Monday, 30 July 2018

भाग ३ समयाचे पंख [WINGS OF TIME] (संगपूरला गेलात तर जरूर बघा)


भाग ३ समयाचे पंख [WINGS OF TIME]
       (संगपूरला गेलात तर जरूर बघा)

सेंटोसाचे प्रवास वर्णन लिहीत असताना माझ्या ध्यानांत आले की 'समयाचे पांख' किंवा 'वेळेच्या पंखावरून' अथवा पंखावरून काळाच्या पलीकडे '[Wings of Time'], एक वेगळा भाग म्हणण्या पेक्षा एक स्वतंत्र अध्याय असला पाहिजे. तो आमचा सिंगापूरातील दुसरा दिवस, नेमके सांगायचे झाले दिवस होता १७ जानेवारी, २०१७. दुपारचे जेवण उरकून, आम्ही म्हणजे आम्ही दोघे आणि आमचा नव्याने परिचित झालेला मित्र परिवार - नेपाळ दांपत्य, श्रीराम शर्मा व मोमिता आणि कानपूरच्या जोडपे, अनुरूप भारतीय व निकिता; आमच्या गाडी चालक राईस सोबत सेंटोसा बेटाच्या दिशेने निघालो. एखाद्या सराईत मार्गदर्शिका प्रमाणे राईसने केबल कार, स्कायलाईन - ल्युज, सेंटोसा बेट, चौपाटी आणि 'विंग्स ऑफ टाईम' ह्या सर्वांची माहिती देत आणि गाडीवर संपूर्ण ताबा ठेवत, गाडी वेगाने नेत आम्हाला केबल कार हार्बर पॉईंटच्या पायथ्याशी सोडले.
केबल कारने आम्ही इंबिह लूकआऊट (Imbiah Lookout) स्टेशनवर उतरलो आणि निघालो स्कायलाईन ल्युज कडे.  ल्यूज आणि आकाश सवारी (Sky-ride), असे दोन अद्वितीय व  आगळे- वेगळे अनुभव होते (unique experiences). केबल कारचा अनुभव देखील अविस्मरणीय होता. ह्या साऱ्या बद्धल दुसऱ्या भागात सविस्तर लिहिले आहे. 
 अनुरूप आणि निकिताने ल्युज राईड आणि स्काय राईड दुसऱ्यांदा करण्याचे ठरवले असल्या मुळे आम्ही चौघे बस न. २ पकडून पुढे निघालो. आम्ही चौघे बीचवर येऊन  'विंग्स ऑफ टाईम' शोसाठी रांगेत उभे राहिलो. गर्दी बरीच होती. आमच्या पुढे १०- १५ लोकं असावीत, पण पाठी मागे बरीच मंडळी. साऱ्यांना पद्धतशीर रित्या आंत सोडले जात होते. धक्काबुक्की किंवा रेटारेटी नाही. कोणताही गोंधळ नाही. ह्याला म्हणतात शिस्त! सारे काही शिस्तबद्ध असल्यामुळे आम्ही लौकरच आंत गेलो.  
कदाचित 'Wing of Times' हा जगातील एकमेव कायम स्वरूपी रात्रीचा खेळ/प्रयोग असावा (the only permanent night show in the world) जो एका खुल्या सुमुद्ररुपी पडद्यावर दाखवला जातो. आम्ही ६ जाणं प्रयोगासाठी रांगेत उभे राहिलो. आमच्या पुढे १० एक लोकं असावी. पाठी मागे बरीच मंडळी होती. साऱ्यांना पद्धतशीर आंत सडले गेले, धक्काबुकी किंवा रेटारेटी नाही. कोणताही गोंधळ नाही. ह्याला म्हणतात शिस्त! समुद्र किनाऱ्याच्या काही अंतरावर अर्धवर्तुळात प्रेक्षकांसाठी बाकडे / खुर्च्या  मांडल्या होत्या - एखाद्या स्टेडियम किंवा सर्कस मध्ये असतात त्या प्रमाणे. बरेच प्रेक्षक वर चढून मागील खुर्च्या पटकावू लागले. आम्ही मात्र तसे न करता पहिल्या रांगेतील बाकाडांवर ठाण मांडली. आमच्या पुढे कोण्ही नसल्यामुळे फोटो काढणं व व्हिडीओ शूट करणे मला सोपे झाले. प्रेक्षक अजून आंत येतच होते, पण ते सारे आमच्या पाठीमागून जात होते, समोरून कोण्ही नाही. मला फोटो काढण्यास कोणताही अडथळा येत नसल्याचे जाणून मी फोटो शूट करू लागलो:

अरे हे काय ? का कोणास ठाऊक, समोरील दृश्य पाहून मला मॅक्सिकन आणि इटालियन खाद्य पदार्थांची आठवण झाली. मी शेजारीच बसलेल्या ममीतला विचारले, "Mamita, have you ever eaten 'tacos'?"

 "Why, of course! Those traditional Mexican - corn or wheat tortilla folded triangular things with some fillings, I simply love them. Those things right in front of do remind us of them, don't they?"
ती म्हणाली.

"
मला ते  नॅचोस  ('nachos' )किंवा मॅड अँगल  ( 'Mad Angles') सारखे अधिक वाटतात ,"  माझ्या  बायकोने उत्तर दिले. आम्हाला वास्तविक नेत्र सुख घेयायचे होते मग अश्या वेळी आम्ही खाद्य पदार्थांचा विचार का करीत होतो?  (Why were we thinking gastronomically?) कदाचित आम्हा साऱ्यांना भूक लागली असावी, हा हा!

संयोजकांचा वक्तशीरपणा वाखाण्याजोगाच होता. बरोबर आठच्या ठोक्याला कार्यक्रमाला सुरुवात झाली. सारे घडू लागले आमच्या समोरील  खुला भव्य -दिव्य सागर समुद्रवर आणि  ते देखील  'larger-than-life' पाणीरुपी वाईड पडद्यावर,  ७० एम एम पडद्याचा कितीतरी पट रुंद अशा पडद्यावर घडत होते - घडणारे सारे चित्त थरारक होते. एक  साधी-सुधी काल्पनिक कथा - परी कथा म्हणा - पण तिची मांडणी काय सांगू! सारे अंगावर एक रोमांच उभे करणारे होते. ३डी प्रोजेक्शन वापरून मल्टी मीडिया इफ्फेटआणणे, लेसर बीम, रोबोटिक पाण्याचे फवारे व चिळकांड्या (ह्या फवाऱ्याचे व चिळकांड्यांचे पाणी थेट आमच्या तोंड-अंगावर वारंवार उडतही होते आणि म्हणूनच आम्हाला थेट त्या परी कथेत गेल्यागत वाटत होते) आणि परी कथेतील नेहमीचे घटक- माया-जादू, गूढता, शौर्य आणि प्रेम विणून तयार झाली ती 'विंग्स ऑफ टाईम'. आत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून ECA2 ह्या जगप्रसिद्ध फ्रेंच मनोरंजन कंपनीने सेंटोसातील स्थानिक तंत्रज्ञांसोबत ह्या अवॉर्ड विंनिंग 'विंग्स ऑफ टाईम' ची निर्मिती केली आहे. मला आजही फेरी टेल्स आवडतात - माझ्या आतले लेकरू बाहेर  येते. त्यामुळेच हे सारे बघता - बघता हा ७० वर्षाचा माणूस ७ वर्षाचा झाला! असो. 

आणि मी हे सारे व्हिडियो शूट करू लागलो.  

 समोर वाळूवर किशोर वयातील मुलं बागडत आहेत. कोण आहेत ती? ही चुणचुणीत मुलगी कोण?
 ही आहे रचेल. ती आहे चौकस, जिज्ञासू, सहासी आणि उत्सुक. ती किनाऱ्यावर असलेल्या खडक आणि दगड न्याहळत बारकाईने पाहत पुढे - पुढे बिनधास्त धावत आहे. 

 हा कोण तिच्या मागे मागे धावत आहे, बरे? थोडा भित्रा वाटतो? होय!
हा आहे फेलिक्स. वाटतो खरा भित्रा आणि भ्याड. पण आंत दडलेल्या त्याच्या शौर्याची त्याला जाणीव होईल. पण कधी ? अहो, जरा धीर धारा.


होय, फेलिक्सचा स्वभाव रचेलच्या अगदी उलट. तो जरी भित्रा आणि पुराणमतवादी असला तरी आहे तो अतिशय प्रेमळ.

“रुचेल , रुचेल , आहेस तरी कोठे तू ?”
“कोण, फेलिक्स का ? 
“हां , तर येथे आहेस तू !”

 “
माझा पाठलाग करतोस कीकाय ?”

 “
वर्गातील सारे तुला शोधीत आहेत .”
 “हे ठिकाण पहा .मी तुला काही दाखविते .किनाऱ्यावरचे हे विचित्र आणि विक्षिप्त खडक बघ . चल जवळून पाहूया ”

 “
त्यांत  नवखे असे काय? साधे दगड तर आहेत ते.”

"
पण मला हे अद्भुत आणि अनोळखी  दगड जवळून न्याहाळाचे आहेत . किती मोठे आहेत हे ! चल , शक्य असेल तर पकड मला."
 “नको .थांब!”
“घाबरत असशील तर दुसरे आहेत त्यांच्या बरोबर रहा . इतका भित्रा-भागुबाई  राहू नकोस . ”
“रुचेल, थांब  wait… माझ्या साठी  थांब !” असे म्हणत तो तिच्या मागे धावत सुटतो. 
  
“ऊं हां !”

फार उशीर झालेला दिसतो. अखेर ती धडपडून पडते. आणि समोर हा कोण? एक गूढ प्राचीन कालीन पक्षी रुपी भला मोठा प्राणी!

 
हा आहे शाहबाझ. त्याच्या कडे आहेत काळाच्या पलीकडे नेणारे जादूचे पंख. 

  " बापरे! कोणरे तू?"
" मी आहे शाहबाझ ! मी नुकताच जागा झालो आहे  एका  दीर्घकालीन झोपेतून. होय, हजारो वर्षांच्या निद्रेतून! आता मला केवळ  सुरवातीच्या काळात आणि माझ्या घरी परत जायचे आहे , बस. "

 "
आणि ते तुम्ही  कसे करणार?"
 "अर्थात माझ्या ह्या पंखां वरून !"

“
वाह, ह्यात मोठे साहस वाटते ! मी तुमच्या बरोबर येऊ शकते ?”
 
 “
रचेल ! काय ग , तुझे डोके ठिकाणावर तर आहे ना ?”

 “
ही , ही , ही ! (फिदीफिदी हसत म्हणते) अहो शाहबाझ राजे , तसे मी आहे रचेल  आणि हा आहे माझा मित्र  फेलिक्स ”
 आणि दोघांना आपल्या पाठीवर घेऊन उडू लागला!
 
 " काळाच्या प्रवाहातून तुम्ही वाटचाल कशी काय करणार , आम्हाला सांगणार का ?"

  "
माझ्या पंखांमुळे, अर्थात!"

(
चला उडूया त्यांच्या सोबत)
आणि उडू लागला शाहबाझ आणि त्याच्या पाठीवर रचेल आणि फेलिक्स - आणि झाला सुरु त्यांचा प्रवास -(आणि त्यांच्या बरोबर आपला देखील) काळाचे रहस्य उलघडत, शतका मागे शतके ओलांडत - निघाले एकविसाव्या शतका पासून पलीकडे.  ती पहा खाली उंच -उंच स्काय  स्कॅपर्स, उडाण पूल, मोनो आणि मेट्रो गाड्या - अरे, ते पहा 'ट्वेन्टीएथ सेंचुरी फॉक्स' ग्लोब चिन्ह. सारे पाठीमागे गेले की.
 
 "हे पहा! आपण येत आहोत १९व्या शतकातील ग्रेट ब्रिटन मध्ये. आता माझी रनिंग कॉमेंटरी बंद केलेलीच  बरी."


सादर केलेजाते आपल्या समोर येते कलात्मक रीतीने सादर केलेले एकोणिसाव्या शतकातील ब्रिटिश औद्योगिक क्रांती - एकमेकात गुंतलेली ही काटेरी चक्र (गिअर), वरखाली होत असलेले दट्टे आणि तराफे आणि त्या सर्वांचा होणार खणखणाट. 
 
 “
किती  अविश्र्वसनीय ! फेलिक्स बघ , आपण आता  रेशमी रास्ता  ह्या युगा पर्यंत आलो आहोत .”
[ ख्रिस्ता पूर्वीच दुसरे शतक ते चौदाव्या शतकाच्या शेवंता पर्यंत, ह्या काळात देवाणघेवाण आणि व्यापाराचा मार्ग पूर्वेतील चँगऍन (आता झीऍन) म्हणजे चीन पासून पश्चिमेतील रोमन साम्राजा पर्यंत जोडला होता. आणि रेशीमाचा व्यापार अधिक असल्यामुळे १८७७ च्या दरम्यान जग प्रसिद्ध  जर्मन भूगोलकर, फ़ेर्डिनंड फॉन रिचतोफेन (Ferdinand von Richthofen) ह्यांनी ह्या मार्गाला रेशमी रास्ता  (Silk Road) असे नाव दिले आणि ह्या युगाला पण हेच नाव पडले. केवळ व्यापाराचा नव्हे तर चीन, भारत,पर्शिया ग्रीक आणि रोमन संस्कृतींची देवाणघेवाण झाली. मायान पिरॅमीड हे माया लोकंना वास्तुकला ३००० वर्षा पूर्वी पासून अवगत होती पुरातनवास्तुशास्त्रीय दाखल देतात. असो. ]

 “ती पहा पाण्या खालचे जग .”

 “आणि हे बघा आफ्रिकेतले  सवान्ना .”
[
सवान्ना किंवा सवानाह ही एक कुरण आणि अरण्यप्रदेश अशी संमिश्र पारियावरण व्यवस्था होय. म्हणून वन्यजीवन आणि झाडी झुडपे फार. ]



रचेल खाली पाण्यात पडते. फेलिक्स तिला वाचवण्या साठी पंखांवरून पाण्यात उडी घे तो.
 “
ओ ! रचेल, रचेल! ”
फेलिक्सला आपल्यातील अंतर शक्तीची जाणीव होते. आणि रुचेलला लक्षात येते की फेलिक्स नक्कीच भित्रा नाही.

मग तिघांचा पुढील प्रवास चालू राहातो. पंखांवरून काळाच्या पलीकडे!

 "...
आपण प्राचीन काळात म्हणजे माझ्या मायदेशा जवळ आलो आहोत, आणि मला आता विरामाची गरज आहे ...हूश ! "

 “
कदाचित कोणीतरी मदत करेल. ”

 "
मीच एक मोठा  रक्षणकर्ता आहे !"
आणि सुरु झाले एक अर्थपूर्ण गाणे : [ गाण्यात यमक नव्हते. पण लय आणि लयबद्धता होती. तसेच पाश्र्वसंगीत सुरेख होते. आणि गाण्याचे बोल आमच्या वर्तमान परिस्थितीला साजेसे होते.] गाणे इंग्रजितच जसेच्या तसे ठेवीत आहे. ] 
When you are travelling far from home,  don’t be scared! (आमचा पण घरापासून लांब प्रवास होता )
When you are travelling far from home, don’t be scared!
You are not alone (अर्थात मी एकटा नव्हतो, सोबत माझी बायको होती. हा,हा!)
You are not alone.
Find Courage, find courage in you (आम्हा दोघात 'ते' ठासून भरले आहे! हा,हा!)
Courage within you!
Let the dream come true!
Keep on hoping! Dream will come true!

 Keep on hoping!

 Keep hoping! Keep hoping! Keep hoping.......

आणि घर आले शाहबाझचे ...... 
 "पुरातन काळ ! हं, आलो एकदाचे घरी! आपल्या सहवासा बद्धल आभारी!"

“
किती रम्य आहे इथे !”
 “होय. पण आपल्या पार्टीचे काय ?”

  "
चिंता नसावी. मी व्यवस्था कारेन."

शाहबाझ होतो अदृष्य. पण रचेल आणि फेलिक्स जादूने येतात वाळूवर! एकमेकांचे हात पकडून निघून जातात.



 “
ओ , फेलिक्स ! काय साहस होते !”

 (
मी रेकॉर्ड केलेला विडिओ आपण फसेबूक वर बघू शकता )
                                             एक गोड अंत 
गोष्टी शेवट झाला तरी कार्यक्रम संपला नव्हता. जोरदार दारूकाम झाले. (त्याचेही विडिओ शूट आपण फसेबूक वर पाहू शकता).अशा रीतीने आमचा सेंटोसातील तो दिवसाची सांगता झाली. ह्या विंग्स ऑफ टाईम ने आम्हा सर्वाना संमोहित केले आणि डोळ्यांचे पारणे फेडले!


                                                                                                              
विनय त्रिलोकेकर

२ - सिंगापुरातला दुसरा दिवस



भाग २ - सिंगापुरातला दुसरा दिवस


आम्ही सकाळचा नाश्ता हॉटेलच्या डिनिंग कक्षेत घेतला. बफे न्याहारीला (buffet ) स्वादिष्ट व भरपूर प्रकार होते. मागच्या भागात सांगितल्या प्रमाणे हॉटेल बॉस मध्ये आम्ही ब्रेक फास्ट घेत होतो आणि लंच व डिनर बाहेर घेत. बॉसच्या स्नॅक बार किंवा रेस्टरॉं [Restaurant (à la carte)] मध्ये नाश्ता होत असे. बफे न्याहारीत इंडियन (उत्तर भारतीय - पंजाबीचे  व साऊथ इंडियन), इंग्लिश , इंटरकॉन्टिनेंटल, ग्लोबल आणि सिंगापूरचे. म्हणतात नाश्ता हा राज्या सारखा असावा आम्हीही तेच करत होता . पण म्हणीचा 'लंच व डिनर' असलेला  भाग मुळीच पाळत नव्हतो. मी (आम्ही नाही) तीन त्रिकाळ अगदी पोट भरून खात होतो. 

लंच - डिनर साठी आम्हाला हॉटेलची निवड करण्या करिता सहा पर्याय (choices) देण्यात आले होते. रात्रीसाठी आमची पसंत बहुसंख्य वेळा ज्वेल ऑफ  इंडिया (Jewel of India Restaurant) उपहारगृह असे. तेथील सजावट,  टेबल - खुर्च्यांची सुबक मांडणी, कानांवर पडणारे मृदू-मंजुळ संगीत (दिवसा जॅझ हा संगीत प्रकार चालतो म्हणे), ताजे, चविष्ट भोजनाचे अनेक प्रकार आणि हॉटेल कर्मचाऱ्यांची आपुलकीची सेवा - ह्यामुळेच आम्ही तेथे बऱ्याचदा गेलो. सकाळचे भोजनसाठी आम्ही उरलेल्या ५ चॉईस घेतल्या. पहिल्या दिवशी गुजराथी दाम्पत्यांची खानावळ झाली. इतर हॉटेल ठीक होती पण त्यांत विशेष असे काही नव्हते. मात्र एक हॉटेल आमच्या लक्षात,  पण चुकीच्या कारणामुळे (all for the wrong reasons). ते हॉटेल होते तंदुरी रेस्टोरंट (Tandoori  Restaurant).  तिथलं जेवण बेताचे - 'ओके' म्हणूया. पण बाकी सारे .... उद्धट वेटर्स, गचाळ व  दरिद्री व्यवस्था, एकूण सारेच होते अगदी करुणास्पद - everything absolutely pathetic and worst service, I would say. असो. 

पॉट भरून आमचा सकाळचा नाश्ता उरकून आम्ही हॉटेलच्या ओसरीत बसलो होतो. एवढ्यात एक जाडजूड माणूस , काहीसा  रागीट व चिडखोर (grumpy) वाटणारा माणूस थेट आमच्या कडे आला. “Mr. Vinay?” माझ्या उत्तराची वाट ही न बघता, आपल्या चिचिड्या आवाजात (sulky voice) तो पुढेस्वरात म्हणाला,  “Common….co..common, let’s go. We are already late. Are you carrying all the papers… show me those papers… Flyer ticket and …I’m Raise. Let’s go.”  त्याचा थोडा लहरी असावा असे मला त्या वेळी वाटले.

आज आमची  अर्द्या दिवसाची 'सिटी टूर' होती आणि त्यात सिंपूरची नावाजलेली 'फ्लायर राईड' (Flyer ride) होती. वाटेत आम्ही एका जोडप्याना घेतले.         
“So, Mr. Shreeram, you have got your papers with you. Haven’t you? Let me see them.”  
 मी मोठ्या मुश्किलीने हसण्याचे टाळले. तो माणूस आणि त्याची पत्नी हसत हसतच आपले कागद पत्र दाखवू लागले. आम्ही एकमेकांची ओळख करून घेतली. तो होता नेपाळचा रहिवाशी, श्रीराम शर्मा आणि त्याच्या सोबत होती त्याची पत्नी, मोमिता. 
  “So you are from India. I’ve visited India many times. Have you ever come to our Nepal? No, surprising! Indian and not come to Nepal, very surprising indeed!”  
आम्ही क्षणातच मित्र झालो!
“It appears you have met Mr. Raise before,” मी दबत्या आवाजात (in hushed voice) विचारले. तीन दिवसां पूर्वी राईसने त्यांना एअर पोर्ट वरून त्यांच्या हॉटेलवर नेले होते. नंतरचे आमचे संभाषण हलक्या व हुळूवर आवाजात झाले, जेणेकरून राईसला कोणत्याही प्रकारे दुखावू नये.
“He is very possessive about the papers. That’s okay. But he does make one very uneasy and nervous. Doesn’t he?”  मी विचारलं. 
 “But there is this driver. He took us to Universal Studio. He’s Kumar. He talks non –stop, you know. Have you gone to Universal studio?” 
 कुमार विषयीच्या ह्या मताशी मी सहमत नव्हतो. 
 “No, it is in our itinerary. But there is still time for it. Kumar picked us from the airport. He does talk rather … but I think he is quite informative.”

गाडी भर वेगात चालली होती आणि राईस गप्प राहून गाडी चालवीत होता. 
कुमार आणि राईस मधेय जमीन - अस्मानाचा फरक होता (were poles apart).. कुमार गाडी चालवत चालवत प्रत्येक ठिकाणा बद्धल माहिती देई तर राईसला वारंवार लाडीगुडीने (coaxing) विचारला लागत होते. आम्ही शहराचा फेरफटका करीत होतो. विचारल्याखेरीज तो काही बोलत नव्हता. तो मार्गदर्शक म्हणून साजेसा नव्हता. असो. 

क्रमशः कोणती ठिकाणं आम्ही पालथी घातली हे कठीण आहे. पण ही होती ती ठिकाणे :
  •   सुलतान पॅलेस किंवा ईस्टना कंपॉन ग्लॅम हे सिंगापूरच्या राजघराण्याचे निवास्थान होते. सुलतान हुसेन शाह ह्याने आपले सार्वभौम अधिकार ब्रिटिशांकडे स्वाधीन केले. ह्या अधिकार सोपविण्याच्या ऐतिहासिक कराराच्या प्रतीक म्हणून सुलतानाने १८२० साली कोटा राजा (the King’s Enclave) नामक, एक लाकडी राजमहाल बांधला. आणि १८४० मध्ये त्याच्या मुलगा, सुलतान अली सिकंदरने आज उभा असलेला राजवाडा बांधला. राजवाड्याच्या अवती भवती सुलतानाच्या  नातेवाईकांच्या आणि नोकरांच्या कुटुबांसाठी मलाय पद्धतीची ग्रामीण घरं बांधली गेली. ह्या चार भिंतीच्या आंत दडलेल्या वस्तीत सर्व काही उपलब्ध होते - शाळा आणि महाविद्यालये,  कोटा राजः क्लब नामक एक मोठे सुसज्ज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आणि अनेक कर्मणुकींचे केंद्र. १९०४ च्या ब्रिटिशांच्या वटहुमा प्रमाणे सुलतानाच्या वंशजांना राजवाड्यात राहण्याची मुभा होती आणि ते वार्षिक भत्ता मिळणार होता.आता शासनाने हे सारे ताब्यात घेतले आहे. विस्थापित लोकांना मोबदला दिला गेला.आता त्या राजवाड्याचे रूपांतर मलाय हेरिटेज सेंटर मध्ये झाले.
  • मलाय हेरिटेज सिनेटर मध्ये आपल्याला मलाय इतिहास,  त्यांची संस्कृती आणि येथील कला ह्यांचे दारुचं मिळते. येथे  मलाय सुमुदायने केलेले योगदान, त्यांची संस्कृती आणि सर्व इतिहास ह्यांची प्रदर्शनार्थ मांडणी सुंदर पद्धतीने आणि उत्तम रित्या केली आहे.
  • सुलतान मस्जिद - (मोसम) हा सिंगापूरचा सर्वात महत्वाचे मस्जिद. भले मोठे प्रार्थनेचा दिवाणखाना आणि मस्जिदीवर सुंदर, कोरीव व मोठे सुनेरी घुमट  हे ह्या मस्जिदीचे वैशिष्ट.
  • जालान सुलतान टेक्सटाईल सेंटर   (Jalan Sultan Textile centre)
  • सिंगापूरचे प्राणी घर
  • चांगी चॅपेल (Changi Chapel)
  • क्रांजे युद्ध स्मारक (Kranje War Memorial)
  •  आशिया खंडाच्या संस्कृतीचे  संग्रहालय. इथे पर्यटकांना आशियातील लोक इतर भागातून इथे कसे आले, इथे स्थायिक कसे झाले आणि त्यांची प्रगती कशी झाली, ह्यांचा संपूर्ण हितिहासाची जाणकारी दिली जाते. 
  • बुद्धाच्या दांत - अवशेष  मंदिर (Buddha Tooth Relic temple): हे उंच - अनेक मजली मंदिर चायना टाऊन असून हे मलायातील  बौद्ध धर्माच्या लोकांचे प्रार्थना स्थळ आहे (Malay Buddhist Meditation Centre).
  • ८,००,००० चौ. मीटर  क्षेत्रफळ असलेला ऑर्चर्ड रोड, रस्त्याच्या कडेला लावलेली अँगसणं वृक्ष, त्या झाडांच्या बुंध्यापासून येणारा गुलाबांच्या फुलासारखा सुघंध, ऑर्चर्ड फळांची लागवड  आणि रस्त्या लागत असलेली   २२ मॉल्स आणि ६ डिपार्टमेंटल स्टोअर्स किरकोळ विक्रीचे (Retail Sale) - हे सारे जणू नंदनवनच होय (Paradice).
  • विज्ञान केंद्र (Science Centre)
  • मरीना उपसागर (Marina Bay) आणि मरिना चौपाटी (Marina Beach). ही चौपाटी जगातील सर्वात लांब असून तिची लांबी २. कि. मी . इतकी आहे. बिचवर सुंदर सुंदर पुतळे  आणि अनेक उद्याने आहेत. 
  • सिंगापूर फ्लायर (Singapore Flyer): हे एक भला मोठा ५४१ फूट उंच पाळणा  (a giant Ferris wheel), जायंट व्हील प्रमाणे. २८ एअर कंडिशन खोल्या सारखे पाळणे आणि प्रत्येक पाळण्यात २८ माणसे बसू शकतात. २०१४ पर्यंत सिंपूरचे फ्लायर जगातील सर्वात उंच फेऱरीस व्हील मानले जात होते. ह्याचे बांधकाम तीन वर्ष्यांच्या आत पूर्ण झाले आणि २००८ साली सिंगापूर फ्लायरचे उदघाटन झाले. तीन माजली टर्मिनल बिल्डिंग ही सिंगापूर फ्लायरचाच भाग आहे. 

सिंगापूर फ्लायर नंतर आम्ही चौघांनी एका बऱ्यापैकी खानावळीत लंच घेतले. राईस सोबत पुढील प्रवाळ निघालो. वाटेत आणखी एका जोडप्याला बरोबर घेतले. ते जोडपे म्हणजे कानपूरचे अनुराग भट्टाचार्य आणि त्याची पत्नी निकिता. ते गाडीत बसताच आम्हाला राईसच्या वक्तृत्व कलेचचे  प्रदर्शन पाहावयास मिळाले आणि त्याचा तो ध्यास - त्या जोडप्यांचे कागद पत्र तपासून आणि त्यांना प्रश्न विचारून मगच गाडीत घेणे - त्याच्या ह्या पछाडलेल्या वृत्तीशी आम्ही परिचित झालो होतो.

आम्हाला सहाजणांना घेऊन राईसने गाडी भरधाव सोडली. "We have to go fast now.I have seen all your papers. You are going to the Sentosa Island, which includes Cable Car ride, Luge & Sky Ride, Sentosa Beach and finally you will watch Wings Of Time show," ही सारी माहिती राईसने देता देता प्रत्येक ठिकाणी कसे जायचे, कोणत्या नंबरची बस पकडायची, वगैरे  संपूर्ण तपशील आम्हाला सांगितला. " I will drop you here at Cable Car Habour Point. I will pick you again at the other side of Santosa."असे बोलून त्याने आम्हाला केबल कार हार्बर पॉईंटच्या पायथ्याशी सोडले.

सिंगापूरची केबल कार ही एक प्रतिभाशाली आकर्षण होय. दोन तारेवर चालणारी होडीसारखी उद्वाहक
(bi-cable gondola lift) आहे. ही गोंडोला लिफ्ट सम्पूर्ण संगपूर चे शहर, बंदराचे आणि सेंटोसा बेटाचे एक पक्ष्याची नजर देते. (Presents a bird's eye view of Singapore city, the habour and Sentosa).  सिंगापूर मुख्य बेटावरील फॅबर पर्वताचे शिखर (Faber Peak Singapore) आणि कप्पेलबंदराच्या पलीकडे  असलेल्या (across the Keppel Harbour) सेंटोसा रिसॉर्ट आयलंड (the resort island of Sentosa) ह्यांच्यातील सिंगापूर केबल कार एक १६५०मीटर लांबीचा हवाई दुआ -जोड आहे. संपूर्ण बंदर व्यापणारा हा जगातील पहिलाच रोप व्हे (rope-way) असावा. ह्यात ६ स्टेशन आहेत. केबल कार मध्ये ८१ कॅबिन  ज्यात प्रत्येक कॅबिन मध्ये ६ माणसे राहू शकतात आणि एका तासात १४०० यात्री दोन्ही दिशेने मिळून ने -आण होते. प्रेत्येक राईड १५ ते २० मिनिटांची असते. आपल्याला सुंदर फोटो काढण्याच्या भरपूर संधी मिळतात. कॅबीनच्या ३६० डिग्री खिडक्यांमुळे सर्व पूर्ण व बदलता देखावा बाजुंचा आपण बघू शकतो (Panoramic view).

आम्ही इंबिह लूकआऊट (Imbiah Lookout) स्टेशनवर उतरलो आणि निघालो स्कायलाईन ल्युज कडे.  ल्यूज आणि आकाश सवारी (Sky-ride), असे दोन अद्वितीय व  आगळे- वेगळे अनुभव होते (unique experiences). 

सेंटोसा ल्युज हे आशियातले पहिले ल्युज होय. ही अत्यंत मजेशीर आणि धमाल उडवून देणारी  गुरुत्वाकर्षण चालणारी फेरी आहे. ल्युज म्हणजे एकजण बसूशकेल अशी एक चाक असलेली एक गाडी. गाडीत बसायला वयाचे बंधन नाही. १. ४ कि. मी. लांबीचा  ही  उतरण  पार करण्यास चालकाकडेच नियंत्रण असते. खाली जाण्यासाठी चालकाला आपले कौशल्य दाखवायला लागते. ह्या नागमोडी वाटेवर स्टेअरिंग व्हील कसे फिरवायचे, अडथळ्यांवर आपण्या पासून  हॅण्डल - ब्रेक  (पाठी खेचून) मारून कसे थांबायचे, पुन्हा हॅण्डल पुढे करून गाडीला वेग द्यायचा  आणि सुखरूप खाली पोहोचायचे.  फार, फार मजा आली.

 आता आम्हाला घ्यायची होती आकाश सवारी (Sky-ride).  - खरोखर तेथे भली मोट्या पाटीवर लिहिले होते 'Once is never enough'.  खरोखर स्कायलाईन ल्युज [(ल्युज गाडी सवारी) आणि आकाश सवारी (Sky-ride)] एकदाच करणे मनाला तृप्ती देणे अश्यकच असते. स्काय राईड घेण्यास वयाचे बंधन नाहीच, पण त्याच्या आनंद लहान मुलांपासून आमच्या सारखे जेष्ठ नागरिकही घेऊ शकतात. आकाश सवारी करिता चारजण बसू शकतील असे चेअर लिफ्ट (four seater chairlift). आम्ही भाग्यवान होतो (lucky). आम्हाला मिळालेली चेअर लिफ्ट  केवळ आम्हा दोघां साठीच होती (exclusively for just the two of us). आम्ही वरून एखाद्या पेक्ष्या प्रमाणे पाहत होतो. खाली जंगलातून वाट काढत जात असलेला ल्युज ट्रॅकचा नागमोडी मार्ग,  दक्षिण चीनचा समुद्र आणि  झाडांवर बसलेले रंगी बेरंगी काकाकुआ (cockatoos), सेंटोसा बेटाचे इतर वन प्राणी आपल्या नैसर्गिकअन शैलीत. सारे मनमोहक आणि डोळे दिपवून टाकणारे. 

 अनुराग आणि निकिताने ल्युज राईड आणि स्काय राईड दुसरीनंद करण्याचे ठरवले. तुम्हाला सेंटोसा चौपाटीवर भेटू असे सांगून आमी पुढे निघालो. बस न. २ (मोफत) आम्ही 'विंग्ज ऑफ टाइम' शो साठी बीचवर आलो. सेंटोसाचे प्रवास वर्णन लिहिताना मला असे लक्षात आले की  ' समयाचे पंख'  'Wings of Time' साठी एक वेगळा भाग लिहिणे रास्त ठरेल. 


विनय त्रिलोकेकर