Tuesday 7 August 2018

२ ) कौल लंपूर मध्ये

 
) कौला लंपूर मध्ये 



जसबीर सिंग आम्हाला घेऊन जेटिंग हायलँड च्या फर्स्ट वर्ल्ड गाडीने खाली कौला लंपूरच्या दिशेने नेत आहे. तो मोटार गाडी अतिशय कौशल्यपूर्णतेने काळजीपूर्वक चालवत आहे. त्याची ड्राइव्ह करण्याची खुबी वाखण्या सारखी आहे कारण हा १८ कि. मीटर रस्ता नागमोडी आणि वेडीवाकडी धोकादायक वळणे घेत
एका वळणावर रेती आणि खडी टाकलेला बाजूला जात असलेला छोटा मार्ग - उतरंडखाली जात आहे.
“ Jasbir bhai, what are those sand and gravel- filled lanes for? वह रास्ता पुराभी नहीं। देखो निचे
वह पूरा रास्ताभी नहीं है, थोड़ा निचे जाता है…... ८ - १० फिट।और आगे जाके हम जारहे है वही रास्तेसे मिलता है, बराबर?

 “They are ‘escape ramps'. These emergency ramps enable vehicles, especially the heavy ones, that having braking problems to safely stop, the deep gravel reduces the momentum of the vehicles in a controlled and relatively harmless manner, so the driver can stop safely,” 

आपल्याला सिंगापूर आणि कौला लंपूरचा मोटार गाडीने प्रवास करतांना एक गोष्ट सातत्याने जाणवते ती म्हणजे तेथील वहतुकेतील शिस्त - विनाकारण हॉर्न वाजवणे किंवा रांग तोडून पुढे जाणे असे प्रकार होत नाहीत आणि वाहतूक सुरळीत चालते आणि आपला प्रवास सुखरूप, खुशाल आणि सुखकर होतो. दुसरी लक्षणीय बाब ही की येथील एकंदरीत व्यवस्था - वाहतूक पोलिसखाते व सिंगापूर / मलेशियातील वेग वेगळ्या शासकीय- बिनशसकीय खात्यांतील सांगड. सिंगापूरचे रस्ते बांधणीचे काम सिंगापूर लँड ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी देखरेखी खाली होते. नवीन रस्ते - फ्लाय ओव्हर, हाय व्हे , भुयारी, लहान - मोठे रस्ते ह्या सर्वांचे बांधकाम साधणे, त्यांची मरंमत व दुरुस्ती करणे - हे सारे सिंगापूर लँड ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी सांभाळते. दोन्ही कडे बांधकाम जोरात सुरु आहे - गगन चुंबी इमारती, रस्ते, पादचारी पूल, रहदारीचे ब्रिज - पण इतके  कंस्ट्रक्शन चालू असून सुद्धा वाहतुकीला व रहदारीला कोणताच अडथळा येत नाही. हे सारी बांधकामा भवती उंच प्लायवूडच्या फळ्या उभारण्यात येतात आंत जोरात काम चालू असते. पण चिखलाचा एक थेंब, मातीचा एक कण बाहेर येत नाही. 
माती, दगड, धोंडे, मलमा , चिखल, वगैरे भोवतालच्या प्लायवूडच्या फळ्या आंतच रहाते आणि रस्ता कोरडा राहातो. (A lot of construction is going on, for which barricades in form of huge wooden planks lining the roads and constructions / repairs are carried out inside and nothing – dirt, mud, debris, rubble, etc. doesn’t come on the road and everything moves smoothly.) सारे कसे स्वछ. वेगळी स्वछता मोहीम राबवला लागत नाही. 

जसबीर आपल्याला हा भरपूर नागमोडी आणि वळणदार मार्ग पार करत झपाट्याने पण काळजी पूर्वक खाली नेत आहे.   एकी कडे वाहन चालकाचे कौशल्य तर दुसरी माणसाचे हा रस्ता तयार करण्यात स्थापत्यशास्त्रातील कसब - मोठे आश्चर्ये होय!  हा डोंगर भागातील चित्तवेधक निसर्गरम्य देखावा पाहात पाहात, प्रचंड बाक वेडीवाकडी वळणे घेत आपण खाली जात आहोत. हा सर्व निसर्गाचा नजारा - लहान- मोठ्या झाडांनी सजलेले  डोंगर आणि दाट झाडेझुडे ताजी व ताटावीत वृक्ष- वनस्पतींनी भाहरलेल्या दऱ्या पाहत , फोटो घेत घेत आणि व्हिडियो काढीत खाली येत आहोत. कैक वेळा एखादा देखावा पुन्हा पाहण्या साठी आपल्याला मान वाळवून गाडीच्या मागील काचेतून पाहत राहण्याचा मोह होणे साहजिक असते.

"साभजि यहाँ मलेसियामे हम सारे बिलकुल  तालमेलसे  और  आपसमे मधुर संभंधसे  रहते है। मलया लोग, भारतीय , चाईनीज  और सारे।  ये मलेशियन  बहुत  स्नेहशील, शिथिल और तनाव मुक्त स्वाभावके लोग है। मलेशिया  के ११ प्रांत  - स्टेटस  ओर  २  संघीय यानि केंद्रशासित  जैसे कुआलालंपुर और पुत्राजया।  भिन्ता देखो - गगनचुमी स्काय स्केपर्स  और सुन्दर छोटे माकन - ऊँचे ऊँचे  पर्वत  और घाटी और जंजाल बस्ती। "


भूक तर लागलीच आहे तेंव्हा थेट हॉटेल जयपूर मेहेल जाऊन बफे जेवण घेऊया. ह्या राजस्थानी भोजनालयाची सजावट आणि शोभावस्तू म्हणा किंवा आपल्याला लागलेली प्रचंड भूक आपण बरेच खाऊ शकलो!

" विनय साहेब, आपका साथ  बहुत  अच्छा लगा. यहाँ का खाना कैसा लगा? बहार शेरी आया है।  वह आपका ख्याल रखेगा।  "

 जसबीरचे आम्ही आभार मानलेच पाहिजेत. खरोखर तो एक चांगला मार्गदर्शक आहेच ज्यांनी आमची चांगलीच खातरदारी   केली जसे रिसॉर्ट वर्ल्ड जेटिंगच्या 'फर्स्ट वर्ल्ड' मधल्या चेकिंग - इन चे , वेग वेगळ्या कुपन्सचेतिकिटांचे, इत्यादींचे सर्व काही पाहणे, पण त्याच बरोबर तो एक उत्तम, सुरक्षित व खात्रीचा मोटर चालक आहे. 

 खरोखर मनःपूर्वक धन्यवाद, जसबीर!   .


" विनय साहब, कैसा रहा आपका  फर्स्ट  वर्ल्ड  का  एक्सपेरिंस? खाणा - पीणा ? मजा टो  आणि  तिही ! क्या अच्छा लागियो, गोंडोला ऊपर जाणा या  जसबीर के गाड़ीमें  निचे आणा ? माळूम है , गोंडोला ! बराबर? गाडी मा  आणा जाणा  होता है।  हम आपको हॉटेल ग्रँड सीझन्स  ड्रॉप  करते है।  ४ बजे कोई बाँदा एके आपको पुत्रजया  टूर वास्ते आवेगा। " 

 हॉटेलात चेक इन झाले. २ वाजले आहेत. २ तास शिल्लक आहेत. १४ मजल्या वरील रूम नुंबर १४२७ मध्ये  जाऊन ३ - ४ फोटो काढणेच पण बायकोची  ' ब्राईट आयडिया ' - बेडवर लोळणे आणि चक्क गाड झोपी जाणे!

आम्ही लॉबी मध्ये थांबलो आहोत... ४ वाजले... ५ वाजले... आता ६ वाजत आले आहेत! टूर कुओर्डीनेटर, विकास शर्माशी संपर्क साधण्याचा केविलवाणा प्रयत्न! तूर असिस्टंट, संदीपच्या फोन वर  दुसराच इसम सांगतो, की संदीप इंडियाला गेलेला आहे आणि विकास कोठेतरी बाहेर गेलेला आहे. पुत्रजया टूर उद्यावर गेली आणि डिन्नरचे काय? आमच्या मुलीद्वारे गेट आऊट हॉलिडेसच्या प्रकाश बरोबर संपर्क आणि आम्हा त्याच्या कडून हा मॅसेज : I have already raised this issues strongly and they apologized and promised to take corrective measures. I always value my guests so I also apologies for this in incident🙏🏽 Your Putra jaya tour has been rescheduled for tomorrow. Someone will pick you for dinner at 9 pm.
लोबितली सजावट अप्रतिम आहे आणि लिफ्ट लॉबीची सजावट  नीटनेटकी आहे.

 चला हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर पाहूया. हॉटेलचे हे द्वार पहा - -मनमोहक फुलांची सजावट आणि रंगीत दिव्यांची रोषणाई - इथे फोटो सेशन झालेच पाहिजे! बाहेरील गार्डन पण सुंदर! चला बगीचा बघून झाला असेल तर बाहेर जाऊया. डावी कडून सुरवात करूया. रस्त्याच्या सोमोरील इमारत आहे पेमएलईडीईकन पेरुबुटंन (Penyelidiikan Perubutan- Institute For Medical Research). आपण बरेच चाललोकी. हूश! दमलो! ह्या बस स्टॅन्डवर बसुया- लोरोंग  बस स्टॅन्ड आहे हा.  इथेच बसून राहिलो तर कसे होईल? हे आहे जालान लुमुत (काय आहे, कोण जाणे?)  (Jalan Lumut) आणि बाजूला आहे रेस्टोरन लोंऑन्ग किआ [Restoran Loang Kea (Restaurants are spelt Restoran both in Singapore and Malaysia)] . वरून जात असलेली मोनो रेल पहा. आता आपण आलो   VUE  जवळ, हे आहे  रहिवाश्यांच्या निवासस्थाना करिता सेवासंस्था (Residences Serviced Suites). पलीकडे समोरच्या रस्त्यावर आहे  कौला लंपूर हॉस्पिटल.  बापरे, आपण बरेच चाललोकी. मागे हॉटेलवर जाऊया. 

ड्रायवर अमन   घेऊन वेळेपूर्वी ८. ३० ला आहे. पण हे काय! त्याच राजस्थानी जयपूर मेहल हॉटेलातच! ( इथे नमूद केले बरे - लंच असो किंवा डिन्नर  तेच ते आणि तेच ते , एकच उपहार गृह -  जयपूर मेहल एके   जयपूर मेहल,  सिंगापूर सारखी निवड करण्याची मुभा नाही. काय हो, ह्या गाडीचालकांचे आणि हॉटेल मालकांचे संगतमन - लागे  बांधे तर नसावेत? कैक वेळा ती लोकं आपल्या परिवारा बरोबर किंवा मैत्रिणीं सोबत येत असत.) जेवण चांगले आणि स्वादिष्ट आहे. चला आता गाडीत बसून हॉटेल गाठूया.

 [ हॉटेल वर पोहोंचताच मी गेट आऊट हॉलिडेसच्या प्रकाशला  सिंगापूरच्या आणि मलेशियातील त्यांच्या टूर  समन्वयकांच्या लापरवा वृत्ती बद्धल ( समक्ष कधीच नाभेटणे किंवा आमच्याशी संपर्क न साधने) तसेच अजून पर्यंत मलेशियातील आम्हाला मिळालेले बेशिस्त ड्रायवर आणि त्याच बरोबर सिंगापूर  आमच्या चांगलय अनुभवा समंधी, आणि शेरी व जसबीरने केलेल्या सेवे बद्धल ईमेलने कळवले.]

या, हे आहे हॉटेल ग्रँड सीझन्सचे स्नॅक बार. घेऊया बफे नाश्ता. ब्रेक फस्टला बरेच प्रकार आहेत - स्वादिष्ट देखील. आज आपली अर्ध्या दिवसाची शहर टूर आहे. - १० पासून दुपारच्या २ पर्यंत. गाडी घेऊन अमनच आला आहे. आपल्या कार्यक्रमातील पहिले स्थळ  पुरातन वास्तू असलेली मिनारा कौला लंपूर बुरुज किंवा कौला लंपूर टॉवर (संक्षिप्त  नाव के.  एल. टॉवर) ह्या टॉवरची उंची ४२१ मीटर (१३८१फीट ) आहे. असे म्हणतात की टॉवरचे बांधकाम ४ वर्षात पूर्ण झाले- १९९५ साली. टॉवर दळणवळणाच्या उद्दिष्टसाठी उभारण्यात आले आहे. आणि त्या करिता टॉवरच्या शेंड्यावर एक लांब स्पर्शा किंवा संवेदनाग्र म्हणजेच ऐन्टेना आहे. ३३५ मीटरवर टॉवरच्या बंडाला एक फिरते (स्वभवती फिरणारे) रेस्टोरंट आहे, मात्र ते सर्वांसाठी खुले नाही. वर आणि खाली जाण्या करीत जिने व लिफ्ट आहेत.  हे जगातील  सर्वात  बुरुज होय. ऐतिहासिक इस्लामिक वारसा लाभलेल्या ह्या टॉवरचे सारे बांधकाम, आंतील रचना ते बाहेरील सजावट अगदी कौलं आणि लाद्या वैशिष्टपूर्ण इस्लामिक फुलांच्या रचनेवर आधारित आहेत.आजचा पहिला टप्पा पूर्ण झाला. आता शहराचा फेरफटका मारायला निघूया - सिटी टूर. 

अमन चांगला  नाही. तो आहे फक्त एक चांगला चालक - एक सुरक्षित व चांगला ड्रायवर- पूर्णविराम! आणि त्याचा स्वभाव पण मनमिळाऊ, मोकळा व अनुकूल मुळीच नाही. असो. 

दुसरा टप्पा आहे नॅशनल वस्तुसंघ्रलाय. हा ४५ मिनिटांचा व्हिडियो - माहितीपट दौरा आपल्याला  मलेशियाच्या समृद्ध  इतिहासाचे दर्शन घडवून आणतो - अगदी पुरातन काळा पासून ते स्वातंत्र्या पर्यंत. एका खाणकारांच्या वसाहती पासून मलेशिया कसे विकसित होऊन एक आधुनिक शहर बनले ह्याचा संपूर्ण आढावा आपल्या समोर मांडला जातो. येथील स्थापत्य मध्ये पाश्चात्य वासहितचा हिस्सा, पौर्वात्य वास्तुकला, मूरिश वास्तुशास्त्र मोगल व इतर इस्लामी डौल; ह्या सर्वांच्या स्थापत्य चक्रव्यूहातून आपले डोळे दिपून जातात. प्रमाणा बाहेर होणाऱ्या गर्दीमुळे आणि होणाऱ्या अतिदाट वस्तीमुळे १९९९ साली शासनाचे कार्य क्षेत्र कौला लंपूर पासून पुत्रजयात हलविण्यात आले. 'पुत्रजया' हे नाव मलेशियाचे पहिले पंतप्रधान, टूनकु अब्दुल रेहमान पुत्र, ह्यांना आदरांजली होय. असे असले तरी कौला लंपूर हे मलेशियाची राजधानी आहे. इथे ८९. ८ % इस्लाम धर्माचे लोक, ७. ८% ख्रिश्चन, २. १% बौद्ध धर्माचे आणि ०. ३% हिंदू आणि इतर.  ह्या माहितीपटा द्वारा आपल्याला समजते मलेशियाची राजधानी असलेला कौला लंपूर कसे उंच गगन चुंबी इमारतींनी व्यापलेले असून देखील पाश्चात्य, पौर्वात्य आणि स्थानिक वास्तुशास्त्र टिकवले आहे. इथे अपरिमित /असंख्य नैसर्किग .आकर्षण आहेत. हे अनेक जिल्ह्या मध्ये विभागले आहे (divided into numerous districts) . इथे अनेक केंद्रस्थाने असून त्यांत तीन मुख्य होत (being the  main hub , ज्याला सोनेरी त्रिकोण (the Golden Triangle) असे म्हणतात आणि ती आहेत - बुकीत बिनटॅन्ग, के. एल. सी. सी. आणि चायना टाऊन (Bukit Bintang, KLCC and Chinatown). ह्या माहितीपटात मध्ये कौला लंपूर मधील अनेक लॅन्ड मार्क्स व प्रेक्षणीय स्थळांचा उल्येख आणि त्यांच्या बद्धलची माहिती दिली जाते - जसे पेट्रोनास ट्वीन टॉवर (जगातील सर्वात उंच ट्वीन टॉवर) ,पेटेलिंग स्ट्रीट फ्ली मार्केट बाटु गुंफा, पॅव्हेलियन के. एल. सी. सी. (शॉपिंग मॉल), सुरिया  के. एल. सी. सी.आणि असंख्य  मॉल्स आणि रिसटॉरंटस जिथे आपल्या विचारा पलीकडचे स्वादिष्ट खाद्य पदार्थ 

हे आहे टुगु पेरींग्टन नेगरा मलेशिया, हे मलेशियाचे राष्ट्रीय स्मारक आहे. हे स्मारक मलेशियाची सांघिक  राजधानी,  कौला लंपूर मध्ये स्तिथ आहे. ह्या राष्ट्रीय स्मारकाच्या समोर आहे ते सिनोटाफ, (Cenotaph, as we all know, is a monument erected in honour of a dead person whose remains lie somewhere else. It is a sculpture that commemorates those who died in Malaysia's struggle for freedom, principally against the Japanese occupation during WorldWar II and the MalayanEmergency, which lasted from 1948 until 1960) आपणासर्वांना माहित असेलच 'सिनोटाफ' म्हणजे हे स्मारक काही व्यक्तींच्या स्मृती व आदरांजली निम्मित उभारण्यात येते. ज्यांच्यासाठी उभारले जाते त्यांची नवे स्मारकावर कोरली जातात. त्यांच्या मृत देह / पार्थिव देह मात्र ह्या जागेवर नसतो. हे येथील स्मारक ज्यांनी  ज्यांनी स्वातंत्र्यासाठी, आपल्या प्राणांची आहुती मलेशिया साठी दिली - जपान विरुद्ध दुसऱ्या महा युद्धात १९४८ ते १९६० मालयान आणीबाणीच्या काळात आणि राष्ट्राच्या स्वतंत्र लढ्यात. स्मारकाची संकल्पना तत्कालीन  प्रधानमंत्री, टूनकु अब्दुल रेहमान पुत्रा अलहज ह्यांनी १९६३ साली मांडली. त्यासाठी लेक गार्डनची ४८,५६२ चौरस मीटरची जागा राखीव ठेवण्यात आली. .ह्या स्मारकाचे सात हासेच्या मुर्त्यांची घटक आहेत. ह्या  ब्रॉन्झच्या स्मारकाची रचना अमेरिकी शिल्पकार फेलिक्स डी वेल्डन ह्यांनी केली असून हे स्मारक १९६६ च्या सुरवातीला पूर्ण तयार झाले. आणि ८ फेब्रुवारी १९६६ला त्याचे अनावरण झाले. त्या दवसापासून दार वर्षी ३१ जुलैला (म्हणजे 'योद्धा दिवसं') पंतप्रधान, लष्कर व पोलीस प्रमुख स्मारकाला मानवंदना देऊन धारार्थी पडलेल्या आपल्या वीरांना फुलचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहतात. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी प्रथमतः बांधले ते १९१४ ते १९४५ पर्यंत लढाईत मारले गेलेल्या त्यांच्या सैनिकांनच्या स्मरणार्थ. काही असो, पण हे काही सैनिकांचा समूह असलेले स्मारक व्यथा, त्याग व स्वार्थत्याग,  नेतृत्व, ऐक्य व एकजूट, जागरूकता,शक्ती व ताकद आणि धडाडी व शौर्य ह्यांचे  प्रतिकात्मक आहे. ह्या स्मारकावर 'जाटा नेगारा' इंग्रजी कोट ऑफ आर्म्स आहे [The Coat of Arms of Malaysia (Jata Negara in Malay)] आणि त्यावर कोरले आहे ' स्वतंत्रता आणि शांती साठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा वीरांसाठी हे स्मारक समर्पित आहे.अल्लाहचे आशीर्वाद त्यांच्या वर सदैव असोत!'

वास्तविक कोणत्याही राष्ट्राचा युद्ध हा सर्वात दुःखाचा क्षण  (the saddest moment) असतो आणि त्या देशाच्या इतिहासातील  शोकांतिकेचा व अनुकंपनीय (tragic part) असा भाग असतो. तरीही अशा रीतीने आपल्या लढाईत धारार्थी पडलेल्या वीरांचे ऋण मानून त्यांचा गौरव करणे आणि त्यांना आदरांजली वाहणे ह्यांत शासनाचा तसेच मलाया लोकांचा आविर्भाव आहे. ह्या वीरांचे बिलिदान व स्वार्थत्याग व्यर्थ नव्हता, त्या सर्व लढ्यातून एक मोठे राष्ट्र उभे राहिले!

 टुगु पेरींग्टन नेगरा मलेशियाच्या संपूर्ण परिसराचे पांच मुख्य घटक आहेत; १ मलेशियाचे राष्ट्रीय स्मारक,
२ सिनोटाफ (वॉर मेमोरियल), ३ कारंजे, ४ मंडप आणि ५ भवतालची उद्याने. 

चला ह्या उद्यानांत बसुया जरा वेळ.

" I want to have a selfie with you. May I?" एक चिनी महिला विचारणा करते.
"Yes, by all means, you may. Only if my wife permits.
"There is no need for my permission.  And will have your photos for our keepsake."
कदाचित माझ्या मध्ये तिला तिचा भाऊ दिसला असेल. जागतिक बंधुभावाला सलाम!  Cheers to universal brotherhood!

तिचे नाव होते हेलन यु. पण खरोखर हे तिचे नाव होते का? आणि तिने दिलेला ईमेल आय डी तरी खरा आहे का? मी तिला ईमेल पाठवला देखील पण त्याला उत्तर आजगत आले नाही

Dear Helen Yu, 
(Of course, you wouldn’t mind my addressing you thus; or should I stick to the formal ‘Ms Helen Yu? Had you been a French national, I would have found it more confusing with ‘Tu’ and ‘Vous’.)
How are you? [身体怎么样?Shen Ti Zen Me Yang?] According to the traditional Chinese Lunar calendar, 2017 marks the Year of Rooster (this I learnt in Singapore, where the country was gearing up to celebrate it in a big, big way.) Your New Year has commenced on 28th January. The Rooster is the 10th sign in the Chinese Zodiac, and is considered, I am told, a symbol of fidelity or loyalty. And according to the year I was born, I fall in the 11th sign of the Zodiac and it is The Dog.  It makes me: Loyal, sociable, courageous, diligent, steady, lively, adaptable, and smart. Ha,ha!
My wife, Vidya joins with me in wishing you and all your dear ones 'A happy, healthy and prosperous New Rooster Year and many years to come'!
Do you remember us, my wife and me? May be these photos will. It was a chance meeting. But it could be a new beginning of friendship with someone from our neighbouring country just the way it has happened between this couple, Shreeram and his wife Mamiata,  from Nepal and us
You too have our photos and some others from your Malaysia / Singapore journey. May be we could exchange some interesting ones. 


Do write about the Chinese New Year (including your take on it). From whatever little that I know, Originating during the Shang Dynasty (17th - 11th century BC), the festival used to be observed to fight against the monster "Nian" who liked to eat children and livestock. The monster was afraid of red color and loud sound. Therefore, people decorated their houses in red and set off firecrackers to expel it. It is a Spring or Harvesting festival. We too have a similar festival in the month of January. Makar Sankranti is a harvest festival celebrated in India, Nepal and parts of Bangladesh in various cultural forms, during the month of January. It is one of the most auspicious days for Hindus all over India and in other countries. It is celebrated with pomp and devotion in almost all the states of India in various forms, from the north to the south. Traditionally many taboos are associated with the New Year Festival, but in recent years some of them have been discarded, especially among the modern urban populations in larger cities and the younger generation. More about the festival later on. 
With regards, 
Vinay and Vidya
माझ्या ह्या चिनी बहिणीचे काय झाले देव जाणे!

 

चला गाडीकडे. आपल्या सांगितल्या प्रमाणे अमन हा केवळ एक चांगला चालक आहे. त्याच्या कडून मार्गदर्शनाची काय अपेक्षा! गाडी सोडली झूम आणि आले आपला चौथा टप्पा -  चॉकोलेट फॅक्टरी म्हणे! कारखाना कसला, हे तर साधे दुकान- शॉप. वाटले होते इथे चॉकलेट  तयार होतात हे दिसेल. इथे तर अनेक फडताळे (शेल्फ) आणि त्यांत अनेक वेग वेगळ्या चॉकोलेट्सनी भरलेली तबक (ट्रे ). अनेक आकारांची, वेगवेगळ्या रंगांची चॉकलेट्स दाखवण्यात आली आणि त्यांच्या किमतीही सांगण्यात आल्या. पण स्वाद घेण्यासाठी- चाखण्या करिता - एकही नमुना नाही. आपण मुंबईतील कखान्यांना भेट दिली आहेत का? आपण शाळेत असताना गेला असाल. क्वालिटी किंवा जॉयच्या आईस क्रीम फॅक्टरीत आईस क्रीम तयार कसा होतो ते पाहिल्यानंतर प्रत्येक शाळकरी मुलांना एक कँडी मिळत असे. कॅडबरी फॅक्टरीतही तोच अनुभव. काही वर्षांपूर्वी आमच्या एन.जी ओ. (संस्थेतील) मुलांना फॅक्टरी व्हिसिटला नेले होते. तेंव्हा त्यांनाही तसाच चांगला अनुभव आला होता. मलेशियाचे पर्यटन विभाग ह्या कडे लक्ष देते का? त्या मानाने आपले टुरिझम डिपार्टमेंट आपल्या उद्योगांची चांगली मांडणी करते. ह्या गाडीचालकांचे आणि येथील  मालक / प्रमुखकांचे  संगतमन - लागे  बांधे तर नसावेत? कारण ह्या इथे शिरताच आमच्या हातही त्या प्रामुख्याने एक मोठे पार्सल दिली - कट / कमिशन? आम्ही विकत घेतलेला चॉकोलेटचा पुडा काही खास नव्हता.


 टप्पा नंबर ५ - ईस्टना नेगरा, अर्थात राष्ट्रीय राजवाडा [Istana Negara (National Palace)], जे  आहे बादशहा यॅन्ग डी परतुअन अगॉन्ग (Yang di Pertuan Agong) ह्यांचे अधिकृत  वसतीस्थान. हे १९२८ साली बांधण्यात आले. सुरवातीला हे एका चिनी  लक्षाधीशच्या राहण्याचे ठिकाण होते. नंतर १९४२ ते १९४५ जपानने मलेशिया व्यापले होते तेंव्हा जपानी अधिकाऱ्यांची खानावळ (Japanese officers’ mess) म्हणून वापरली गेली. जपानच्या शरणागती नंतर  सेलँगोर राजसरकारने ते विकत घेऊन,  नूतनीकरण केले आणि हे सेलँगोर सुलतानाचे (His Majesty the Sultan of Selangor) १९५७ पर्यंत वसतीस्थान झाले.  नंतर सांघिक सरकारने ते विकत घेऊन त्याचे बादशहा यॅन्ग डी परतुअन अगॉन्ग साठी ईस्टना नेगरा मध्ये रूपांतर केले. 

९८ हेक्टर क्षेत्राचा आणि २२ कळस/ घुमट  असलेला राजवाड्याचा परिसर  ३ मुख्य भागात विभागला आहे. 
 औपचारिक विभाग (Formal Component),  राजाचा (बादशहाचा ) (Royal Component) विभाग  आणि  कारभार विभाग (Administration Component). बादशहाचा विभाग पर्यटकांसाठी खुला नाही. हा विभाग कुंपणाने वेढला आहे. इथल्या मूळ द्वारा पाशी दोन तरतरीत ब्रिटिश शैलीचे युनिफॉर्म मधले घोडेस्वार राज-  द्वारपाल (Royal Calvary guard), एक डावी कडे तर दुसरा उजवी कडे, पहारा देत असतात. दोघांच्या बाजूला आहेत एक एक चौकी. चौक्यांना सुंदर नक्षीदार कमानी आणि दिमाख्यात उभे असतात शुभ्र पांढरे गणवेशधारी  रक्षक. पांढरे जॅकेट व पांढरी विजार असा आहे त्यांचा युनिफॉर्म. उभे असलेले रक्षक पारंपरिक सोन्या-चांदीच्या धाग्यामुळे लुकलुकणारे सारोंग किंवा सॉन्गकेट आपल्या कंबरेला बांधतात.  हेच पर्यटकां करिता एक मोठे आकर्षण असते. यहाँ  दो -चार सेल्फी तो बनतेहि है।

 पुन्हा गाडीत आणि आपण वेगाने जात आहोत ही सारी स्थळे पाठी सोडत - संसद भवन, राष्ट्रीय मॉस्क, स्वातंत्र्य चौक, पेट्रोनास ट्वीन टॉवर्स, मर्डेका चौक .... आमच्या साठी ही सारी केवळ नावेच! आणि हॉटेलवर परत. अमनचे रात्री डिनर साठी उशिरा येणे आणि त्याच राजस्थानी जयपूर मेहल हॉटेलातच नेणे हे सांगण्याची गरज नाही. त्याचे नाखुशीने का होईना आम्हाला चायना टाऊन  सोडणे हेच पुष्कळ झाले. 

चला मारूया फेफटका ह्या नावाजलेल्या बाजार पेठेत. ह्याला चायना टाऊन का म्हणतात देव जाणे. ९० % व्यापारी चिनी नसून इतर आहेत आणि त्यांत बांगला देशी अधिक. असो. 

एक चामड्याच्या वस्तूंचे दुकान - शोभेच्या वस्तू, बेल्ट्स, पर्सिस, घडल्याचे पट्टे, बॅग्स - सर्व काही. 
 " ही बॅग चांगली दिसते ना? घेऊ या का? आपल्या मुलीला नक्की आवडेल."


 बॅग दिसते सुंदर व मजबूत. आकार गोल एकाद्या ढोलकी सारखी. माप - लांबी डिड फूट आणि रुंदी गोल आकाराचे व्यास ८ ते १० इंच. पण.... पण किंमत १७५ रिंगगिट्स (रुपये ३०००/-). 
" घेऊयाच. फक्त १७५ला तर आहे. "

मोबाईल वर माझी गणना चालू - १७५ रिंगगिट्स म्हणजे ३००० रुपये की! बापरे महाग वाटते. मोबाईल वरून बॅगचा फोटो , तपशील (मॅप आणि किंमत) मुलीला  व्हाट्सअँप करणे उचित. 
"Daddy, have you already bought it . It's very costly. No. Good! Don't buy. आपल्या कडे पण मिळतात अशा बॅग आणि कमी किमतीत. "

ह्या दुकाना जवळ बरीच गर्दी दिसते. बऱ्याच बायका घोळका करून आहेत. गाऊन्सची विक्री चालू आहे. मोबाईलच्या गणनयंत्र वरून त्यांचा हिशेब चालू.रिंगिट  (ringgits) चे रुबल (rouble) मध्ये रूपांतर आणि मग दुकानदारा बबरोबर सौदा - घासाघीसी चालू आहे- त्या स्त्रियां मोठमोठ्याने वाटाघाटी करीत होत्या आणि रिंगिट व रुबल हे शब्द कानी पडत होते. रुबल म्हणजे रशियाचे चलन हे मला माहीत होते. 

"ह्या बायका  रशियाई आहेत!" मी मोठ्या बढाईखोरपणे अनुमान केला. काय तो शिक्षित अंदाज हो!
 

हा आहे फळ विक्रेता. कितीही वेग वेगळी फळे - कधी न पाहिलेली देखील आहेत. ही फळं काजू फळासारखी दिसतात. एक किलो ला १० रिंगिट्स. चला घेऊन बघूया. एक गुंड मवाली आम्हाला धक्का देत फळांनी भरलेली एक टोपली उचलून पलीकडे ठेवलेल्या फटफटीवर बसून छू ! आणि त्याच्या मागे फळ विक्रेता धावत, ओरडत,   " Thief, thief, #*@# ! My  fruit baskit . He run  with my baskit. Catch d thief. Thief, thief, #*@# #4#$ !" त्याच्या मागून पळत होता. हा होता एक निष्फळ  पाठलाग. बघता बघता पार नजरेआड झाले आणि क्षणार्धात अक्षरशः हवेत विलीन झाला.

 हॉटेल वर जाण्या साठी टॅक्सी पकडली.  मलाय (Malaysian) टॅक्सी ड्राइवर, सांसुई फारच बोलका होता. " Sir, have you witnessed the robbery? It is a regular feature over here in China Town. That guy was a drug addict - good for nothing - he spoils our name. Did you see many Chinese vendors? No. There aren't many. Most of them are Bangla-deshis.  The name should now be changed to Bangla Town from China Town, ha, ha !"
तो आम्हाला सांगत आहे कसे सरकार त्याच्या मुलांच्या शिक्षणाचे पाहते,  " Free education , you see. Government has provided me with free  accommodation. When redevelopment  of our house was undertaken they had provided us with alternate accommodation, a good one and we moved into our old place- it's better and bigger than our original house. What else do you want? We are quite happy with our government. "

आपण आता हॉटेलवर आलो आहोत. झोपण्या पूर्वी खिडकीतून  फोटो शूट आणि व्हिडियो सेशन झालेच - आमच्या खिडकीतून सिटी टूर ट्वीन टॉवर्स, नेत्रदीपक झगमगणारे  नियॉनचे दिवे, खालून जात असलेली मोनो रेल गाडी, सर्व काही!

ह्या ट्रॅव्हलॉगचा  अंतिम भाग अजून बाकी आहे. पुढच्या भागात भेटू तोवर गुड बाय!
[सिंगापूर आणि मलेशियात मी काढलेले फोटो / व्हिडीओ आपण  फेस बुकवर  शकता. ]
                                                                                               विनय त्रिलोकेकर

email id : vbt1946@yahoo.co.in
mob. 7506376746 /9987595865









































































































































































































































































































































































































































































































































 















After dinner  he drives us back to the hotel. 
 It's our third day in Malaysia and the second in Kuala Lumpur. In the morning we have a nice, tasty buffet breakfast.
 ur half- day city tour with KL Tower entry is rescheduled from 10 am to 2.00 pm. As the luck would have it, we have this driver Aman again. He takes us to Jaipur Mahel again. 

We go to KL Tower, The Kuala Lumpur (Menara Kuala Lumpur, Abbreviated as KL Tower) is a tall tower having a total height of 421 metres (1381 feet). Its construction, they say, took some four years and completed in 1995. It is used for communication purposes and for which there is an antenna reaching the top. The roof of the pod is at 335 metres and the rest of the tower below has a stairwell and an elevator. At the top there is a revolving restaurant, which is not open for general public. It is without doubt the most famous  monument in Kuala Lumpur and 7 tallest tower in the world. It reflects the country's Islamic Heritage. The tiles are decorated with typical Islamic flower motifs.   
 Then we proceed for the city tour. 


Aman isn’t much of a guide, he is more of a driver – a driver full stop! He isn’t friendly either. Our first halt is the National Museum. It’s 45 minutes affair – an interesting canter through the rich history of the country from prehistoric times to independence. How Kaula Lumpur developed from a small tin Miners Settlement to a growing modern city currently. It takes you through a maze of interesting architecture of Oriental and colonial part, Moorish, Mogul and Islamic styles. It tells you how in 1999 the seat of government was shifted from Kuala Lumpur because of congestion and overcrowding to Putrajaya (Federal Territory of Putrajaya). We learn that Putrajaya is named after the first Prime Minister of Malaysia, Tunku Abdul Rehman Putra and also from its meaning in Sanskrit –Victory of the Prince (पुत्र = Prince & जय = Victory ).  It tells more about this planned city and how it is the federal administrative centre of Malaysia, though Kuala Lumpur remains the capital and the seat of the King and the Parliament. Kuala Lumpur is the commercial and financial centre. About 92.8 % follow Islam, 7.8 % Christianity, 2.1 % Buddhism and 1.0 % Hinduism with 0.3% being non religious or follow some other religion. 

How Kuala Lumpur, the capital city of Malaysia, boasting gleaming skyscrapers, colonial architecture, charming locals, and a myriad of natural attractions. Divided into numerous districts, its main hub is called the Golden Triangle which comprises Bukit Bintang, KLCC and Chinatown. How it  is widely recognised for numerous landmarks, including Petronas Twin Towers (the world’s tallest twin skyscrapers), Petaling Street flea market, and Batu Caves, which is over 400 million years old, with frequent sales events throughout the year, expansive shopping malls like Pavilion KL and Suria KLCC, and with abundance of gastronomic delights – with thousands of hawker stalls, cafes and restaurants serving every imaginable type of delicacies. 

We like the décor in the lift lobby.
 https://www.facebook.com/vinay.trilokekar/videos/1476757162355027/

https://www.facebook.com/vinay.trilokekar/videos/1476739985690078/ 
&  https://www.facebook.com/vinay.trilokekar/videos/1476757162355027/
Please try these URL video links given above. 
 Here we come to Tugu Peringatan Negara Malaysia (National Monument of Malaysia). In front of the National Monument is the cenotaph. Cenotaph, as we all know, is a monument erected in honour of a dead person whose remains lie somewhere else. It is a sculpture that commemorates those who died in Malaysia's struggle for freedom, principally against the Japanese occupation during WorldWar II and the MalayanEmergency, which lasted from 1948 until 1960. It is located in the Federal capital, KualaLumpur. The idea for the construction of the National Monument of Malaysia (Tugu Peringatan Negara) (Tugu Peringatan Negara) was mooted by the then Prime Minister of Malaysia, YTM Tunku Abdul Rahman Putra Alhaj in 1963 to commemorate the warriors who died defending the sovereignty of the country. An Area measuring 48,562 square metres facing the Lake Gardens was set aside for its construction. The monument complex encompasses five main components; the National Monument, fountains, pavilion, a war memorial and the surrounding gardens. The monument embodying seven bronze statues also represents the triumph of the forces of democracy over the forces of evil. The monument was designed by an American sculptor, Felix De Weldon and was completed in early 1966. It was unveiled on 8th February of the same year and from then on a ceremony to commemorate the passing of the warriors is held here annually, on 31st July on Warrior’s Day, when the Prime Minister, heads of military, and the police pay their respects to the fallen heroes by laying garlands at the monument. 


Originally built by the British administration, it is dedicated to honor their fallen soldiers in war from 1914-1945, there are the inscription of the names of those fallen soldiers as a tribute to their sacrifices.
 The bronze sculpture shows a group of soldiers symbolizing leadership, suffering, unity, vigilance, strength, courage and sacrifice.It has the Malayan Coat of Arms with inscriptions that says: Dedicated to the heroic fighters in the cause of peace and freedom, May the blessing of Allah be upon them.
War is usually the saddest moment and the most tragic part the history of any nation. However, it's a good way to imbibe the rich history of Malaysia in this manner, a nice gesture from the government to acknowledge and honor those who perish during the wars. There are some things that are worth remembering despite the tragic circumstances. The lives sacrificed thus were not for nothing, something good has come out of these wars.



















 
This is the beautiful surrounding garden.  







Let's sit for some time" I want to have a selfie with you," she says. She even seeks my wife permission, also shares her email details with me. May be I remind her of her brother ... Cheers to universal brotherhood! "And your photos for our keepsake," says my wife.
 Let's go to the car.




















This is not a tour. This is a driver with a vehicle who in our case is hours late! He drives us from one point to another, giving little to none information and takes to places, we don’t want to go, like this Chocolate (he calls it factory, when it is just shop)... bullshit ...it's just a shop. [Again I shall take this matter with Mr. Prakash. I feel there some cuts for the drivers. I see the in charge of this outfit giving a huge packet to our driver. Our chocolate factory are much worth visiting, (I have been during my schooling days and I have taken children from our NGO) and our Tourism department make a show case of industries.







































 What's next? Straight to.....
Aman drives us our next stop,which is the Istana Negara (National Palace), the official residence of the Yang di-Pertuan Agong, the monarch of Malaysia and which was  The palace complex has an area of 97.65 hectares, 22 domes, and is split into three main portions: the Formal Component, Royal Component and Administration Component.  It was built in 1928 and was originally the residence of a Chinese millionaire. During the Japanese occupation from 1942-1945, it was used as the Japanese officers’ mess. After the surrender of the Japanese, the building was bought by the Selangor State Government. It was then renovated to become the palace of His Majesty the Sultan of Selangor until 1957. Subsequently it was bought by the Federal Government to be turned into the Istana Negara for the Yang di Pertuan Agong, the Malaysian King. The area is fenced up and at the front of the gate are two guard posts where members of the Royal Calvary guard the entrance. The palace is not open to the public and the main entrance with
he mounted royal guard at the gate is one of the main attractions for visitors to the Istana.
 Beside each guard house for the mounted guards in their British-style uniforms there is a smaller rectangular structure with an arch. Those two small shelters are just big enough to protect the standing guards from the weather. Those standing guards wear traditional white sarongs. A traditional sarong would be a length of fabric wrapped around the waist, and Malay men would wear sarongs woven in a check pattern. Those guards however wear white uniform (jacket and trousers), and a so-called Songket wrapped around the waist. This Songket is a shorter piece of precious brocade fabric which makes it – worn over a sarong or a Baju Melayu - stand out of the background with its shimmering texture, due to the use of gold and silver threads. A Baju Malayu normally consists of a shirt and trousers.
t

No comments:

Post a Comment