Wednesday 10 May 2017

मला चांदोबा सापडले आणि त्याच बरोबर माझे बालपण !




मला 'चांदोबा' सापडले आणि त्याच बरोबर माझे बालपण !

 सोमवारी लोकसत्तेतील अर्थ वृत्तांत वाचला. त्यात 'पुंगीवाला - गाजराची पुंगी' ह्या सदरात  राजा विक्रमादित्य- वेताळाच्या गोष्ट वापरून 'नमो स्वप्नांची' लाभार्थी  गुंतवणूक करण्या संबंधी हा लेख होता. लेखाचा सारांश असा :
राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला. "राजा, चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीचे निकाल अभ्यासल्यानंतर गुंतवणुकीसाठी चार कंपन्यांची नावे तू वाचकांना सांगणार आहेस. आधी वचन दिल्याप्रमाणे या क्रमातील तू निवडलेली तिसरी कंपनी वाचकांना आज सांग. ही कंपनी तू सांगितली नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील," वेताळाने राजाला सांगितले.

" ...  Buy investments as you would buy groceries, not perfumes!l हे वाक्य तुला ठाऊक आहेच. किराणा खरेदी करताना माणूस अतिशय चिकित्सक असतो पण अत्तर खरेदी करताना फारशी चिकित्सा करीत नाही. गुंतवणुकीसाठी शेअर निवडताना चिकित्सक असायला हवे. शेअरची चिकित्सा स्वत: करायला हवी. प्रत्यक्षात आपण शेअर खरेदी अत्तरांसारखी म्हणजे भावनावश होऊन करतो ...." राजा म्हणाला."  ......., "खरेदी करण्याचे धडे देण्यात राजा मग्न व अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे (मूळ गोष्टीत  भंग झाले आणि... ) वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.( आणि शव झाडावर जाऊन लटकू लागले.)

आणि ह्या सोमवारानी मला थेट साठ सालात नेऊन सोडले. आमच्या इतर वर्तमानपत्रांबरोबर दर आठवड्याला इलस्ट्रेटेड विकली हे साप्ताहिक आणि प्रत्येक महिन्याच्या सुरवातीस चांदोबा हे मासिक टाकले जाई. आम्ही सारे, माझ्या चार बहिणी आणि मी, अक्षरशः त्या साप्ताहिक आणि मासिकांवर तुटून पडायचो. 

चांदोबातील चित्र रेखीव आणि सुंदरटर असायचीच पण गोष्टींना साजेशी असत. वपा, शक्ती दास, चित्रा आणि शंकर हे असत मासिकाचे चित्रकार. मासिकाचे मुखपृष्ठ आणि आंतील प्रत्येक पान ह्या चित्रकारांनी सजवलेली असत. 

चांदोबा हे मूळचे रूप म्हणजे चंदामामा जे प्रथम प्रसिद्ध झाले तामिळ आणि तेलगू मध्ये जुलै,१९४७ साली. मासिकाचे बी. नेगी रेड्डी हे संस्थापक आणि पहिले संपादक होते (founder- editor). त्यानंतर १२ भारतीय भाषेत आणि इंग्रजीत भाषेत मासिक प्रसिद्ध होऊ लागले. मासिकात काल्पनिक, पौराणिक (mythology) , महाकाव्य (epics), दंतकथा (fables)  आणि लोकसाहित्याचा (folklore) भरणा असायचा.
 महाकाव्यातील रामायण,कृष्ण गाथा, महाभारत, आणि  भीम- बकासुराचा गोष्टी तसेच ऋषी-मुनींच्या पुरण्यातल्या कथा, दंत आणि काल्पनिक गोष्टी चंदोबात वाचला मिळत. 





 आणि  ऐतिहासिक कथा 
चांदोबाच्या तसे अनेक विषय हाताळले जात. त्यांत माहितीपूर्ण व बोधप्रद लेख असत:

आणि बरेच काही - इसापनीतीतल्या गोष्टी, परी कथा नैतिक व बोधसूचक गोष्टी आणि बातम्या व जाहिरातीही:

 ह्या News Items च्या खालच्या चौकटीत असलेले उंदीर - मांजराचे खेळ जे मला मॅड मॅगझीन मधले 'Spy vs Spy' ची आठवण करून देतात . 
 विक्रम - वेताळ ह्याची मूळकल्पना संस्कृत मधील वेताळ पञ्चविंशति ह्या पौराणिक आणि जादूच्या  २५ गोष्टींच्या संग्रहातून घेतल्या गेल्या किंवा त्यावर आधारित होत्या. पण चांदोबात आजहि त्या गोष्टीची मालिका चालूच आहेत. मूळ गोष्ट कशी सुरु झाली हे मला माहित नाही. पण मालिकेतील प्रेत्येक गोष्टीची सुरवात अशीच असायची:

 

  मला सर्वात जास्त आवडणारी गोष्टीची मालिका म्हणजे धूमकेतू. अतिशय भीतीदायक आणि चित्तथरारक होती. गोष्टी सोबत चित्रकार चित्राने काढलेली सुबक आणि तितकीच  भेदक  चित्रे होती.

सोमवार सारून मंगळवारही गेला. आज आहे बुधवार. तरी मी अजूनही माझ्या लहानपणात आहे. असो!




विनय त्रिलोकेकर

No comments:

Post a Comment