Monday 30 July 2018

२ - सिंगापुरातला दुसरा दिवस



भाग २ - सिंगापुरातला दुसरा दिवस


आम्ही सकाळचा नाश्ता हॉटेलच्या डिनिंग कक्षेत घेतला. बफे न्याहारीला (buffet ) स्वादिष्ट व भरपूर प्रकार होते. मागच्या भागात सांगितल्या प्रमाणे हॉटेल बॉस मध्ये आम्ही ब्रेक फास्ट घेत होतो आणि लंच व डिनर बाहेर घेत. बॉसच्या स्नॅक बार किंवा रेस्टरॉं [Restaurant (à la carte)] मध्ये नाश्ता होत असे. बफे न्याहारीत इंडियन (उत्तर भारतीय - पंजाबीचे  व साऊथ इंडियन), इंग्लिश , इंटरकॉन्टिनेंटल, ग्लोबल आणि सिंगापूरचे. म्हणतात नाश्ता हा राज्या सारखा असावा आम्हीही तेच करत होता . पण म्हणीचा 'लंच व डिनर' असलेला  भाग मुळीच पाळत नव्हतो. मी (आम्ही नाही) तीन त्रिकाळ अगदी पोट भरून खात होतो. 

लंच - डिनर साठी आम्हाला हॉटेलची निवड करण्या करिता सहा पर्याय (choices) देण्यात आले होते. रात्रीसाठी आमची पसंत बहुसंख्य वेळा ज्वेल ऑफ  इंडिया (Jewel of India Restaurant) उपहारगृह असे. तेथील सजावट,  टेबल - खुर्च्यांची सुबक मांडणी, कानांवर पडणारे मृदू-मंजुळ संगीत (दिवसा जॅझ हा संगीत प्रकार चालतो म्हणे), ताजे, चविष्ट भोजनाचे अनेक प्रकार आणि हॉटेल कर्मचाऱ्यांची आपुलकीची सेवा - ह्यामुळेच आम्ही तेथे बऱ्याचदा गेलो. सकाळचे भोजनसाठी आम्ही उरलेल्या ५ चॉईस घेतल्या. पहिल्या दिवशी गुजराथी दाम्पत्यांची खानावळ झाली. इतर हॉटेल ठीक होती पण त्यांत विशेष असे काही नव्हते. मात्र एक हॉटेल आमच्या लक्षात,  पण चुकीच्या कारणामुळे (all for the wrong reasons). ते हॉटेल होते तंदुरी रेस्टोरंट (Tandoori  Restaurant).  तिथलं जेवण बेताचे - 'ओके' म्हणूया. पण बाकी सारे .... उद्धट वेटर्स, गचाळ व  दरिद्री व्यवस्था, एकूण सारेच होते अगदी करुणास्पद - everything absolutely pathetic and worst service, I would say. असो. 

पॉट भरून आमचा सकाळचा नाश्ता उरकून आम्ही हॉटेलच्या ओसरीत बसलो होतो. एवढ्यात एक जाडजूड माणूस , काहीसा  रागीट व चिडखोर (grumpy) वाटणारा माणूस थेट आमच्या कडे आला. “Mr. Vinay?” माझ्या उत्तराची वाट ही न बघता, आपल्या चिचिड्या आवाजात (sulky voice) तो पुढेस्वरात म्हणाला,  “Common….co..common, let’s go. We are already late. Are you carrying all the papers… show me those papers… Flyer ticket and …I’m Raise. Let’s go.”  त्याचा थोडा लहरी असावा असे मला त्या वेळी वाटले.

आज आमची  अर्द्या दिवसाची 'सिटी टूर' होती आणि त्यात सिंपूरची नावाजलेली 'फ्लायर राईड' (Flyer ride) होती. वाटेत आम्ही एका जोडप्याना घेतले.         
“So, Mr. Shreeram, you have got your papers with you. Haven’t you? Let me see them.”  
 मी मोठ्या मुश्किलीने हसण्याचे टाळले. तो माणूस आणि त्याची पत्नी हसत हसतच आपले कागद पत्र दाखवू लागले. आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली. तो होता नेपाळचा रहिवाशी, श्रीराम शर्मा आणि त्याच्या सोबत होती त्याची पत्नी, मोमिता. 
  “So you are from India. I’ve visited India many times. Have you ever come to our Nepal? No, surprising! Indian and not come to Nepal, very surprising indeed!”  
आम्ही क्षणातच मित्र झालो!
“It appears you have met Mr. Raise before,” मी दबत्या आवाजात (in hushed voice) विचारले. तीन दिवसां पूर्वी राईसने त्यांना एअर पोर्ट वरून त्यांच्या हॉटेलवर नेले होते. नंतरचे आमचे संभाषण हलक्या व हुळूवर आवाजात झाले, जेणेकरून राईसला कोणत्याही प्रकारे दुखावू नये.
“He is very possessive about the papers. That’s okay. But he does make one very uneasy and nervous. Doesn’t he?”  मी विचारलं. 
 “But there is this driver. He took us to Universal Studio. He’s Kumar. He talks non –stop, you know. Have you gone to Universal studio?” 
 कुमार विषयीच्या ह्या मताशी मी सहमत नव्हतो. 
 “No, it is in our itinerary. But there is still time for it. Kumar picked us from the airport. He does talk rather … but I think he is quite informative.”

गाडी भर वेगात चालली होती आणि राईस गप्प राहून गाडी चालवीत होता. 
कुमार आणि राईस मधेय जमीन - अस्मानाचा फरक होता (were poles apart).. कुमार गाडी चालवत चालवत प्रत्येक ठिकाणा बद्धल माहिती देई तर राईसला वारंवार लाडीगुडीने (coaxing) विचारला लागत होते. आम्ही शहराचा फेरफटका करीत होतो. विचारल्याखेरीज तो काही बोलत नव्हता. तो मार्गदर्शक म्हणून साजेसा नव्हता. असो. 

क्रमशः कोणती ठिकाणं आम्ही पालथी घातली हे कठीण आहे. पण ही होती ती ठिकाणे :
  •   सुलतान पॅलेस किंवा ईस्टना कंपॉन ग्लॅम हे सिंगापूरच्या राजघराण्याचे निवास्थान होते. सुलतान हुसेन शाह ह्याने आपले सार्वभौम अधिकार ब्रिटिशांकडे स्वाधीन केले. ह्या अधिकार सोपविण्याच्या ऐतिहासिक कराराच्या प्रतीक म्हणून सुलतानाने १८२० साली कोटा राजा (the King’s Enclave) नामक, एक लाकडी राजमहाल बांधला. आणि १८४० मध्ये त्याच्या मुलगा, सुलतान अली सिकंदरने आज उभा असलेला राजवाडा बांधला. राजवाड्याच्या अवती भवती सुलतानाच्या  नातेवाईकांच्या आणि नोकरांच्या कुटुबांसाठी मलाय पद्धतीची ग्रामीण घरं बांधली गेली. ह्या चार भिंतीच्या आंत दडलेल्या वस्तीत सर्व काही उपलब्ध होते - शाळा आणि महाविद्यालये,  कोटा राजः क्लब नामक एक मोठे सुसज्ज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आणि अनेक कर्मणुकींचे केंद्र. १९०४ च्या ब्रिटिशांच्या वटहुमा प्रमाणे सुलतानाच्या वंशजांना राजवाड्यात राहण्याची मुभा होती आणि ते वार्षिक भत्ता मिळणार होता.आता शासनाने हे सारे ताब्यात घेतले आहे. विस्थापित लोकांना मोबदला दिला गेला.आता त्या राजवाड्याचे रूपांतर मलाय हेरिटेज सेंटर मध्ये झाले.
  • मलाय हेरिटेज सिनेटर मध्ये आपल्याला मलाय इतिहास,  त्यांची संस्कृती आणि येथील कला ह्यांचे दारुचं मिळते. येथे  मलाय सुमुदायने केलेले योगदान, त्यांची संस्कृती आणि सर्व इतिहास ह्यांची प्रदर्शनार्थ मांडणी सुंदर पद्धतीने आणि उत्तम रित्या केली आहे.
  • सुलतान मस्जिद - (मोसम) हा सिंगापूरचा सर्वात महत्वाचे मस्जिद. भले मोठे प्रार्थनेचा दिवाणखाना आणि मस्जिदीवर सुंदर, कोरीव व मोठे सुनेरी घुमट  हे ह्या मस्जिदीचे वैशिष्ट.
  • जालान सुलतान टेक्सटाईल सेंटर   (Jalan Sultan Textile centre)
  • सिंगापूरचे प्राणी घर
  • चांगी चॅपेल (Changi Chapel)
  • क्रांजे युद्ध स्मारक (Kranje War Memorial)
  •  आशिया खंडाच्या संस्कृतीचे  संग्रहालय. इथे पर्यटकांना आशियातील लोक इतर भागातून इथे कसे आले, इथे स्थायिक कसे झाले आणि त्यांची प्रगती कशी झाली, ह्यांचा संपूर्ण हितिहासाची जाणकारी दिली जाते. 
  • बुद्धाच्या दांत - अवशेष  मंदिर (Buddha Tooth Relic temple): हे उंच - अनेक मजली मंदिर चायना टाऊन असून हे मलायातील  बौद्ध धर्माच्या लोकांचे प्रार्थना स्थळ आहे (Malay Buddhist Meditation Centre).
  • ८,००,००० चौ. मीटर  क्षेत्रफळ असलेला ऑर्चर्ड रोड, रस्त्याच्या कडेला लावलेली अँगसणं वृक्ष, त्या झाडांच्या बुंध्यापासून येणारा गुलाबांच्या फुलासारखा सुघंध, ऑर्चर्ड फळांची लागवड  आणि रस्त्या लागत असलेली   २२ मॉल्स आणि ६ डिपार्टमेंटल स्टोअर्स किरकोळ विक्रीचे (Retail Sale) - हे सारे जणू नंदनवनच होय (Paradice).
  • विज्ञान केंद्र (Science Centre)
  • मरीना उपसागर (Marina Bay) आणि मरिना चौपाटी (Marina Beach). ही चौपाटी जगातील सर्वात लांब असून तिची लांबी २. कि. मी . इतकी आहे. बिचवर सुंदर सुंदर पुतळे  आणि अनेक उद्याने आहेत. 
  • सिंगापूर फ्लायर (Singapore Flyer): हे एक भला मोठा ५४१ फूट उंच पाळणा  (a giant Ferris wheel), जायंट व्हील प्रमाणे. २८ एअर कंडिशन खोल्या सारखे पाळणे आणि प्रत्येक पाळण्यात २८ माणसे बसू शकतात. २०१४ पर्यंत सिंपूरचे फ्लायर जगातील सर्वात उंच फेऱरीस व्हील मानले जात होते. ह्याचे बांधकाम तीन वर्ष्यांच्या आत पूर्ण झाले आणि २००८ साली सिंगापूर फ्लायरचे उदघाटन झाले. तीन माजली टर्मिनल बिल्डिंग ही सिंगापूर फ्लायरचाच भाग आहे. 

सिंगापूर फ्लायर नंतर आम्ही चौघांनी एका बऱ्यापैकी खानावळीत लंच घेतले. राईस सोबत पुढील प्रवाळ निघालो. वाटेत आणखी एका जोडप्याला बरोबर घेतले. ते जोडपे म्हणजे कानपूरचे अनुराग भट्टाचार्य आणि त्याची पत्नी निकिता. ते गाडीत बसताच आम्हाला राईसच्या वक्तृत्व कलेचचे  प्रदर्शन पाहावयास मिळाले आणि त्याचा तो ध्यास - त्या जोडप्यांचे कागद पत्र तपासून आणि त्यांना प्रश्न विचारून मगच गाडीत घेणे - त्याच्या ह्या पछाडलेल्या वृत्तीशी आम्ही परिचित झालो होतो.

आम्हाला सहाजणांना घेऊन राईसने गाडी भरधाव सोडली. "We have to go fast now.I have seen all your papers. You are going to the Sentosa Island, which includes Cable Car ride, Luge & Sky Ride, Sentosa Beach and finally you will watch Wings Of Time show," ही सारी माहिती राईसने देता देता प्रत्येक ठिकाणी कसे जायचे, कोणत्या नंबरची बस पकडायची, वगैरे  संपूर्ण तपशील आम्हाला सांगितला. " I will drop you here at Cable Car Habour Point. I will pick you again at the other side of Santosa."असे बोलून त्याने आम्हाला केबल कार हार्बर पॉईंटच्या पायथ्याशी सोडले.

सिंगापूरची केबल कार ही एक प्रतिभाशाली आकर्षण होय. दोन तारेवर चालणारी होडीसारखी उद्वाहक
(bi-cable gondola lift) आहे. ही गोंडोला लिफ्ट सम्पूर्ण संगपूर चे शहर, बंदराचे आणि सेंटोसा बेटाचे एक पक्ष्याची नजर देते. (Presents a bird's eye view of Singapore city, the habour and Sentosa).  सिंगापूर मुख्य बेटावरील फॅबर पर्वताचे शिखर (Faber Peak Singapore) आणि कप्पेलबंदराच्या पलीकडे  असलेल्या (across the Keppel Harbour) सेंटोसा रिसॉर्ट आयलंड (the resort island of Sentosa) ह्यांच्यातील सिंगापूर केबल कार एक १६५०मीटर लांबीचा हवाई दुआ -जोड आहे. संपूर्ण बंदर व्यापणारा हा जगातील पहिलाच रोप व्हे (rope-way) असावा. ह्यात ६ स्टेशन आहेत. केबल कार मध्ये ८१ कॅबिन  ज्यात प्रत्येक कॅबिन मध्ये ६ माणसे राहू शकतात आणि एका तासात १४०० यात्री दोन्ही दिशेने मिळून ने -आण होते. प्रेत्येक राईड १५ ते २० मिनिटांची असते. आपल्याला सुंदर फोटो काढण्याच्या भरपूर संधी मिळतात. कॅबीनच्या ३६० डिग्री खिडक्यांमुळे सर्व पूर्ण व बदलता देखावा बाजुंचा आपण बघू शकतो (Panoramic view).

आम्ही इंबिह लूकआऊट (Imbiah Lookout) स्टेशनवर उतरलो आणि निघालो स्कायलाईन ल्युज कडे.  ल्यूज आणि आकाश सवारी (Sky-ride), असे दोन अद्वितीय व  आगळे- वेगळे अनुभव होते (unique experiences)

सेंटोसा ल्युज हे आशियातले पहिले ल्युज होय. ही अत्यंत मजेशीर आणि धमाल उडवून देणारी  गुरुत्वाकर्षण चालणारी फेरी आहे. ल्युज म्हणजे एकजण बसूशकेल अशी एक चाक असलेली एक गाडी. गाडीत बसायला वयाचे बंधन नाही. १. ४ कि. मी. लांबीचा  ही  उतरण  पार करण्यास चालकाकडेच नियंत्रण असते. खाली जाण्यासाठी चालकाला आपले कौशल्य दाखवायला लागते. ह्या नागमोडी वाटेवर स्टेअरिंग व्हील कसे फिरवायचे, अडथळ्यांवर आपण्या पासून  हॅण्डल - ब्रेक  (पाठी खेचून) मारून कसे थांबायचे, पुन्हा हॅण्डल पुढे करून गाडीला वेग द्यायचा  आणि सुखरूप खाली पोहोचायचे.  फार, फार मजा आली.

 आता आम्हाला घ्यायची होती आकाश सवारी (Sky-ride).  - खरोखर तेथे भली मोट्या पाटीवर लिहिले होते 'Once is never enough'खरोखर स्कायलाईन ल्युज [(ल्युज गाडी सवारी) आणि आकाश सवारी (Sky-ride)] एकदाच करणे मनाला तृप्ती देणे अश्यकच असते. स्काय राईड घेण्यास वयाचे बंधन नाहीच, पण त्याच्या आनंद लहान मुलांपासून आमच्या सारखे जेष्ठ नागरिकही घेऊ शकतात. आकाश सवारी करिता चारजण बसू शकतील असे चेअर लिफ्ट (four seater chairlift). आम्ही भाग्यवान होतो (lucky). आम्हाला मिळालेली चेअर लिफ्ट  केवळ आम्हा दोघां साठीच होती (exclusively for just the two of us). आम्ही वरून एखाद्या पेक्ष्या प्रमाणे पाहत होतो. खाली जंगलातून वाट काढत जात असलेला ल्युज ट्रॅकचा नागमोडी मार्ग,  दक्षिण चीनचा समुद्र आणि  झाडांवर बसलेले रंगी बेरंगी काकाकुआ (cockatoos), सेंटोसा बेटाचे इतर वन प्राणी आपल्या नैसर्गिकअन शैलीत. सारे मनमोहक आणि डोळे दिपवून टाकणारे. 

 अनुराग आणि निकिताने ल्युज राईड आणि स्काय राईड दुसरीनंद करण्याचे ठरवले. तुम्हाला सेंटोसा चौपाटीवर भेटू असे सांगून आमी पुढे निघालो. बस न. २ (मोफत) आम्ही 'विंग्ज ऑफ टाइम' शो साठी बीचवर आलो. सेंटोसाचे प्रवास वर्णन लिहिताना मला असे लक्षात आले की  ' समयाचे पंख'  'Wings of Time' साठी एक वेगळा भाग लिहिणे रास्त ठरेल. 


विनय त्रिलोकेकर















No comments:

Post a Comment