाला, "Hyu babal pack bag? Jus one bag? fas, fas hyu kom. Me man has come kom arly tuday. So me open  d kontar arly."

बबल पॅकिंग झाले. आमच्या दोन्ही बॅगना टॅग लावण्यात आले, चेक इन झाले आम्हाला बोर्डिंग पास मिळाले. 
 हे सारे करून देखील आम्ही टर्मिनल वर खूपच वेळेपूर्वी पोहोचलो होतो. मग काय विचारता - बायकोच्या डोक्यात एक सुपीक कल्पना सुचली! प्रवेश वाटेच्या सजावटीचे फोट घ्यावेत! तुम्हाला माहीतच असेल बायकोची विनंती माझ्या करिता  हुकूम म्हणा किंवा आज्ञा असते. ( ह्यात हसण्या  सारखे काय आहे?) मग सुरु झाले फोटो शूट आणि व्हिडियो काढणे
आम्ही एम एच ६०४ फ्लाईटला फारच उशीर झाला होता , ह्यांत काही अतिशयोक्ती नाही. (the flight MH604 was late, delayed would be an under -statement). टर्मिनल हे दोन भागात विभागले गेले होते - A कौलालंपूर  आणि B हाँग काँग. दोन्हीचे बोर्डिंग सकाळी ११ वाजता एकाच वेळी सुरु झाले
 "First the business class passengers",  घोषणा झाली. आम्ही होतो इकोनॉमीतले माध्यम वर्गीय! चला थांबण्या वाचून आम्ही काय करणार
"Business Class!"

अजून किती वेळ लागणार

बिसिनेस क्लासबिसिनेस क्लास, बिसिनेस क्लास - अशी  घोषणा - वेळा झाल्यावर मला वाटले काहीतरी गडबड आहे. मी उठून काऊंटर वर गेलो आणि म्हणलो, "How long it's going to take? We have been waiting for such along time for Kaula Lumpur flight..."

"Business Class, I sail. Why don uhu seet! I'll kol uhu after." खेकसून माझ्यावर ओरडली. मी माझ्या जागेवर जाऊन बसलो

बराच वेळ झाल्यावर , एक माणूस मला शोधात तेथे  आला

 "Mr. Vinay Trilokekar?,"  हातात माझ्या नावाची पाटी घेऊन विचारात होता. मी ऊठून हात वर केला.


  "Oh, we are waiting for you, sir."

घडलेला सारा प्रकार मी त्याला सांगितला. त्याने काउंटरवरील त्या बाईस खडसावून काहीतरी सांगितले, माझी क्षमा मागितली आणि आम्हा दोघांना घेऊन एरो ब्रिज कडे नेले. आमचा विमानातील प्रवेश अविस्मरणीय होता. आमच्या पुढे चालत होता आम्हाला विमानात घेऊन आलेला तो पर्सर (purser) आणि त्याच्या मागे जात होतो आम्ही दोघे VIP. विमानांतील इतर प्रवाशी आपल्या माना वाळवून आणि स्वतःदेखील वळून  वळून आम्हाला पाहात होते. कदाचित त्या साऱ्यांना वाटले असणार की आम्ही कोणी बडी हस्ती आहोत. खरे सांगायचे तर आम्हाला ओशाळल्यासारखे झाले होते (embarrassed) - आम्हाला लाज वाटत होती. पण आता हे सारे लिहीत असताना माझी विनोदबुद्धी जागी झाले आणि मी एक वेगळ्या नजरेने पाहिले (all together a different perspective). आणि माझ्या कल्पनाशक्तीने हे चित्र असे  उभे केलं. असो. 

आम्ही कौलालंपूरला दुपारी १२. ३० वाजता पोहोचलो, साधारण दीड तास वेळाने. बाहेर एक माणूस हातात पाटी घेऊन आमच्या स्वागतासाठी उभा होता. पाटीवर लिहिले होते :


'Welcome to Malasia
Mr. & Mrs. Trilokekar
Mr. & Mrs. Patel'

आम्हाला एका आलिशान गाडीत (एसी कोच) बसवून तो परत एअरपोर्टच्या दालनाकडे गेला. कदाचित त्या दुसऱ्या दाम्पत्यांना घेण्यासाठी गेला असावा. आमचा अंदाज बरोबर ठरला. एक गोरा गोमटा माणूस चेहरा तांबूस लाल डोक्यावर फेल्ट हॅट, टीशर्ट, शॉर्ट्स आणि पायात स्पोर्ट शूज आणि त्याच्या सोबत असलेली त्याची बायको पंजाबी ड्रेस मध्ये होती. दोघेही पन्नाशीच्या वरचे असावेत. 
आम्हा  चौघांना घेऊन  ड्रायवरने गाडी सुरु केली. आणि सांगू लागला, " Me Sherry. I 'll first take you four to the Batu Caves. आप  फोटो , वीडियो निकालो - Very good place for photography. वहाँ  ਖਾਣਾ  खाणा  खा  लेणा . फिर आपको  केबल कार  स्टेशन छोडूंगा  - I will drop you at the lower Genting Sky Station at Gohtong Jaya, which is actually some 51 Km from Kaula Lumpur - हम  वहाँ  सीधे जाते तो एक घंटे में जा सकटे  हैं  लेकिण  .. we are covering Batu Caves . These Batu Caves...."

शेरी चांगलाच जाणकार वाटत होता. बाटु गुहें बद्धल त्याने आम्हाला बरीच माहिती पुरवली. आम्ही बाटु केव्हस जवळ उतरलो. बाटु गुहेंचा डोंगर ४०० दक्षलक्ष वर्षांचा आहे. हा डोंगर संपूर्ण चुनखडीचा (limestone hill) असून त्याचे नाव सुंगाई बाटु नदीवरून (the river Sungai Batu) पडले आहे. ही नदी डोंगराच्या पायथ्यापासून पुढे जाते.  ह्या गोमबॅक, सॅलँगोर, मलेशियाच्या  डोंगराळ भागात अनेक गुंफा व गुंफा- देवळं आहेत. बाटु गुंफा हे भारता बाहेरील सर्वात लोकप्रिय प्रसिद्ध हिंदू देवासस्थान  होय. बाटु गुंफा ही प्रभू मुरुगन किंवा नाथ सुब्रमनियम म्हणजेच स्वामी कर्थिकेय (आपण कार्तिक स्वामी म्हणतो) ह्यांन समर्पित केली आहे. हे देवासस्थान मलेशियातील थैपुसाम ह्या हिंदू सणाचे केंद्र बिंदू आहे. अशा एकंदर १० पवित्र गुंफा आहेत, ६ आहेत भारतात तर ३ मलेशियात,  इपोह मधील कल्लूमलाई देऊळ (Kallumalai Temple in Ipoh),  पेनांगचे तणनिर्मलाई देऊळ (Tanneermalai Temple in Penang) आणि मलाक्काचे सन्नासीमलाई देऊळ (Sannasimalai Temple in Malacca). येथील गुहेच्या प्रवेशद्वारांवर सुरवातीला स्थानिक ओरँग असली जमातीच्या तेमाऊँ लोकांचे वास्तव्य होते. नंतर साधारण १८६० साली चिनी  वसाहतवला (Chinese settlers) आले.  पण ह्या गुंफेना खरी प्रसिद्धी जेंव्हा ब्रिटिश वसंहितांच्या अधिकाऱ्यांनी (डॅली व सेयर्स) आणि अमेरिकेचे विलियम हॉर्नडे ह्यांनी १८७८ मध्ये ह्या गुफेची नोंद केली. भारतीय व्यापारी के थांबूस्वामी पिलाईने गुंफेतील मुरुगन देऊळानी प्रेरित होऊन ह्या स्थळाला देवासस्थान म्हणून बढती दिली आणि सन १८९० मध्ये डोंगराच्या पायथ्याशी कार्तिक स्वामींची भव्य मूर्तीची उभारणा केली. [पिलाईने कौलालंपूरच्या श्री महामरीयमम देवालयाचीही  स्थापना केली.   (also founded the Sri Mahamariamman Temple, Kuala Lumpur).]

ही मूर्ती १४० फूट उंच आहे. १८९२ पासून थैपुसम महोत्सव जानेवारी - फेब्रुवारी मध्ये साजरा केला जातो. बाटु गुंफेत जाण्यासाठी १९२० साली लाकडी पायऱ्या तयार केल्या होत्या. मात्र आता त्या जागी आता २७२ काँक्रीटच्या पायऱ्या झाल्या आहेत. आमच्या बरोबर होतेते जोडपे २७२ पायऱ्या चढून वर गेले. डोंगरावर अनेक लहान, मोठ्या गुंफा आहेत त्यांत बाटु कॉम्प्लॅक्सच्या ३ मोठ्या गुंफा आणि काही लहान व मुख्य गुंफा. ३ मोठ्यां मध्ये सर्वात मोठी म्हणजे टेम्पल किंवा कॅथेड्रल केव्ह (the Cathedral or Temple Cave), ज्यात अनेक हिंदू देवालय वसतात.   

 पण आम्हा दोघांना इतक्या पायऱ्या चढून वर जाणे कठीण होते. मग आम्ही खालील परिसराचे अन्वेषण (explore) करण्याचे ठरविले. सोबत फोटो व व्हिडियो काढणे चालूच होते. 

डोंगराच्या पायथ्याशी आहेत २ गुंफा - आर्ट गॅलरी गुंफा आणि म्युसियम गुंफा. दोन्ही गुंफेत आहेत हिंदू देवतांच्या मुर्त्या व चित्रं आणि बऱ्याच मुर्त्यात व चित्रात प्रभू मुरुगनच्या दैत्य सूरपदामनवर केलेल्या विजयाचे चित्रण केले आहे. पर्यटकांना ऑडिओ - व्हिडियो टूरवर नेले जाते.  

आम्ही बाहेर पडून एका शाकाहारी भोजनालयात जेवण घेतले. हॉटेलातून बाहेर पडताच मला एक फणसाचे गर (fleshy pods, the sweet edible parts of jack-fruits) विकत असलेला एक फेरीवाला दिसला. गर चांगले मोठे, ३ इंच लांब आणि जाड व लठ्ठ, त्यांचा रंग पण होता नारंगी - पिवळा आणि त्यांचा तो घमघमाट, वाह! वास्तविक फणसाच्या घमघमाटानेच माझे लक्ष वेधले होते. माझ्या तोंडाला पाणी सुटले होते. ३ रिंगिटला आम्हाला भरपूर गर मिळाले. गर सुंदर पिकले होते - सुंदर म्हणणे बरोबर नसेल - ते चांगले पिकलेले होते - They had reached the peak of their ripeness, असे म्हणणे रास्त. अम्म! लव्हली! चवदार, स्वादिष्ट! एक, दोन, तीन... दहा ... बारा, मी खातच होता. प्रत्येक गर होता साखरे सारखा गोड, रसाळ, लठ व  मांसल! माझ्या बायकोने देखील तेव्हडेच खालले असावेत. तो फेरीवाला स्थानिक होता. तो काही लोकां सोबत दक्षिण भारतीय भाषेत बोलत होता (मल्याळम असावी). तो जाणकार होता (very informative). त्याने आम्हाला बाटु गुंफेची, प्रभू मुरुगन बद्धलची आणि फणसा बद्धलची माहिती तर त्याने अशा प्रकारे सांगितलं,  

“Sir, are you Indians? From the north? Jack-fruits are common in the South India, aren’t they?” तो माझ्या उत्तराची वाट न पहाता, पुढे बोलत होता, "Here in Malaysia we call them nangka. Rich in vitamins A, B, C, and many more. Perhaps, all… How many vitamins in all, sir? If there are A to Z, all will be there in our nangka. Lots of minerals too – calcim (calcium) – good for bones, potasim (potassium) and iran (iron) for blood."


आमचे भरपूर गर खाऊन झाले होते आणि तरीही अजून काही उरले होते. कमीतकमी ८ ते १० तरी बाकी असावेत. उरलेले गर आणि फणसांचे गर खाऊन झालेल्या गरांच्या बिया त्याच्या कडून आम्ही बांधून घेऊन त्याचा निरोप घेतला. 
 

 " चलो साहब, निकलें ?" शेरी आम्हाला विचारीत होता. "अब हमें गोहटॉन्ग जया जाणा है - वहाँ आपको जेंटिंग स्कायव्हे केबल कारमें बिठाएंगेल l आधे घंटे में l"
" शेर्री, आप पंजाबसे हो क्या?" मी त्याला विचारले. 
"हाँजी, इसलिए ये पंजाबी गाना लगायियो l मारे पास मराठी गाणा तो नाही हो ना इंग्लिश! और आप कहाँसे हो? इंडियन हो ना? यू फ्रॉम व्हेर?"  आमच्या मागे बसलेल्या त्या जोडप्याला तो विचारीत होता.  

"We are Patels, Gujaratis from England. This our first visit over here,"  एअर पोर्ट पासून ते आता पर्यंत गप्प बसलेला हा माणूस बोलत होता, “though not our first visit to India.”  

 गोहटॉन्ग जया मधल्या लोवर जेटिंग स्कायव्हे स्टेशनला पोहोचलो होतो. ही ५ मजली इमारत आहे. आम्ही चौघे गोंडोला म्हणजे केबल कार मध्ये बसलो. आठ जणांची क्षमता असलेल्या ह्या कॅबिन मध्ये आम्ही चार जाणंच होतो. 

ही मोनो - केबल (एक तारेवर चालणारी) गोंडोला लिफ्ट आम्हाला १७४० मीटर वर असलेल्या जेटिंग हायलँड रिसॉर्टच्या मॅक्सिमस हॉटेल जवळ असलेल्या अप्पर स्टेशनला नेणार होती. ही लिफ्ट जगातील सर्वात जलद धावणारी उद्वाहक (elevator) आणि आशियातील सर्वात लांब. ही २ X ६४० कि W शक्तीने चालणारी लिफ्ट सर्वात शक्तिमान समजली जाते. ती वेग ६ मीटर प्रति सेकंद असतो म्हणजे ताशी २१.६ कि.मी. ह्याची रचना लेईट्नर रोप - व्हेने (designed by Leitner Ropeways) केली आहे आणि संपूर्ण बांधणी  स्वित्झर्लंडच्या कडक नियमानुसार आहे. ह्या ३. ३८  कि.मी. चा प्रवासला १५ ते २० मिनिटे लागतात, अर्थात हे सारे हवामानावर अवलंबून असते. शिखरावरील स्टेशन गाठे पर्यंत   बरेच फोटो व व्हिडियो आम्ही काढले. दरम्यान ह्या २० मिनिटांच्या प्रवासात मिस्टर आणि मिस्सेस पटेलांशी थोडी बातचितही झाली. जास्ती नाही थोडीच. आम्हाला समजले. मिस्टर पटेल नुकतेच वयाच्या ५५व्य वर्षी मोठ्या इंग्लिश कंपनीतून सेवा निवृत्त झाले होते आणि त्यांची पत्नी लंडनच्या एक मोठ्या हॉटेलात मुख्य आचारी (chef) म्हणून काम करत आहे. दोघेही आम्हाला मनमोकळे वाटले नाहीत. असो. 

खाली दिसत आहे तुम्हाला  ते ... पगोडा सारखे दिसणारे... हो तेंच ! ते आहे चीन स्वी गुंफा मंदिर. देवता टॉइस्टचे हे देवालय आहे. ह्या देवता कडे अदभुत आणि अलैकिक शक्ती आहे हवामानांत चांगले बदल घडवणे, पाऊस आणणे आणि वाईट शक्तींना दूर ठेवणे  - अशी भाविकांची समजूत आहे. तूच सुख करता , तूच दुःख हरता! अरेच्चा! हे काय इथेपण? सिमेंट काँकरीटचे बांधकाम जोरात दिसते! इथली नैसर्गिक सुंदरता नष्ट होऊ नये हीच इच्छा!

 ही आमची राईड सोपी, आरामदायी व सुखदायी होती. (आम्हाला माहित होते की हा गोंडालाचा प्रवास एक मार्गी , म्हणजे वन व्हे होता. खाली जाताना आम्हाला  कारने जायचे होते.) गोंडोला लिफ्ट मधून उतरताच आमच्या लक्षात आले की  ते शिल्लक राहिले फणसाचे गर आणि बिया शेरीच्या कोच मध्ये राहिले. वाटले होते अपर स्टेशन वर शिरीच येईल. पण नाही, आला होता जसबीर सिंग. (देव करो आणि आमच्या नंतर बसणाऱ्या प्रवाशांना किंवा खुद्द शिरीला ते पुडक्यातील गर व बिया सापडोत! आणि देवाचा प्रसाद समजून ते गर त्यांनी खावेत.) जसबीरने आमच्या  रिसॉर्ट वर्ल्ड जेटिंगच्या 'फर्स्ट वर्ल्ड' मधल्या चेकिंग - इन चे , वेग वेगळ्या कुपन्सचे ,  तिकिटांचे, इत्यादींचे सर्व काही पहिले.

रिसॉर्ट वर्ल्ड जेटिंगची पांच  पथिकाश्रम (hotels ) आहेत -  जेटिंग ग्रँड हॉटेल, मॅक्सिम हॉटेल, रिसॉर्ट हॉटेल, थीम पार्क हॉटेल आणि फर्स्ट वर्ल्ड हॉटेल (जेथे आमची सोय केली होती). फर्स्ट वर्ल्ड हॉटेल हे जगातील सर्वात भव्य व मोठे हॉटेल (२००६ ते २००८ आणि २०१५ पासून आज पर्यंत) असल्याची गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. (It holds the Guinness World Record as the largest hotel in the world from 2006 until 2008, and again from 2015 on wards). 

फर्स्ट वर्ल्ड हॉटेलात ७३५१ खोल्या आहेत. आमची खाली १७व्या मजल्यावरील १७२६ नंबरची. आंत खोलीत दरवाज्याच्या बाजूला दोन कपाटे , ज्यात खालच्या कप्यात ठेवल्या गेल्या आमच्या बॅग. खोली होती आलिशान. खोलीला भली मोठी खिडकी  आणि खोलीतील ४ ब्लेडचा पंखा, हे दोन्ही बाहेरून डोंगर - टेकड्या वरून येणाऱ्या थंडगार हवेला पूरक होते. खिडकीतून दिसणारा देखावा अवर्णनीय होता. खिडकीला होते सुंदर रंगीत पडदे - भिंतींना व खोलीला मॅच होणारे. खिडकीच्या बाजूला कोपऱ्यात असलेल्या ड्रेससिंग टॅबलेला ४ ड्रॉवर होते, त्यांतील अंकात डिजिटल तिजोरी होती. रूम मध्ये अनेक सुविधा होत्या - फ्लॅट टीव्ही (इन हाऊस फिल्म्स), टेलेफोन, चहा/ कॉफी बजावण्यासाठी एक टेबल [बनवण्याचे सामान- इलेक्ट्रिक किटली, ग्लास, कप , चमचे , स्टरर , इत्यादी आणि साहित्य - कॉफी , साखर ,चहाचे सॅचे (sachet) आणि  निःशुल्क (complimentary) दोन मिनरल पाण्याच्या २ लिटरच्या बाटल्या], दोन २ -सीटर सोफा., डबल बेड व साईड टेबल ज्यावर सुंदर रुबाबदार  दिवा (table - lamp) आणि काचेची  नाजूक पण सुबक फुलदाणी.,  सुसज्ज स्नानगृह (टब , स्टँडिंग शॉवर, फेस व बॉडी वॉश, वेगवेगळे शाम्पू, साबण, टूथ पेस्ट व टूथ ब्रश,  शेवर आणि इतर दाढी करण्याचे सामान), कपडे धुऊन घेण्यासाठी लॉनड्री सेवा होती आणि कसली उणीव किंवा गरज भासलीच तर टेलेफोन वर १# फिरवून रिसेपशनशी संपर्क साधूशकत होतो.


आम्ही खाली आलो. वाय फाय (WiFi access) खाली ओसरीत (lobby) उपलब्द होते. आमच्या मुलांशी फोन वर बोलणे झाले. लॉबीत फिटनेस सेंटर, एक लॉबी कॅफे २४ तास स्थानिक मलेशियाचे  पदार्थ मिळतात), स्पा सेंटरआणि बरेच काही.  

 फर्स्ट वर्ल्ड हॉटेलची ५,००,००० चौ. फूट इन डोअर थीम पार्क असलेल्या फर्स्ट वर्ल्ड प्लाझाशी थेट जोडणी आहे. ह्या   फर्स्ट वर्ल्ड प्लाझा मध्ये अनेक शॉपिंग सिनेटर, अनेक पर्यायी खानावळे, सिनेप्लेक्स, थेटर, ऑर्खेस्ट्रा आणिगाण्याचा मंच (karaoke facilities) , स्नो वर्ल्ड, कॅसिन (casino), स्मृती चिन्ह/ भेटी विकणारी दुकाने  (souvenir shops) आणि असे बरेच काही पाहण्या सारखे . नुकताच नाताळ साला होता पण एक भव्य  क्रिसमस ट्री (huge Christmas tree) सुंदर सजावट असलेली अजून तेथे होती.  छायाचित्रण करण्या करिता ही जागा अगदी योग्य होती तेंव्हा आमचे फोटो सेशन व व्हिडियो शूटींग होणे सहाजिकच होते. जवळच असलेल्या एका रेस्टोरंट मध्ये आम्ही आमचे डिन्नर घेतले आणि नंतर आमचे फोटो काढणे, व्हिडियो शूट आणि सेल्फी सेशन चालूच ठेवले. आम्ही ह्यात इतके मग्न होतो की आम्हाला वेळेचे भान नव्हते. बराच काळ लोटल्या नंतर हॉटेलवर जाण्यास निघालो. आपण आहोत तरी कोठे? कसे आणि कसे हॉटेलला पोहोचलो देव जाणो!

आम्हाला कॅसिनोचे दोन स्लॉट कार्ड मिळाले होते, एक माझ्या नवे व दुसरा माझ्या बायको साठी. आम्ही  कॅसिनो पालथे घातले, पण काय करायचे माहित नव्हते. एक  तो जुगाराचा अड्डाच! आम्ही त्यात थोडे तोकडे आहोत! आम्हाला रिसॉर्ट्स वर्ल्ड जेटिंग ची २ क्लासिक मेम्बरशिप कार्ड पण मिताली आहेत. अशीच पडून आहेत ती.

मात्र २ 'स्नो वर्ल्डच्या' (Snow World)  तिकिटांचा आम्ही पुरेपूर फायदा घेतला. चला, आमच्यातील बालपण जागे झाली होते - ह्या बर्फील्या 'शिखरांवर' एक और मजा होती!

मी तुम्हाला स्नो वर्ल्ड मध्ये घेऊन चालतो. चला तर मग हिवाळ्याच्या विस्मयी आणि नवलाईच्या नगरीत. आमचा उत्साह आणि हुरूप पाहून तुम्हाला आम्ही किशोर वयातले वाटतो ना? इथले वातावरणच असा चमत्कार घडवते. आपण जादूच्या दुनियेचा शोध घेऊया. - चकाकणाऱ्या आणि झगमगणाऱ्या हिमवृष्टीत आपण न्हाऊन निघूया. ही पहा नेत्रदीपक बर्फाची  शिल्पाकृती! ह्या कृत्रिम गल्ली बोळातून फेरफटका मारूया. आभाळात चमकणारे तारे साथीला  हवेत तरंगणारे मोहक आणि मधुर संगीत आणि अंगावर येणारे बर्फीले वारे - सारे कसे आपल्याला परी - नगरीत जात आहेत. त्या खिडकीच्या गोठलेला काचे पलीकडे (frosted window panes) काय दिसते? माद्या - मदिरेच्या बाटल्या, बहुधा स्पेन मधल्या असाव्यात! ही आहे फ्रेंच बकरी, बाजूला इंग्लिश चहाचे दुकान आणि हे आहे इटालियन पिझ्झारिया. हे मला वाटते स्विस चॉकलेट शॉप - हे सारे जगातील वेगवेगळ्या संस्कृतीचे प्रदर्शन असावे. ह्या वर जात असलेल्या पायर्यांवरून वर जाऊया. होय , पायऱ्या थोड्या निसरड्या आहेत. जरा सांभाळून!किती भव्य आहे हा किल्ला! राजमहाल असावा. ह्या  काठेड्यावर काढूयाकी काही सेल्फी.  स्नो वर्ल्ड मध्ये अनेक फोटो आणि व्हिडियो काढले. ( हे सारे  आणि इतर सिंगापूरचे व मलेशियातील फोटो / व्हिडियो आपण माझ्या  पाहो शकता.)

" Uncle, I am Robert and this is Seyni, my fiancee. We are Irish.  I will take photos and videos of you two on your camera," त्या तरुण जोडप्यातील माणूस मला सांगत होता.
"Here have it. By the way I am Vinay and my wife, Vidya." " We are Maharashtrians from India," बायकोने पुस्ती जोडली.
"  We have been observing you two for quite some time now. I was telling Robert how enthusiastic you both are. You were inside before us. Almost everybody has left but for four of us. It will not be good for you two to be in here --- you may not realize ... See that care taker also come to ..."

" Go out you . It's Time for the next batch!"

   संपूर्ण दिवस दमछाक पण मौजेने भरलेला  (hectic day) गेला. तेंव्हा बिछान्यावर अंग ठेवताच आम्हाला गाढ झोप लागली. सकाळी मला लौकरच जाग आली. काही वेळाने बायकोला देखील जाग येऊ लागली होती.  ती पडल्या पडल्या बेडवर चुळबुळ करू लागली. (She had started stirring and fidgeting in the bed.)  मला एक कल्पना सुचली. 

" तुझ्या दिवसाची सुरवात चांगली करतो.  कशी करूया बरे?"

"कशी?"

"बेड -टी  घेणार?" 

"ते पाठवतील?"

"हो,  पण नको.   मी तुझ्या साठी चहा बनवतो आणि will coffee for me. कशी वाटते माझी आयडिया? " 


तिच्या चेहऱ्यावरील  आश्चर्य  बरेच काही सांगून गेले. (The very look on her face said it all.) मी ह्या पूर्वी असे कधीच केले नव्हते. ह्या गोड धक्यातून बाहेर येण्या आधीच मी हाती चहाचा कप ठेवला. माझ्या ह्या पराक्रमाचं फोटो शूट केले. कोणाचा विश्वास बसणार नव्हता - ना माझ्या मुलांचा ना माझ्या भाचे मंडळींचा! (मी कल्पना करू शकत होतो. माझा मुलगा बोलणार, "Just don't believe, डॅडी मिल चहा करून देणार? शक्यच नाही!" त्याला साथ देणार माझी मुलगी, "आणि स्वतः साठी कॉफी करणार? शक्यच नाही! मम्मीनेच केली असेल डॅडी साठी कॉफी." पण सून मात्र बाजूने, "Baba, I believe you!"  माझी सारी भाचे मंडळी, " Impossible! Unbelievable! मामा आणि असलं काम करणार?" ) तेंव्हा पुरावा - दाखल असलेला बारा. म्हणूनच होता फोटो शूटचा खटाटोप. 

आणि सारे असे घडले आणि ते मी आपल्या साठी (Oops, गम्मत केली हो! माझ्या समर्थन करीता!) 
किती मोठे आणि अवघड काम ते! किटलीत पाणी भरून स्विच ऑन केले. कपात दोन साचे साखर झाली. पाणी उकळले की. पाणी कपात गेले. चहाची बॅग ...  डिप, डिप, डिप, डिप, 


[" किती वेळ करणार  हे डिप , डिप .. ... चहा कडू होईल ."]
" बस, झालेच. दूध पावडर  एक की दोन साचे? एक, आणि हा दुसरा. नाही अजून एक घालतो."
वाह दिसतो तरी चांगला!
"Here is your tea!"  
"Mmm! Lovely!"  असेच काहीसे ती उद्गारली असावी

अशाच प्रकारे झाली माझी कॉफी. 


म्ही हॉटेलातून चेक आउट केले. ऑटो चेक आउट होते. अगदी सरळ आणि सोपे. स्लॉट मध्ये आमच्या नंबरचे कार्ड घाला बटन डबा - बस झाले. आम्हाला खाली नेण्यास जसबीरच गाडी घेऊन आला होता. येथून कौलालंपूरकडे जाणारा नागमोडी रास्ता एक तासाचा होता. तो प्रवास मजेशीर, विलक्षण व सुखाचा झाला. ह्या सर्व प्रवासाचे व्हिडियो काढले आहेत आणि ते आपण बघू शकता इथे: मचा नाश्ता हॉटेल वर झाला. 
   https://www.facebook.com/vinay.trilokekar/videos/1459245880772822/

माझा मलेशियाच्या ट्रॅव्हललॉग चालू असणार आहे पुढील भागात . तो वर मी म्हणतो  फ्रेंच मधील
 'Au Revoir'! अहो 'Good - bye ' हो! भेटू या!


 (मी रेकॉर्ड केलेला विडिओ / फोटो  आपण फसेबूक माझ्या ब्लॉग वर बघू शकता )
                                                                                                        विनय त्रिलोकेकर