Monday 15 May 2017

पाहिजेत : कार्टून्स आणि कार्टूनिस्ट - भाग १


 पाहिजेत : कार्टून्स आणि कार्टूनिस्ट  - भाग १

 आज आपण सारे आपले 'सेन्स ऑफ ह्यूमर ' विसरत चाललो आहोत! म्हणून पाहिजेत  कार्टून आणि कार्टूनिस्ट   फेसबुकवर. पटापटा अर्ज करा आणि सगळ्यांना आनंद होईल ---- आपल्या फेसबुक वरील फ्रेण्ड्सना नक्कीच!

आजचे हे  दूषित वातावरण पाहून मला वरील जाहिरात फेसबुक देण्याचे सुचले. खरोखर ' Laughter is the best medicines' ह्यांत बरेच सत्य आहे. हसणं आणि हसवणे दोन्ही गोष्टी चांगल्या पण दुसऱ्यांना हसवण्याचा पारडे अधिक जड! म्हणूनच सर्कशीतील विदूषक श्रेष्ठ वाटतो. 'To err is human' हे  'To err is necessary' असे बदलून, तो जगाला हसवीत राहतो.

दशका मागून दशकं सरली आणि तरीही दररोज सकाळची लक्षावधी टाइम्सच्या वाचकांची एकच विधी असायची - फ्रंट पेजवरचे 'You Said It' कॉलम पाहणे आणि दिवसाची हसत हसत सुरवात करायची. आर .के . लक्षमण ह्यांची कार्टून्स, म्हणजे हास्य चित्रे आणि व्यंगचित्रे (caricature) ही सारी त्या त्या वेळचे राजकारण व सामाजिक स्थितीचे अचूक चित्रीकरण करीत. त्यांच्या चित्रांत उपरोधिकता (irony), मर्मभेदकता (sarcasm), विनोद (merriment and not joke) व चटकदारपणा (wit) असायचे पण कटुता मात्र नक्की नाही.  

मला आठवते. १९६५ साल. माझ्या कल्पने प्रमाणे  पाकिस्तानचे जनरल होते याह्याखान. केवळ भारताच्या समाधान साठी अमेरिकेने पाकिस्तानला उघड रित्या युद्ध सामुग्री देण्याच्या  धोरणात थोडा बदल केला. अमेरिकेने पाकिस्तानला संपूर्ण शस्त्रांस्त्र न पुरवता केवळ 'सुटे भाग' (spare parts) देण्याचे काबुल केले . (तसे पूर्वी पासूनच अमेरिकेचे धोरण दुटप्पी असायचे आणि अजूनही आहे. ) लक्षमण ह्यांचे कार्टून असे होते. व्यंग चित्रात जनरल याह्याखान एक कृपण (स्क्रू -screw) हातात पकडून  'एक संपूर्ण पॅ टन टॅंक ह्या स्क्रूवर सुटा भाग म्हणून द्या'  असे अमेरिकन राष्ट्र अध्यक्ष्य लीडनं जॉनशन ह्यांना सांगतात -  " Fix on to this!". अर्थात मला हे दुर्मिळ कार्टून मिळाले नाही.

कामराज हे इंदिरा गांधी ह्यांचे हितचिंतक, मार्गदर्शक आणि सल्लागार , थोडक्यात 'मेंटॉर' होते. पण तरीही त्यांच्यात एकदा खटके उडाले. तेंव्हा लक्ष्मण ह्यांनी 'माय फेअर लेडी' चित्रपटातील एलिझा डूलिटिलच्या   (ऑड्रे हेपबर्न - Audrey Hepburn -हिने साकारलेली भूमिका) प्रोफेसर हेनरी हिग्गिन्स  ( रेक्स हॅरिसन - Rex Harrison) ह्यांना संबोधित केलेल्या   ह्या गाण्याचे दृश्यचा आधार घेऊन एक व्यंग चित्र तयार केले होते :


   लक्ष्मण ह्यांनी हेच गाणे इंदिरा गांधींच्या तोंडी कामराज ह्यांना उद्धेशून असे काहीसे चित्र तयार केले होते.

 
 अर्थात मला हेही  दुर्मिळ कार्टून मिळाले नाही. असो.
गीताचे बोल (lyrics)  इतके सुरेख आहेत की  मला ते येथे लिहायसे वाटतात.



There'll be spring every year without you
England still will be here without you
There'll be fruit on the tree
And a shore by the sea
There'll be crumpets and tea without you
Art and music will thrive without you
Somehow Keats will survive without you
And there still will be rain on that plain down in Spain
Even that will remain without you,
I can do without you!
You, dear friend, who talk so well
You can go to Hartford, Hereford and Hampshire
They can still rule the land without you
Windsor Castle will stand without you
And without much ado we can
All muddle through without you
Without your pulling it the tide comes in
Without your twirling it, the Earth can spin
Without your pushing them, the clouds roll by
If they can do without you, ducky, so can I
I shall not feel alone without you
I can stand on my own without you
So go back in your shell
I can do bloody well
Without you


आणखीएक राजनैतिक लक्ष्मण ह्यांचे व्यंग चित्र असे होते, सात देशांच्या दौऱ्यावर एक राजकारणी आपल्या सहकार्यास विचारतो, "By the way, tell me what bilateral talks I should have and on what and with whom."

  अर्थात त्यांचा मुख्य हिरो 'सामान्य माणूस' (Common Man), अगदी प्रत्येक चित्रात असत असे, अगदी असहाय होऊन साऱ्या परिसस्थितून आपली वाटचाल करीत पुढे जात असतो. खरोखर  तो 'too helpless to change things around him' आणि त्याला हे  माहित आहे. कदाचित त्याला ' the virtues of being speechless' जण आहे त्याचे हे मौन बरेच काही सांगून जाते . आज लक्ष्मण आपल्यात नाहीत , पण ह्या घटकेला बरेच आरडा ओरडा करणारे फार पण ऐकणारे फारच कमी! अशा वेळी आयुष्यात व्यंगचित्रकाराचे महत्व फार! असे म्हणतात हास्य हे एक सर्वात उत्कृष्ट औषध आहे मग व्यंग चित्रकार एक मोठा  डॉक्टर जो आपल्याला दैनंदिन अशी औषधें देतो ज्या मुळे हे कटकटीचे जीवन चवदार, रुचकर आणि स्वादिष्ट बनवतो. त्यांनी रेखाटलेल्या चित्रात आपल्याला आपले हरवलेले स्मित सापडते. आणि समजूतदारपणा आणि शहाणपणाची जाणीव होते.


व्यंग चित्रकाराचा व्यवसाय आज त्यांच्या करीत फार घातक होत आहे. त्यांना यातना, छळ, धमक्या, देशद्रोही असल्याचे आरोप आणि शेवट मृत्यूला देखील सामोरे जावे लागत आहे. का? कारण काहींना त्यांची चित्रे अस्वस्थ करून टाकतात. पण तरीही  आपल्या जीवाची पर्वा न करता ही मंडळी खंबीरपणे न डगमगता आपले कार्य चालूच ठेवत आहेत. 


स्व. आर. के. लक्षमण ह्यांचे हे  स्पष्टीकरणात्मक चित्र इलस्ट्रेटेड विकली किंवा टाइम्स मध्ये फार वर्षां पूर्वी प्रसिद्ध झाले होते. सामान्य माणसाची (कॉमन मॅनची) स्थिती आजही तीच! महागाईच्या काटेरी खडतर मार्गवरुन वाटचाल - पायपीट करीत आणि अनेक समस्यांचे ओझे घेऊन आपला कॉमन मॅन अजूनही कसा हसतो हे कोडे इतरांना आज पण तसेच!
 
लक्षमण हे चित्र रेखीव व सुबक असायचेच पण ते त्यांत असलेल्या बारीक - सारीक आणि लहानसहान गोष्टींकडे देखील  आपले लक्ष ठेवीत. छापखान्यातील (printing press) कोपऱ्यात असलेल्या लहान शिरस-भांडे हे  भव्य छपाई प्रेस यंत्र इतकेच महत्वाचे लक्षमण मानीत. 

माझा हा ब्लॉग लिहीत असताना माझी नजर बाजूला असलेल्या टीव्हीवर  चालू असलेल्या एका मुलाखतीवर  पडली. एका मराठी वाहिनेवर हा कार्यक्रम चालू होता. 'मदर डे' निमित्त कोण एक नटी व तिची मुलगी होत्या . ती आई मोठ्या अभिमानाने सांगत होती की तिच्या ४ वर्षाच्या मुलीला कार्टून म्हणजे काय हेच माहित नाही.  " आम्ही तिला कार्टून आणि चॉकलेटे ह्यां पासून दूरच ठेवले आहे. बघा, पर्वा त्याच्या 'बिर्थ डे' ला केकवर 'पिप्पा' कार्टून हत्तीचे चित्र होते. ती  केक कपात असताना  मी तिला विचारले की हा कोण आहे. त्यावर ती  म्हणाली  'बाप्पा!' आम्ही सारे हसलो. तिला तो गणपती वाटला असावा. "

 मला ह्या गोष्टीचे हसू काही आले नाही. मला त्या बाईची कीव आली. आपल्या मुलीला  'कार्टून' पासून दूर ठेवले ह्यात तिला धन्यता वाटते.  मात्र त्या बिचाऱ्या मुलीला  उपरोधिकता (irony), मर्मभेदकता (sarcasm), विनोद (merriment and not joke) व चटकदारपणा (wit) ह्या मोठ्या विश्वाची ओळख होणार नाही. ह्या साऱ्या प्रसंगाने माझे  मन सुन्न झाले, मला पुढे काय लिहावे तेच सुचेनासे झाले आहे आणि म्हणून मी हा ब्लॉग  भाग १ करून येथेच थांबत आहे. 

                                                                                                            विनय त्रिलोकेकर 

No comments:

Post a Comment